Ritbhatmarathi

Search
Close this search box.

कपिल शर्मा यांची आज ओळख करून द्यायची गरज नाही कारण त्यांचं नाव घेतलं की आठवतात टेलिव्हिजन वरील सगळेच विनोदी कार्यक्रम. आणि त्यात अग्रक्रमावर असलेला कार्यक्रम म्हणजे सगळ्यांच्या तोंडावर असलेला कॉमेडी नाईटस विद कपिल. खरंतरं या कार्यक्रमाच्या खूप आधी खूप कॉमेडी कार्यक्रमात कपिल सरांनी हजेरी लावली आणि नुसती हजेरी लावली नाही तर प्रत्येक कार्यक्रम जिंकून दाखवला आहे. स्वतःची वेगळी आणि विशिष्ठ ओळख निर्माण केली आहे. त्यांचा जीवनप्रवास कमालीचा आहे.

आज त्यांची ओळख केवळ विनोदकार इतकी नसून उत्तम कलाकार, टेलिव्हिजन संचालक आणि गायक अशी आहे. आज ते त्यांच्या कामाने इतके प्रसिद्ध आहेत की फोर्ब्स इंडिया सेलिब्रिटी यादीत टॉप १०० मध्ये त्यांनी स्थान मिळवले आहे आणि करमणूक विभागात सीएनएन आयबीएन या अमेरिकेतील बातम्या पुरवणाऱ्या केबल वहिनी तर्फे इंडियन ऑफ द इयर २०१३ म्हणून पण घोषित केले गेले आहे. आज ते सोनी चॅनलवर प्रसारित होणाऱ्या द कपिल शर्मा शो होस्ट करत आहेत. म्हणजेच त्यांच्या कार्यक्रमात आलेल्या पाहुण्यांचे स्वागत करत आहेत. पाहुण्यांबद्दल प्रेक्षकांच्या मनात असलेल्या प्रश्नांची उत्तरे मिळवून देत आहेत.

कपिल शर्मा यांचा जन्म २ एप्रिल १९८१ मध्ये पंजाबमधील अमृतसर येथे झाला. त्यांचे वडील पोलीस हेड कॉन्स्टेबल होते, ज्यांचा २००४ मध्ये कॅन्सरमुळे मृत्यू झाला तर त्यांच्या आई गृहिणी आहेत.
१२ डिसेंबर २०१८ मध्ये त्यांची गर्लफ्रेंड गींनी चन्नथ यांच्या सोबत जालंधरमध्ये ते विवाह बंधनात अडकले.

कपिल शर्मा यांनी त्यांचे शिक्षण अमृतसर मधील हिंदू कॉलेजमध्ये पूर्ण झाले आहे.

कपिल सरांनी त्यांच्या करिअरची सुरुवात महाराष्ट्राच्या नंबर वन कार्यक्रम हसते हसाते राहो या मधून मनोरंजन क्षेत्रात केली. त्यांना पहिली मोठी संधी मिळाली ती द ग्रेट इंडियन लाफ्टर चॅलेंज या कार्यक्रमाच्या रुपात. खरतर कपिल सरांनी या आधी एकूण आठ विनोदी कार्यक्रम केले होते पण द ग्रेट इंडियन लाफ्टर चॅलेंज हा कार्यक्रम त्यांच्यासाठी मोठी संधी देणारा ठरला. हा नववा रिॲलिटी शो त्यांनी जिंकला होता. या कार्यक्रमाचा एक मनोरंजक किस्सा सांगण्यासारखा आहे तो म्हणजे या कार्यक्रमाच्या तिसऱ्या सीजनसाठी पहिली ऑडिशन कपिल सरांनी अमृतसर येथे दिली होती ज्यात त्यांना नाकारण्यात आले होते. पण हा कार्यक्रम त्यांना करायचाच असल्याने पुन्हा दिल्लीत त्यांनी दुसरी ऑडिशन दिली ज्यात ते निवडले गेले. आणि फक्त निवडले गेले नाहीत तर २००७ मध्ये रुपये दहा लाखांचे बक्षीस पण जिंकले.

सोनी चॅनलवर प्रसारित होणाऱ्या कॉमेडी सर्कसमध्ये त्यांनी भाग घेतला. नंतर २००८ मध्ये उस्तादो का उस्ताद यात ते सहभागी झाले. पुढे झलक दीखला जा या कार्यक्रमाचा सहावा सीजन संकलित केला. तसेच बिग बॉसच्या वेगवेगळ्या भागात दिसले. शिवाय छोटे मिया हा विनोदी कार्यक्रम पण होस्ट केला.

आयुष्यात थोडे हादरे बसले, म्हणून काही संपूर्ण आयुष्य वाया जात नाही – अजय पुरकर

सैराट मधील तिचा अभिनय सर्वांना इतका आवडला की तिचे काम पाहून कन्नड दिग्दर्शक श्री. एस. नारायण इतके प्रभावित झाले की

यानंतर कपिल शर्माने स्वतःचा बॅनर ज्याचे नाव होते k9 निर्मित म्हणजे कॉमेडी नाईटस विद कपिल 2013 मध्ये सुरू केला. या कार्यक्रमाला प्रेक्षकांचे अफाट प्रेम मिळाले त्यामुळे हा शो खूपच यशस्वी झाला. आजही हा कार्यक्रम त्याचे यश टिकवून आहे. या शोमुळे कपिल सर घराघरात पोहोचले. त्यांच्या लोकप्रियता मुळे २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत दिल कमिशनद्वारे कपिल सरांना ब्रँड ॲम्बेसेडर घोषित केले गेले.

इथेच ते थांबले नाहीत. इतकी लोकप्रियता मिळाली म्हटल्यावर बॉलिवूड चित्रपटात काम न करता ते कसे राहिले असते. त्यांना पहिला चित्रपट यशराज बॅनरच्या बँक चोर या चित्रपटने करायचा होता पण ते स्वतःच या चित्रपटातून बाहेर पडले आणि नंतर किस किस को प्यार करू या विनोदी चित्रपटात मुख्य भूमिकेत दिसले. कौन बनेगा करोडपती या टेलिव्हिजन शो च्या आठव्या सीजन मध्ये सुरुवातीच्या भागात पाहुण्याच्या रुपात ते आपल्या भेटीला आले.

द ग्रेट इंडियन लाफ्टर चॅलेंज ३, स्टार या रॉक स्टार, कॉमेडी सर्कस, झलक दिखलाजा ६, कॉमेडी नाईटस विद कपिल, द कपिल शर्मा शो इत्यादी.

विनोदी क्षेत्रात केलेल्या दमदार अभिनयामुळे आणि कामामुळे टेलिव्हिजन मधील बक्षीस सोबतच कपिल सरांना स्वच्छ भारत मिशन अभियाना साठी केलेल्या योगदाना बद्दल राष्ट्रपती कडून सम्मानित केले आहे.

आपले ध्येय डोळ्यासमोर असले तरीही ते निश्चित करताना, मिळवताना अनेक अडचणी येतात आणि जातात. पण अडचणी आल्या म्हणून खचून न जाता आपली पाऊले धेयाकडे टाकत राहिली पाहिजेत हीच शिकवण देतो कपिल सरांचा प्रवास. ज्या लाफ्टर चॅलेंज कार्यक्रम साठी त्यांना सुरुवातीला नाकारले गेले होते तोच कार्यक्रम पुन्हा ऑडिशन देऊन त्यांनी जिंकून दाखवला. हीच तर खरी जिद्द असते. ती न सोडता स्वतःच्या हुशारी वर विश्वास ठेवून मार्गक्रमण करायला हवे. यश आपलीच वाट पहात असते. यात शंका नाही. हो ना ??

==============

marathi goshta

marathi story

marathi moral stories

marathi love story

marathi motivational stories

Share your love
Facebook
Twitter

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *