पुरुषमंडळींसाठी सोप्पेसुलभ उखाणे….

©️®️ सौ. गीता गजानन गरुड.
यमुनेच्या काठावर कान्हा वाजवतो पावा
…..चा सहवास मला आयुष्यभर हवा
महाराष्ट्रात मुंबई मुंबईत परेल
….माझी गाते गाणी सुरेल
डहाळीवर बसलैत पोपटपक्षी
…नि माझ्या प्रितीला चंद्रतारे साक्षी
लोणावळ्यात मिळते मगनलाल चिक्की
……घेते एका पायावर गिरकी
मुंबई आहे सात बेटांचे शहर
माझी ….म्हणजे मोगऱ्याचा बहर

आटीव दूध आणले जायफळ घालून
गोडी वाढवली …ने पहिला घोट पिऊन
बाई म्हणायच्या शिस्त म्हणजे शिस्त
…..वरच माझ्या जीवनाची भिस्त
हिरवीगार शेंग शेंगेत मटार
…..ला येते वाजवता गिटार
विहिरीच्या रहाटावरनं सोडली कळशी माझी
……सोडून बाकी साऱ्या आळशी
आंब्याच्या फांदीवर बसलाय कोकीळ
…..आहे पुण्यातली निष्णात वकील

दारात तुळस तुळशीला मंजिरी
…..माझी आहे साजिरीगोजिरी
वडीलधाऱ्यांना करतो जोडीनं नमन
..संगे करायचं आहे मला भारतभ्रमण
उंबरठा ओलांडून सासरी आली
मातपित्यांची लाडकी..
माझी अर्धांगिनी झाली
लहानपणी पाठ होते वीसापर्यंत पाढे
….चं नाव घ्यायला कशाला आढेवेढे
रानात चरत होते दोन तर
….माझी साऱ्यांत सरस

सीतेने हट्ट धरला कांचनम्रुगाचा
….व मी जोडीने संसार करु सुखाचा
ह्रदयासाठी बेस्ट असतो लसूण
…..चं नाव घेतो खुर्चीत बसून
अंगणात चिमण्या थुईथुई नाचता
….ने घातलेले दाणे भरभर टिपतात
भारताची राजधानी शोभे दिल्ली
….कडे माझ्या सुखाची किल्ली
उन्हाळ्यात पितात माठातलं पाणी
…..झाली माझ्या आयुष्याची राणी

पंढरपुरात असतो विठुनामाचा जागर
……चा सुरु झाला घरादारात वावर
रामासोबत सीतामाई वनवासाला गेली
माहेर सोडून…..माझ्या घरी आली
फणसाच्या अंगावर असंख्य काटे
….च्या साथीने आयुष्य सोप्पे वाटे
चांदीच्या ताटात काटेरी हलवा
…..चं नाव घेतो सासूबाईंना बोलवा
चांदीच्या ताटात काटेरी हलवा
…..चं नाव घेतो सासूबाईंना बोलवा

सोन्याची अंगठी अंगठीत हिरा
….म्हणते तुच माझा मोहन
नि मी तुझी राधा
सागरात उठतात लाटांवर लाटा
वाऱ्यावर उडतात….च्या बटा
कुलपात कुलुप गोदरेजचं कुलुप
…..ला कामाचा भारी हुरुप
वरणभातावर वाढलीय तुपाची धार
…..वाहते माझ्या संसाराचा भार
मित्राच्या लग्नात विकेट पडली
जेंव्हा … नि माझी ह्रष्टीभेट घडली

©️®️ सौ. गीता गजानन गरुड.