भारतातील काही व्रत-वैकल्ये आणि सण – २०२२

list of indian festivals: सण हे प्रत्येक देशात साजरे केले जातात पण भारतात प्रत्येक सणांचा एक असा वेगळाच अंदाज आहे,कौटुंबिक प्रेम,भाऊबंदकी किंवा सामाजिक व्यवस्थेला अनुसरून सणांची काही महत्वाची टोकं आहेत आपल्या संस्कृतीमध्ये प्रत्येक सणाला एक अशी खासियत आहे ज्याला अनुसरून आपली सण साजरे केले जातात विशेषता अशी की निसर्गाला अनुसरून प्रत्येक सण साजरा केला जातो हवामानातील ऋतुमानानुसार प्रत्येक सण येत असतो आणि या वातावरणाला अनुसरूनच सण साजरे केले जातात.
१. आपल्या संस्कृतीतील व्रत-वैकल्य आणि सण
आपल्या भारतात विविध संस्कृती गुण्यागोविंदाने नांदत आहेत त्यामुळे अगदी विविधतेमध्ये एकता असल्यासारखं प्रत्येक भारतातल्या त्या-त्या राज्यात अगदी उत्साहात सण साजरे केले जातात त्याचंच विवरण आपण करणार आहोत.
२. भारतातील महत्वपूर्ण सांस्कृतिक सण उत्सव [ तारखेनुसार ]
३. भारतातील काही धार्मिक सण
४. एकादशी व्रत आणि तिथी
हिंदू शास्त्रानुसार एकादशी ही तिथं खूप अनन्यसाधारण अशी समजली जाते…विशेषतः वारकरी संप्रदायात या तिथीला विशेष असे महत्व आहे…एकादशीच्या दिवशी संपूर्ण दिवस उपवास केला जातो…आरोग्याच्या दृष्टीने काहीजण उपवास करतात तर काही जण धार्मिक दृष्ट्या उपवास करताना दिसतात…आरोग्याच्या दृष्टीने अशासाठी म्हंटल कारण एकादशी ही १५ दिवसांनी येत असते त्यात आपल्या पचनशक्तीवर लंघन करणं हा सर्वोत्तम असा उपाय मानला जातो कारण सारखं पोटात काही ना काहीतरी खात राहणं म्हणजे पचनशक्तीला आराम न देणं असं समजलं जात म्हणून आपल्या पचनशक्तीला आराम म्हणून लंघन केले जाते…म्हणूनच आरोग्याच्या दृष्टीने एकादशीला अनन्यसाधारण असे महत्व आहे.एकादशी ही भगवान विष्णूला स्मरून केली जाते प्रत्येक वर्षात एकूण २६ एकादशी असतात प्रत्येक एकादशीची अशी एक पौराणिक कथा आहे. खाली आपण प्रत्येक एकादशी नेमकी कधी येते हे आपण पाहणार आहोत.
तर अधिक महिन्यातील काही एकादशीची नावे यात दिलेली आहेत पण खरे पाहता अधिक महिना हा तीन वर्षानंतर येत असल्याने त्या एकादशीची तारीख नमूद केली गेली नाही याची नोंद वाचकांनी घ्यावी.
हेही वाचा
महालक्ष्मी मंदिर कोल्हापूर माहिती व इतिहास
५. पौर्णिमा
हिंदू पंचांगानुसार प्रत्येक महिन्यात दोन पक्ष असतात शुक्ल पक्ष आणि कृष्ण पक्ष जे नेहमी अमावास्या आणि पौर्णिमा यामध्ये येतात किंवा पौर्णिमा आणि अमावास्या या दोन्हीच्या मध्ये येत असतात.प्रत्येक वर्षात १२ पौर्णिमा असतात.पौर्णिमेच्या दिवशी किंवा एक दिवस आधी सत्यनारायण देवाची पूजा केली जाते कारण त्या दिवशी पूजेचे महत्व असते.पूर्णिमेच्या दिवशी चंद्र मात्र पूर्ण स्वरूपात असतो ज्या दिवशी उपवासाचे महत्व असते खूप नियमानुसार उपवास हिंदू धर्मात केला जातो.पुढील प्रमाणे पौर्णिमा हि तारखेप्रमाणे मांडलेली आहे.
६. अमावास्या
अमावास्या हि हिंदू कालमापनातील तिसावी तिथ आहे ज्यादिवशी पृथ्वीवरून चंद्राचा भाग न दिसता अप्रकाशित भाग दिसतो ती तिथी अमावास्या असते प्रत्येक अमावास्येला आपल्या हिंदू संस्कृतीत महत्व आहे म्हणूनच दर महिन्यातल्या अमावास्येला काही ना काही तरी संबोधतात याचीच माहिती आणि अमावास्येची तारीख पुढील रकान्यात मांडलेली आहे.
७. शेतकऱ्यांचे काही सण
८. तिथी
हिंदू संस्कृतीमध्ये तिथींना विशेष असे महत्व आहे प्रत्येक तिथीवर उपवास असतो किंवा कुठल्याही देवतेची पूजा हिंदू संस्कृतीमध्ये केली जाते याचेच विवरण खालीलप्रमाणे केले आहेत.
९. मुस्लिम सण समारंभ
भारतामध्ये कित्येक जाती आणि धर्मांचा समावेश आहे म्हणूनच भारतात विविधतेमध्ये एकता असलेली आपल्याला दिसून येते भारत हा एकमेव असा देश आहे जिथे प्रत्येक जात आपला सण आपल्या आपल्या पद्धतीने साजरा करते म्हणजेच स्वतंत्रतेने साजरा करते कारण भारतात वैचारिक दृष्ट्या सर्व जातीपातींना आपले सण आपल्या पद्धतीने साजरे करता येतात.म्हणूनच इस्लामिक सण खालीलप्रमाणे सूचित केलेले आहेत.
हीच तर आपल्या खऱ्या भारताची ओळख आहे विविधतेत एकता अशी. प्रेम,बंधुत्व हेच तर या सण समारंभाचे खरे स्रोत आहेत. सामाजिक हेतुपरत्त्वे सणानं एक विशिष्ट असं महत्व आहे आणि यानेच आपली संस्कृती टिकून आहे.
==============