Skip to content Skip to sidebar Skip to footer

वाचा मराठी महिला उद्योजकांचा प्रवास, संघर्ष आणि अनुभव त्यांच्याच शब्दात | marathi women entrepreneurs success story

All about marathi women entrepreneurs : व्यवसाय ही जिद्दीने आणि योग्य नियोजन करून केली जाणारी गोष्ट आहे. आजकाल बऱ्याच लोकांचा कल उद्योग करण्याकडे आहे. पूर्वीच्या काळी लोक नोकरी करून महिन्याचे ठराविक पेमेंट घेऊन जीवन घालवणारे होते. त्यांना व्यवसायाची रिस्क, जबाबदारी, भांडवल, मिळणारे यश, त्यासाठी ठेवावा लागणारा संयम या सगळ्या गोष्टींपेक्षा ठराविक वेळेत काम करून हक्काचा येणारा पगार घेऊन राहण्यात जास्त समाधान मिळत असे.

पण आता ही परिस्थिती खूपच बदललेली आहे. त्यातल्या त्यात परंपरागत चालणारेच व्यवसाय करणे हे तर इतिहास जमा झाले आहे. फक्त पुरुष नाही तर महिला ही त्यांच्या खांद्याला खांदा देऊन रादर त्यांच्याही पुढे जाऊन वेगळे विचार करून त्यात भरघोस यश मिळवत आहेत.

आज अशाच काही महिलांची आपण ओळख करून घेऊया. ज्यांनी चाकोरीबाहेर जाऊन सगळ्यांपेक्षा हटके विचार करून उत्तम पर्याय निवडले आणि आपली छान ओळख निर्माण केली. बरं या सगळ्याच उद्योजिका त्यांच्या त्यांच्या क्षेत्रात खूप यशस्वी आहेत. उत्तम शिक्षणाची पदवी आहे तरीही चोकोरी बद्ध जीवन न निवडता वेगळे पर्याय निवडले आणि त्यात यशस्वी ठरले.

पण यांची वाट सोपी नव्हतीच. अनेक अडचणी आल्या, लोकांनी वेळोवेळी व्यवसायातील धोके सुचवले, कोणी कोणी तर हा काय व्यवसाय असू शकतो का?? अशीही टीपणी केली. बऱ्याचदा आर्थिक अडचण आली तर कधी काम करताना आलेले अनुभव बरच काही शिकवून गेले. तरीही त्या डगमगल्या नाहीत.

बघुया कोण आहेत या यशस्वी उद्योजिका (marathi women entrepreneurs) :

१. वैभवी रेगे

आपल्याकडे हल्ली एकटे राहणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांची संख्या वाढते आहे पण हे ज्येष्ठ नागरिक आपल्या समाजाचे महत्त्वाचे आणि मुख्य घटक आहेत. सध्याचे आधुनिक तंत्रज्ञान त्यांचे आयुष्य सुखावह करण्यासाठी त्यांना मदत करते.

खरतर या तंत्रज्ञानाचा वापर करणे तरुण आणि युवा पिढीसाठी खूपच सोपे असते. त्यांच्या डाव्या हाताचा मळ जणू. आजकालची लहान मुलेही या तंत्रज्ञानाचा वापर अगदीच सहजपणे करताना दिसतात. त्यांना काहीही न शिकवता. पण हेच तंत्रज्ञान वापरणे ज्येष्ठ नागरिकांसाठी अवघड जात आहे. बदलत्या काळानुसार त्यांनाही स्वतःमध्ये बदल करून घेऊन हे शिकायचे आहे.

फेसबुक कसे वापरावे ?? स्काईप कसे वापरावे ?? नेटबुकिंग तसेच आधुनिक ॲप्लिकेशनचा वापर कसा करावा ?? मेल कसे पाठवावेत ?? या सर्व साध्या पण अगदी आवश्यक असणाऱ्या गोष्टी त्यांनाही आमालात आणायच्या आहेत पण हे सगळं शिकवणार कोण ?? हा मुख्य प्रश्न आहे.

ही ज्येष्ठ नागरिकांची समस्या ओळखून ती सोडवण्याचा प्रयत्न केला आहे कमरशियल आर्टिस्ट असणाऱ्या वैभवी रेगे यांनी. हे सगळे वैभवी स्वतः या नागरिकांच्या घरी जाऊन त्यांना शिकवते. त्यामुळे होते काय की यांच्यातील न्यूनगंड कमी होतो आणि ते ही काळाच्या बरोबरीने चालू शकतात.

वैभवी अशा लोकांकडे जातात आणि आठवड्याभरात नेटसावी करतात. त्यामुळे एखाद्या आजी पुरणपोळीचे फोटो अपलोड करतात. तर एखादे आजोबा नाटकाचे ऑनलाईन बुकींग, कोणी भिशी पार्टीला हॉटेल बुक करतात, तर कोणी फूड ऑर्डर करतात. वैभवी यांनी आजवर अशा तीनशेहून अधिक लोकांना नेटची ओळख करून मेन स्त्रिम मध्ये आणले आहे. त्यामुळे त्या ज्येष्ठ नागरिकांच्या आवडत्या झाल्या आहेत. त्या मराठी,हिंदी आणि इंग्रजी अशा तीनही भाषांतून नागरिकांना शिकवतात.

अनुभव :

एका आजीना त्यांच्या मुलाने आधुनिक पद्धतीचा आयपॉड दिला होता. पण दीड वर्षे तो धूळ खात पडला होता. त्या आजीकडे वैभवी शिकवायला गेल्या आणि आठच दिवसात त्या आजी आयपॉड वापरायला शिकल्या. हे जेंव्हा त्यांच्या मुलाला समजले तेंव्हा यावर त्यांचा विश्वास बसेना.
वरवर किरकोळ वाटणारे हे काम समाजाभिमुख आहेत. आपल्या समाजाचे मुख्य घटक असणारे जेष्ठ नागरिकांसाठी हे संवाद साधणारे आहे. २००९ पासून वैभवी यात कार्यरत असून दिवसेंदिवस याची मागणी वाढतेच आहे.

यामुळे जेष्ठ नागरिकांचा वेळ अगदी कारणी लागतो आणि त्यांचे एकटेपण दूर होण्यास मदत होते. अशा नागरिकांसाठी स्वतःचा वेळ काढून काहीतरी करण्याची इच्छा प्रत्येकाच्या मनात निर्माण व्हायला हवी. वैभवी यांच्या वेगळ्या अशा उपक्रमाला उदंड शुभेच्छा.

२. तेजस परुळेकर

आपण सगळे नेहमीच कुठे ना कुठे बाहेर फिरायला जातो. सगळ्यांनाच फिरणे खूप आवडते. वेगवेगळी ठिकाणे बघणे,तेथील संस्कृती, परंपरा, विशेषता समजून घेणे सगळ्यांच्याच आवडीचा विषय. जेंव्हा कधी आपण बाहेर फिरायला जातो त्या त्या वेळी सर्रास हॉटेल्स मध्येच रहातो. सकाळी उठणे, नाष्टा करणे, फिरायला जाणे पुन्हा हॉटेल मध्ये येऊन जेवण आणि झोप घेणे. हे रूटीन असणारा कार्यक्रम आपण करत असतो.

भारताबाहेर बऱ्याच ठिकाणी यावर पर्यायी सोय म्हणून “होम स्टेज” या संकल्पनेची निर्मिती केली आहे. मग हे होम स्टेज काय असते ?? तर होम स्टेज म्हणजे अशी जागा, बंगला / हवेली जिथे जाऊन तुम्ही राहू शकता, जी जागा तेथील ठिकाणच्या परंपरा आणि संस्कृतीशी सांगड घालतात, जणू काही त्या आठवणी पुन्हा जगण्याचा अनुभव देतात.

मस्त आहे ना ही कल्पना ?? आपल्या भारतात असे होम स्टेज का बरे नाही ?? असा प्रश्न युरोप मधील होम स्टेज पाहून आपल्या भारतीय तरुणीला पडला आणि हीच संकल्पना भारतात राबवण्याचा निर्णय त्यांनी घेतला. खरतर हा प्रवास सोपा नव्हता, यासाठी खूप फिरावे लागणार होते, जाणून घ्यावे लागणार होते, लोकांना ही कल्पना पटवून द्यावी लागणार होती पण यासाठी वाट्टेल ते कष्ट करण्याची त्यांची तयारी होती. चाकोरीबाहेर जाऊन काहीतरी वेगळं त्यांना करायचं होत त्यामुळे बऱ्याच अडचणींना सामोरे जाऊन त्यांनी “सॅफरॉन स्टेज” नावाचं पर्यटन स्थळ उभे केले त्यांचं नाव आहे ” तेजस परुळेकर “.

सॅफरॉन स्टेज म्हणजे नक्की काय ?? तर आपल्या भारतात अनेक पर्यटन स्थळे आहेत पण त्या त्या ठिकाणच्या परंपरा, संस्कृतीशी सांगड घालणारे होम स्टेज नाहीत. विशेषता केरळ मध्ये. केरळ मध्ये अनेक पारंपरिक वाडे आहेत पण वर्षातील दहा महिने ते बंदच असतात. केरळ शिवाय अनेक ठिकाणी असे जुने वाडे,बंगले आणि हवेल्या आहेत. त्यांचा वापर करून संस्कृतीशी सांगड घालणारे पर्यटन स्थळ म्हणजेच सफारोन स्टेज.

———————–

तेजस यांनी त्यांच्या कामाची सुरुवात महाराष्ट्र पासून केली. माथेरानचा पारशी बांगला,कमशेत मधील दमदार वाडा, महाबळेश्वर येथील ठिकाणे इत्यादी अशी बरीच ठिकाणे फिरून पर्यटकांसाठी सॅफरॉन स्टेज तर्फे वेगळं पर्यटन साधणाऱ्याना उपलब्ध करून दिले.

हे फक्त रहाणं नाही तर तिथल्या वास्तुशी संवाद साधणे आहे. तेथील संस्कृती परंपरा जाणून घेण्याचा जीवंत अनुभव आहे पर्यटकांसाठी. मग ते माथेरानचा पारशी किल्ल्यातील बावा असो, पारशी फूड वर्क शॉप असो किंवा मग महाबळेश्वरची स्ट्रॉबेरी खुडणे नाहीतर मग मासेमारीसाठी गळ टाकून बसणं असो. तेजस त्यांच्या नवऱ्यासोबत म्हणजेच देवेंद्र सोबत प्रवासाला एक वेगळाच अर्थ देतात. फिरायला येणाऱ्या पर्यटकांची सुट्टी संस्मरणीय करतात.

या कार्यक्रमात तेजस यांनी तेथील स्थानिक लोकांनाही सहभागी करून घेतले आहे. अर्थशास्त्रात आपण याला “मायक्रोएंटरप्रेनिरशिप” असे म्हणतो. इथे पर्यटकांना हवेली किंवा बंगल्याच्या रूपात स्वतःच घर मिळते. हॉटेलमध्ये गेल्यावर जसे ग्राहक आणि कर्मचारी यांच्या मध्ये औपचारिक भिंत असते तसेच त्यांना शिजवलेला त्रयस्थ नम्रपणा असतो तसे इथे घरात राहिल्याचा अनुभव देते सॅफरॉन स्टेज. घराची काळजी घेणारा कर्मचारी वर्गच पाहुण्यांची सरबराई करतो.

हॉटेल सारखे ऑर्डर केले आणि जेवण मिळाले असे इथे होत नाही. घरातल्या लोकांशी जसे प्रेमाने वागतात तसेच इथे सगळे एकमेकांशी प्रेमाने वागतात. हॉटेल सारखे चाकोरीबद्ध जीवन तेजस यांनी आवर्जून नाकारले आहे. तेजस यांनी त्यांच्या या कामासाठी काही स्थानिक लोक मदतनीस म्हणून घेतले आहेत ते आलेल्या पर्यटकांना काय करावे, काय पहावे, वेळ कसा घालवावा याच्यावर मार्गदर्शन करतात. आलेले पर्यटक व्यावसायिक गाईड पेक्षा हा पर्याय आवडीने स्वीकारतात.

बँकेची नोकरी सोडून ५० वर्षे वयामध्ये सुरु केली कंपनी…आता आहे तब्बल ८०० कोटी कंपनीची मालक

कमी खर्चात महिलांना घरच्या घरी व्यवसाय सुरु करता येईल अशा ११ आयडिया

अनुभव :

हे काम करताना तेजस यांना काही विचित्र अनुभवांना सामोरे जावे लागले. काही लोक सहा लोक येणारे अस सांगून बारा लोक घेऊन येतात, येताना स्वयंपाकासाठी महाराज घेऊन येतात, हे हॉटेल नसून घर आहे हे बिनदिक्कत पणें नजरेआड करतात, उर्मटपणे वागतात, तेथील वस्तूंची नासधूस करतात. आपण एका हेरिटेज वास्तूत रहातो याचे त्यांना अप्रूप नसतेच.

यातून तेजस खूप काही शिकल्या आहेत.जसे की सेक्युरिटी diposit घेणे आणि नुकसान झाले तर त्यातून वजा करून घेणे. आपल्याकडे पर्यटन गंभीर पने घेतले जात नाही याचा अनुभव तेजस यांना वेळोवेळी आला आहे. रोजचा दिवस त्यांना नवे काहीतरी शिकवून जातोय. न भांडता ठामपणे नाही म्हणायला तेजस शिकल्या आहेत.

सफरोनची आधीची दर दिवशीची उलाढाल २०००० इतकी होती, आता ती दीड लाखांच्या घरात गेली आहे. भविष्यात फक्त भारतात नाही तर परदेशात सगरोंन स्टेज उभारण्याचे त्यांचा विचार आहे.

३. प्रियांका कोथमिरे

आपण फिरायला जातो त्यावेळी बऱ्याच वेळा आपल्याला थोड्या वेळासाठी किंवा काही तासांसाठी हॉटेलमध्ये रूम हवी असते. कधी कधी आपण रात्री अपरात्री एखाद्या ठिकाणी उतरतो, पण तिथे आपल्याला राहायचे नसते दुसऱ्या ठिकाणी जायचे असते, अशा वेळी एखादे लहान बाळ महिलेच्या सोबत असेल किंवा अगदी महिलांचा समूह जरी असला तरीही महिलांनी वेळी अवेळी बस स्टँड किंवा रेल्वे स्टेशन वर वाट पाहत रहाणे धोक्याचे ठरते किंवा कधी देवदर्शन करण्यासाठी आपण जातो तेंव्हा दर्शन घेण्या पुरते थोडा वेळ रूम हवी असते.

कधी कधी लहान मुले सोबत असतील तर त्यांची नापी बदलण्यासाठी किंवा कधी काहीं महिलांना एखाद्या कार्यक्रमात साडी बदलण्यास साठी , तर कधी कधी प्रवास लांबचा असेल तर एखाद्या ठिकाणी थांबून अंघोळ करण्यासाठी किंवा कधी कधी एखादी डुलकी घेऊन फ्रेश होण्यासाठी आपल्याला थोड्या वेळासाठी रूम हवी असते.

पण हॉटेलमध्ये १२ किंवा २४ तासांसाठी रूम्स असतात त्यामुळे काहीच वेळासाठी इतके दिवसभराचे भाडे भरणे पर्यटकांना पटत नाही आणि परवडत पण नाही. मग अशा वेळी काय करायचे ?? नेमक्या याच अडचणींचा विचार करून त्यावर एक सडेतोड सोलुशन आपल्यातील अशाच एका फिरण्याची आवड असणाऱ्या एका महिलेने शोधून काढले आणि सर्व पर्यटकांना “शॉर्ट स्टे” च्या माध्यमातून उत्तम पर्याय दिला त्यांचे नाव आहे प्रियांका कोथमिरे.

————————–

प्रियांका यांनी FORTREL या कंपनीद्वारे “शॉर्ट स्टे”चा पर्याय उपलब्ध करून दिला आहे. विमानतळावरून लगेच पंचतारांकित हॉटेल मध्ये जाणे खरतर खूप सोयीचे आणि सोपे असते. पण प्रत्येकालाच ते परवडते असे नाही. नेमक्या याच परंपरागत भारतीय मानसिकतेला ओळखून प्रियांका यांनी या व्यवसायाला सुरुवात केली. लग्नसमारंभ, खरेदी, पार्टी, देवदर्शन यासाठी थोडाच वेळ चांगली जागा हवी असते. कधी कधी एका कार्यक्रमातून दुसऱ्या कार्यक्रमात जाण्यासाठी कपडे , मुलांचे नापी बदलावे लागतात. यासाठी ही सेवा एकदम छान आहे.

या कामासाठी प्रियांका यांना खूप चांगला प्रतिसाद मिळत आहे. पण आजकालच्या स्पायकॉमच्या युगात अशा सुविधा जपून वापरायला हव्यात आणि यासाठी प्रियांका सतत दक्ष असते. सगळ्यांची सुविधा त्यातल्या त्यात महिलांची उत्तम सुविधा हा या संकल्पनेचा मुख्य हेतू आहे.

हे काम करताना बऱ्याच लोकांनी या सेवेचा फायदा अनैतिक कामासाठी होऊ शकतो असा इशारा दिला. पण तो इशारा त्यांनी गैरसमजात बदलून टाकला. त्यासाठी प्रियांका यांनी सगळ्याच नामवंत आणि विश्वासार्ह हॉटेल्सशी करार केला. इकॉनॉमिक्स शॉर्ट स्टे हे त्यांचे ब्रीदवाक्य फक्त आर्थिक दृष्टीने सक्षम असणाऱ्यांसाठी नसून समाजाच्या सर्वच स्तरातील स्त्रियांसाठी आहे.

सुरुवातीला ही कल्पना समजून सांगणे हे प्रियांकासाठी एक आव्हानच ठरले. अनेक हॉटेल्स मधील व्यवस्थापक यासाठी तयार नव्हते, यात त्यांचाही काही दोष नव्हता कारण या सेवेसाठी अनेक जोडपी अनैतिक कामासाठी वापर करू शकतात त्यामुळे हॉटेलचे नाव बदनाम होण्याचे शक्यताच जास्त होती. त्यामुळे प्रियांका स्वतः हॉटेलवर राहिल्या आणि लोकांचा विश्वास संपादन केला.

अनुभव :

एका बाळाच्या आई म्हैसूरवरून बंग्रुळल जात होत्या त्यांना साडी नेसायला आणि बाळाला दूध पाजायला रूम हवी होती. त्यांनी ऑफलाईन फॉर्त्रेलशी संपर्क साधून रूम मागितली तर प्रियांका यांनी स्वतः जातीने लक्ष घालून त्यांची व्यवस्थित सोय करून दिली. तर त्या ग्राहक त्यांच्या शॉर्ट स्टे च्या चालत्या बोलत्या जाहिरात झाल्या आहेत.

या सोईचा उपयोग अनेकांना अनेक कारणांसाठी झाला आहे. लोणावळा भुशी dam वर गोंधळ घातल्या नंतर कपडे बदलण्यासाठी, दर्शन घेण्यासाठी, सामान रूमवर ठेवण्यासाठी. ही सेवा देणारे हॉटेल्स सगळीकडे उपलब्ध आहेत. पुणे मुंबईत लग्न सराईत जागा मिळणे कठीण होते ते यामुळे सोपे झाले आहे. आज प्रियांकाचे ९२ शहरात २१६ मोठ्या हॉटेल्स सोबत हे काम चालत आहे.

पुढच्या सहा महिन्यात हे जाळे पूर्ण भारतभर पसरवन्याचा प्रियांका यांचा मानस आहे. यासाठी त्यांना खूप फिरावे लागते, पारखवे लागते पण ही जबाबदारी प्रियांका आणि त्यांचे सहकारी अगदी सहजपणे पार पाडत आहेत.

४ . वैशाली कुलकर्णी

गोष्टी सांगणे हा व्यवसाय असू शकतो का ?? आपल्या कोणाच्याही मनात असा विचारच आला नसेल ना ?? पण हे खरं आहे. सुरुवातीला सतरंजी वर बसून गोष्टी सांगणाऱ्या, शाळा शाळेत जाऊन गोष्टी सांगणाऱ्या या उद्योजिकीने आज स्वतःचे सेंटर उघडले आहे. या उद्योजिका स्वतः फार्मसिस्ट असून त्या क्षेत्रात न रमता गोष्टींच्या जादुई दुनियेत रमणाऱ्या वैशाली कुलकर्णी यांनी २००६ पासून गोष्टी सांगायला सुरुवात केली आहे.

यांच्या घरात आई वडील आजी सगळेच लोक वाचन वेडे असल्याने वैशाली यांनाही वाचनाची आवड उपजतच लागली. वाचनाची आवड असल्याने अनेक कथा रंगवून सांगू शकण्याची त्यांच्यातील कला वैशाली यांना समजली आणि त्याचेच व्यवसायात रूपांतर त्यांनी केले.आमची मुले वाचत नाहीत अशी सगळ्याच पालकांची तक्रार असते पण अशा वेळी मुलांना वाचनासाठी काय द्यावे हे समजत नाही. आजकाल इसापाच्या कथा, हितोपदेश कथा किंवा पंचतंत्र ते अगदी कराडी टेल्स पर्यंत सगळ्या कथा मराठी, हिंदी, इंग्रजी आणि तमिळ अशा भाषेत २-१५ वर्षे वयोगटातील मुलांना वैशाली कथा सांगतात.

फक्त गोष्टी उपदेश प्रमाणे सांगणे म्हणजे कथा सांगणे नाही तर त्या गोष्टीतला उपदेश आणि मर्म मुलांना कळणे महत्त्वाचे आहे. त्यासाठी जादुई दुनियेची सफर त्या मुलांना घडवत असतात त्याची साखळी बनवून मुलांना सांगतात आणि मुलेही खूप आनंदाने हे ऐकून वाचक बनले आहेत.

आजकाल आजी आजोबाच्या मांडीवर बसुन गोष्टी ऐकणे आता काल्पनिक झाले आहे पण हाच अनुभव वैशाली कुलकर्णी अनेकांना देत आहेत. यासाठी त्यांनी एक उपक्रम राबविला आहे २०1५ मध्ये स्वतःची जागा घेऊन दि स्टोरी सेशन असे केंद्र त्यांनी सुरू केले. यात मुले अगदी नाईट ड्रेस घालून इथे येतात आणि कोको पीत गोष्टी ऐकतात. ७:९३० पर्यंत चालणारा हा उपक्रम मुले अगदी आनंदाने एन्जॉय करतात आणि घरी जातात.

५. निशिगंधा पळशीकर

आजकाल सगळीच मुले संगणकाशी परिचित आहेत. पण सगळीच मुले याचा वापर फक्त गेम खेळण्या पुरताच करतात. या मुलांची ऊर्जा आणि क्षमता योग्य ठिकाणी वापरून त्यांचे कौशल्य योग्य ठिकाणी वापरण्याची गरज लक्षात घेऊन योग्य मार्ग देण्याचे काम केले आहे निशिगंधा पळशीकर यांनी. निशिगंधा यांनी प्रोग्रामिंग तर्फे मुलांना प्रशिक्षण देऊन संगणक प्रणाली कशी निर्माण करावी हे शिकवलं. या उपक्रमात MIT च्या सर्च, गुगल ब्लॉक प्रोग्राम आणि प्रणालीतून प्रशिक्षण कार्यक्रम घेतला ज्यात मुले स्वतः संगणकाचे खेळ तयार करतात, ऍप डिझाईन करतात, रोबो मॅनेज करतात म्हणजेच नवी प्रणाली निर्माण करतात.

हे संगणक प्रशिक्षण नाही तर संगणकाला कसे प्रशिक्षित करायचे हे शिकवले जाते. कोडींग शिकवले जाते ज्यात कंपुषक नावाचा यंत्रमानव आहे ज्याला मुले कोडींग द्वारे शिकवतात.यामुळे संगणकाचा वापर अगदी सहजपणे आणि जबाबदारीने होतो. मुलांच्या पालकांनाही यात सहभागी करण्यात येते. निशिगंधा या स्वतः एक संगणक अभियंता आहेत आणि या स्तुत्य उपक्रमातून अनेक भावी शास्त्रज्ञ घडवण्याचा उत्तम उपक्रम त्या राबवत आहेत.

६. विद्या माने

विद्या माने या बी.कॉम झालेल्या आहेत. त्यांना दोन मुली. त्यांच्या पतीची म्हणजेच सुनील माने यांची गोकुळ शिरगाव येथे औद्योगिक वसाहतीत मे. सुनील इंडस्ट्रीज ही चारचाकी वाहनांचे सुट्टे पार्ट तयार करण्याची कंपनी होती. पण अचानक सुनील माने यांना २००० मध्ये हृदयविकाराचा झटका आला आणि त्यात त्यांचे निधन झाले. त्यावेळी त्यांची मोठी मुलगी पाच वर्षांची तर छोटी मुलगी तीन वर्षांची होती.

काळाने झडप घातली आणि विद्या माने यांचे जीवन एका क्षणात बदलले. परिस्थिती इतकी बिकट झाली की कारखाना बंद करण्याची वेळ आली. पण त्यावेळी बँका, पतसंस्थाचे कर्ज आणि सुमारे शंभर कामगारांच्या उदरनिर्वाहाची काळजी या सगळ्यामुळे विद्या मानेंनी पुन्हा कारखाना सुरू करण्याचा निर्णय घेतला.

पदरात दोन लहान मुली, कामाचा नसलेला अनुभव आणि कारखान्याची बिकट परिस्थिती. तरीही त्यांनी निर्णय घेतला आणि कंपनीत गेल्या. त्यात त्यांचे दिर मिलिंद माने आणि महिंद्रा अँड महिंद्रा कंपनीचे काही अधिकारी त्यांच्या मदतीला होते. विद्या पहिल्यांदा कंपनीत गेल्या त्या वेळी गाडीच्या एकाही भागाचे ( पार्ट ) चे नाव त्यांना माहीत नव्हते, कामकाज, उत्पादन, विक्री यातील कसल्याही गोष्टीचा अनुभव नव्हता. पण त्यांनी सगळ्या गोष्टींची माहिती करून घेतली, महिन्या भरात त्यांना सगळ्याची ओळख झाली आणि पुन्हा त्यांनी मागे वळून पहिले नाही.

२००० मध्ये त्यांच्यावर अनेक बँकांचे कर्ज होते, कामगारांचे दोन महिन्यांचे पगार थकले होते, रॉ मटेरियल देणाऱ्या कंपनीचे बील बाकी होते. त्यांना सगळ्या गोष्टींचे कर्ज फेडायला सात वर्षांचा कालावधी लागला. आज विद्या माने यांची कंपनी महिंद्रा अँड महिंद्रा कंपनी साठी चारचाकी गाडीचे सुटे पार्ट तयार करते. लेथ मशीन पासून सी.एन.सी, व्हीं.एम सी मशीन येथे आहेत. कंपनीचा खूप विस्तार केलेला आहे. दोन युनिट वर काम करत असलेली कंपनी आज पाच युनिट वर काम करते आहे. कच्च्या मालासाठी स्वतःची फाऊंड्री सुरू केली असून यात दोनशे कामगार काम करत आहेत.

सुनील इंडस्ट्रीजचे उत्पन्न

दररोज ७०० मॅट्रिक टनाचे उत्पादन होते. २००४ पासून उत्पादन एक्सपोर्ट करण्यास विद्या माने यांनी सुरुवात केली आहे आणि त्यासाठी लागणारे आयएसओ, टी.एस प्रमाणपत्र ही मिळवले आहे. सध्या कंपनीकडून अमेरिकेला सात ते आठ कंटेनर निर्यात केले जातात. याचा वापर अमेरिकेत मायनिंग साठी होतो. यासोबतच देशभरातील चारचाकी वाहनांसाठी लागणारे सुटे पार्ट सुद्धा इथे निर्माण केले जातात.

आज विद्या माने महिलांना रोजगार उपलब्ध करून देण्याचे उपक्रम राबवत आहेत. त्यासाठी सीएनसी मशीन वर महिलांना प्रशिक्षण दिले जाते. त्यांच्या मुली मोठ्या झाल्या असून त्यांनीही आई सारखेच उद्योग क्षेत्रात पाऊल टाकले आहे. मोठी मुलगी मेकॅनिकल इंजिनिअर झाली असून दुसरी मुलगी याच्याच दुसऱ्या वर्षाला शिकत आहे.

विद्या माने यांचा हा प्रवास सोपा नव्हता. यात त्यांना अनंत अडचणींना सामोरे जावे लागले पण त्यावर जिद्दीने मात करून त्यांनी या उद्योगाची भरारी अमेरिकेत पर्यंत पोहचवली आहे. त्यांच्या या नेत्रदीपक कामगिरीला आणि जिद्दीला सलाम. आपणही कोणत्याच परिस्थितीत हार न मानता आलेल्या प्रसंगाना सामोरे जाऊन आयुष्यातील चॅलेंज स्वीकारायला हवेत आणि जिंकून दाखवायला हवेत. अशी शिकवण देतो विद्या माने यांचा जीवनप्रवास.

तर आहे ना हा प्रवास रंजक आणि व्यवसाय हटके. आपणही जगावेगळा हटके विचार करूया आणि त्याचे व्यवसायात रूपांतर करण्याचा प्रयत्न करूया. या सर्वच उद्योजिका आणि तुम्हा सर्वांना तुमच्या यशस्वी प्रवासासाठी मन:पुर्वक शुभेच्छा !!!

======================

marathi goshta

marathi story

marathi moral stories

marathi love story

marathi motivational stories

Leave a Comment

error:

Warning

सध्या युट्युब वर कथा चोरी करून वाचून दाखवण्याचे धंदे चालू आहेत लोकांचे. आमच्या वेबसाईट वरची कथा कुठल्याही युट्युब चॅनेलवर बेकायदेशीररित्या आढळल्यास त्या चॅनेलला लगेच रिपोर्ट करण्यात येईल ह्याची कृपया दक्षता घ्यावी. तसेच आपल्या वाचकांपैकी कुणालाही असे बेकायदेशीर चॅनेल्स आढळल्यास आम्हाला ritbhatmarathi@gmail.com ह्या ई-मेल वर त्वरित कळवावे.