Ritbhatmarathi

Search
Close this search box.

मायबोली मराठी मधून रेसिपीस चे व्हिडिओज युट्युब वर टाकून आज कमावते करोडो रुपये…

madhura bachal information:

कधी कधी काही गोष्टी आयुष्यात अपघाताने घडतात. म्हणजे काहीच गोष्टी न ठरवता आपल्या आयुष्याला वेगळेच वळण लागते पण अतिशय चांगल्या अर्थाने. आणि आयुष्य बदलून जाते. असे बदल प्रत्येकालाच हवे असतात.

आज अशाच एका यशस्वी उद्योजिका बद्दल आपण जाणून घेणार आहोत ज्या स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये काम करत होत्या. पण प्रसूती रजा चालू असताना अचानक त्यांच्या डोक्यात एक कल्पना आली आणि त्यांचे आयुष्य त्यांच्याही नकळत बदलून गेले. अख्या महाराष्ट्राला आपल्या अस्सल आणि पारंपरिक महाराष्ट्रीयन पदार्थांची ओळख करून देणाऱ्या पाककौशल्यात निपुण मिसेस मधुरा बाचल.

मधुराज रेसिपीज ही त्यांची ओळख आज जगभर पसरलेली आहे असे म्हणायला हरकत नाही. आज लाखो लोक त्यांचे पाक कौशल्य यूट्यूबच्या मदतीने अनुभवत आहे. मूळच्या पुण्याच्या असणाऱ्या मधुरा ताई २००९ मध्ये आपल्या पतींसोबात शिकागो येथे एस.बी.आय मध्ये काम करत होत्या. पण थोड्याच दिवसात त्या आई झाल्या आणि प्रसूती रजेमुळे घरातच होत्या. त्या दरम्यान बराच वेळ त्यांच्या हातात रहात होता.

त्यामुळे सुट्टी दरम्यान काहीतरी महाराष्ट्रीयन अस्सल चवदार पारंपरिक जेवण बनवावे असा विचार त्यांनी केला.पण आश्चर्याची गोष्ट म्हणजे बऱ्याच महाराष्ट्रीयन रेसिपीज खूप शोधूनही सापडल्याच नाहीत. ते पदार्थ अस्सल नव्हते असे मधुरा ताई म्हणतात. त्यामुळे त्या निराश झाल्या आणि अचानक त्यांच्या डोक्यात विचार आला की आपण स्वतःचे काहीतरी असे बनवावे जे पारंपरिक, अस्सल आणि चवदार असेल. त्यांना लहापणापासूनच स्वयंपाकाची आवड होती आणि त्यांच्या आजी स्वयंपाकात खूपच निपुण होत्या. त्यामुळे आजीकडून त्यांना अनेक गोष्टी त्यांना मिळालेल्या होत्या.

मधुरा ताईनी ठरवले की स्वतःच्या हाताने या रेसिपी कशा बनवायच्या ते लिहायचे आणि ब्लॉग रुपात पोस्ट करायचे. त्यांची पहिली लिहलेले रेसिपी होती “भरलेले वांगे”. त्याच वेळी फेसबुक नव्यानेच प्रसिध्दीस आले होते. त्यावर ब्लॉग पोस्ट करून त्यांच्या ओळखीच्या लोकांना म्हणजेच मित्रमंडळी आणि नातेवाईक यांना बघण्यास सांगितले. एका नंतर एक अशा अनेक रेसिपी पोस्ट करत गेल्यावर त्यांचे फोलोइंग वाढत गेले. म्हणजेच रेसिपी बघणाऱ्या लोकांची संख्या वाढत गेली. नंतर मधुरा ताईनी स्वतःचे यूट्यूब चॅनल सुरू केले ज्याचे नाव होते “मधुराज रेसिपी”. यानंतर मात्र मधुरा ताईनी मागे वळून पहिले नाही.

असं म्हटलं जात कि जोड्या स्वर्गात बनवल्या जातात पण ह्याने तर तब्बल लाखो जोड्या बनवल्या.

करोडो रुपयांची नोकरी सोडली आणि स्वतःचा व्यवसाय चालू केला. आज नवऱ्यासोबत चालवतेय स्वतःची कंपनी

मधुरा ताईचे यूट्यूब चॅनल जेंव्हा प्रसिद्धीस यायला सुरुवात झाली तेंव्हा लोकांच्या वेगवेगळ्या पदार्थांच्या अनेक मागण्या यायला सुरुवात झाली तशा मधुरा ताई त्या पूर्ण करत केल्या. जशी पदार्थांची मागणी वाढत गेली तशीच मधुरा ताई पदार्थात वापरत असलेल्या मसाल्यांची मागणी पण वाढू लागली. मधुरा ताई त्यांच्या रेसिपीमध्ये जुने, परपरिक आणि पाककृती पूर्ण मसाले वापरत असत. अनेक मागण्या आल्यावर त्यांनी रेसिपी बुक पण तयार केले आणि मसाल्यांचा उपक्रम सुरू केला ज्याचे नाव होते मधूराज रेसिपी मसाला.

ऑक्टोबर २०१८ मध्ये तीन मासाल्यांसह सुरू केलेला हा उपक्रम तीन वर्षात सात मसाल्यांवर येऊन पोहचला. त्यात गोडा मसाला, कांदा लसूण मसाला, बेडगी मिरची मसाला, मालवणी मसाला, स्पेशल काळा मसाला, मिसळ मसाला आणि पावभाजी मसाला यांचा समावेश आहे.

मधुरा ताईच्या रेसिपी प्रमाणेच प्रेक्षकांनी त्यांच्या मासाल्याना भरभरून प्रतिसाद दिला. एकाच महिन्यात त्यांना तब्बल तीन हजार ऑर्डर मिळाल्या. इतकेच नव्हे तर आज अनेक मोठ्या दुकानात जसे की बिग बाझार, रिलायन्स फ्रेश तसेच इ कॉमर्स सारख्या म्हणजे फ्लिपकार्ट, अमेझॉन सारख्या दुकानात ऑनलाईन मसाले उपलब्ध आहेत. यांचे उत्पादन पुण्यात होते.

पण मधुरा ताईसाठी रेसिपीचे ज्ञान मिळवत व्हिडिओ बनवणे आणि त्याच बरोबर मसाल्याचे प्रमोशन तसेच उत्पादन बनवणे एक चलेंज होते. पण ते त्यांनी लीलया पेलले. त्या म्हणतात मी आधी एक रेसिपी निर्मिती आहे आणि मगच उद्योजक. भविष्यात अजून भारतीय पारंपरिक पदार्थात आणि अजून मसाले वाढवण्याचा विचार आहे असे मधुरा ताई म्हणतात.

आपल्या पाककौशल्यावर आज त्यांनी मिळवलेले यश हे खूप कौतुकास्पद आहे. त्या आधारे त्यांना आज पैसा, प्रसिध्दी, नाव सगळे काही मिळाले आहे. ते असेच टिकून राहो हीच इच्छा. त्यांच्या पुढच्या वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा.

=============

हेही वाचा

marathi goshta

marathi story

marathi moral stories

marathi love story

marathi motivational stories

Share your love
Facebook
Twitter

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *