श्री कुंजिका स्तोत्र मराठी भावार्थसह

१. कुंजिका स्तोत्र म्हणजे काय?
kunjika stotram in marathi: मित्रांनो आपल्या पुराणात कितीतरी श्लोक, स्तोत्र आणि मंत्र आहेत. जे ऋषी मुनींनी सिद्ध करून आपल्यासाठी लिहून सुधा ठेवले आहेत. गरज आहे ती फक्त आपण त्याकडे लक्ष देण्याची. या स्तोत्रात, मंत्रात इतकी अफाट ताकद आहे की, आपल्या आयुष्यातील कोणतीही अडचण ते दूर करू शकतील. पण त्यासाठी आपण योग्य त्या पद्धतीने म्हणजेच, सर्व नियम व अटींच पालन करून त्यांचे पठण करायला हवे. आपल्या सगळ्यांच्या आयुष्यात आर्थिक, मानसिक आणि शारीरिक समस्या असतात. या समस्यांचे निराकरण करण्याची ताकद या स्तोत्रामधे असते.
आज अशाच एका स्तोत्रबद्दल जाणून घेणार आहोत, जे सिद्ध करून ठेवलेले तर आहेच पण त्याच्या पठणाने सर्वच अडचणी कायमच्या तुमच्या आयुष्यातून निघून जातील.
दुर्गा सप्तशती या पाठात, पाठ सुरू करण्याआधी दुर्गा कवच, अर्गला स्तोत्र आणि कूंजिका स्तोत्र वाचण्याची प्रथा आहे हे आधीच सांगितले आहे. त्यातील अर्गाला स्तोत्राची सगळी माहिती आपण करून घेतली. त्यातीलच अत्यंत प्रभावी आणि चमत्कारिक असे स्तोत्र म्हणजे कुंजिका स्तोत्र.
——————–
या स्तोत्राबद्दल भगवान शंकराने देवी पार्वतीला, असे सांगितले आहे की, ज्यांना दुर्गा सप्तशती पाठ करणे शक्य नाही किंवा जमत नाही पण सप्तशती पाठाचे पुण्य त्यांना हवे असते अशा लोकांनी केवळ कुंजिका स्तोत्राचे पठण केल्याने संपूर्ण सप्तशती पाठ केल्याचे पुण्य मिळू शकते. कारण कुंजिका स्तोत्र मधील मंत्र हे सिद्ध केलेले आहेत त्यामुळे पठण करताना संकल्प करून मंत्रांचा जप करत दुर्गा देवीची आराधना केली की देवी प्रत्येक मनोकामना पूर्ण करते.
या स्तोत्राचे महत्त्व आणि ज्ञान भगवान शंकराने देवी पार्वतीला सांगितले आहे. असे म्हणतात की, हे स्तोत्र अत्यंत गुप्त असे स्तोत्र आहे. हे स्तोत्र रुद्रयामल तंत्राच्या गौरी तंत्र भागातून घेतले आहे. म्हणूनच सिद्धकुंजिका स्तोत्राचे पठण हे संपूर्ण दुर्गा सप्तशतीच्या पठणाच्या बरोबरीचे आहे.
या स्तोत्राचा मूळ मंत्र नवक्षरी मंत्राने सुरू होतो (ॐ ऐं ह्रीं क्लीं चामुण्डायै विच्चे).
कुंजिका या शब्दाचा अर्थ होतो चावी. म्हणजेच कुंजिका स्तोत्र नावाची चावी भगवान शंकराने गुप्त केलेली दुर्गा सप्तशतीची शक्ती जागृत करते. या स्तोत्राच्या पठणानंतर पुढे कोणत्याही नामजपाची किंवा उपासनेची गरज नसते, सर्व नामजप केवळ कुंजिका स्तोत्राच्या पठणाने सिद्ध होतात, इतके सामर्थ्य या स्तोत्रात आहे. त्यामुळेच हे स्तोत्र वाचताना विशेष काळजी घेणे म्हणजे नियम आणि अटी पाळणे अत्यंत आवश्यक आहे. नाहीतर वाचकाला भयंकर परिणामास सामोरे जावे लागू शकते.
सिद्ध कुंजिका स्तोत्र अत्यंत चमत्कारी आणि प्रखर स्तोत्र आहे. हे स्तोत्र आयुष्यातील कोणत्याही प्रकारचे रोग, वंचितपणा, संकटे, दु:ख, रोगराई व शत्रूंचा नाश करणारे आहे. कुंजिका स्तोत्र नवरात्रात तर वाचलेच पाहिजे.
२. कुंजिका स्तोत्र वाचताना घ्यावयाची काळजी
१. दुर्गा देवीची आराधना, उपासना आणि सिद्धी करण्यासाठी मनाची पवित्रता यासाठी खूप महत्वाची आहे. आता मनाचे पावित्र्य म्हणजे काय असा प्रश्न पडला असेल तर, कोणाशीही वाईट वागायचे, बोलायचे नाही, कोणाबद्दल मनात वाईट विचार आणायचा नाही, अपशब्द वापरायचे नाहीत. सगळ्यांबद्दल चांगलाच विचार करायचा आणि कोणी कसेही वागले तरी आपण चांगलेच वागायचे.
२. कुंजिका स्तोत्र पठण दरम्यान एकदा संकल्प केला की,मांसाहार सेवन करायचे नाही, मद्यपान करायचे नाही, इतकेच काय तर पठण चालू केल्यापासून संपेपर्यंत पूर्ण ब्रह्मचर्य पालन करायचे म्हणजेच शारीरिक संबंध बद्दल विचारही मनात आणायचा नाही.
३. कुंजिका स्तोत्र वाईट इच्छा,एखाद्याच्या नाशासाठी, एखाद्या वाईट कामानेसाठी पठण करू नये. याचा उलट परिणाम वाचकांवर होऊ शकतो.
हेही वाचा
रामरक्षा स्तोत्र पठण फायदे आणि प्रचिती
पुरुष सूक्तम (प्राकृत) मराठी अर्थासह
३. कुंजिका स्तोत्र पठण फायदे | siddha kunjika stotram benefits
१. रोग मुक्तता :
आजारपण ही आजकाल प्रत्येक घरात निर्माण झालेली समस्या आहे. आपली मिळकत कितीही कमी असली तरीही आजार कमी होण्यासाठी दवाखान्याचा खर्च करावाच लागतो. कुंजिका स्तोत्र हा त्यावरील प्रभावी उपाय आहे. या स्तोत्राच्या केवळ पठणाने गंभीर असलेल्या आजारांपासून तर मुक्ती मिळतेच आणि रोगांवरील होणाऱ्या खर्चापासूनही तुम्ही मुक्तता मिळवू शकता.
२. धनलाभासाठी :
घरात कितीही पैसा आला तरीही महिन्याच्या शेवटी चणचण भासतेच. कितीही पैसा आला तरी पुरतच नाही असे सगळ्यांच्या घराचे चित्र असते. ज्यांना नेहमी पैशाची कमतरता असते. सतत आर्थिक चणचण भासत आहे. अशांना कुंजिका स्तोत्रांच्या वाचनाचा फायदा मिळतो, संपत्ती मिळवण्याचे नवे मार्ग खुले होतात, पैशाचा संग्रह वाढतो.
३. सुखद वैवाहिक जीवन :
आजकाल पती पत्नीमध्ये छोट्या छोट्या गोष्टींवरून वाद होताना दिसून येते. अशाने घरातील वातावरण कलुशित आणि अशांत होते. वैवाहिक जीवनात नियमित सुख कायम राहण्यास कुंजिका स्तोत्रांचे नियमित पठण केले पाहिजे. एखाद्यावर आकर्षणाचा प्रभाव वाढविण्यासाठी देखील हे स्तोत्र पठण केले जाते.
४. शत्रुमुक्ती :
आपले चांगले झालेले अनेकांना बघवत नाही. लगेच वाईट बोलून, नजर लावून मोकळे होतात आणि याच मुळे शत्रूपीडा जाणवते. अशा वेळी हे स्तोत्र शत्रूंपासून मुक्ती मिळविण्यासाठी आणि केसेस जिंकण्यासाठी चमत्कारासारखे कार्य करते. नवरात्रात आणि नवरात्रानंतरही नियमितपणे पठण केले तरी शत्रू जीवनात व्यत्यय आणत नाहीत. कोर्ट कचेरी, खटले जिंकले जाऊ शकतात.
५. कर्जमुक्ती :
कधीही डोक्यावर कर्ज असू नये असे म्हणतात. जर एखाद्या व्यक्तीला आयुष्यभर कर्ज घेणे हे चक्रच जणू चालू असेल आणि त्याला छोट्या छोट्या गरजा भागवण्यासाठी ही कर्ज घ्यावे लागत असेल तर कुंजिका स्तोत्रांचे नियमित पठण केल्यास कर्ज मुक्ती लवकरच होईल.
४. कुंजीका स्तोत्र
श्री कुञ्जिका स्तोत्रम्
सिद्ध कुंजिका स्तोत्र
ऊँ श्रीकुञ्जिकास्तोत्रसिद्ध कुंजिका स्तोत्र
विनियोग : ॐ अस्य श्री कुन्जिका स्त्रोत्र मंत्रस्य सदाशिव ऋषि:॥ अनुष्टुपूछंदः
॥ श्रीत्रिगुणात्मिका देवता ॥ ॐ ऐं बीजं ॥ ॐ ह्रीं शक्ति: ॥ ॐ क्लीं कीलकं ॥ मम सर्वाभीष्टसिध्यर्थे जपे विनयोग: ॥
शिव उवाच
शृणु देवि प्रवक्ष्यामि कुंजिकास्तोत्रमुत्तमम।
येन मन्त्रप्रभावेण चण्डीजापः भवेत् ॥1॥
न कवचं नार्गलास्तोत्रं कीलकं न रहस्यकम् ।
न सूक्तं नापि ध्यानं च न न्यासो न च वार्चनम् ॥2॥
कुंजिकापाठमात्रेण दुर्गापाठफलं लभेत् ।
अति गुह्यतरं देवि देवानामपि दुर्लभम् ॥ 3॥
गोपनीयं प्रयत्नेन स्वयोनिरिव पार्वति।
मारणं मोहनं वश्यं स्तम्भनोच्चाटनादिकम् ।
पाठमात्रेण संसिद्ध् येत् कुंजिकास्तोत्रमुत्तमम् ॥4॥
—————-
अथ मंत्र :
ॐ ऐं ह्रीं क्लीं चामुण्डायै विच्चे। ॐ ग्लौ हुं क्लीं जूं सः
ज्वालय ज्वालय ज्वल ज्वल प्रज्वल प्रज्वल
ऐं ह्रीं क्लीं चामुण्डायै विच्चे ज्वल हं सं लं क्षं फट् स्वाहा।।”
—————-
॥ इति मंत्रः॥
“नमस्ते रुद्ररूपिण्यै नमस्ते मधुमर्दिनि।
नमः कैटभहारिण्यै नमस्ते महिषार्दिनी ॥1॥
नमस्ते शुम्भहन्त्र्यै च निशुम्भासुरघातिनी ॥2॥
जाग्रतं हि महादेवि जपं सिद्धं कुरुष्व मे।
ऐंकारी सृष्टिरूपायै ह्रींकारी प्रतिपालिका॥3॥
क्लींकारी कामरूपिण्यै बीजरूपे नमोऽस्तु ते।
चामुण्डा चण्डघाती च यैकारी वरदायिनी॥ 4॥
विच्चे चाभयदा नित्यं नमस्ते मंत्ररूपिणी ॥5॥
धां धीं धूं धूर्जटेः पत्नी वां वीं वूं वागधीश्वरी।
क्रां क्रीं क्रूं कालिका देवि शां शीं शूं मे शुभं कुरु॥6॥
हुं हु हुंकाररूपिण्यै जं जं जं जम्भनादिनी।
भ्रां भ्रीं भ्रूं भैरवी भद्रे भवान्यै ते नमो नमः॥7॥
अं कं चं टं तं पं यं शं वीं दुं ऐं वीं हं क्षं
धिजाग्रं धिजाग्रं त्रोटय त्रोटय दीप्तं कुरु कुरु स्वाहा॥
पां पीं पूं पार्वती पूर्णा खां खीं खूं खेचरी तथा॥ 8॥
सां सीं सूं सप्तशती देव्या मंत्र सिद्धिं कुरुष्व मे॥
इदं तु कुंजिकास्तोत्रं मंत्रजागर्तिहेतवे।
अभक्ते नैव दातव्यं गोपितं रक्ष पार्वति॥
यस्तु कुंजिकया देविहीनां सप्तशतीं पठेत् ।
न तस्य जायते सिद्धिररण्ये रोदनं यथा॥
।। श्रीरुद्रयामले गौरीतंत्रे शिवपार्वती संवादे सिद्ध कुंजिका स्तोत्र संपूर्णम् ।।
तर असे हे कुंजिका स्तोत्र वाचून आयुष्यातील प्रत्येक अडचण दूर करा. देवी तुमच्यावर प्रसन्न होऊन आशिर्वाद देवो हीच सदिच्छा !!!
==================
प्रिय वाचकहो, उत्तम बोधकथा/moral stories in marathi, प्रेम कथा, रहस्य कथा, कथामालिका, भारतातील संस्कृतीचे विविध पैलू, पर्यटन, खाद्यसंस्कृती, फॅशन, पॅरेंटिंग, लाईफस्टाईल ब्लॉग्स वाचायचे असतील तर रीतभातमराठीला नक्की भेट द्या.