Ritbhatmarathi

Search
Close this search box.

हर्षवर्धन आपल्या आईच्या स्वभावामध्ये झालेलं परिवर्तन पाहून हरखून जातो कारण कित्येक दिवसांनी शारदादेवी मोकळा श्वास घेतायत हे हर्षवर्धनला उमजू लागत…कारण शारदादेवी पूजाला भेटण्यासाठी कित्येक वेळेला तिच्या घरी जात असत कारण कुटुंबातल्या सर्वांशीच त्या एकजीव झाल्या होत्या…पूजाच्या बाबांना तर त्यांनी भाऊच मानले होते आणि त्याचप्रमाणे पूजाला शारदादेवींबद्दल एक विशेष आदर वाटत असे…काही ना काही त्या नेहमी पूजाच्या घरी घेऊन जात रिकाम्या हाती जात नसत…पण ते काही पूजाला आवडत नसे…पूजा कित्येकदा ते बोलून दाखवत असे पण मायेच्या अधिकाराने शारदादेवी पूजाला रागावत आणि घ्यायला लावत…शारदादेवींच्या प्रेम आणि ममतेपुढे पूजा नतमस्तक झाली….त्यांच्यामध्ये हळू हळू आपल्या आईला पूजा शोधू लागली….पूजा तासंतास बसून आपल्या सुखदुःखाच्या गोष्टी शारदादेवींबरोबर शेअर केल्याशिवाय राहत नसत पण हर्षवर्धनसरांमुळे पूजा घाबरायची आणि एक प्रकारची अदृश्य भिंतच जणू उभी राहिली होती…

पूजाच्या बाबाची तबियतही हळू हळू सुधारू लागली होती….आता बाबा उठून बसू लागले होते…शिवाय अजयचा अभ्यासही जोमाने चालला होता…काही दिवसातच परीक्षा असल्याने अजय रात्रीचा दिवस करून मेहनत घेत आणि उरलेल्या वेळात आपल्या ताईला म्हणजेच पूजाला मदत करत…असेच दिवसांमागुन दिवस सरत होते सुनेत्रा म्हणजेच पूजाची जिवलग मैत्रीण एक दिवस खूपच नाचत नाचत पूजापाशी आली…..

सुनेत्रा – पूजा…पूजा…..आज मे उपर आसमा नीचे…

पूजा – का गं….काय झालंय…स्वारी एवढी खुशीत कशी….लॉटरी वैगेरे लागली कि काय…?

सुनेत्रा – लॉटरी नाही…मुहूर्त मिळालाय माझ्या लग्नाचा…खरंच वर्षभरातून हा सातवा मुहूर्त काढलाय माझ्या लग्नाचा ….प्रत्येक वेळी काही ना काही अडचण यायची मग लग्न पुढे ढकलायला लागायचं…शेवटी सापडला बाई मुहूर्त…आणि तुला सांगू जर या वेळी मुहूर्त मिळाला नसता ना तर मला पळवून न्यायचा बेत आखला होता स्वारीने…[ सुनेत्रा खो खो हसू लागली ]

पूजा – काय सांगतेस काय तुझं लग्न…? कधी..?

सुनेत्रा – पुढच्या आठवड्यात आहे…आणि तू माझ्या लग्नाला नक्की येणार आहेस…मला कुठलंही कारण चालणार नाही…समजलं…!

पूजा – काही काळजी करू नकोस एक वेळ तू तुझ्या लग्नाला पोचणार नाहीस पण मी तुझ्या आधी पोचेल…

पूजाबरोबरच सुनेत्राने हर्षवर्धनलाही पत्रिका देऊन ठेवली…आणि रीतसर पूजाने ती पत्रिका शारदादेवींकडे नेऊन दिली…पुढच्याच आठवड्यात लग्न असल्याने पूजा आपल्या बहिणीला म्हणजेच नितालाही लग्नासाठी घेऊन गेली….पूजा मस्त गडद गुलाबी रंगाची साडी नेसली होती…मैत्रिणींच्या घोळक्यात पूजा अतिशय सुंदर अशी दिसत होती…तेवढ्यात हर्षवर्धन सर तिथून गेले…आणि त्यांची नजर फुललेल्या गुलाबासारख्या हसऱ्या पूजाकडे गेली आणि त्यांचे पाय थबकले…त्यांची नजर तिच्यावरच खिळून राहिली…साक्षात चंद्रच आकाशातून आपल्या समोर येऊन उभा राहिलाय याची लक्ख जाणीव हर्षवर्धन सरांना झाली…आणि त्यांची नजर पूजावरच खिळून राहिली…पूजाच लक्ष हर्षवर्धन सरांकडे गेलं अचानक तीही हसता हसता गंभीर झाली…आणि झटकन दुसरीकडे निघून गेली…हर्षवर्धन खरं तर सुनेत्राला शुभेच्छा देण्यासाठीच आले होते कारण काही कामानिमित्त त्यांना लगेच निघावे लागणार होते पण हर्षवर्धन सरांना पूजाच्या रूपसौन्दर्याने जणू एक मोहिनीच घातली होती त्यामुळे कामानिमित्त जाण्याची इच्छा असूनही ते पूजाच्या रूपसौन्दर्याने जाऊ शकले नाही…पुजाशी बोलण्याचा त्यांनी कितीदा तरी प्रयत्न केला पण पूजा मात्र त्यांना टाळत राहिली…पूजा जिथे जाईल त्या ठिकाणी हर्षवर्धन एकटक पुजालाच न्याहाळत…हे पाहून पूजा मात्र नीताला घेऊन लग्नामधूनच घरी वैतागून निघून आली…तिकडे सर मात्र पुजालाच शोधत बसले…आपण कितीदा तरी प्रयत्न करूनही आपल्याला जी गोष्ट मिळत नाहीय मग ती मिळवण्यासाठी कसलाही आटापिटा जो माणूस करतो तेव्हा खऱ्या अर्थाने तो माणूस आकर्षला जातो हेच नेमकं हर्षवर्धनसरांच्या बाबतीत घडत होतं…असेच लग्नसमारंभ मस्त पार पडला…  

 पूजा एक दिवस ऑफिसात काम संपेपर्यंत खूप वेळ थांबली पूजाची बसही निघून गेली…पूजा मात्र बसची वाट पाहत एकटीच स्टॉप वर उभी होती…रात्रही बरीच चढू लागली होती…तेवढ्यात एक फोरव्हीलर तिच्यासमोर येऊन उभी राहिली…

हर्षवर्धन सर – पूजा…या मी तुम्हाला सोडतो…

पूजा – नो थँक्स..आपण त्रास घेऊ नका…मी जाईन…

हर्षवर्धन सर – उगाच हट्ट करू नका…रात्र झालीय चला…बसा…

पूजा – नाही नको…मला कुणाचे उपकार घ्यायला आवडत नाही….[ आणि पूजाने दुसरीकडे तोंड फिरवलं आणि झर…झर रस्ता कापू लागली ]

पूजा चालू लागताच सरांपासून लांब जाऊ लागली….तोच पूजाला एकटीला पाहून काही दोन चार टारगट पोरं पूजाला सतावू लागली…हर्षवर्धनने लगेच तिथे जाऊन त्या पोरांना दम दिला दम दिल्याबरोबर सगळी पोरं पळून गेली…तेवढ्यात पूजा हर्षवर्धनला म्हणाली….

पूजा – सर….तुम्ही उगाच माझ्यासाठी त्यांच्याशी भांडलात…तो माझा प्रॉब्लेम होता मी पाहून घेतलं असत…

हर्षवर्धन सर – पूजा….तुम्ही पहिलं गाडीत बसा…[ सरांनी दरवाजा उघडला आणि पूजाला गाडीमध्ये बसायला सांगितलं…पूजाही वैतागून गाडीत बसली ]

हर्षवर्धन सर – पूजा…कुणीही तुझ्याकडे नजर वर उचलून पहिलेल मी सहन करू शकत नाही…[ हर्षवर्धन अचानक एकेरीवर येऊन बोलू लागला…]

पूजा – का…? मी तुमची कोण लागते…? [ पूजा रुक्षपणे म्हणते ]

हर्षवर्धन – कारण तू माझी आहेस…फक्त माझी….!  मला तू आवडतेस…माझं तुझ्यावर निस्सीम प्रेम आहे…! [ पूजावर पूर्ण अधिकार आहे अशा आवाजात हर्षवर्धन बोलला ]

पूजा – स्टॉप इट….आय से स्टॉप द कार…! [ पूजा संतापाने म्हणाली ]

हर्षवर्धन – का…काय झालं…?

पूजा – आपल्या प्रेमाच्या जाळ्यात मुलींना फसवत आहात तुम्ही….अशा किती मुलींना फसवलंत तुम्ही…आणि लक्षात ठेवा मी तसल्या मुलींमधली नाहीय ….आज मी शांत आहे ते फक्त शारदादेवींसाठी…नाहीतर चांगलाच धडा शिकवला असता तुम्हाला…

संतापाच्या भरात पूजा थरथरत बोलत होती…हे सर्व ऐकत हर्षवर्धन सर स्तंभित होऊन पहाताच राहिले….तेवढ्यात पूजा कार मधून तणतणत निघूनही गेली घरी आल्यावर रात्रभर पूजा मुसमुसतच होती…तिच्या मनात एकच विचार हर्षवर्धन सरांनी कधीही गंभीर व्हायचं…केव्हाही झिडकारायच आणि केव्हाही प्रेम करायचं…असं करायला आपल्यावर अधिकार गाजवायला काय आपण त्यांच्या हातच बाहुलं किंवा गुलाम थोडी ना आहोत…मनातले विचार काही थांबत नव्हते…दुसरीकडे हर्षवर्धन अतिशय अवस्थ होते पूजाला काहीही करून आपण आकर्षित करून घ्यायचं त्यांनी ठरवलं…

त्यानंतर काही दिवस पूजा ऑफिसातच आली नाही…पूजा न आल्याने हर्षवर्धन सरांची अवस्था फार बेचैन होतं असं…आणि फायनली ज्या दिवशी पूजा ऑफिस मध्ये आली त्यावेळी सर

तिच्याकडे एकटक पाहतच राहिले…जणू पूजाकडे बघून आपल्या डोळ्यांची तहानच भागवत होते…असंच कामाचं निमित्त करून सरांनी पूजाला आपल्या कॅबिनमध्ये बोलावून घेतलं…आणि ते म्हणले…

हर्षवर्धन सर – पूजा इतके दिवस ऑफिसला का नाही आलीस…माहितीय तुझ्याशिवाय दिवस कसे काढले मी…? [ प्रेमाने सर पूजाकडे बघत म्हणाले ]

पूजा –  मला वाटत तुम्ही मला काही कामासाठी बोलावलंय…[ नजर दुसरीकडे नेऊन म्हणाली ]

हर्षवर्धन सर – खूप तिरस्कार करतेस ना माझा तू…पण एक दिवस याच तिरस्काराचं रूपांतर प्रेमात होईल कि नाही ते पहाच…!

पूजा – तुम्हाला दिवास्वप्न पाहायची सवयच आहे वाटतं…मी कधी तुमची होईल हा समज डोक्यातून काढून टाका…

सरांची पूजाबद्दलची जवळीक वाढू लागली पण पूजा मात्र त्यांचा तिरस्कार करत होती…अशातच ऑफिस मधून काही कामासाठी आठवडाभरासाठी मुंबईला जावं लागणार होतं…त्यात पूजांचेही नाव होते त्यामुळे पूजाला हा घेतलेला निर्णय काही फारसा पटला नव्हता म्हणून आपल्या जागी दुसऱ्या कुणाची तरी नियुक्ती व्हावी यासाठी पूजाने प्रयत्न केला पण तो प्रयत्न साफ फोल ठरला…म्हणून नाईलाजाने पूजाला जाणे भागच होते…पण आपल्या मुलासोबत पूजाही जातेय हे समजताच शारदादेवींना फार आनंद झाला…म्हणून पूजाची खास अशी काळजी हर्षवर्धनला घ्यायला सांगितली…पूजाला कुठलीच कमी पडू देऊ नको याची पूर्ण खबरदारी घे असं शादादेवींनी हर्षवर्धनला ठासून सांगितलं….

मुंबईत सगळ्यांची राहण्याची सोय एका उत्तम अशा हॉटेलमध्ये केली होती वरून आणि पूजा दोघांच्याही खोल्या शेजारी शेजारीच होत्या म्हणून हर्षवर्धन पूजाची व्यवस्थित अशी काळजी घेत होते…सुरुवातीचे चार-पाच दिवस अतिशय कामात गेले…रविवारी मात्र सर्व स्टाफ ने फिरायला जाण्याचे योजले…सर्व अधिकाऱ्यांनी हर्षवर्धनला येण्यासाठी खूप विनवले पण सरांनी काही कामाचं निमित्त सांगून जाण्याचे टाळले….योगेश म्हणून एका सहकाऱ्याने पूजाला खरेदीसाठी येण्याची विनंती केली…पूजा येण्यासाठी तात्काळ तयारही झाली पण  तेवढ्यात हर्षवर्धन सर तिथे पोचले आणि कामाबद्दल पुजाशी बोलू लागले…आणि पूजाला कामासाठी तिथेच बसावं लागलं…त्यानंतर काय होतंय…खरंच सर पूजाच मन आपल्याकडे वाळवून घेऊ शकतील का…कि नेहमीप्रमाणे पूजा नाहीच म्हणेल….उत्सुकता अशीच असू द्यात पाहुयात पुढच्या भागात….