Skip to content Skip to sidebar Skip to footer

अमेरिकेतील बलाढ्य पगाराची नोकरी सोडून स्वतःचा व्यवसाय चालू केला. ११ वर्षातच बनवली अडीच अरब करोडोंची कंपनी | lenskart owner peyush bansal information in marathi

आपल्या भारतातील असेच एक यशस्वी व्यावसायिक ज्यांनी लहानपणापासून व्यवसाय करायचे ठरवून,मायक्रोसॉफ्ट मधली चांगल्या पगाराची नोकरी सोडून व्यवसाय करण्याचा निर्णय घेतला आणि यशस्वीपणे पूर्ण सुद्धा केला. आज त्यांच्या व्यवसायाचे नाव यशस्वी स्टार्टअप मध्ये अग्रभागी घेतले जाते. त्यांनी फक्त स्वतःसाठी व्यवसाय केला नाही तर बऱ्याच लोकांना कंपनी मोठी करून रोजगार संधी निर्माण करून दिली.लेन्सकार्टचे संस्थापक आणि सीईओ,मुख्य कस्टम अधिकारी,जैकल्सचे सह संस्थापक आणि सध्याच्या सोनी टीव्हीवर दाखवल्या जाणाऱ्या व्यवसायावर आधारित शार्क टेंक इंडियाचे जज पियूष बन्सल (lenskart owner peyush bansal information in marathi)यांच्याविषयी जाणून घेऊया.

कुठलाही व्यवसाय करायचा म्हटल की त्यात धोका हा असतोच.मग गुंतवणूक आली, जम बसण्यासाठी संयम ठेवणे आले,शिवाय जागा बघणे, व्यवसायाची कल्पना कितपत यशस्वी ठरते,ग्राहकांचा कल, या सगळ्याच गोष्टींना वेळ द्यावा लागतो,पटकन निर्णय घ्यावे लागतात त्यामुळे व्यवसाय म्हटलं की सगळेच जरा विचार कचरतात.पण काही लोक मात्र आधीपासूनच व्यवसाय करायचे हे ठरवूनच पाऊले टाकतात.व्यवसायासाठी त्यांची धोका पत्करण्याची आणि होणाऱ्या परिणामांना स्विकारण्याची तयारी असते. पियूष बन्सल यांच्याविषयीची माहिती जाणून घेऊ या.

पियूष बन्सल यांचा जन्म २६ एप्रिल १९८५ मध्ये नवी दिल्ली,भारतात झाला. त्यांचे पालन पोषण त्यांच्या आई आणि वडिलांनी खूप चांगल्या प्रकारे केले. पियूष बन्सल घेतील त्या प्रत्येक निर्णयात त्यांच्या आई वडिलांनी खूप पाठिंबा दिला. पियूष बन्सल यांना अगदी लहापणापासूनच व्यवसाय करायचा होता,वेगळे काहीतरी करायचे होते,त्यामुळे त्यांना जे काही मिळाले त्यातील उत्तम त्यांनी निवडले.

शिक्षण : सुरुवातीचे प्राथमिक शिक्षण त्यांनी दिल्लीतील डॉन बॉस्को या विद्यालयात घेतले तर कॉलेज मधील शिक्षण त्यांनी मैकगिल विद्यापीठ ऑफ कॅनडा येथे केले,येथे त्यांनी इलेक्ट्रॉनिक अभियांत्रिकी ही पदवी मिळवली तर पोस्ट ग्रॅज्युएशन आय.आय.एम बेंगलोर येथे संपादन केले.

पियूष बन्सल यांना शिक्षण पूर्ण झाल्यावर लगेच अमेरिकी सॉफ्टवेअर मायक्रोसॉफ्ट येथे नोकरी मिळाली होती. आय.आय.एम मधले शिक्षण घेतल्यानंतर बन्सल यांनी मायक्रोसॉफटमध्ये प्रोग्राम मॅनेजर या पदावर एक वर्ष काम केले. पण बन्सल यांना नोकरी करायची नव्हती,स्वतःचे वेगळे असे काहीतरी करायचे होते,वेगळी ओळख निर्माण करायची होती. बन्सल यांना ऑनलाईन पद्धतीने चष्मा विकायचा होता,पण त्यासाठी लागणाऱ्या कामाचा त्यांना अनुभव नव्हता. व्यवसायासाठी लागणाऱ्या सगळ्याच गोष्टींचा बन्सल यांनी नीट विचार केला,आकडेमोड केली आणि मग व्यवसायात उतरायचे ठरवले. याच दरम्यान प्रोग्राम मॅनेजर म्हणून काम करत असताना जॉन जेकब्स, एक्वालेन्स सारख्या कंपन्यांची साखळी शोधण्याचे काम त्यांनी केले. नोकरी सोडून भारतात परत येण्याचे त्यांनी ठरवले आणि सगळ्यांनीच त्यांना विरोध केला पण त्यांच्या आई वडिलांनी याही निर्णयात त्यांना पाठिंबा दिला आणि आपल्याच देशात काहीतरी वेगळे करण्यासाठी बन्सल आले.

ते भारतात आले त्यावेळी ई- कॉमर्सचा खूपच बोलबाला होता. बन्सल यांनी मार्केटची स्थिती जाणून घेण्यासाठी सर्च माय कॅम्पस ही सुविधा सुरू केली. यात विद्यार्थ्यांसाठी पुस्तके,हॉस्टेल सुविधा, पार्ट टाईम नोकरी शोधण्यासाठी मदत केली जात होती. विद्यार्थ्यांना कोणत्याही अडचणीत मदत करणे हाच त्यामागे उद्देश होता. बन्सल यांनी सर्च माय कॅम्पसला ई- कॉमर्सच्या दुनियेत नेण्याचा निर्णय घेतला कारण ई- कॉमर्स त्यावेळी बाजारात खूप चालत होते आणि हेच बन्सल यांचे यश होते. बन्सल यांनी या प्रोजेक्टवर तीन वर्षे काम केले,याचा फायदा असा झाला की भारतीय ग्राहकांचे वागणे आणि मागणी काय आहे याचा सविस्तर अभ्यास त्यांना करता आला.

याच ग्राहकांच्या मागणीनुसार त्यांनी चार वेगवेगळ्या प्रकारच्या वेबसाईट सुरू केल्या,त्यापैकी एक होती आयवीआर आणि बाकीच्या तीन वेबसाईट या युवकांना केंद्रस्थानी धरत ज्वेलरी,घड्याळ आणि बॅग्स ऑनलाईन विक्री करण्यासाठी सुरू केल्या होत्या. पण थोड्याच कालावधीत आयविअरला मिळालेले घवघवीत यश पाहून त्यांनी आयवियारवर लक्ष केंद्रित केले ज्या संधीच्या शोधात आयवीआर बाजारात आले होते,त्यालाच अमेझॉन, ईबे सारख्या प्रमुख ई- कॉमर्स कडून दुर्लक्षित केले होते आणि त्याच आयवीआरने अमेरिकेतील उद्योगांना समर्पित एक वेबसाईट बनवली जी खूप यश मिळवून गेली तिचे नाव होते फ्लायर. आणि खऱ्या अर्थाने लेन्सकार्टच्या यशाची सुरुवात झाली.

असं म्हटलं जात कि जोड्या स्वर्गात बनवल्या जातात पण ह्याने तर तब्बल लाखो जोड्या बनवल्या.

करोडो रुपयांची नोकरी सोडली आणि स्वतःचा व्यवसाय चालू केला. आज नवऱ्यासोबत चालवतेय स्वतःची कंपनी

कमी खर्चात महिलांना घरच्या घरी व्यवसाय सुरु करता येईल अशा ११ आयडिया

फ्लायर खूप यश मिळवत होते आणि चष्म्याची विक्री खूप प्रमाणात वाढली होती त्यामुळे २०१० मध्ये बन्सल यांनी लेन्सकार्टची स्थापना केली.सुरुवातीच्या काळात इथे फक्त कॉन्टॅक्ट लेन्स विकले जात होते, काही महिन्यात चष्मा लावून देण्याचे काम सुरू झाले पुढे २०११ मध्ये डोळ्यांचे धूप आणि सूर्याचा प्रखर प्रकाश यापासून संरक्षण करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या चष्म्याचा समावेश करण्यासाठी पोर्टफोलिओच विस्तार करण्यात यश मिळविले आणि त्यांना फॅशन अॅक्सेसरी मधे ठेवले.

लोकल ग्लोबलच्या आधारावर देशाच्या प्रत्येक छोट्या मोठ्या शहरात दुकाने उघडायला बन्सल यांनी सुरुवात केली. त्या सर्व दुकानात प्रत्येक किमतीत म्हणजेच कमीत कमी ते जास्तीत जास्त किमतीत चष्मा तर मिळत होताच शिवाय डोळे तपासून देण्याची सोय सुद्धा सुरू केलेली होती. यासोबतच ऑनलाईन विक्री चालूच होती.याद्वारे आय टेस्ट एट यूर होम या संकल्पनेला ओळख दिली गेली. ही कल्पना लोकांना इतकी आवडली की अनेक मोठ्या मोठ्या कंपन्या बन्सल सोबत गुंतवणुकीस तयार झाल्या,केकेआर,सॉफ्ट बैंक, विजन फंड,प्रमजीइंवेस्त आणि आयफसी ही त्यातील काही नावे आहेत. त्या दरम्यान लेन्सकार्ट व्हिजन फंड,लेन्सकर्ट प्लसची स्थापना केली ज्या सगळ्या प्रकारच्या चष्मा आणि लेन्स वर लक्ष केंद्रित करत असत.

आज लेन्सकार्ट जवळ ग्राहकांसाठी ५००० पेक्षा जास्त फ्रेम आणि ग्लास आहेत तर ४५ पेक्षा जास्त प्रकारचे जास्त क्वालिटी चे लेन्स आहेत. त्यात पुढील गोष्टींचा समावेश होतो.

  • साधा चष्मा,धुपसाठी चष्मा आहे.
  • आकार ( शेप) – वेफरार,ओवल, राऊंड,कैत आय.
  • आकार (साईझ) – छोटा,मध्यम,मोठा.
  • ब्रँड : बॉश आणि लोंब, जॉन्सन आणि जॉन्सन,अल्कोन.
  • रंग संपर्क लेन्स : कलर कॉन्टॅक्ट लेन्स आणि बरेच काही.

पियूष बन्सल यांनी सुरू केलेला हा लेन्सकार्टच व्यवसाय हा त्यांच्या पुरता मर्यादित नसून त्यांनी मार्च २०२२ पर्यंत २००० पेक्षा जास्त लोकांना नोकरी देण्याचे जाहीर आश्वासन दिले होते आणि ते नक्कीच पूर्ण होईल यात शंका नाही.

भारत देशातील महानगरापासून ते मध्यम आणि छोट्या शहरात लेन्सकार्ट पोहचले आहेच पण आता ते सिंगापूर,पश्चिम एरिया आणि अमेरिकेत सुद्धा आपली टीम वाढवत आहे.

शार्क इंडिया हा असा मंच आहे जिथे भारतातल्या उभरत्या म्हणजेच येऊ घातलेल्या व्यावसायिकांना त्यांच्या डोक्यातील व्यवसाय विषयीच्या कल्पना म्हणजेच स्टार्टअप बद्दल आपले विचार मांडत असतात आणि त्या कल्पना जर आवडल्या तर त्यासाठी लागणारा खर्च सुद्धा मिळण्याची संधी हा कार्यक्रम देत आहे. जे लोक आलेल्या व्यावसायिकांचे आकलन करतात ते हुशार व्यावसायिक म्हणजेच शार्क म्हणून ओळखले जातात. हा कार्यक्रम २० डिसेंबर २०२१ पासून सोनी टीव्हीवर दाखवण्यात येत आहे आणि त्यातील एक जज्ज म्हणजेच शार्क आहेत पियूष बन्सल.

पियूष बन्सल यांना एका मुलाखतीत त्यांच्या यशाचे रहस्य विचारले असता ते म्हटले होते मी धोका पत्करायला घाबरत नाही आणि निर्णय घ्यायला उशीर लावत नाही,त्यामुळेच संधी माझ्या हातातून निसटत नाही. शिवाय काम जास्त चांगल्या प्रकारे होणे अपेक्षित असेल तर टीममध्ये जबाबदाऱ्या वाटून वेळोवेळी त्यांचे कौतुक केले तर टीम उत्तम प्रकारे आणि झपाट्याने काम करते.

बन्सल यांनी योग्य आणि पटकन निर्णयक्षमता आणि धोका पत्करण्याची तयारी यांच्या जोरावर छान यश मिळवले आणि यशाचे सूत्र सांगितले. हेच गुण अंगी बाळगून आपणही यशाला गवसणी घालण्याचा प्रयत्न करुया.

=========

marathi goshta

marathi story

marathi moral stories

marathi love story

marathi motivational stories

Leave a Comment

error:

Warning

सध्या युट्युब वर कथा चोरी करून वाचून दाखवण्याचे धंदे चालू आहेत लोकांचे. आमच्या वेबसाईट वरची कथा कुठल्याही युट्युब चॅनेलवर बेकायदेशीररित्या आढळल्यास त्या चॅनेलला लगेच रिपोर्ट करण्यात येईल ह्याची कृपया दक्षता घ्यावी. तसेच आपल्या वाचकांपैकी कुणालाही असे बेकायदेशीर चॅनेल्स आढळल्यास आम्हाला ritbhatmarathi@gmail.com ह्या ई-मेल वर त्वरित कळवावे.