Ritbhatmarathi

Search
Close this search box.

हर्षवर्धन सर तिथे पोहोचले आणि योगेशला एकट्यालाच जायला सांगितलं योगेश गेल्यानंतर सगळ्या फाईल्स बाजूला सारून हर्षवर्धन सर पूजाला लगेच म्हणाले….

हर्षवर्धन सर – पूजा…लवकर तयार हो आपल्याला बाहेर फिरायला जायचंय…!

पूजा – [ गोंधळून बोलते ] क्काय….काय सर…?

हर्षवर्धन सर – अगं हे तर योगेशला कटवण्यासाठी केलेलं नाटक होतं…चल उठ आटप लवकर [ टायची गाठ बांधत हसत म्हणतात ]

पूजा – [ संतापलेल्या स्वरात ] सॉरी…तुम्ही जा…मला कुठेही जायचं नाहीय…

हर्षवर्धन सर – का…? तुझी तबियत तर ठीक आहे ना…काही प्रॉब्लेम नाही ना…[ पूजाला स्पर्श करण्याचा प्रयत्न हर्षवर्धन सर करतात पण पूजा झर्रकन मागे सरकते आणि म्हणते ]

पूजा – मी इथे काम करण्यासाठी आलीय…तुमच्याबरोबर हिंडण्याफिरण्यासाठी,मौजमजेसाठी नाही आलीय…

हर्षवर्धन सर – तुला स्वतःबद्दल जरा जास्तच घमेंड आहे…आज तुझी ही घमेंड नाहीशी केल्याशिवाय राहणार नाही [पूजाचा हात घट्ट पकडत हर्षवर्धन म्हणतात ]

पूजा – सोडा…सोडा माझा हात…मी म्हणतेय ना सोडा माझा हात…[ आपला हात हर्षवर्धनच्या हातातून सोडवण्याचा प्रयत्न पूजा करते ]

हर्षवर्धन सर – आणि….नाही सोडला तर….?

पूजा – तुम्हाला काय वाटलं…तुमच्या या अशा हलकट वागण्याने तुम्ही मला जिंकाल..? मी तुमचा तिरस्कार करत होते…आणि यापुढेही करत राहील…[ नागिणीसारखी पूजा त्वेषाने म्हणाली ]

हर्षवर्धन सर – आणि मी तुझ्यावर प्रेम करत होतो आणि यापुढेही करत राहील…तेही आयुष्यभर…[ हर्षवर्धन सर पूजाच्या डोळ्यात प्रेमाने पाहत म्हणाले ]

पूजा – मी तुमच्या आईकडे तक्रार करेन तुमची…

हर्षर्धन सर – काय सांगणार तिला…कि मी तुझ्यावर प्रेम करतो म्हणून आणि प्रेम करणं हा गुन्हा आहे…असं तू माझ्या आईला सांगणार…[ पूजाच्या जवळ जात हर्षवर्धन सर म्हणतात ] तुला एक गुप्त

गोष्ट सांगतो….यू नो व्हॉट…मी आपल्याबद्दल माझ्या आईला आधीच सांगून ठेवलंय…मला इकडे मुंबईला तुझ्यासोबत पाठवण्यात तिचा मोठा हात आहे…

पूजा – काय…[ पूजा अवाक होऊन म्हणते ]

हर्षवर्धन सर – यस…[ हर्षवर्धन सर हसून म्हणतात ] आता तरी लवकर तयार हो…

पूजा – मी सांगितलं ना….मला नाही यायचं म्हणून…

हर्षवर्धन सर – हे बघ…पूजा आता खूप झालं…मला संतापवू नकोस…

पूजा – मी तुमच्या बरोबर…येणार नाही…येणार नाही…येणार नाही…!

तेवढ्यात एक तडकदिशीं जोरदार चपराक पूजाच्या श्रीमुखात पडते…हर्षवर्धन सरांची चपराक एवढ्या जोरात पडली की पूजाचे डोळे पाण्याने डबडबले…पूजा रडतच आपल्या खोलीत गेली आणि आपल्या रूमचा दरवाजा बंद करून ढसाढसा रडू लागली…आपल्या हातून हे काय विपरीत घडलं या विचाराने हर्षवर्धन सर सुन्न झाले त्यांनी पूजाच्या खोलीचं दार ठोठावून दार उघडण्याची वारंवार विनंती केली….खूपदा माफी मागितली पण तरीही पूजाने दरवाजा काही उघडला नाही…निराश आणि उदास होऊन हर्षवर्धन सर आपल्या खोलीत परतले…पूजाने मात्र त्याच दिवशी परत जाण्याचं ठरवूनही टाकलं…व लगबगीने आपले सामान आवरू लागली…संध्याकाळी वेटर रूममध्ये आला तेव्हा त्याला जेवण ‘ नको ‘ म्हणून सांगितलं आणि त्याच वेटर कडे चौकशी केल्यांनतर तिला असं समजलं की बाजूच्या खोलीचं दार सकाळपासून उघड नाहीय…आणि आतून काहीच प्रतिसाद मिळत नसल्याचंही पूजाला वेटरकडून समजतं…हे समजताच पूजा अस्वस्थ झाली हर्षवर्धनची चिंता न करता आपण तिथून निघून जायचं असं पूजाने अगोदरच ठरवलेलं होतं पण तिचे पाय मात्र त्याच्या खोलीकडे वळले…पूजाने दार वाजवलं पण आतून काहीच आवाज आला नाही…पूजा मात्र विचित्र शंकेने घाबरून गेली आणि अथकपणे दार खटखटू लागली…त्याच रागाने हेलपाटत हर्षवर्धनने दार उघडले…समोर पूजाला पाहून त्याला काहीच सुचेना…हर्षवर्धनकडे पाहताच पूजाला असे जाणवले की जणू वर्षानुवर्षे आजारी आहेत की काय कारण तसे हर्षवर्धन सर दिसत होते….काय झालंय हे पाहण्यासाठी पूजाने हर्षवर्धनच्या कपाळावर हात टेकवला आणि विजेच्या वेगाने पूजाचा हात मागे आला कारण हर्षवर्धन तापाने प्रचंड फणफणला होता हर्षवर्धन लगेच पूजाला म्हणाले-

हर्षवर्धन सर – पूजा तू…माझी काळजी करू नकोस…मला काहीही झालेलं नाहीय…तेव्हा तू तुझ्या खोलीत परत जा…

त्यांच्या बोलण्याकडे बिलकुल लक्ष न देता पूजाने त्यांना बळेबळेच अंथुरणावर निजवले…औषध दिले आणि ताप उतरवण्यासाठी कपाळावर गार पाण्याच्या घड्या ठेऊ लागली….अगतिकतेने हर्षवर्धन सर पूजाला म्हणाले…

हर्षवर्धन सर – पूजा…राहू देत..मी खूप वाईट माणूस आहे…मी मेलो तरी कुणाला काय फरक पडणार आहे…? मी आणि माझं नशीब…तू कशासाठी हे सगळं करतेय…? कृपा करून इथून जा…[ बोलतानाही हर्षवर्धनाला धाप लागत होती ]

पूजा – हे बघा…तुमची प्रकृती ठीक नाहीय…तेव्हा तुम्ही शांतपणे पडून राहा…

हर्षवर्धन सर – पूजा…माझ्यासाठी विनाकारण अस्वस्थ होऊ नकोस तू तुझ्या खोलीत जाऊन विश्रांती घे…!

पूजा – सर आता पुरे झालं….एकदम गप्प….[ एखाद्या लहान मुलाला रागावतात तशा सुरात पूजा हर्षवर्धन सरांना समजाऊ लागते ]

हर्षवर्धन सर – तुझ्या तोंडून माझं नाव आलं….खूप बरं वाटलं…[ हर्षवर्धनच्या चेहऱ्यावर तरतरी आली ] पूजा मी काय एकदम दगडाच्या काळजाचा नाहीय…परिस्थितीने मला कठोर बनवलंय…[ दुखावलेल्या आवाजात हर्षवर्धन सर बोलत होते ]

पूजा – हर्षवर्धन…प्लिस…! [ सरांना थोपवत पूजा म्हणाली ]

हर्षवर्धन सर – नाही पूजा आज मला माझं मन मोकळं करू देत त्याखेरीज मला स्वस्थता मिळणार नाही…तुला माहितीय कितीतरी वर्षांपासून माझी अशी इच्छा होती की माझं सुखदुःख समजून घेणार कुणीतरी असावं…मला समजून घेणार कुणीतरी भेटावं…तुला माहितीय मी इतका कठोर का झालो ते….मी माझ्या लहानपणी खूप दुःख सोसलंय…तुला नाहीय याची कल्पना…

हे सांगताना हर्षर्धनाची नजर एकदम शून्यात गेली….ते भूतकाळात हरवले….

हर्षवर्धन सर – माझे वडील एक फार मोठे उद्योगपती होते… आईबाबांचा लग्न आंतरजातीय होतं…माझी आई एका मध्यमवर्गणीय कुटुंबातली होती…माझे आजोबा अतिशय परंपराप्रिय होते…आईबाबांचं हे आंतरजातीय प्रेम त्यांना अजिबात मान्य नव्हतं…पण सगळ्यांचा विरोध असूनही आईने हे लग्न केलं आणि आजोबांनी तिच्याशी असलेलं नातं कायमचं तोडून टाकलं…आणि नंतर आईबाबांनी एका अत्यंत चांगल्या आणि नवीन आयुष्याला सुरुवात केली…माझ्या वडिलांचं माझ्या आईवर खूप प्रेम होतं…दरम्यान माझ्या धाकट्या बहिणीचा जन्म झाला…मला ती खूप आवडायची…माझा खूप लळा होता तिला…[ बोलत असताना हर्षवर्धनला धाप लागत होती तसं पूजाने लगेच हशवर्धनला पाणी आणून दिलं तसा तो परत

बोलू लागला ] ….पण आमच्या त्या सुंदर जीवनाला कुणाची तरी दृष्ट लागली बाबांच्याच ऑफिसातल्या काम करणाऱ्या एका मुलीने त्यांना आपल्या रूपाच्या जाळ्यात अडकवलं…इतकं अडकवलं की बाबा आम्हा सगळ्यांना विसरले…ते एकदम बदलून गेले…ते रोज दारू पिऊन घरी येऊ लागले…नंतर…नंतर कितीतरी दिवस ते घरीच येत नव्हते…तिच्याचकडे राहत…आई काही म्हणायला गेली की तिला बेदम मारत…मला आणि माझ्या बहिणीला म्हणजेच छोटीलाही येत-जात असताना रागवत…आणि मारतही एक विचित्र अशी एक घुसमट तयार झाली होती…आणि अशाच वातावरणात आम्ही वाढत होतो…हळूहळू बाबानी वाढवलेल्या त्या बिजनेसची त्या बाईने वाट लावली…तिने बाबाना अक्षरशः उघड्यावर आणलं…आई नेहमी रडायची…बाबांचा खूप छळ सोसूनही आई माझ्या बाबांना समजवायची….तरीही त्या बाईचा नाद मी सोडणार नाही असं बाबांनी आईला बजावून सांगितलं…आणि अशातच त्या बाईने म्हणजेच रिचाने माझ्या बाबांना दारू पाजून नशेतच सगळी इस्टेट आपल्या नावावर करून घेतली…व आम्हा तिघांना घराबाहेर काढून टाकले…त्यावेळी बाबा आमच्याकडे असहाय होऊन पाहू लागले आणि त्याच क्षणापासून मला त्यांच्याबद्दल तिरस्कार दाटून आला… आम्ही तिघेही रस्त्यावर आलो होतो…आजोबांनी तर आईशी संबंध तोडून टाकले होते म्हणून माहेरी जाऊन राहण्याचा प्रश्नच उद्भवत नव्हता…मग माझ्या आईने एका महिलाश्रमात जाऊन राहण्याचा निर्णय घेतला…दुसरीकडे रिचाने माझ्या बाबांना नोकरासारखी वागणूक द्यायला सुरुवात केली तिच्या कृपेवर त्यांना जगणं भाग होतं…मग बाबांनाही खूप पश्चाताप होऊ लागला आणि त्याच दुःखाने ते सतत आजारी राहत…अशातच छोटीची प्रकृतीही बिघडू लागली…कारण छोटीला हार्ट चा प्रॉब्लेम होता आणि शस्त्रक्रियेसाठी लाखो रुपयांची गरज होती…माझ्या आईने रिचाकडे जाऊन मदतीसाठी हात पसरले…रिचा खूप निर्दयी होती तिने माझ्या आईला धुडकावून लावले….मग अशातच उपचारांअभावी छोटी हे जग सोडून गेली…

आल्या बहिणीची आठवण अनावर होऊन हर्षवर्धन रडू लागले…पूजाही आपले अश्रू थोपवू शकली नाही….हर्षवर्धन परत आपले मन मोकळे करू लागला…

हर्षवर्धन सर – छोटीच्या जाण्याचा खूप मोठा धक्का मग माझ्या बाबांनाही बसला ते स्वतःला गुन्हेगारच समजू लागले पण ज्यावेळेला त्यांना भान आलं तेव्हा सगळं संपून गेलं होतं…त्या दिवसापासून मला त्यांचा इतका तिटकारा आला की मरेपर्यंत मी त्यांचं तोंडही नाही पाहिलं…आणि याच पश्चातापाची आगीतच माझ्या बाबांनाही मृत्यूला सामोरं जावं लागलं…त्यांच्या मरण्याचा मला किंचितही दुःख नाही झालं…नियतीने का अशी भयानक कसोटी आमची घेतली होती….आईने मात्र सगळ्या परिस्थितीचा सामना करण्याचं ठरवलं…तिने मग आश्रमातच नोकरी मिळवली…माझ्याबरोबरच तिने स्वतःच अर्धवट राहिलेलं शिक्षण पूर्ण केलं…दिवसरात्र अथक परिश्रम करून तिने प्राध्यापिकेची नोकरी मिळवली…या एवढ्या काळात मी दगडासारखा कठोर झालो…मी हसणं विसरलो…काळजात कायम संतापाची आग धगधगत

असायची…मग तू भेटलीस…तुझ्या स्वभावाने आणि साधेपणाने माझंही आयुष्य बदललं…मी तुझ्या प्रेमात कधी पडलो मला कळलंच नाही….पण दुर्दैवाने माझ्याविषयी वाटणाऱ्या तिरस्काराचं रूपांतर प्रेमात करणं मला जमलं नाही…

बोलता बोलता हर्षवर्धन एकाएकी गप्प झाले…त्यांच्या आयुष्याची हकीकत ऐकून पूजाला रडू आलं…पूजाला स्वप्नातही वाटलं नव्हतं की, या कठीण आणि कठोर दिसणाऱ्या माणसाचं एवढं कोमल आणि भावनाप्रधान हृदय असेल….हर्षवर्धनचे अश्रू पुसत पूजा म्हणाली-

पूजा – हर्षवर्धन….आय एम सॉरी…मी तुम्हाला खर्च खूप त्रास दिला…आता इथूनपुढे मी तुम्हाला एवढं प्रेम देईल की तुम्ही तुमची सगळी दुःख विसरून जाल…!

यावर हर्षवर्धनने पूजाचा हात आपल्या हातात घेऊन तिला आपल्याकडे ओढलं आणि पूजा शरमेनं मान खाली घेत म्हणाली….

पूजा – सर….आता नको ना…[ आणि आपला हात हर्षवर्धनच्या हातातून सोडवला आणि आपल्या खोलीत गेली ]

सकाळची प्रसन्न उन्ह साऱ्या जगाला प्रकाशित करत होती…सकाळपर्यंत हर्षवर्धनचा ताप पूर्णपणे उतरला…दोघेही तयार झाली…दोघांनीही सकाळचा नाश्ता एकत्र केला…तेवढ्यात हर्षवर्धनाला शारदादेवींचा फोन येतो…

हर्षवर्धन सर – आई…मी उद्याच परत येतोय…आणि येताना तुझ्या लाडक्या सुनेलाही घेऊन येतोय…[ पूजाकडे प्रेमळ कटाक्ष टाकत हर्षवर्धन म्हणाला…] पूजा आईला तुझ्याशी बोलायचं आहे….[पूजाकडे फोन देत म्हणाला]

शारदादेवी – पूजा…..!

पूजा – हूं…! [ शारदादेवींचा आवाज ऐकताच पूजा गडबडली ]

शारदादेवी – पूजा…आता लवकरच तू सून म्हणून घरी ये…आता फार काळ वाट नाही पाहू शकत मी तुझी…[ लाजून पूजा चूर झाली ]

शारदादेवी – अगं…पहिल्या भेटीपासूनच मी तुला सून मानलं होतं…पण जेव्हा हर्ष म्हणला ना मला की तू त्याच्यावर नाराज आहेस मग मीच त्याला खूप रागावले…आणि सांगितलं काय वाट्टेल ते करून समजूत

कधी आणि घेऊन ये आपल्याकडे पूजाला सून म्हणून…आता तुम्ही दोघेही लवकर घरी या…तुमच्या लग्नाची तयारी करायचीय…

हे ऐकताच पूजाने आपला चेहरा हर्षवर्धनच्या छातीवर लपवला…

हर्षवर्धन – आई…अगं ती लाजतेय बोलायला….आम्ही दोघेही उद्या लवकर घरी येऊ…तू मात्र स्वतःला जप…

आपल्या आजूबाजूलाही अशी कठोर माणसं असतात तर त्या माणसांचा तिरस्कार न करता त्यांना मायेनं बोलतं करा कारण अशी माणसं स्वभावाने खूप संवेदनशील असतात..