सगळे मित्र मैत्रिणी क्लास मध्ये बसले होते आणि संजय धापा टाकत lecture सुटून जाऊ नये म्हणून पळत पळत आला आणि आपल्या जागेवर जाऊन बसला…सगळ्यांची नेहमीप्रमाणे गप्पाष्टक रंगली होती…अंजली मात्र तिच्या आवडीच्या कवीची कविता वाचण्यात गर्क होती…इतक्यात अंजलीला मंजिरी खिजवत म्हणते..
मंजिरी – आहे बाबा अजयनंतर जागा घेणाऱ्या मिस कवयित्री…कुठल्या कवीची कविता वाचतीय…जरा कळू तरी दे आम्हाला…
अंजली – अग…कवी ‘अनुराग’ आहे खूप मस्त असतात याच्या कविता…माझ्या मते हे पाहिलंच प्रकाशन आहे त्याच पण असं वाटत मला खूप जवळून ओळखतो कि काय…
संजय – [त्यांचं बोलणं ऐकून म्हणतो..] बापरे…चक्क…कवी याना जवळून ओळखतो…पण या ओळखतात का समोरच्यांना…
अंजली – संजय…मी सकाळपासून पाहते काही ना काही उपरोधिक बोलतोयस तू…पण विषय वाढवायचा नाही म्हणून मी गप्पं बसतीय पण याचा फायदा घेऊ नकोस तू… [इतक्यात ज्यांचं lecture आहे त्या मॅडम क्लास मध्ये येतात आणि दोघेही शांत बसतात]
पूर्ण तास अंजलीच लक्ष नव्हतं….कसा-बसा कॉलेज चा पहिला दिवस जातो आणि अंजली नेहमी आनंदित होऊन घरी जायची पण आज हताश होऊन घरी गेली…
आई – काय ग अंजली…आज असं काय तोंड पाडून आलीय ..तबियत बरी आहे ना ? कॉम्बीफ्लाम देऊ का ?
अंजली – नको अग आजारी नाहीय मी…जरा मूड ऑफ झालाय माझा..
आई – तू फ्रेश होऊन ये…मी चहा करते तुझ्यासाठी…
अंजली – हो आई …दे ग खरंच खूप गरज आहे चहाची…
आई – घे चहा ठेवलाय इथे…
अंजली – वाह..! मस्त झालाय चहा…ममा…यु आर सो स्वीट…!
आई – आणखी स्वीट म्हणशील …जर पुढची बातमी ऐकलीस तर..
अंजली – कुठली बातमी…?
आई – अग या वर्षाअखेरीस लग्नाची तारीख ठरवून आलोय आम्ही दोघे आज…
अंजली – [लाजत ] खरंच…खूप लवकर होतंय ग लग्न…! माझ्या तर पोटात गोळा आलाय भीतीने…
आई – अगं…वेडाबाई सगळ्याच मुलींच असंच होतं…माझी काय वेगळी अवस्था होती…मलाही असंच वाटलं होतं …तेव्हा तर किती जुन्या विचारांची माणसं होती…त्यामानाने अभयराव खूप समंजस आहेत…आणि कसली ग भीती..? आम्ही आहोत ना…!
अंजली – नाही ग आई…पण तुम्हाला सोडून जाताना जी हुरहूर लागतीय ना…म्हणून जायचं मन होत नाहीय
आई – हे बघ…सगळ्या मुलींना असं स्ट्रॉंग व्हावेच लागते..आणि अभयराव तर मुंबईला शिफ्ट होणार आहेत कि लग्नानंतर…मग ह्यांची बदलीही पुढच्यावर्षी मुंबईला असणार आहे..मग मी तर किती जवळ राहील तुझ्या…मग तर खुश…
अंजली – हम्म…[लाजून आपल्या रूममध्ये जाते]
पाहता-पाहता कॉलेज च्या स्पर्धा,क्रीडास्पर्धा वार्षिक स्नेहसंमेलन होऊन जात शिवाय फर्स्ट सेमिस्टर सुद्धा होऊन जात…या सगळ्यात सगळे मित्र मैत्रिणी अजयला खूप मिस करत असतात कारण सगळ्या activities मध्ये अजय भाग घ्यायचा आणि पारितोषिकही पटकवायचा पण त्यांचा वर्ग पारितोषिकापासून यावर्षी लांबच राहिला कारण अजयची कमी कुणीही भरून काढणारं नव्हतं…अजय मात्र अधून मधून संजयची चौकशी करायचा…
अजय – हॅलो…संजय कसा काय आहेस..?
संजय – मी कसा असेल रे…तुझ्याशिवाय…ऐकत असतो कौतुक त्या माकडाच…ते जाऊ देत…रे पण कॅन्टीनला तुझ्याशिवाय मजाच येत नाही रे..पुणे काय म्हणतंय..?
अजय – ‘पुणे तिथे काय उणे’ असं म्हणतात ना…मस्त रमलोय इकडे…आणि तू जर अंजलीला टॉन्ट देत असशील ना तर ते करू नकोस हा…नाहीतर तिला कळेल..
संजय – कळू देत कि मग…खरं आहे ते आहे आपण नाही घाबरत कुणाच्या बापाला…!
अजय – कृपा करून असं काही करू नकोस…नाहीतर मला वाईट वाटेनं…तुला आपल्या मैत्रीची शप्पथ…
संजय – घातला ….घातला राव…
अजय – काय घातला…
संजय – माझ्या वर्मावर घाव घातला….मैत्रीची शप्पथ घातली म्हणून…नाहीतर केव्हाच…इंगा दाखवला असता..
अजय – डोकं शांत ठेव आणि थोडासा खुनशी स्वभाव सोड…
संजय – सोडला भावा…तुमच्यासाठी काय पण…!
अजय – चल…जातो मी लाइब्ररीत…बाय
संजय – बाय…अशीच आठवण ठेव रे बाबा..!
आणि इकडे अंजलीच्या लग्नाची तयारीही जोरात सुरु असते घरात दाग-दागिने,उंची कपडे, लग्नपत्रिका,गोड-धोडाचे पदार्थ अगदी घर भरून आलं होतं आणि अभयच्या घरीही सुनेसाठीचे दागिने,साड्या आणि नातेवाईक अगदी उल्हसित वातावरण होत दोघांचे ही बोलणी होत होती शिवाय अंजलीच्या वार्षिक परीक्षा ही येऊनच ठेपल्या होत्या आणि एकीकडे परीक्षा आणि दुसरीकडे लग्नाची तयारी असं तीच रुटीन चालू होतं त्यामुळे अभयशी बोलणं फार कमी होत असे अंजलीच्या वडिलांनी लग्नाचा बार खूप धुमधडाक्यात करायचं ठरवलं ठरवल्याप्रमाणे एका lawns मध्ये लग्न करायचे ठरले… .एव्हडी लग्नाची धामधूम पण अंजली आवडत्या कवीच्या कविता आवर्जून वाचत होती…कवी ‘अनुराग’….शिवाय कविता वाचता वाचता उखाणेही मस्त तयार करून ठेवले होते…
लग्नाचा दिवस उजाडला आपल्या परीक्षा संपवून अंजली आपल्या आयुष्याची परीक्षा द्यायला सिद्ध झाली ..भरजरी शालू , अंगभर दागिने,पायात पैंजण,आणि मेहंदी याने तिचे सौन्दर्य अधिकच खुलून दिसत होते…अभयही खूप मस्त आपल्या बायकोला साजेसा असा तयार झाला आणि दोघांनीही मंगलाष्टक झाल्यावर एकमेकांना पुष्पहार घातले आणि मस्तपैकी फोटोस काढणं आपल्या मैत्रिणी आल्या त्यांच्यासोबत फोटोस असं जंगी सोहळा झाला…अंजलीची नजर मात्र सारखी अजायलाच शोधात होती…कारण खूपदा अंजलीने अजयला संपर्क साधण्याचा प्रयत्न केला पण अंजलीच्या प्रयत्नांना यश आले नाही…पण शेवटचा प्रयत्न म्हणून अंजलीने पत्रिका संजयने सांगितलेल्या पत्त्यावर पाठवली होती म्हणून अंजलीचे डोळे अजयला शोधतं होते…पण खूप उशीर झाला होता अजय लग्नाला आलाच नाही…पण अंजलीला एक भेट जरूर पाठवली होती…अंजलीने कुतूहलाने…बॉक्स ओपन केला त्यात तिला भेट पाहून खूप आनंद झाला भेट होती….एक गुलाबाचं…चांदीचं फुल…फुलं इतकं आकर्षक होत…कि कुणीही त्या फुलाकडे पाहत राहील.. आभार मानायचे पण कसे मागणार…
पुढचा भाग लवकरच आपल्या भेटीला पाहुयात लग्नानंतरची परीक्षा चोख पार पडतेय कि नाही ते….

प्रतिभा सोनवणे
मी प्रतिभा. गृहिणी आहे. लिहायचा अनुभव नव्हता पण लिहिता लिहिता लिखाणाची आवड निर्माण झाली आणि मनात असलेल्या भावना रीतभातमराठीच्या व्यासपीठावर कथा स्वरूपात छापल्या.