lata mangeshkar biography in marathi गाणसम्राज्ञी लता मंगेशकर….The nightingle – ratna of bharat

lata mangeshkar biography in marathi: जन्मास आलेली व्यक्ती मारणार हे अटळ सत्य आहे आणि हे सत्य कोणाच्याही बाबतीत बदलत नाही.कोण किती वर्षे जगले या पेक्षा कसे जगले हे जास्त महत्वाचे ठरते.रोज असंख्य लोक जन्माला येतात आणि मरतात पण काही लोक आपल्या कामाने,कारकिर्दी ने कायम अमर राहतात आणि अनंत काळासाठी जीवंत राहतात,कारण त्यांनी त्यांच्या जीवनात सगळ्यांच्या कायम लक्षात राहील असे काम करून ठेवलेले असते त्यामुळे त्यांचे काम त्यांना जीवंत ठेवते.
केवळ आपल्या भारतात नाही तर संपूर्ण देशात आपल्या दैवी स्वरांनी असंख्य लोकांना मंत्रमुग्ध करणाऱ्या गानकोकिळा,गानसम्राज्ञी,भारताचा आवाज,दैवी स्वरांची कोकिळा ज्यांना सगळे जग लतादीदी या नावाने ओळखते त्या म्हणजे लता मंगेशकर हे त्यापैकी एक दिग्गज नाव आहे.त्यांच्या गाण्याने करोडो भारतीयांची मने जिंकली अगदी कायमची.
लतादीदी यांचा जन्म २८ सप्टेंबर १९२९ रोजी इंदौर येथे झाला.लतादीदी यांचे वडील पंडित.दीनानाथ मंगेशकर हे शास्त्रीय गायक आणि अभिनेते होते.गाण्याचा वारसा त्यांच्याकडूनच लतादीदी कडे आलेला होता.त्यामुळे लतादीदी यांचे पाहिले गुरु त्यांचेच वडील पं.दीनानाथ मंगेशकर हे होते.लतादीदी यांनी अभिनेत्री म्हणून कारकिर्दीला सुरुवात केली होती ती सुद्धा वयाच्या पाचव्या वर्षी प.दीनानाथ मंगेशकर यांच्या संगीत नाटकामध्ये.
पण १९४२ मध्ये लतादीदी चे वडील गेले त्यावेळी त्या केवळ १३ वर्षांच्या होत्या.त्यानंतर मास्टर विनायक जे मंगेशकर कुटुंबीयचे चांगले मित्र होते त्यांनी या कुटुंबाला साथ दिली पण काही वर्षातच काळाने त्यांनाही आपल्या सोबत नेले आणि खऱ्या अर्थाने सर्व कुटुंबाची जबाबदारी लतादीदीच्या वर येऊन पडली.लतादीदी त्यांच्या भावंडांमध्ये सर्वात मोठ्या होत्या.त्यांच्या आईचे नाव शेवंती मंगेशकर तर मीना खडीकर,आशा भोसले,उषा मंगेशकर आणि हृदयनाथ मंगेशकर हे त्यांचे भाऊ बहीण.
कुटुंबाची जबाबदारी पडल्यामुळे त्यांनी चित्रपटात काम करण्याचा निर्णय घेतला.त्यांचा पहिला चित्रपट होता पहिली मंगळागौर जो १९४२ मध्ये प्रदर्शित झाला तर दिदिंचे पाहिले हिंदी गाणे होते गाजाभाऊ चित्रपटातील आणि गाण्याचे बोल होते “माता एक सपुत की दुनिया बदल दे तू” साल होते १९४३.त्यानंतर दीदी मुंबईत आल्या आणि त्यांनी शास्त्रीय संगीताचे धडे घेतले उस्ताद अमानात आली खान यांच्याकडून.पुढे १९४६ मध्ये “आपकी सेवा” या चित्रपटातील त्यांचे गाणे आले गाण्याचे बोल होते “पा लागून कर जोरी”.हे त्यांचे खऱ्या अर्थाने हिंदी चित्रपटसृष्टीत मधील पाहिले गाणे होते.गुलाब हैदर यांनी १९४८ मध्ये “मजबुर” चित्रपटात गाण्याची संधी दिली ते गाणे होते “दिल मेरा तोडा”, आणि इथूनच त्यांच्या पार्श्वगायन ल सुरुवात झाली त्यामुळे गुलाब हैदर यांनी दीदींना हिंदी सिनेसृष्टीत स्थान मिळवून देण्याचा प्रयत्न केला असे म्हणणे चुकीचे ठरणार नाही.
१९४९ सली दीदींनी “महल” या चित्रपटात मधुबाला चित्रित गाण्यासाठी पार्श्वगायन केले,बोल होते “आयेगा आने वाला” हे त्यांचे सुपरहिट ठरलेले पाहिले गाणे होते.मधुमती चित्रपटातील “आजा रे परदेसी” या दीदींच्या गाण्याला पहिला फिल्मफेअर अवॉर्ड मिळाला ते साल होते १९५८.पुढे १९६२ मध्ये “बीस साल बाद” या चित्रपटातील “कही दीप कही दिल” या गाण्याने पुन्हा फिल्मफेअर मिळवून दिले.
१९९० मध्ये दीदींनी “लेकीन” हा पहिला चित्रपट निर्माण केला त्यातील “यारा सिली सीली” या गाण्यासाठी दीदींना तिसऱ्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार ने गौरवण्यात आले.मराठी चित्रपट साधी माणसे यासाठी राज्य शासनाचा उत्कृष्ठ संगीतकार पुरस्कार मिळाला.लतादीदींनी त्यांच्या कारकिर्दीत असे अनेक पुरस्कार प्रदान करण्यात आले.त्यांना इतके पुरस्कार मिळाले की १९९३ मध्ये दीदींनी “फिल्मफेअर लाईफ टाईम अचिवमे ट अवॉर्ड देऊन गौरवण्यात आले.
त्यानंतर १९८४ पासून मध्या प्रदेश शासनाने तर १९९२ पासून महाराष्ट्र शासनाने दीदींच्या सन्मानार्थ “लता मंगेशकर पुरस्कार” प्रदान करण्यास सुरुवात केली.एम.एस. सब्बालक्षमी यांच्यानंतर पहिल्यांदा भारतीय गायकाला हा सर्वोच्च बहुमान देण्यात आला होता त्या म्हणजे आपल्या लतादीदी.
लतादीदी यांनी तब्बल सहा दशके काळ आपल्या कारकिर्दीने गाजवला.तीस पेक्षा जास्त भाषेमध्ये त्यांनी गाणी गायली आहेत.मधुबाला ते प्रीती झिंटा पर्यंत सर्वांना त्यांनी त्यांचा आवाज दिला आहे.एकंदरीत त्यांनी पाच पिढ्यांना आवाज दिला आहे.पार्श्वगायन शिवाय काही अलबाम ही त्यांनी केले आहेत.”बिती ना बिताये” या गाण्यासाठी त्यांना राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार मिळाला तर नंतर त्यांनी गाण्याचे जाहीर कार्यक्रम करायला सुरुवात केली,ही तर त्यांच्या चाहत्यांसाठी पर्वणीच होती.१९७४ सली लंडनमधील अल्बर्ट हॉलमध्ये त्यांनी गाण्याचा पहिला जाहीर कार्यक्रम सादर केला.
दीदींच्या आवाजात कमालीची ताकद होती.त्यांचे अजरामर ठरलेले अजून एक गाणे म्हणजे “ए मेरे वतन के लोगो”.हे गाणे दीदींनी २७ जून १९६३ मध्ये गायले होते,या गाण्याने आजही अंगावर रोमांच उभे राहतात,हे गाणे ऐकून खुद्द पं.जवाहरलाल नेहरू यांच्या डोळ्यात पाणी आले होते,या गाण्याला संगीत दिले होते सी.रामचंद्र यांनी.
आपल्या लतादीदींच्या नावाचा आणि आडनावाचा एक गोड किसा आहे.तुम्हाला ऐकुन कदाचित खरे वाटणार नाही पण दिदिंचे मूळ नाव आहे “हेमा”.पण पां.दीनानाथ मंगेशकर यांच्या नाटकातील आवडत्या “लतिका” या पात्रा वरून पंडितजींनी त्यांचे नाव लता ठेवले.तर त्यांचे मूळ आडनाव होते हर्डीकर.पण पंडितजी हे त्यांच्या आईच्या जास्त बाजूकडील होते,त्यांच्या आई येसूबाई देवदासी होत्या,त्या गोव्यातील मंगेशी गावात रहात होत्या आणि तिथूनच त्यांना मंगेशकर ही पदवी मिळाली होती,पुढे त्यांनी मंगेशी सोबत असलेले नाते पुन्हा जोडले आणि मंगेशकर आडनाव घेतले.
दीदींना ८ जानेवारी २०२२ रोजी कोरोना ची लागण झाली होती,गेल्या २८ दिवसांपासून त्या मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार घेत होत्या.डॉक्टर प्रतीत समदानी त्यांच्यावर उपचार करत होते.दीदींना कोरोना सोबत निमनिया ची सुद्धा लागण झाली होती,पण मधल्या काळात त्यांच्या प्रकृतीत सुधारणा दिसून आली होती,तसेच त्यांनी जेवण घेण्यास सुरुवात केली होती पण शनिवार पासून पुन्हा त्यांची तब्येत खालावली आणि रविवारी सकाळी ९ वाजता त्यांची प्राणज्योत मालवली.त्यांना भेटायला आलेल्या केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी दिदींचे अंत्यदर्शन घेऊन स्वतः याचा खुलासा केला.
हेही वाचा:
“गड आला पण सिंह गेला” असे उद्गार शिवाजी महाराजांच्या तोंडातून का निघाले
हिजाब आणि मग किताब असा संभ्रम का?
दीदींनी यश चोप्रा यांच्या विनंतीला मान देऊन वीर झारा या चित्रपटात शेवटचे गाणे गायले.राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार,बंगाल फिल्म पत्रकार संगठन, फिमल्फेअर सर्वश्रेष्ठ पार्श्व गायिका,फिल्मफेअर आजीवन लब्धी पुरस्कार,भारतरत्न,पद्मभूषण, पद्मविभूषण,दादासाहेब फाळके अशा अनेक पुरस्कारांनी दीदींना गौरवण्यात आले. आपल्या संपूर्ण कारकिर्दीत पन्नास हजार पेक्षा जास्त गाणी गायली दीदींनी.इतकेच नव्हे तर १९७४-१९९१ या काळात सर्वाधिक रेकॉर्डिंग केली म्हणून गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये त्यांचे नाव नोंदवले होते.या काळात त्यांनी पंचवीस हजार गाणी गायली होती.
लता मंगेशकर एक असे व्यक्तिमत्व होते ज्यांनी वयाच्या तेराव्या वर्षी गायनाला सुरुवात करून आपले संपूर्ण आयुष्य गाण्यासाठी वाहिले होते.त्यांच्यासोबत काम केले नाही असा संगीतकार आपल्या चित्रपट सृष्टीत सापडणार नाही. आता विसव्याचे क्षण हे त्यांनी गायलेले शेवटचे गाणे होते.त्यांच्या खांद्यावर च पदर कधीही त्यांनी खाली पडू दिला नाही.मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर यांना त्या मानसपुत्र मानत होत्या.सगळ्यांशी त्यांचे घट्ट आणि वैशिष्ट्यपूर्ण नाते होते.दीदींच्या कारकिर्दीबद्दल लिहिताना शब्द कमी पडतील पण त्यांची कारकीर्द संपणार नाही.त्यांच्या जाण्याने संगीत जगत पोरके झाले आहे,हे नुकसान भरून न येण्यासारखे आहे.
लतादीदी या चित्रपट सृष्टीच्या आई होत्या,प्रेमळ होत्या,त्यांच्या प्रेमळ स्वभावाने,मायेने अनेकांना त्यांनी आपलेसे केले होते.अनेक अजरामर गाणी त्यांनी आपल्याला दिली.त्यांचा आवाज हीच त्यांची ओळख होती,संपूर्ण आयुष्य त्यांनी रसिक प्रेक्षकांची सेवा करण्यात घालवले. त्यांचे काम प्रचंड आहे.त्यांची गाण्याची दैवी ताकद अफाट होती आणि राहील यात शंका नाहीच.अशा या गानसम्राज्ञी,आपल्या सगळ्यांच्या लाडक्या लतादीदी ना कोटी कोटी सलाम!!!
==============