
खण म्हटलं कि लहान मुलींची परकर ..पोलकी आठवतात आणि त्याचप्रमाणे आपली आजी..पणजी नऊवार लुगड्यांवर प्रामुख्याने घातली जाणारी चोळी ती खणाचीच…. पूर्वीचं ते खणाचं कापड आता फक्त चोळीपुरतं मर्यादित न राहता खणाची साडी खूप ट्रेंड मध्ये आहे. नुकतीच संपलेल्या झी मराठी वरील मालिका “तुझ्यात जीव रंगला” मधील अंजली बाईंची ती खणाची साडी खूपच भाव खाऊन गेली….तेव्हापासूनच बहूतेक खणाच्या साडीचा ट्रेंड बाजारात आला.

अस्सल मराठमोळा पोशाख असणाऱ्या खणाने परत फॅशन च्या जगात प्रवेश केला. खणाच्या साड्यांमध्ये बाजारात पुष्कळ प्रकार पाहायला मिळतात. अगदी ५०० रुपयांपासून सुरु होणारी साडी २५ हजारांच्या खण पैठणी मधेही उपलब्ध आहे. खण हा प्रकार पारंपरिक जरी असला तरी खणाच्या साडीला एक डिझायनर टच मिळाला. पूर्वी काही रंगातच मिळणार खण आता अनेक सुंदर रंगात मिळू लागलं. या खणात मुखत्या: हॅन्डलूम वर बनणारे खण आणि पॉवरलूम वर बनणारे खण असे दोन प्रकार आहेत. हॅन्डलूम वर बनवलेले खण हे रेशमाचे असते आणि हे खण थोडे महाग असतात. याऊलट पॉवरलूमवर बनणाऱ्या चांगल्या प्रतीच्या खणात ७० ते ८० टक्के कॉटन असते आणि कापडाला चकाकी येण्यासाठी २०-३०% रेयॉन आणि आर्ट सिल्क असते. म्हणून पॉवरलूमवर बनणाऱ्या खणाची किंमत सर्वसामान्यांना झेपेल एवढी असते. स्वस्तात मस्त अशी हि खणाची साडी सणावाराला अगदी उठून दिसते आणि प्रत्येक स्त्रीच्या वॉर्डरोब मध्ये असायलाच हवी.

खणाची साडीमध्ये अगदी प्लेन खणाची साडी आणि प्रिंट्स मध्ये सरस्वती प्रिंट, नथ प्रिंट सध्या ट्रेंड मध्ये आहे. खणाची साडी जर नेसायची झाली तर त्यावर शक्यतो प्लेन ब्लाऊज घालावा. खणाच्या साडीवर खणाचा ब्लॉउज उठून दिसत नाही. खण साडी आणि त्यावर ऑक्सिडाइज्ड ज्वेलरी हा लुक सध्या खूप ट्रेंड मध्ये आहे आणि खूप खुलून दिसतो. त्याचबरोबर कपाळावरची चंद्रकोर टिकली ह्या लूकची अजूनच शोभा वाढवते. नथीचा आकडाही ह्या साडीवर उठून दिसतो.


पांढऱ्या धाग्याने विणलेल्या खणाच्या साड्याही बाजारात उपलब्ध आहेत. खणाच्या साडीप्रमाणेच खणाचे कुर्ते, वनपीस आणि ओढणीलाही अधिक पसंती मिळत आहे. खणाच्या साडीवर सरस्वती आणि नथीप्रमाणेच कमलाकर, पोपट, मोर सारखे रेखाटलेले नक्षीकाम खणाच्या साडीच्या पदरावर सर्रास पाहायला मिळते. २ शेड्स मधेही खणाची साडी भेटते, जसे कि लाल-काळा , हिरवा-लाल, गुलाबी-पिवळा असे कॉन्ट्रास्ट रंग खणाच्या साडीत खूप भाव खातायेत आज काल.
थोडक्यात सांगायला गेलं तर आपल्या साड्यांच्या कलेक्शन मध्ये एक तरी खणाची साडी ठेवाच. म्हणजे सणावाराला खणाची साडी तशीच हलकी असल्याने कामं करतानाही अडचण येणार नाही आणि सोबतच दिवसभर मिरवताही येईन. नाहीतर एखादी हेवी साडी घातली कि ती फक्त पुजेपुरतं घालतो आपण आणि नंतर कामं आहेत म्हणून काढून ठेवतो मग सणावाराला आपण स्पेशल दिल्याचा फिलच येत नाही.
काय मग लाल,पिवळा,मेहेंदी,काळा ,पोपटी,हिरवा,जांभळा कुठला रंग घेताय तुम्ही?
==================
प्रिय वाचकहो आमच्या कथा तुम्हाला वाचायला आवडत असतील तर आमच्या फेसबुक पेजला फॉलो करून लेखकांना प्रतिसाद नक्की द्या. जेणेकरून नवोदित लेखकांना प्रेरणा मिळेल.
https://www.facebook.com/ritbhatmarati/
तसेच तुम्हालाही लिहायची आवड असेल तर आमच्याशी संपर्क साधा.
ritbhatmarathi@gmail.com
फोटो साभार – गूगल
आमची स्टोरी आमच्या/लेखकाच्या नावासकट शेयर केल्यास आम्हास काही हरकत नाही
=============
हेही वाचा

सारिका सोनवणे
नमस्कार मी सारिका. पुण्यातल्या नामांकित अभियांत्रिकी महाविद्यालयातून (COEP) संगणकाची पदवी घेतली. आणि गेली १० वर्षे आयटी मध्ये जॉब करते आहे. गेल्या १० वर्षांत आयटी मध्ये खूप काही शिकायला मिळालं. परदेशातही जायची बऱ्याचदा संधी मिळाली. पण आता १० वर्षे होऊन गेली आणि कुठंतरी मनात खोलवर रेंगाळत असलेली स्वप्ने जागी झाली आणि ठरवलं कि आता बास करायचं आणि स्वतःचा व्यवसाय सुरु करायचा. वाचनाची पहिल्यापासूनच आवड होती. वाचता वाचता असं वाटलं आपणही लिहू शकतो आणि मग रीतभातमराठीच व्यासपीठ सुरु केलं. आणि हळू हळू स्वतःसोबत इतर लेखकांना जोडत गेले. लिखाणासाठी नवोदित लेखकांना रीतभातमराठीच्या माध्यमातून उत्तम व्यासपीठ मिळावं हीच सदिच्छा.