लेक लाडकी दोन्ही घरची

मुलांच्या परीक्षा होऊन चार दिवस झाले तरी सुषमा अजून रिझर्वेशनचे काहीच बोलली नाही
प्रवीणला आश्चर्यच वाटले, शेवटी त्यांनी विचारले” का ग यंदा आई कडे जाण्याचा विचार दिसत नाही?
“पहाते रे–“
ते ऐकुन तिच्या सासूबाई म्हणाल्या “अग शाळांना पण सुट्ट्या लागल्या मग रिझर्वेशन मिळणार नाही गाड्यांना गर्दी होईल म्हणून विचारतोय तो.”
सुषमा आणि प्रवीण सुखी जोडप, दोन मुलगे, आणि,सासू-सासरे दरवर्षी मुलांच्या परीक्षा कधी होतात आणि केव्हा माहेरी जाते असे तिला नेहमी होत असे…
,
आई माझी वहिनी अवनी माहेरी गेली आहे ती केव्हा परत येते त्यानुसार मी जाईन म्हणजे तिचा बरोबर ही राहता येईल.
संध्याकाळी बाजारात भाजी घेताना पाचव्या मजल्या वरची साक्षी भेटली.
भाजीवालीशी नेहमी घासाघीस करणारी साक्षी.
काय ग–आज फक्त बटाटे घेतले? तर म्हणाली उद्या माहेरी जाते आहे,
साक्षीच्या आवाजात खूप उत्साह दिसत होता. भावाचं लग्न आहे.
.” हे येतिल नंतर, म्हणून बटाटे घेऊन ठेवते यांना कधी घरी करावे असे वाटले तर—..
“अग सुषमा तू केव्हा जाते माहेरी?” तुझ्या भावाचे लग्न झाले न
कशी आहे तुझी नवी भावजय”?
“छान आहे”.!
“मग जाणार न?”
” हो जाईन ग लवकरच.!
यावेळेस माहेरी जाण्याचा मनातून इतका उत्साह का वाटत नाही याचा विचार सुषमा करत होती.
धाकटा भाऊ आशिष याचे लग्न नुकतेच झालेले .
अवनी नवी भावजय खूप आवडली सुषमाला.
खूप हुशार पण जरा अल्हड.!
.त्यावेळेस माहेरी वरचेवर जाणे झाले .त्यानंतरही मंगळागौर ,संक्रांत यानिमित्तानेही जाणे झाले .पण फारसे रहायला नाही जमले,
तरीही जाणवले आई थोडीशी नाराज दिसते .नेमके काय कारण ते कळत नव्हते .
नवीन सुने बरोबर ऍडजेस्ट करणं जमत नसावे .असो ,यावेळेस जास्त दिवस राहिल्याने कळेलच..जाऊनच यावे.
घरी येऊन तिने प्रवीणला रिझर्वेशन करण्याविषयी सांगितले.
मुलांना तर खूपच आनंद झाला मामा-मामी बरोबर मजा करायला मिळेल आजी कडून लाड मग आणखीन काय हवे ?
आईकडे पोहोचल्यावर सुषमाचे जंगी स्वागत झाले .अवनी नुकतीच माहेरून आलेली होती. खूप बडबडी उत्साही , माहेरच्या गमती जमती सांगता सांगता तिच्या डोळ्यात नवीन उत्साह दिसत असे.
असेच दिवस जात होते आई काही बोलत नसली तरी मधुन मधुन चिडचिड करते हे सुषमाला जाणवलं.
एक दिवस सुषमा व अवनी दोघीजणी लग्नाचा अल्बम पाहत बसल्या होत्या आई स्वयंपाक घरात काहीतरी काम करत होत्या.
“सुषमा काय करतीये? इकडे ये, काय बाई किती गप्पा..”
“काय करायचं उरलय आई? सुषमाने स्वयंपाक घरात येऊन विचारले..”
काही नाही ग कोशिंबिरीत लिंबू पिळून फोडणी करायची आहे…
एवढेच ना ?अगं ते वेळेवर करू आधीपासून नाही करत ग काकडीचा क्रंच जातो.
“अजून काय काय करायचे सांग?..”
‘काही नाही …’
मग “तू इतकी बडबड का करतीये”??
“आई मी आल्यापासून पाहते तू या न त्या कारणाने सारखी चिडचिड करते,” जाऊ का परत मी माझ्या घरी”
“काय बोलते? तुझ्यावर नाही ग राग माझा.
मग– आई खरं सांग?” तू अवनी वहिनी वर नाराज असते का?” मग तिला न बोलता तू ” लेकी बोले सुने लागे” करते हे बरोबर नाही.
अग पण …
“आई तू तिच तिला बोलत का नाही? हा तुझा भिडस्त स्वभाव तुलाच त्रासदायक होतो आहे.
“कसं बोलणार ग– मला बऱ्याच गोष्टी तिच्या पटत नाही पण- दुसऱ्याची पोर आपल बोलणं तिला नाही आवडलं तर उगाच वाद होतील.
“हे बघ आई– माझे लग्न याच वयात, , झाले.मलाही सर्वच कळत होतं असं नाही.”
‘ हो बाई, मी आले होते तुझ्या घरी तेव्हा मला सारख वाटायचं तू नीट काम करते की नाही नाहीतर तुझी सासू म्हणेल हिला काहीच कसं येत नाही .,?
अगं असं काही नाही, सुरुवातीला मला पण जमत नसे, कळत ही नसे करावे की नाही करू ?पण मग सासूबाईंनी स्वतः विचारलं की मी कुठली कामे करू इच्छिते मला काय जमेल?
” हो का ?”
“हो आई, माझं चुकलं तर त्या बोलायच्या पण एकट्या मध्ये,सर्वांसमोर नाही.
म्हणजे काय?
सुरुवातीलाच लग्न झाल्यावर त्या म्हणाल्या सुषमा पाव्हणे आहे तोपर्यंत सात पर्यंत उठून खाली यायचे
पाहुणे गेले त्यानंतर त्या म्हणाल्या आरामात उठ ,झोप पूर्ण करून.
तुम्हा मुलींना दुपारी आराम नसतो. “अग पण त्या लवकर उठतात ना?
” हो आई ती त्यांची सवय आहे, आणि दुपारी त्या झोपतात .
म्हणत होत्या या वयात झोप कमी येते मग पडून राहून अंगदुखायला लागतं.
हो खरं आहे !”
“आई अवनी खूप साधी भोळी आहे तिला नसेल समजत, तू हे असे शालजोडीतले टोमणे मारलेले तिला लागत असतील पण आपलं काय चुकतंय काय करावे हे नाही उमजणार तिचा उरला सुरला उत्साह ही संपेल.
” हो पण दरवेळी सांगायची काय गरज? लहान आहे कां? स्वतःच स्वतःला नको का समजायला?
“बरोबर आहे तुझं म्हणणं, पण इतक्या दिवसात तुझ्या लक्षात आलं ना की तिला उमजत नाही ,किंवा करायची भीती वाटत असेल नाही जमलं तर?
तू सांग स्वतःहून .-.”मनातल्या मनात कुढत बसण्यापेक्षा बोलाव” त्यांनी बरेचसे गैरसमज दूर होतील.
आई पुढे अवनी नौकरी करु लागली तर अजून कमी वेळ ती घरी असेल तेव्हा काय करशील?
पाहते ग जमतं का?
माझाही स्वभाव जरा,–
जरा—नाही आई ,खूsप बदलायला हवा आहे तुला आपला स्वभाव.
हे मी माझ्या सासूबाईंना पाहून सांगते.
..हो बाई त्यांचंच कौतुक कर मी काय आता परकीच ना तुझ्यासाठी?
” तसं नाही ग मम्मूडी माझी, म्हणत सुषमाने गळ्यात पडून आईच्या गालावर किस करत “तरी मला आवडते ग तूच…”
पुरे- पुरे –चला आता जेवायला म्हणून सुगंधाताई हात धुवायला गेल्या.
आज रविवार असल्याने आशिष ला सुट्टी आहे पाहून नाश्ता आरामात, गप्पा मारत पार पडला.
त्या नंतर आशीषला काफी प्यायची इच्छा झाली
” अवनी करतेस तू?”
अवनीने आई कडे पहात करू विचारले?
“अग कर बिंधास्त यात काय विचारायचे” सुषमा म्हणाली.
काफी खूपच मस्त बनली होती
वाह मजा आली सर्वानी तारीफ केली.
दोन दिवसांनी सुषमा परत जाणार म्हणून त्यांनी बाजारात जायचं नक्की केल.
संध्याकाळी यायला उशीर होणार स्वयंपाकाचे काय कराव?
निघताना सुगंधाताईंनी अवनीला बोलावून सांगितले “आम्हाला यायला उशीर झाला तर भाजी कर व कणिक भिजवून ठेव बरं ,आल्यावर गरम पोळ्या करू”.
“भाजी कोणती करू?”
” तू ठरव तुला जी फ्रिजमधली आवडेल ती कर तुझ्या स्टाईलची” म्हणत त्या सुषमाकडे पाहत हसल्या.
घरी परतल्या तो भाजीचा मस्त वास घरभर दरवळत होता नी टेबलावर सर्व जेवण तयार होतं.
अग बाई तू सर्व केलं? पोळ्या पण?
वाह मस्त झाली भाजी, तोंडात घास घेताच सर्व बोलले.
पोळ्या मला तितक्या नाही जमत अवनी लाजत म्हणाली
रोज थोड्या कर येतील.सुषमा म्हणाली.
करू आई मी चालेल?
हो –माझी गुणाची ग म्हणत त्यांनी अवनीला जवळ घेतल, तशी मी पण— म्हणत सुषमाही दोघींमध्ये शिरली.
हो बाई तू तर आहेस च – म्हणत सुगंधा बाईंनी तिलाही जवळ घेतल…
.
लेखिका.सौ.प्रतिभा परांजपे
==================
प्रिय वाचकहो, उत्तम बोधकथा/moral stories in marathi, प्रेम कथा, रहस्य कथा, कथामालिका, भारतातील संस्कृतीचे विविध पैलू, पर्यटन, खाद्यसंस्कृती, फॅशन, पॅरेंटिंग, लाईफस्टाईल ब्लॉग्स वाचायचे असतील तर रीतभातमराठीला नक्की भेट द्या.