
२ दिवसानंतर आज तो दिवस उजाडला. सगळी तयारी झाली होती. आनंद आणि त्याचे आई बाबा आपल्या गाडीमध्ये निघाले आणि मध्ये रितू आणि फॅमिलीला पिकअप करणार होते. आनंद रितूच्या घरी पोहोचला. उशीर होईल म्हणून रितूच्या आई बाबानाच खाली बोलावलं होतं त्यांनी. रितूचे आई वडील आले आणि मागून रितू हि आली. रितू फोनवर कुणाशी तरी बोलण्यात बिझी होती. आनंदची नजर रितू वर पडली आणि तो पाहतच राहिला तिला….
एवढ्या वर्षांनी रितूला पाहिलं होतं त्याने.. पहिल्या रितू मध्ये आणि आताच्या रितू मध्ये खूप फरक होता. रितू आता अधिकच सुंदर दिसत होती. आधीदेखील दिसायला ती कमी नव्हतीच…. पण कॉलेजला आणि शाळेतल्या मुलींमध्ये खूप फरक पडतो…. राहणीमान बदलतं.. कॉलेजची हवा लागली कि चांगलं वागलं कळायला लागतं.. रितुने पिंक कलरचा टॉप घातला होता आणि त्यावर ३/४th जीन्स घातली होती. गडद गुलाबी रंगाच्या टॉप मध्ये रितूचा गोरा गोरा रंग अधिकच उठून दिसत होता. आनंदला बघताचक्षणी रितू आवडायला लागली होती.
रितूचा फोन झाला होता.. रितू गाडीत येऊन बसली.. बसताना तिने गाडीतल्या सगळ्यांवर एकदा नजर फिरवली आणि तिची नजर ड्राइवर सीट वर फिरली ..ड्राइवर सीटवर आनंद बसला होता.. आनंदलाही कॉलेजचं वारं लागलं होतं.. त्यामुळे अर्थातच तोही स्मार्ट आणि आणि हँडसम दिसू लागला होता.. दोघांची नजरेला नजर भिडली आणि दोघांच्याही स्मितहास्याबरोबरच त्यांची कोकण ट्रिप सुरु झाली.
आनंद तर पार भाळला होता रितूवर. गाडी चालवता चालवता सारखा तो गाडीच्या ‘रिअर व्यु मिरर’ मध्ये रितूला बघत होता आणि रितूही त्यालाच… दोघांनाही एकमेकांशी बोलायला कस्सस होतं होतं.. दोघेही विसरून गेले होते कि बालपणी तेच दोघे किती चांगले मित्र होते आणि कसे भांडायचे एकमेकांशी.. आता वयानुसार तो आपलेपणा नाहीसा झाला होता कुठेतरी… मध्ये मध्ये थोडा चहा नाष्ट्याचा ब्रेक घेत संध्याकाळी सगळे जण कोकणातल्या रिसॉर्ट वर सुखरूप पोहोचले होते…. अजूनही रितू आनंदने एकमेकांशी अबोलाच धरला होता.. सकाळी दोघांच्याही आई बाबांचा जवळच्याच लेक वर बोटिंगला जायचा प्लॅन ठरला.. पण रितू आनंदला बोटिंग मध्ये रस नसल्याकारणाने त्यांनी त्यांच्यासोबत जाण्यास मनाई केली..
दोघांचेही आई बाबा बोटिंगला निघून गेले.. त्यानंतर रितू आनंदला थोडा निवांतपण मिळाला बोलायला.. आनंदने बोलायला सुरुवात केली आणि रितूही आनंद सोबत फ्रॅंक होयला लागली आणि बघता बघता बालपणीच्या आठवणींमध्ये ती दोघेही मंत्रमुग्ध झाली होती.. दोघेही आता एकमेकांसोबत कंफोर्टेबल झाली होती.. असाच आठवडाभर कसा गेला कळलंच नाही आणि कोकण ट्रिप संपली सुद्धा. त्यानंतर रितू आनंद दोघेही आपापल्या मार्गी लागले.. दोघांनीही एकमेकांचे नंबर्स एक्सचेन्ज केले होतेच ..आनंदला फार वाटायचं कि रितूला फोन करून तिची विचारपूस करावी पण त्याची कधी हिंमतच नाही झाली….
अशीच ३-४ वर्षे गेली. दोघांचंही शिक्षण पूर्ण होऊन दोघांनाही चांगला जॉब लागला होता.. घरी आता रितूच्या लग्नाचीही बोलणी सुरु झाली होती. रितूच्या आई वडिलांना फार वाटायचं कि रितूचं आनंद सोबत लग्न व्हावं आणि आनंदच्या आई वडिलांना देखील….. आणि तशी आनंदनेही संमती दाखवलीच होती .पण एके दिवस रितुने आपलं दुसऱ्या मुलावर प्रेम असल्याचं सांगितलं आणि लग्न करील तर त्याच्याशीच असंही तिने आपल्या आई वडिलांना ठामपणे सांगितलं. रितूच्या आई वडिलांना हे लग्न मान्य नव्हतं. पण रितुने त्यांना कन्व्हिन्स केलं आणि आनंदच्याही आई वडिलांनी रितूच्या आई वडिलांना समजावून सांगितलं होतं कि पोरीच्या इच्छेनुसार लावून द्या लग्न ..इकडे आनंदचेही आई बाबा आनंदसाठी मुलगी बघायला लागले होते आणि बघता बघता आनंदचेही लग्न ठरले होते..दोघांचेही एकामागोमाग लग्न झाले आणि सुखी संसार सुरु झाला.. आता दोघेही आपल्या आयुष्यात सुखी आहेत.. म्हणतात ना लग्नाच्या गाठी स्वर्गातच बांधल्या जातात आणि त्यात कुणीही हस्तक्षेप करू शकत नाही.
त्या स्वर्गात बांधलेल्या गाठी जुळवून आणण्यासाठी देवाचेही प्रयत्न चालू असतात आणि नकळत देवच आपल्याला असा मार्ग दाखवतो कि आपणही नकळत तोच मार्ग अनुसरण करतो आणि अशाच पद्धतीने रितू आणि आनंद बाबत देखील तेच ठरलं. कोकण ट्रिप मधेच दोघेही एकमेकांना आवडू लागले होते. पण पुरेसा संवादाअभावी दोघेही पुढे गेली नाहीत आणि त्यांची कथा खुलण्याआधीच कायमची बंद झाली.
=================
प्रिय वाचकहो आमच्या कथा तुम्हाला वाचायला आवडत असतील तर आमच्या फेसबुक पेजला फॉलो करून लेखकांना प्रतिसाद नक्की द्या. जेणेकरून नवोदित लेखकांना प्रेरणा मिळेल.
https://www.facebook.com/ritbhatmarati/
तसेच तुम्हालाही लिहायची आवड असेल तर आमच्याशी संपर्क साधा.
ritbhatmarathi@gmail.com
फोटो साभार – गूगल
आमची स्टोरी आमच्या/लेखकाच्या नावासकट शेयर केल्यास आम्हास काही हरकत नाही
=============
हेही वाचा

सारिका सोनवणे
नमस्कार मी सारिका. पुण्यातल्या नामांकित अभियांत्रिकी महाविद्यालयातून (COEP) संगणकाची पदवी घेतली. आणि गेली १० वर्षे आयटी मध्ये जॉब करते आहे. गेल्या १० वर्षांत आयटी मध्ये खूप काही शिकायला मिळालं. परदेशातही जायची बऱ्याचदा संधी मिळाली. पण आता १० वर्षे होऊन गेली आणि कुठंतरी मनात खोलवर रेंगाळत असलेली स्वप्ने जागी झाली आणि ठरवलं कि आता बास करायचं आणि स्वतःचा व्यवसाय सुरु करायचा. वाचनाची पहिल्यापासूनच आवड होती. वाचता वाचता असं वाटलं आपणही लिहू शकतो आणि मग रीतभातमराठीच व्यासपीठ सुरु केलं. आणि हळू हळू स्वतःसोबत इतर लेखकांना जोडत गेले. लिखाणासाठी नवोदित लेखकांना रीतभातमराठीच्या माध्यमातून उत्तम व्यासपीठ मिळावं हीच सदिच्छा.