हरितालिका व्रतादिवशी घेण्यासाठी सुरेख, नवीन १०००+ उखाणे


marathi ukhane for female :
©️®️ गीता गरुड.
भाद्रपद तृतीयेस करतात हरितालिका पूजा
रावांच्या जीवावर करतेय मी मजा
जन्मोजन्मी भोलेनाथ मिळावा पती
याचसाठी पार्वतीने केले होते उग्र तप
माहेरून निघताना आईने दिला कानमंत्र
रावांसारखंच त्यांच्या आईवडिलांनाही जप
शिव व भवानी यांचा त्रेलोक्यात अनुपम जोडा
रावांचे नाव घेते वाट माझी सोडा
देवी पार्वती आहे शिवाची शक्ती
रावांच्या ह्रदयावर सदा माझी जप्ती


हरितालिकेसमोर केली आहे फुलांची आरास
राव माझे नित्य धरतात सत्याचीच कास
पार्वतीने केले होते वाळूचे शिवलिंग
माझ्या संसाररुपी राज्याचे राव आहेत किंग
अंबिकेने केली होती महादेवाची आराधना
रावांच्या सहवासात प्रितीची नसे वानवा
भाद्रपद शुद्ध तृतीयेदिवशी हरितालिका उपवास
रावांचा लाभो मज साताजन्मी सहवास
भोलेनाथ परिधान करतात वाघाचे कातडे
रावांच्या सुखासाठी मागते हरितालिकेकडे साकडे


हातातल्या हिरव्या चुड्यापुढे सोनपाटल्या फिक्या
रावांच नाव घ्यावयास आग्रह करतात सख्या
शिवशंकरासभोवती असतात भुतगण
रावांच्या सोबतीत हरेक दिवस होतो सण
हिमालय पर्वताची कन्या पार्वती
रावांमुळे माझ्या संसाराला गती
भोलेनाथ घालतात सर्पालंकार
राव करतील माझी स्वप्ने साकार
हरितालिका व्रत आहे सर्व व्रतांत श्रेष्ठ
रावांशी माझे लग्न लागले तो मास होता ज्येष्ठ
हरितालिका पुजेसाठी मोडली नव्या साडीची घडी
रावांनी आणली माझ्यासाठी मोत्यांची कुडी


जीवनरुपी सागरात रावांच्या साथीने करते नौकाविहार
सुशील, सज्जन पती लाभला म्हणून मागते देवाचे आभार
गळ्यात घातली मोहनमाळ, नाकात मोत्याची नथ
हो ना करताकरता होते रावांचे नि माझे एकमत
हरितालिका व्रताच्या रात्री
सख्या धरतात फेर
खेळतात पारंपारिक खेळ
गातात जुनी गाणी
होतात थट्टा नि विनोद
रावांचे आवडते वाद्य सरोद
टॉकीजला लागलाय सिनेमा
बाळाचे बाप ब्रह्मचारी
रावांची स्पेशालिटी आहे भेंडी आचारी
पंढरपुरात विठोबा, जेजुरीत खंडोबा
रावांच नाव ऐकायला गर्दी झाली तोबा
अ’कार पीठ माहूर ‘उ’कार पीठ तुळजापूर
‘म’कार पीठ कोल्हापूर आणि ऊर्धमात्रा सप्तशृंगी
आदिशक्तीची साडेतीन पीठे आहेत प्रसिद्ध
रावांसोबत झाले मी विवाहबद्ध


गर्भरेशमी साडीवर जरीची बुट्टी
आज माझे हरितालिका व्रत म्हणून
रावांनी घेतलीय माझ्यासाठी सुट्टी
हरितालिका देवीसाठी गोळा केल्या सोळा पत्री,
बेल, आघाडा , मधुमालती , दूर्वा , चाफा , कण्हेर , बोर , रुई , तुळस , आंबा , डाळिंब , धोतरा , जाई , मरवा , बकुळ, अशोक
रावांच्या सहवासात जगणे माझे निर्धोक
हरितालिकेच्या नैवेद्यात फळे, पंचामृत व खडीसाखर
रावांची माझ्यावर सदोदित प्रीतपाखर
देवघरातल्या करंड्यात आहेत तीन कप्पे
हळद कुंकू अन् अक्षता
रावांच्या दिर्घायुष्यासाठी
टेकते हररितालिकेसमोर माथा
देवीसमोर लावला आहे भीमसेनी कापूर
रावांचे गाव तुळजाभवानीचे तुळजापूर
भाळी कुंकवाचा टिळा म्हणजे सौभाग्याची खूण
रावांचं नाव घेते पंतांची सून


श्रावण सरला नं भादवा आला
हरितालिकेचा निर्जली उपवास केला
वेध लागले गणरायाच्या आगमनाचे
राव करताहेत काम सजावटीचे
साजशृंगार करुन पुजते पहिली हरितालिका
राव माझे श्रीकृष्ण नं मी त्यांची सानिका
पैठणीच्या पदरावर दिमाखात मिरवती जरतारी मोर
रावांच नाव घेते भाग्य माझं थोर
रिमझिम पावसात येतो हरितालिका सण
राव़ास अर्पिले मी तनं, मन, धन
हरितालिका व्रत आचरता लाभते शिवपार्वतीची क्रुपाद्रुष्टी
आजीसासू सांगतात मला रावांच्या धमालगोष्टी
स्वैंपाकघरात चुलीवर शिजतेय फणसाचे सांदण
रावांचे नाव घेते हरितालिकेचे कारण


निसर्गाशी नाते जोडा
संदेश देतो हरितालिका सण
रावांसोबत मजेत जातो
माझा क्षणनंक्षण
सवाष्णीच्या वाणात करंडा,फणी,
गळेसरी,काजळ,हिरवाचुडा
राव व माझा शोभून दिसतो जोडा
महादेवाच्या अर्धांगी वसते माता पार्वती
संसाररुपी रथाचे राव आहेत सारथी
माझ्या पैंजणांचा छुमछुम नाद रावांना खुणावतो
गणेशचतुर्थीआधी हरितालिका सण येतो
गरम पातेलं उचलावयास हाताशी असावी सांडशी
रावांचे नाव घेते हरितालिकेदिवशी
सासरच्या बागेत तरारलेय सुवासिक मालन
रावांचे नाव घेते हरितालिकेचे कारण


तळहातावर रंगलेली मेहंदी प्रेमाचे प्रतिक
रावांचे नाव घेऊन चौरंगासमोर रेखाटते स्वस्तिक
श्रीगणेश व कार्तिकेय उमापार्वतीचे पुत्र
रावांच्या नावाने घालते मी मंगळसूत्र
मोगऱ्याच्या वेण्या माळल्या पार्वती व सखीच्या अंबाड्यात
रावांचा हात धरून फिरते मी टिपुर चांदण्यात
हरितालिका व्रतानिमित्त ओळख होते नानाविध पत्रींची
रावांचे नाव घेते सून…व…ची
अंगी भस्म लावलेल्या महादेवास देवी पार्वतीने वरले
रावांचे नाव घेताना मी चक्क लाजले
हळदकुंकवाने शोभून दिसते सवाष्णीचे कपाळ
रावांसोबत मी फिरून आले भोपाळ


हरितालिका पुजताना वापरले सुवासिक अत्तर
राव आहेत माझे सुखदु:खातील मैतर
महादेवाने जटेत केले गंगेला धारण
रावांचे नाव घेते हरितालिकेचे कारण
हरितालिकेच्या पुढ्यात समयांची जोडी
रावांमुळे माझ्या जीवनात आली गोडी
नाव घे नाव घे आग्रह सख्याशेजारणींचा
रावांसोबत संसार करते मी सुखाचा
कुमारिका असताना करत होते व्रत हरितालिकेचे
रावांसारखा भ्रतार मिळाला आभार मानते देवाचे


हरितालिकेसमोर ठेवले सवाष्णीचे वाण
रावांचे नाव घेऊन राखते सर्वांचा मान