करवा चौथ व्रत | Karva Chauth in marathi | जाणून घ्या करवा चौथ व्रत, पूजा विधी आणि उद्यापन कसे करावे

करवा चौथ व्रत | Karva Chauth in marathi | जाणून घ्या करवा चौथ व्रत, पूजा विधी आणि उद्यापन कसे करावे
Karva Chauth in marathi: करवा चौथ हे एक हिंदू व्रत आहे. साधारणपणे उत्तरभारत,राजस्थान,मध्यप्रदेश,दिल्ली,पंजाब,हिमाचल प्रदेश,हरियाणा,जम्मू या भारतातील भागात करवा चौथ व्रत केले जाते….अश्विन कृष्ण चतुर्थीच्या दिवशी विवाहित स्त्रिया हे व्रत करतात…आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी आणि समृद्धीसाठी पूर्ण दिवस उपवास केला जातो…
1. करवा चौथ व्रत माहात्म्य | Karva Chauth information in marathi
करवा चौथ हे एक हिंदू व्रत आहे साधारणपणे उत्तरभारत, राजस्थान, मध्यप्रदेश, दिल्ली, पंजाब, हिमाचल प्रदेश, हरियाणा, जम्मू या भारतातील भागात करवा चौथ व्रत केले जाते.अश्विन कृष्ण चतुर्थीच्या दिवशी विवाहित स्त्रिया हे व्रत करतात. आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी आणि समृद्धीसाठी पूर्ण दिवस उपवास केला जातो…अगदी काहीही न खाता आणि पाण्याचा घोट न घेता हे व्रत अगदी मनोभावे सुवासिनी करतात…आणि संध्याकाळी चंद्र उगवल्यावर प्रथम चंद्राला पीठ चाळण्याच्या चाळणीमधून पाहिले जाते त्यानंतर चंद्राला ओवाळले जाते…नंतरच पतीचा चेहरा पाहून पतीच्या पाया पडून आशीर्वाद घेतात…मग पतीच्या हातून काहीतरी खाऊन आपला उपवास सोडतात…
क्वचित काही ठिकाणी आपल्याला इच्छित वर मिळू दे यासाठीही कुमारिका हे व्रत करताना आपल्याला दिसतात…संकष्टी चतुर्थी ज्या दिवशी आपण गणपतीची पूजा करतो या दिवशीही भाविक उपवास करतात त्याच दिवशी करवा चौथ हा हिंदू सुवासिनींचा सण असतो…या दिवशी भगवान शंकर,देवी पार्वती आणि कार्तिकेय या देवतांची पूजा केली जाते.
2. करवा चौथ व्रताचे स्वरूप
या दिवशी भल्या पहाटे लवकर उठून आपले स्नान संध्या सगळे विधी आटोपून या व्रताच संकल्प केला जातो. करवा म्हणजे मातीचा घट आणि चौथ म्हणजे चतुर्थी…करवा चौथ हे व्रत करताना सुवासिनी सर्व प्रकारचे सौभाग्यालंकार परिधान करतात. यादिवशी नवीन करवा आणून तो सजवला जातो त्यानंतर पूजा करून याच कर्व्यातून चंद्राला अर्ध्य अर्पण केले जाते..काही ठिकाणी खास करून पंजाब कडील भाघांमध्ये भल्या पहाटे उठून सुहागिनी जेवण करतात आणि पाणी पितात ज्याला “सर्गी” असेही म्हणतात.
3. करवा चौथ व्रतासाठी लागणारे साहित्य
पूजेसाठी ताम्हण किंवा ताट
भिजवलेले तांदुळ आणि हळद (तांदूळ बारीक करून त्यात हळद मिसळावी ज्याला “अप्पन” असेही म्हणतात.)
रोली किंवा कुमकुम
स्टीलची चाळणी
जनेयु
लाल धागा
सुपारी (गौरीच्या प्रतिमेसाठी)
शिव पार्वती प्रतिमा अथवा फोटो
करवा
नैवेद्यासाठी मिष्ठान्न (काही ठिकाणी गव्हाचे पीठ गुळाच्या पाण्यात मळून त्याच्या पुऱ्या किंवा भजे म्हणजेच गुलगुले करतात. गुलगुलेना विशेष महत्व आहे.)
आज काल मार्केट मध्ये विविध प्रकारच्या लेस आणि गोटा पट्टीने सजवलेले रेडिमेड करवे देखील मिळतात. तसेच छान टिकल्यांनी सजवलेला करवा आणि ताट देखील मिळतात.
श्लोक – ‘ मम् सुखसौभाग्यम पुत्रपौत्रादी सुस्थिर श्री प्राप्तये करक चतुर्थी व्रतमः करिष्ये ‘
हेही वाचा
करवा चौथ व्रत शृंगार लूक्स
6 Gorgeous Looks For karwa chauth 2021
4. करवा चौथ पूजा विधी
पूजेच्या ताम्हनामध्ये किंवा ताटामध्ये तांदूळ, रोली म्हणजेच हळदीने तयार केलेलं चूर्ण (अप्पन ) ज्याचा वापर टिळक बनवण्यासाठी केला जातो. पाण्याने भरलेला घडा किंवा लोटा , मिठाई आणि सिंदूर किंवा कुंकू आणि हळद, लाल धागा, जनेयु, देवाला वाहण्यासाठी फुलं घ्यावी. एका पणतीमध्ये सुपारी ठेऊन तिला पार्वती समजून नाडा (लाल धागा) बांधतात. शिव पार्वती मूर्ती किंवा फोटोला अप्पन, कुंकू वाहावे. शंकराच्या प्रतिमेला जनेयु बांधावे आणि शेवटी फुलं वाहावे.
आता पंजाबमध्ये थोडीशी वेगळी पद्धत असल्याने तिथे पूजेच्या ताटात स्टीलची चाळणी, पाण्याने भरलेला ग्लास आणि लाल धागा घेतात.
त्याचप्रमाणे राजस्थान मध्ये गहू आणि माती घड्यावरती ठेवतात…काळ्या मातीमध्ये साखरेचा पाक एकत्र करून त्या मातीपासून करवा म्हणजे घडा बनवतात याऐवजी तांब्याच्या भांड्याचाही वापर केला जातो..आणि त्यावर शिव-पार्वती, कार्तिकेय आणि गणपतीची स्थापना करून त्याची मनोभावे पूजा केली जाते.
दहा कऱ्हे आणावे त्याची पूजा करून आलेल्या सुवासिनींना ते घडे भेट स्वरूपात द्यावेत भेट देण्यापूर्वी रॅलीने म्हणजेच हळदीच्या चूर्णाने प्रत्येक घड्यावर स्वस्तिक काढावे…प्रत्येक घड्यामध्ये तांदूळ किंवा गहू भरावे त्यावर साखर ठेवावी मग त्यावरती दक्षिणा आपापल्या परीने ठेवावी…आणि हेच घडे किंवा करे आलेल्या सुवासिनींना भेट म्हणून द्यावे…
रात्री चंद्र उगवल्यानंतर एका चाळणीमध्ये एक दिवा ठेऊन प्रथम चंद्राचे दर्शन घ्यावे आणि त्यानंतर आपल्या पतीचा चेहरा पाहावा आणि पाया पडून आशीर्वाद घ्यावा…आणि त्यानंतर आपला उपवास संपन्न करावा अशाप्रकारे व्रताची सांगता करावी.
5. करवा चौथ व्रताची कथा | सुवासिनी करवा चौथ व्रत का करतात?
खूप काळापूर्वी इंद्रप्रस्थपूर नावाच्या एका गावात वेदशर्मा नावाचा एक ब्राह्मण राहत होता त्या ब्राह्मणाचा विवाह लीलावती नावाच्या एका मुलीबरोबर झाला…लिलावातीपासून वेदशर्माला सात मुलं आणि वीरवती नावाची सुंदर मुलगी झाली या सर्व सात भावंडांमध्ये वीरावती एकटी लाडकी बहीण होती…जेव्हा वीरवती लग्नासाठी योग्य अशी झाली त्यावेळी तिचा विवाह एक उच्च ब्राह्मण तरुणाशी झाला…वीरवती जेव्हा लग्नानंतर आपल्या वहिनींबरोबर राहिली त्यावेळी आपल्या भाऊजयांबरोबर नवऱ्याच्या दीर्घ आयुष्यासाठी करवा चौथ नावाचं व्रत केलं होत…
या व्रतादरम्यान वीरवती ला भूक सहन झाली नाही म्हणून ती पटकन बेशुद्ध पडली…कमजोरी असल्याने तिला उठवतंही नव्हतं…सगळ्या भावाना आपल्या लाडक्या बहिणीची हि अशी स्थिती पाहावली नाही…सर्व भावाना माहिती होत कि वीरवती एक पतिव्रता आहे आणि ती नक्कीच आपल्या नवऱ्यासाठी चंद्रदर्शन जोपर्यंत होत नाही तोपर्यंत काहीही न खाता राहील मग आपला जीव गेला तरी चालेन…म्हणून सगळ्या भावानं मिळवून एक युक्ती शोधून काढली की जेणेकरून वीरवती जेवण करेल…म्हणून सात भावंडांपैकी एकाने वडाच्या झाडावर एका हातात चाळणी आणि दुसऱ्या हातात दिवा प्रज्वलित करून ठेवला आणि तिथेच तो भाऊ थांबला…ज्यावेळी वीरवती आपल्या बेशुद्धावस्थेमधून जागी झाली त्यावेळी तिला सांगण्यात आलं की, ‘ चंद्राने आपलं दर्शन दिलंय चंद्रोदय झालाय…आता जेवण केलास तरी चालेन ‘ आणि वीरावती ला सगळे भाऊ चंद्रदर्शन करण्यासाठी आरतीचं ताट घेऊन घराच्या छतावर घेऊन आले…वटवृक्षामागे चंद्रोदय झालाय हे पाहताच वीरवतीला चंद्रोदय झाल्याचे भासले…वीरवतीने आरतीचे ताट घेऊन त्या प्रज्वलित झालेल्या दिव्यालाच चंद्र समजून त्याचा अर्ध्य अर्पण केले…
चंद्रदर्शन झाल्यावर वीरवती तात्काळ भोजनासाठी बसली…त्यावेळी मात्र तिला अशुभ संकेत मिळाले…पहिल्याच घासत वीरवतीला केस सापडला…दुसऱ्या घासला तिला शिंक आली…तिसऱ्या घासालाच वीरवतीला सासरकडच्याकडून निरोप आला…आणि आपल्या सासरी पोचल्यावर वीरवतीला आपल्या नवऱ्याचं मृत शरीर दिसलं…आपल्या पतीचं मृत शरीर पाहून वीरवतीला शोक अनावर झाला…ती रडू लागली आणि आपल्या करवा चौथ या व्रतामध्ये आपणच हलगर्जी केली म्हणून आपल्याला ही शिक्षा मिळाली असा दोष स्वतःवर ओढवून घेऊ लागली…आणि आक्रोश करू लागली हा निरागस वीरवतीचा आक्रोश पाहून देवी शची म्हणजेच इंद्रदेवांची पत्नी शची देवी वीरवतीला सांत्वन देऊ लागल्या…व्रत करण्यामध्ये हलगर्जीपणा झाला म्हणून वीरवती शची देवींना याच कारण विचारू लागली…शची देवींनी कारण सांगितले…” चंद्राला अर्ध्य अर्पण न करताच तू व्रत खंडीत केलंस..” यावर उपाय म्हणून प्रत्येक महिन्याच्या चतुर्थीला म्हणजेच ज्याला आपण संकष्टी चतुर्थी म्हणतो या दिवशी परत मनोभावे हे व्रत तू कर…तुझा पती तुला परत मिळेल…
शची देवींनी सांगितल्या प्रमाणे वीरवतीने अगदी मनोभावे हे व्रत कुठलाही हलगर्जीपणा न करता आचरणात आणले…वर्षभर असं वीरवती करू लागली…आणि याच पुण्यफळ म्हणून वीरवातीला आपला पती जसा होता तसा परत मिळाला…महाभारतातही द्रौपदीने हे व्रत केले होते…याच पुण्य म्हणून आपलं गेलेलं राज्य पांडवांस परत प्राप्त झालं…आणि कौरवांचा नाश झाला…तेव्हापसून ते आजपर्यंत अजूनही आपल्या हिंदू धर्मात करवा चौथ हा दिवस साजरा करतात…
६. करवा चौथ २०२२ तारीख आणि शुभ मुहूर्त
७. करवा चौथ व्रत शृंगार
करवा चौथ म्हटलं कि महिलांची तयारी महिनाभर आधीच सुरु होते. १६ शृंगार करून त्या दिवशी महिला छान तयार होतात. त्या दिवशी शक्यतो लाल किंवा गुलाबी रंगाचे वस्त्र घालतात. हातात चुडा, गडगंज दागिने, नाकात नथ, केसात गजरा माळतात. हाताला मेहेंदी लावतात. पायांना रोली (अलता) लावतात. तहान भूक विसरून जेव्हा साज शृंगार करून नवऱ्यासाठी तयार होतात तेव्हा काही वेगळीच चमक असते त्यांचा चेहऱ्यावर.
करवा चौथ साठी नववधू असो व कुणीही असो, त्या दिवशी कसे तयार व्हावे जेणेकरून सगळ्यांची नजर तुमच्यावरच असेल या साठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा. लुक साथीचा लेख तुम्हाला मराठीमधून हवा असेल तर कंमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा.
=============