जाणून घ्या कोण होते लाल सिंग चड्ढा

lal singh chaddha storyमानसिक दृष्ट्या सक्षम नसूनही राष्ट्रपतींच्या हस्ते परमवीर चक्र घेणाऱ्या या शीख व्यक्तीची लढण्याची कथा सगळ्यांना आयुष्य जगण्याचा आणि आयुष्याकडे बघण्याचा नवा दृष्टिकोन देते….
मित्रानो परमेश्वराने आपल्याला इतके सुंदर आयुष्य जगण्याची संधी दिली आहे. पण आपण सतत कुठल्या ना कुठल्या गोष्टीचे दुःख करत बसतो. सतत कशाची ना कशाची देवाकडे तक्रार करत असतो. माझ्याकडे हे नाही, ते नाही, हे माझ्याच नशिबी का ?? आपले सुईइतके दुःख डोंगराइतके करून रडत बसण्याची सवय असते आपल्यातील अनेकांना. काय नाही याकडे बघण्याच्या नादात काय आहे याकडे मात्र आपण कधीच लक्षच देत नाही.
जरा अवतीभोवती नजर टाकली तर आपल्या लक्षात येईल मित्रानो आपल्या पेक्षाही खूप दुःखी आणि वाईट आयुष्य जगत असतात लोक. देवाने आपल्याला दिलेली सगळ्यात अनमोल संपत्ती म्हणजे आपले शरीर आणि विचार करण्यासाठी लागणारा मेंदू. आपण आपल्या आसपास अनेक असे लोक बघतो ज्यांना, हात नसतात, पाय नसतात, पायांची काही बोटे नसतात, काही लोक अपंग अस्तर तर काहींचा मानसिक विकास नीट झालेला नसतो. तरीही असे लोक आपल्यापेक्षा नेहमी आनंदी असतात उलट आपल्यापेक्षा जास्त जिद्दीने छान आयुष्य जगून दाखवतात. अशा लोकांना देवाने विशेष अशी कुठली ना कुठली देणगी दिलेली असते, यांच्यात काहीतरी विशेष असते आणि ते ओळखून हे लोक आयुष्य नेटाने जगतात.
————–
आज अशाच एका मानसिक दृष्टीने दुर्बल असणाऱ्या एका शीख माणसाची गोष्ट बघणार आहोत ज्याने आयुष्यात अशा गोष्टी करून दाखवल्या ज्या आपल्या सारख्या सामान्य बुद्धीच्या लोकांनाही करायला जमल्या नसत्या. त्याच्या पराक्रमाने राष्ट्रपतींच्या हातून परमवीर चक्र देऊन गौरवण्यात आले आणि अथलेटिकमधील अनेक बक्षिसे जिंकली.
तुम्हाला समजलेच असेल मी कोणाविषयी बोलत आहे, बरोबर ओळखलत ११ ऑगस्ट २०२२ रोजी प्रदर्शित झालेल्या लाल सिंग चड्डा चित्रपटाच्या निमित्ताने जाणून घेणार आहोत लाल सिंग चड्डा बद्दल.
अद्वैत चंदन दिग्दर्शित आणि अतुल कुलकर्णी लिखित या चित्रपटात बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खान, करीना कपूर, नागा चैतन्य आणि मोना सिंग यांच्या मुख्य भूमिका आहेत. हा चित्रपट टॉम हँक्स या हॉलिवूड अभिनेत्याचा फॉरेस्ट गंप चा हिंदीत केलेला रिमेक आहे. आमिर खान या चित्रपटातून तब्बल चार वर्षांनी मोठ्या पडद्यावर पदार्पण करत आहे.
————-
आमिर खानने या चित्रपटात लाल सिंग चड्डा या शीख माणसाची भूमिका पार पाडली आहे. नक्की कोण होता हा लाल सिंग चड्डा ?? तर लाल सिंग चड्डा हा एक मानसिक दृष्ट्या दुर्बल असा व्यक्ती होता. त्याच्या मानसिक दुर्बलतेमुळे सगळे लोक त्याची टिंगल करत असत. त्याच्या या मानसिक आजारामुळे शाळेत त्यांना एडमिशन मिळत नाही पण त्यांची आई मात्र त्यासाठी खूप अडचणींचा सामना करून त्यांना शाळेत एडमिशन मिळवून देते. शाळेत सगळी मुले त्यांना चिडवत असत तेंव्हा चड्डा यांची आई त्यांना तू ते सगळं करशील जे बाकी लोक करतात असे म्हणून त्यांना हिम्मत देत असे. लहापणापासूनच चड्डा सिमरन नावाच्या मुलीवर प्रेम करत असतो.
शाळेत एकदा अथलेटीक्सची रेस होणार असते त्यात चड्डा यांचा मित्र गुरुप्रीत भाग घेणार असल्यामुळे चड्डाला पण भाग घेण्याची इच्छा होते पण त्यांची आई नको म्हणाल्यामुळे चड्डा भाग घेत नाही. काही दिवसांनी रेस सुरू होते त्यात गुरूप्रीतला लागते आणि तो खाली पडतो. ते पाहून चड्डा त्याच्या जवळ जातात आणि त्याला खांद्यावर उचलून घेऊन रेसमध्ये पळतात आणि नुसते पळत नाहीत तर जिंकून दाखवतात. हे पाहून जज, शिक्षक आणि सगळे विद्यार्थी आश्चर्यचकित होतात आणि त्यांचा हा परफॉर्मन्स पाहून अनेक गेम्समध्ये भाग घेण्याची संधी चड्डा यांना मिळते.
हेही वाचा
वॉरेन बफे म्हणतात की यशाचे सर्वात मोठे माप म्हणजे तुमचा बँक बॅलन्स नाही, तो म्हणजे….
रतन टाटांनी देखील अपयशातून यशाची शिखरे गाठली
अशाच प्रकारे चड्डा यांचे शालेय शिक्षण पूर्ण होते. कॉलेजमध्ये गेल्यावर त्यांच्या मानसिक अवस्थेचा,भोळेपणाचा खूप लोक फायदा घेतात. त्यांना समजून घेणारे फक्त दोनच मित्रा त्यांना कॉलेजमध्ये असतात. कॉलेजच्या शेवटी अथलेटीक्स खेळणाऱ्या मुलांना आर्मित जाण्याची संधी मिळते. त्यामुळे चड्डा आर्मी जॉईन करतात पण त्यांचा मित्र गुरुप्रीतला आर्मी जॉईन न करता मिठाईचे दुकान चालवायचे असते पण त्याचे बाबा त्याला जबरदस्तीने आर्मीत पाठवतात आणि त्याच वेळी चड्डा ज्या मुलीवर प्रेम करत असतात ती मुलगी सिमरन गायिका होण्याचे स्वप्न घेऊन मुंबईत येते.
इकडे आर्मीमध्ये आल्यावर भारत पाकिस्तान युद्ध होते. तेंव्हा गुरूप्रीत त्याच्या मिठाईच्या दुकानाचे स्वप्न चड्डा यांना सांगतो आणि म्हणतो मला इथे शहीद होऊन मरायचे नाही माझे दुकानाचे स्वप्न पूर्ण करायचे आहे. पण युद्धात अनेक सैनिक जखमी होतात तर काही शहीद होतात. चड्डा सगळ्या जखमी सैनिकांना एका सुरक्षित ठिकाणी नेऊन त्यांचे प्राण वाचावतो. पण त्याच वेळी त्यांचा मित्र गुरूप्रीत शहीद झाल्याचे चड्डा यांना कळते. चड्डा यांनी केलेल्या कामगिरीमुळे त्यांना राष्ट्रपतीकडून परमवीर चक्र प्रदान करण्यात येते.
चड्डा आर्मी मधून रिटायर होतात आणि पंजाबमध्ये येऊन गुरूप्रीतचे स्वप्न पूर्ण करतात. काही दिवसात पंजाबमध्ये दंगे होतात, खूप नुकसान होते पण चड्डानी टाकलेले मिठाईचे दुकान व्यवस्थित रहाते आणि उत्तम चालते. त्याच दरम्यान चड्डा यांची आई आजारी असल्याचे त्यांना कळते आणि दुकान गुरूप्रीतच्या वडिलांकडे सोपवून चड्डा आईची काळजी घेण्यासाठी येतात. आईची खूप सेवा करतात पण कॅन्सर असल्यामुळे त्यांचा मृत्यू होतो.
—————
इकडे सिमरन तिचे स्वप्न पूर्णकरण्यासाठी काही चुकीच्या लोकांवर विश्वास ठेवून फसते त्यामुळे घरी यायची इच्छा असूनही येऊ शकत नाही. ती आत्महत्येचा प्रयत्न करते त्यात तिचा जीव वाचतो पण खूप दुखापत झालेली असते. हे चड्डाला कळताच तो सिमरनला घरी घेऊन येतो. ते सिमरनवर लहानपानापासून प्रेम करत असतात पण कधीच तसे बोलून दाखवलेले नसते आणि सिमरन पण त्याच्यावर प्रेम करत असते.
सिमरन एक दिवस चड्डाला न सांगता घर सोडून निघून जाते. त्यामुळे चड्डा एकटे पडतात आणि एकटेपणा घालवण्यासाठी जगभर फिरतात. त्यात अनेक लोक त्यांची टिंगल करतात पण त्यांचं पाहून अनेक लोक त्यांच्या सोबत फिरायला लागतात. त्यातच चड्डा खूप फेमस होतात आणि त्यांचे नाव जगाच्या इतिहासात जाते. ही बातमी टीव्ही, पेपर आणि सोशल मीडियातर्फे सगळीकडे पसरते. ते पाहून सिमरन चड्डाला शुभेच्छा देते.
चड्डा सिमरनला शोधून काढायचे ठरवतात आणि शोधून काढतातही. पण त्याच वेळी चड्डाला कळते की सिमरनला एक मुलगा आहे. सिमरन तो मुलगा चड्डाचाच असल्याचे सांगते. तेंव्हा चड्डाला भीती असते की त्याचा मुलगा त्याच्या सारखाच मानसिक दृष्ट्या कमकुवत तर नाही ना पण सिमरन तो खूप हुशार असल्याचे सांगते आणि म्हणते मला एक आजार झाला आहे आणि काहीच दिवसात मी मरणार आहे. हे ऐकून चड्डाला खूप दुःख होते. काहीच दिवसात सिमरन मरते आणि चड्डा आपल्या मुलाला घेऊन येतो आणि सगळे आयुष्य त्याच्या सोबत घालवतो.
मानसिक दृष्ट्या कमकुवत असूनही दुसऱ्याच्या आयुष्यासाठी जगणाऱ्या या लाल सिंग चड्डाची कहाणी सगळ्यांना खूप काही शिकवणारी आहे.
========================
प्रिय वाचकहो, उत्तम बोधकथा/moral stories in marathi, प्रेम कथा, रहस्य कथा, कथामालिका, भारतातील संस्कृतीचे विविध पैलू, पर्यटन, खाद्यसंस्कृती, फॅशन, पॅरेंटिंग, लाईफस्टाईल ब्लॉग्स वाचायचे असतील तर रीतभातमराठीला नक्की भेट द्या.