लक्ष्मी प्राप्तीसाठी श्री सुक्ताबरोबरच लक्ष्मी सूक्त ह्या स्तोत्राचेही पठण करा. श्री लक्ष्मी सूक्त पठण

Laxmi Suktam in Marathi:
१. श्री लक्ष्मीसुक्त म्हणजे काय आणि श्री लक्ष्मीसुक्ताचे महत्व
फार प्राचीन काळापासून आपण वेगवेगळ्या युगांबद्दल ऐकत आलो आहोत सांगायचे झाल्यास सत्य युग , द्वापारयुग , त्रेतायुग आणि सध्यर्व युगात आपल्याला सूर आणि असुर प्रवृत्तीचे दर्शन घडले जसे कि , सत्य युगात दोन्हीही प्रवृत्ती आपापल्या पद्धतीने जीवन जगत होत्या त्यानंतर द्वापार युगात कौरव आणि पांडव यांच्या रूपात सूर – असुर वृत्ती दिसल्या कौरवरूपी असुर प्रवृत्तरीचा नाश करण्याकरता भगवान श्रीकृष्णाला देवरूपी पांडवांचे सारथ्य करावे लागले आणि कौरवरूपी असुरांचा सर्वनाश केला गेला . त्यानंतर त्रेतायुगात रावणरूपी असुराचा नायनाट करण्यासाठी भगवान श्रीरामास अवतार धारण करावा लागला.
सध्या कलियुगात सूर आणि असुर या दोन्ही प्रवृत्ती एकाच शरीरात असून असुरी वृत्तीचे दर्शन जास्त दिसून येत आहे म्हणूनच यावर जय मिळवण्यासाठी काही ऋषींनी काही वैदिक स्तोत्र लिहून ठेवले आहेत याठिकाणी लक्ष्मीसुक्तम हे वैदिक स्तोत्र लिहून ठेवले आहे तर या सुक्तामध्ये भौतिक सुखाच्या मागण्या केल्या आहेत पण या मागण्या राजाच्या आणि प्रजेच्या हितासाठी केल्या गेलेल्या आहेत जेणेकरून सुख , समृद्धी आणि भरभराट होऊन मानवाचे अंतःकरण समाधानी आणि शांत राहण्यास मदत होईल हीच एकमेव इच्छा लक्ष्मीसुक्तम मध्ये मांडण्यात आली आहे.
२.श्री लक्ष्मी सुक्तम
पद्मानने पद्मऊरू,
पद्माक्षी पद्मसम्भवे।
तन्मे भजसिं पद्माक्षि येन,सौख्यं लभाम्यहम्॥१।।
अश्वदायी गोदायी,
धनदायी महाधने।
धनं मे जुष तां देवि,सर्वांकामांश्च देहि मे॥२।।
पद्मानने पद्मिनि पद्मपत्रे,
पद्मप्रिये पद्मदलायताक्षि।
विश्वप्रिये विश्वमनोऽनुकूले,त्वत्पादपद्मं मयि सन्निधत्स्व॥३।।
धनमाग्निर्धनं वायुर्धनं सूर्यो,
धनं वसु।
धनमिन्द्रो बृहस्पतिर्वरुणां,धनमस्तु मे॥४।।
वैनतेय सोमं पिव,
सोमं पिवतु वृत्रहा।
सोमं धनस्य सोमिनो,मह्यं ददातु सोमिनः॥५।।
न क्रोधो न च मात्सर्यं,
न लोभो नाशुभामतिः।
भवन्ति कृतपुण्यानां भक्तानां,सूक्त जापिनाम्॥६।।
सरसिजनिलये सरोजहस्ते,
धवलतरांशुक गंधमाल्यशोभे।
भगवति हरिवल्लभे मनोज्ञे,त्रिभुवनभूतिकरी प्रसीद मह्यम्॥७।।
विष्णुपत्नीं क्षमां देवीं,
माधवीं माधवप्रियाम्।
लक्ष्मीं प्रियसखीं,देवीं नमाम्यच्युतवल्लभाम॥८।।
महादेव्यै च विद्महे,
विष्णुपत्न्यै च धीमहि।
तन्नो लक्ष्मीः प्रचोदयात्॥९।।चंद्रप्रभां लक्ष्मीमेशानीं,
सूर्याभांलक्ष्मीमेश्वरीम्।
चंद्र सूर्याग्निसंकाशां,श्रिय देवीमुपास्महे॥१०।।
श्रीर्वर्चस्वमायुष्यमारोग्यमाभिधाच्छ्रोभमानं,
महीयते।
धान्य धनं पशु बहु पुत्रलाभम्,सत्संवत्सरं दीर्घमायुः॥११।।
३. लक्ष्मीसुक्ताचे फायदे
१. लक्ष्मीसुक्त म्हणजेच श्रीसूक्ताचे पठन केल्यानंतर म्हंटले जाणारे स्तोत्र ज्याला आपण ‘ फलश्रुती ‘ असेही म्हणतो.
२. लक्ष्मिसूक्त म्हण्टल्याने आपले घर संपन्न तर बनतेच त्याचबरोबर घरातील ईडा-पिडा दूर होऊन घरातील दारिद्र्यता दूर होऊन नवीन चैतन्य घरात निर्माण होतं.
३. श्रीसूक्ताचा पाठ केल्यानंतर आवर्जून लक्ष्मीसूक्तम म्हणावे.
लक्ष्मीसूक्ताचा मराठी अर्थ आपण जाणून घेणार आहोत.
हेही वाचा
रामरक्षा स्तोत्र पठण फायदे आणि प्रचिती
४. लक्ष्मीसुक्तमचा मराठी भावार्थ
पद्मानने पद्मऊरू,
पद्माक्षी पद्मसम्भवे।
तन्मे भजसिं पद्माक्षि येन,सौख्यं लभाम्यहम्॥१।।
मराठी भावार्थ –
हे लक्ष्मी माते , तुझे वक्ष , चेहरा , डोळे हे कमळाप्रमाणे आहेत , तुझी उत्पत्तीच कमळामधून झालेली आहे , हे कमलनयनी माझ्यावर तुझी कृपा असोत.
अश्वदायी गोदायी,
धनदायी महाधने।
धनं मे जुष तां देवि,सर्वांकामांश्च देहि मे॥२।।
मराठी भावार्थ –
हे देवी लक्ष्मी माते , तू घोडे , धन , गाई हे सर्व देण्यासाठी तू समर्थ आहेस हेच सर्व मला देऊन माझ्यावर कृपा कर आणि माझ्या मनोकामना पूर्ण कर.
पद्मानने पद्मिनि पद्मपत्रे,
पद्मप्रिये पद्मदलायताक्षि।
विश्वप्रिये विश्वमनोऽनुकूले,त्वत्पादपद्मं मयि सन्निधत्स्व॥३।।
मराठी भावार्थ –
हे लक्ष्मी देवी तुझे वदन हे कमळाप्रमाणे आहे , तू कमळ पुष्पावर विराजमान आहेस , तुझे डोळे हे कमळाप्रमाणे तेजस्वी आहे , कमळपुष्प तुला प्रिय आहे . चराचरातील सर्व सृष्टीवर तुझी अतोनात माया आहे , सृष्टीतील सर्वांवर तुझी समान कृपा आहे सर्वांना तू अनुकूल असं फळ देते , हे देवी तुझे चरण कमळ सदैव माझ्या हृदयात स्थान करून राहोत.
धनमाग्निर्धनं वायुर्धनं सूर्यो,
धनं वसु।
धनमिन्द्रो बृहस्पतिर्वरुणां,धनमस्तु मे॥४।।
मराठी भावार्थ –
हे लक्ष्मी माते , तू माझ्यावर धन , वायू , अग्नी , वरून देव , बृहस्पतीदेव या सर्व देवांच्या कृपेद्वारे माझ्यावर सदैव धनाची कृपा कर.
वैनतेय सोमं पिव,
सोमं पिवतु वृत्रहा।
सोमं धनस्य सोमिनो,मह्यं ददातु सोमिनः॥५।।
मराठी भावार्थ –
हे वनपुत्र गरुडा , वृत्रासुराचा हननकर्ता , अमृत प्राशन करणारे सर्व देव मलाही अमृतरूपी धन दान कर.
न क्रोधो न च मात्सर्यं,
न लोभो नाशुभामतिः।
भवन्ति कृतपुण्यानां भक्तानां,सूक्त जापिनाम्॥६।।
मराठी भावार्थ –
या सूक्ताचे पठन करणाऱ्यानमध्ये राग , लोभ , मत्सर आणि इतर अशुभ कार्य करण्याची वृत्ती नाहीशी होते ते आपोआपच सत्कर्माची आस धरू पाहतात
सरसिजनिलये सरोजहस्ते,
धवलतरांशुक गंधमाल्यशोभे।
भगवति हरिवल्लभे मनोज्ञे,त्रिभुवनभूतिकरी प्रसीद मह्यम्॥७।।
मराठी भावार्थ –
हे लक्ष्मी देवी , हे त्रिभुवनेश्वरी , कमलवासिनी देवी , तुझ्या हातात कमळ धारण केलेलं आहे , शुभ्र आणि स्वच्छ असं वस्त्र अंगावर परीधान केलेलं आहे त्याचबरोबर गळ्यात चंदनाची माळा आहे आणि तू भगवान विष्णूला प्रिय आहे , सर्वांच्या मनोकामना तू पूर्ण करते तशी माझीही मनोकामना पूर्ण कर
विष्णुपत्नीं क्षमां देवीं,
माधवीं माधवप्रियाम्।
लक्ष्मीं प्रियसखीं,देवीं नमाम्यच्युतवल्लभाम॥८।।
मराठी भावार्थ –
भगवान विष्णूंना प्रिय असणारी , माधवाची प्रेयसी असणारी माधवी , भगवान अच्युताची प्रेयसी , क्षमेची मूर्ती मी तुला वारंवार नमन करतो.
महादेव्यै च विद्महे,
विष्णुपत्न्यै च धीमहि।
तन्नो लक्ष्मीः प्रचोदयात्॥९।।
मराठी भावार्थ –
देवी महालक्ष्मीला मी स्मरण करतो , विष्णुपत्नी देवी महालक्ष्मी आमच्यावर तुझी कृपादृष्टी असू देत आम्हाला सत्कार्यासाठी प्रवृत्त कर
चंद्रप्रभां लक्ष्मीमेशानीं,
सूर्याभांलक्ष्मीमेश्वरीम्।
चंद्र सूर्याग्निसंकाशां,श्रिय देवीमुपास्महे॥१०।।
मराठी भावार्थ –
जी चंद्राच्या आभेप्रमाणे शीतल आहे सूर्याप्रमाणे तेजोमय आहे त्या लक्ष्मी देवीची आम्ही आराधना करतो
श्रीर्वर्चस्वमायुष्यमारोग्यमाभिधाच्छ्रोभमानं,
महीयते।
धान्य धनं पशु बहु पुत्रलाभम्,सत्संवत्सरं दीर्घमायुः॥११।।
मराठी भावार्थ –
हे लक्ष्मीसुक्त जे कुणी पठन करेल ती व्यक्ती तेज , आयुष्यमान , आरोग्यदायी आणि शोभून दिसेल अशी होईल , धन – धान्य , पुत्र पौत्र सौख्य लाभदायक होईल.
=============
प्रिय वाचकहो, उत्तम बोधकथा/moral stories in marathi, प्रेम कथा, रहस्य कथा, कथामालिका, भारतातील संस्कृतीचे विविध पैलू, पर्यटन, खाद्यसंस्कृती, फॅशन, पॅरेंटिंग, लाईफस्टाईल ब्लॉग्स वाचायचे असतील तर रीतभातमराठीला नक्की भेट द्या.