Skip to content Skip to sidebar Skip to footer

महालक्ष्मी मंदिर कोल्हापूर kolhapur mahalakshmi information in marathi

kolhapur mahalakshmi information in marathi: आपल्या भारतात भरपूर मंदिरे आहेत. या मंदिरांची रचना, स्थापना, देवांच्या निर्मितीमागे असलेली कारणे, रहस्य वेगवेगळी आहेत. या सगळ्यांचा उल्लेख पुराणात आपल्याला पाहायला मिळतो. तेहतीस कोटी देव आहेत आपल्या हिंदू धर्मात. प्रत्येकाची कहाणी अतिशय रंजक तर आहेच शिवाय आपल्या भारत देशातील करोडो लोकांचे श्रद्धा स्थान ही आहेत हे देव आणि त्यांची मंदिरे. प्रत्येकाचे श्रद्धा स्थान वेगळे जरी असले तरी भक्तीभाव तोच आहे, विश्वास तोच आहे. शेवटी सगळे देव भक्तीचे भुकेले असतात आणि सगळ्याच देवांचे आपल्या लाडक्या भक्तांवर लक्ष असतेच असते.

आपल्या हिंदू धर्मातील बऱ्याच लोकांचे श्रद्धा स्थान म्हणजे देवी. मग ती कोल्हापूरची असो, अंबाजोगाईची असो नाहीतर मग तुळजापूरची. कोणतीही देवी ही त्यांचे श्रध्देच स्थान. आपल्या आई नंतर आपल्या मनातील गाऱ्हाणे आपण कोणाला सांगत असू तर ती ही देवी आई,अंबाबाई, जगदंबा, महालक्ष्मी, कात्यायनी, जगन्माता अशी एक ना अनेक नावांनी ओळखली जाणारी देवी. आपल्या संपूर्ण महाराष्ट्रात साडेतीन शक्ती पीठांपैकी एक असलेली आई म्हणजे कोल्हापूरची श्री महालक्ष्मी. या साडेतीन पिठंना आपल्याकडे विशेष महत्त्व दिले गेले आहे आणि श्री महालक्ष्मीवर श्रद्धा असणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढतेच आहे कारण इथे येऊन काहीही मागणं मागितलेला भाविक रिकाम्या हाताने परत जातच नाही अशी भाविकांची मनोमन श्रद्धा आहे.

आज त्याच महालक्ष्मी बद्दल काही खास गोष्टी जाणून घेऊया.

करवीर कोल्हापूर महाराष्ट्र हे स्थान असलेले कोल्हापूर नगरीतील महालक्ष्मी मंदिर हे ५२ शक्तीपीठ पैकी एक आहे तर महाराष्ट्रातील साडेतीन पीठांपैकी एक आहे आणि यांचा उल्लेख पुराणात आपल्याला पाहायला मिळतो. आपल्या महाराष्ट्रात देवीची साडेतीन शक्तिपीठे मानली जातात. कोल्हापूरची महालक्ष्मी हे पूर्णपीठ व आद्य शक्तीपीठ, दुसरे माहूरची रेणुकामाता, तिसरे तुळजापूरची तुळजाभवानी आणि सप्तशृंगीची देवी हे अर्धपिठ मानले जाते. पुराणकथेनुसार शक्तीपीठत देवीची शक्ती जनकल्याण करण्यासाठी भक्तांच परीपालन करण्यासाठी सदैव उपस्थित असते. आपल्याकडे अशी सहा शक्तिपीठे उपस्थित आहेत आणि कोल्हापूर हे त्यातील प्रसिद्ध शक्तीपीठ आहे.

कोल्हापूर हे तीर्थस्थान मातृकक्षेत्र म्हणजे करवीर मातृपुजेचे आद्यक्षेत्र व शक्ती उपासक म्हणून तसेच दक्षिण काशी म्हणून ओळखले जाणारे तीर्थक्षेत्र आहे. या मंदिराची स्थापना चालुक्य राजवटीतील राजा कर्ण देव यांनी सातव्या शतकात केली आणि त्यांनीच हे मंदिर बांधले आहे अशी आख्यायिका आहे. म्हणूनच देवीला करवीर निवासिनी म्हटले जाते. कोल्हापूर निवासिनी म्हणजेच करवीर निवासिनी महालक्ष्मी जगदंबा यांच्या मंदिरामुळे कोल्हापूरला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. या मंदिराचे उल्लेख पद्म पुराण, स्कंद पुराण, मार्कंडेय पुराण, देवी भागवत या प्राचीन ग्रंथात आढळतो. ऐतिहासिक शिलालेख,ताम्रपट अशा पुरणांवरून मंदिराच्या नोंदी नवव्या शतकपासून सापडतात. करवीनिवासिनी महालक्ष्मी परब्रह्म यांनी जे रूप साकार करून शक्ती प्रकट केली ती म्हणजेच महालक्ष्मी.

राक्षस केशीचा मुलगा कोल्हासूर हा भयानक राक्षस होता. त्याने सर्व देवतांना खूप त्रास देऊन सलो की पळो करून टाकले होते. त्याच्या त्रासाला कंटाळून देवतांनी देवीला प्रार्थना केली. देवीने दुर्गेचे रूप धारण करून ब्रह्महत्यारांनी कोल्हासूरचा वध केला. मृत्यू वेळी कोल्हासुराच्या तोंडून निघालेला दिव्य प्रकाश थेट देवी महालक्ष्मीचा मुखात शिरला आणि देवीच्या देहाचे कोल्ह्यात रूपांतर झाले. तो दिवस आश्विन पंचमीचा होता. मरणाआधी कोल्हासुरणे या भागाचे नाव कोल्हासूर व करवीर असे राहिले पाहिजे असा वर मागितला म्हणूनच या शहराचे नाव कोल्हापूर ठेवण्यात आले मात्र करवीर तसेच राहिले.

kolhapur mahalakshmi information in marathi

असे म्हणतात की मंदिरात स्थापित महादेवाची प्रार्थना सुमारे सात हजार वर्षे जुनी आहे. आदिशक्ती देवीच्या साडेतीनशे पिठं मधील हे एक पूर्ण पीठ आहे. या मंदिराचे अजून एक वैशिष्ट्य असे की येथे नवग्रह, सूर्य, महिषासूरमर्दिनी, विठ्ठल रखुमाई आणि महादेव या देवतांची ही पूजा स्थळे आहेत. यातील काही प्रतिमा या अकराव्या शतकातील आहेत. मंदिरातील अंगणात स्थित असलेला मणकर्निका कुंड तटावर विश्वेश्वर महामंदिर आहे.

जाणून घ्या महाराष्ट्रातील देवींचे साडेतीन शक्तिपीठे आणि त्यांचा इतिहास

जाणून घ्या सप्तशृंगी मातेच्या मुखात पानाचा विडा का ठेवला जातो

या मंदिराच्या पश्चिम भिंतीवर एक उघडी खिडकी आहे. ज्यातून दरवर्षी जानेवारी आणि फेब्रुवारी महिन्यात सूर्यकिरणे मूर्तीवर पडतात. हा किरणोत्सव उत्सवा प्रमाणे साजरा केला जातो. पहिल्या दिवशी किरणे चरणांवर पडतात, दुसऱ्या दिवशी अंगावर म्हणजेच मध्यभागी तर तिसऱ्या दिवशी सूर्यकिरणे देवीच्या मुखावर असतात. जणू काही सूर्य देव देवीचे चरण स्पर्शून आशीर्वाद घेत असतात. असा देखावा असतो पहिल्या दिवशी. हे दृश्य पाहण्यासारखे असल्याने उत्सवाप्रमाणे साजरे होते. याशिवाय नवरात्र, रथोस्तव, ललित पंचमी आणि दसरा हे सण सुद्धा मोठ्या उत्साहाने साजरे करण्यात येतात.

मंदिरातील देवीचा गाभारा ही अतिशय पवित्र गोष्ट आहे. येथे फक्त पुजाऱ्यांना प्रवेश दिला जातो. देवीला कडक सोवळे म्हणजेच खूप स्वच्छ्ता लागते. अनेक भाविक तेथे दर्शनासाठी येत असतात त्यात अनेक महिला भाविक असतात. पण सोवळे कडक असल्यामुळे पुजाऱ्या शिवाय कोणालाही प्रवेश दिला जात नाही. कडक सोवळ्यात पूजा केली जाते. गाभाऱ्याचे पावित्र्य राखण्यासाठी पुजारी सुद्धा कोणाकडून स्पर्श करून घेत नाहीत.

महालक्ष्मी मंदिरातील देवीची मूर्ती काळ्या दगडावर कोरलेली असून चार हात इतकी उंच म्हणजेच तीन फुटांची असून चौकोनी आहे. देवीच्या डोक्यावर भरगच्च दागिन्यांनी मधवलेल ४० kg वजनाचे मुकुट आहे. मंदिराच्या एका भिंतीत दगडावर देवी अंबाबाईचे चित्र कोरलेले आहे. देवीच्या मूर्तीमागे देवीचे वाहन सिंह याची प्रतिमा आहे. या शिवाय विष्णूच्या शेषनागची साडेतीन वेटोळाची प्रतिमा देवीच्या मुकुटात आहे. नागाचा फणा समोरील बाजूस असून फण्याच्या मागे लिंग व योनी ही तत्व व पुरुष यांची प्रतीके आहेत. देवीच्या चार हातात वेगवेगळी आयुधे धारण केलेली आहेत. डावीकडील खालच्या हातात गदा आणि ढाल, तर उजवीकडील खालच्या हातात पानपत्र आहे. हिंदूंच्या इतर मंदिरांमध्ये देवी पूर्व व उत्तर मुखी असते पण या मंदिरात पश्चिमेस मुख धारण केले आहे. हे मंदिर तरकाकृती असून मुख्य मंदिर महाकाली, महासरस्वती, गणेश मंडप आणि शेवटी गरुड मंडप अशा क्रमाने बांधकाम केले आहे. मंदिराच्या गर्भगृहात दगडी चाबुतरवर दहा खांब असणाऱ्या मेघडंबरित करवीरनिवासिनी अर्थात जगदंबेची मूर्ती आहे. कोल्हापूर शहराच्या मध्यभागी वसलेले तीन गर्भगृह असलेले पश्चिम मुखी मंदिर हेमाडपंथी आहे. या मंदिरात चारही बाजूने प्रवेश करता येतो आणि महाद्वारातून प्रवेश केल्यावर देवीचे दर्शन होते. मंदिरा बाहेर जे स्तंभ आहेत त्यावरील नक्षीकाम मन प्रसन्न केल्यावाचून रहात नाहीत. या मंदिरा बाहेर शिलालेख आहेत.

कोल्हापूर हे महालक्ष्मी मंदिरामुळे छान पर्यटन स्थळ झालेले आहे. इथे मंदिराशिवाय पन्हाळा किल्ला, छत्रपती शाहू महाराज संग्रहालय, रंकाळा तलाव आणि जोतिबाचे मंदिर ही ठिकाणे पाहण्यासारखी आहेत.
तर मंदिराजवळ पालघर आणि शिरपामाल ही ठिकाणे पाहण्यासारखी आहेत.

एका गावात एक ब्राह्मण रहात होता. तो भगवान विश्र्नुंची खूप आराधना करायचा. एक दिवस भगवान विष्णु त्याच्यावर प्रसन्न झाले आणि हवे ते वरदान माग असे ब्रह्मनाला म्हणाले. घरामध्ये लक्ष्मीचा निवास असावा असा वर ब्रह्मनाने मागितला. भगवान विष्णु म्हणाले येथील महालक्ष्मी मंदिराजवळ एक स्त्री येते. तिला तुझ्या घरी येण्यास सांग त्याच देवी महालक्ष्मी आहेत. त्या जेंव्हा तुझ्या घरी येतील तेंव्हा तुझ घर धन धाण्याने भरून जाईल असे म्हणून विष्णु गायब झाले. दुसऱ्या दिवशी सकाळी ब्राह्मण मंदिराजवळ गेला आणि त्या स्त्रीला घरी येण्यास आमंत्रण दिले. देवी म्हणाली मी येईन त्याआधी तुला महालक्ष्मी व्रत करावं लागेल ते ही सोळा दिवस. हे सोळा दिवस रोज माझी प्रार्थना करून चंद्रावर अर्घ्य अर्पण करायचे आहे. सोळाव्या दिवशी चंद्रावर अर्घ्य अर्पण केल्यावर तुझी इच्छा पूर्ण होईल. ब्राह्मणांने व्रत पूर्ण केले आणि उत्तरेला तोंड करून लक्ष्मीचं नाव घेतलं आणि देवीने तिचे वाचन पूर्ण केले. तेंव्हा पासून व्रताची परंपरा सुरू झाली.

१. दर्शनासाठी ई पास आहे का ? कसा घ्यायचा ?

कोविड मुले भाविकांची दर्शनाची सोय होण्यासाठी ई पास उपलब्ध करून देण्यात आले होते. हे ई पास इंटरनेटच्या मदतीने उपलब्ध करून दिले जात होते. त्यासाठी भाविकांचे नाव, आधार कार्ड घेऊन ते भाविकांना दिले जातात आणि मंदिरात दर्शन घेण्याची संधी दिली जाते.

२. आरतीची वेळ कोणती ??

काकड आरती पहाटे ४:३० ते ६ पर्यंत.
मध्य आरती सकाळी ११:३०
संध्याकाळ ची आरती ८:०० आणि रात्री आरती १०:०० होते.

३. कोल्हापूरल कसे जावे ?

आपण बस,ट्रेन आणि विमान द्वारे जाऊ शकतो.
ट्रेन : मुंबई,पुणे,औरंगाबाद आणि शिर्डी वरून आहे.
नाशिक वरून बस आणि विमान सेवा आहे. तसेच सगळ्याच शहरातून बस मिळू शकते.
विमान : जव्हार पासून नाशिक विमानतळ ८० किमी आहे तर मुंबई १०० किमी आहे .

४. देवी नवसाला पावते का ??

नक्कीच. श्रध्देने जाणारा कोणताही भाविक आजवर रिकाम्या हाताने आलेला नाही. हे जागृत देवस्थान आहे.

५. देवीला साडी चढवू शकतो का ??

नक्की. आपण काही इच्छा मागितली असेल किंवा साडी चाढवण्याची इच्छा असेल तर आपण चढवू शकतो.

६. दर्शनाची निवांत वेळ ??

मध्य आरती नंतरची वेळ ही निवांत असते. तसेच दुपारची पूजा झाल्यानंतर ते संध्याकाळ पर्यंत ची वेळ ही निवांत असते दर्शनासाठी. तर ऑक्टोंबर नोव्हेंबर महिन्यात दर्शनाची निवांत संधी आपल्याला मिळू शकते. या काळात फारशी भाविकांची गर्दी नसते.

================

हेही वाचा

marathi goshta

marathi story

marathi moral stories

marathi love story

marathi motivational stories

Leave a Comment

error:

Warning

सध्या युट्युब वर कथा चोरी करून वाचून दाखवण्याचे धंदे चालू आहेत लोकांचे. आमच्या वेबसाईट वरची कथा कुठल्याही युट्युब चॅनेलवर बेकायदेशीररित्या आढळल्यास त्या चॅनेलला लगेच रिपोर्ट करण्यात येईल ह्याची कृपया दक्षता घ्यावी. तसेच आपल्या वाचकांपैकी कुणालाही असे बेकायदेशीर चॅनेल्स आढळल्यास आम्हाला ritbhatmarathi@gmail.com ह्या ई-मेल वर त्वरित कळवावे.