कन्या पूजा

बुटिक लाॅक करून प्राची ने कार स्टार्ट करायच्या आधी सिद्धार्थ, तिच्या नवऱ्याला फोन केला
“ऐक न, मी निघाले च आहे फ्रीज मधला भाजी चा डोंगा बाहेर काढून ठेव न प्लीज” आल्या वर मायक्रोवेव्ह मधे गरम करून जेवण करू..
घरी पोचल्यावर प्राची ने गरम पाण्याने वाॅश घेतला.ती व सिद्धार्थ जेवायला बसले.
प्राची–” माझा टूर प्रोग्राम ठरला आहे मी उद्या सकाळी निघणार, दोन दिवस तरी लागतील काम संपायला”
“अरे –पण तू तर पुढच्या आठवड्यात जाणार होता?”
हो-” पण एक ऑर्डर घ्यायची आहे.”
सिद्धार्थ एरिया मॅनेजर आहे. प्राचीचे स्वतःचे बुटीक आहे ,छान चाललय. दोघ आपापल्या कामात खुश आहे.
नुकतेच गणपती विसर्जन झाले. सध्या पितृपक्ष चालू आहे तरी पुढचा दसरा, दिवाळी फेस्टिवल सीजन पाहता प्राची वर कामाचा खूप लोड आहे.
प्राची ने विचार केला दोन दिवस सिद्धार्थ बाहेर जात आहे.त्यामुळे बुटिक ला जास्त वेळ देता येईल. विचार करत करत प्राची झोपली.
सकाळी बुटीक वर पोहोचल्या पोहोचल्या शिलाई मास्टर योगी भेटले. तिने ” पर्पल आणि मेरून कलरच्या सेटिन घागरा चोली च काम कुठवर आलंय हे विचारलं”
“शिवण झाल आहे मॅडम, फक्त टिकल्या, कवड्यांचे डिझाईन उरलं आहे,
मी कॅटलाग मधून फोटो घेऊन तुम्हाला पाठवते तसेच करा, आणखीन एक काम ,आजच सेलचा बोर्ड लावून द्या, काही पॅम्प्लेट पण छापून घ्या.
स्टाॅक क्लियरेंस करायला सुरु करू .
पूर्ण दिवस प्राची ने जुना स्टॉक चेक केला.
दोन वर्ष कोरोना ने काहीच विक्री झाली नव्हती,
जेव्हा सण वार नाही ,नोकरी नाही, कस्टमर तरी कुठून येणार नवे कपडे घ्यायला?
आता सुरुवात तर झाली पण– फॅशन बदलली.
जे तयार कपडे आहेत ते सेल में काढावेत.असे प्राची ने ठरवले.
दोन दिवस प्राची फक्त झोपाय पुरती घरी गेली. बरेच कपडे विकले गेले सेलमध्ये.
आता नवीन कपडे शिवण्याकडे पूर्ण लक्ष घालायला हवे. दोन दिवसांनी पितृपक्ष संपेल आणि नवरात्र सुरू
होईल.
घरी पोहोचली तर सिद्धार्थ मूवी पाहत तिची वाट पाहत होते.
” प्राची किती काम करतेस ग? आता नवरात्र संपल्यानंतर कुठेतरी बाहेर जाऊया चार दिवस”
” हो रे मलाही खूप थकायला होते
आहे पण हळूहळू कामाचे प्रेशर कमी असेल तेव्हा आपण बाहेर जाऊया.
रात्री बेडवर प्राची ला जवळ घेत सिद्धार्थ तिच्या कानात कुजबुजत म्हणाला “आता अशीच तुझ्या सारखी एक गोड कळी उमलू देवू न आपल्या बागेत”.
“जशी तुझी मर्जी” म्हणतप्राची त्याच्या कुशीत शिरली..
सकाळी प्राची बुटिक ला जायला निघाली. वाटेत बराच ट्राफिक होता. कितीतरी दुकाने रंगबिरंगी वस्तूंनी सजली होती. लोक सणाच्या तयारीला लागलेली होती. काही ठिकाणी डांडियाची तयारी दिसत होती.
जागोजागी देवळात भाविकांची गर्दी जाणवत होती.
फळांची , फुलांची आणी देवीच्या श्रृंगारा च्या सामानाची बरीच दुकाने सजली होती.
प्राचीला आठवले सासुबाई होत्या तेव्हा त्या घरी नवरात्र बसवत, रोज सकाळी अंघोळ करून सिद्धेश्वरी देवीच्या दर्शनाला येत. नवव्या दिवशी कन्या भोजन करत ,प्राची त्यांच्यासोबत येत असे. कुमारिका ना यथायोग्य भेटवस्तू देत.
“आई मला हे सगळं नाही जमू शकत तुम्ही किती उपास करता?”
“अगं हे असंच केलं पाहिजे असं नाही. तुला जे शक्य असेल ते तू कर.उपासकेलेच पाहिजे असे नाही. . एकूण काय मातेवर श्रद्धा ठेव, आणि जे योग्य असेल ते कर. देवी आई नक्की तुला फळ देईल.
पण– मागच्या वर्षी कोरोनाच्या पायी त्याही नाही राहिल्या.
सासुबाईंच्या आठवणीने प्राची चे डोळे भरून आले.
गाडीचे स्टेयरिंग आपोआप देवळाकडे वळले . देवळात अष्टभुजाचे दर्शन घेऊन प्राची बाहेर आली.
देवीच्या चेहऱ्यावर असीम तेज होते.
गुरुजींना नमस्कार करताच त्यांनी प्रसाद देत “पुत्र किंवा पुत्री वती भव” असा आशिर्वाद दिला.
कार देवळापासून बरीच दूर पार्क केली होती. वाटेमध्ये एक झोपडपट्टी होती बाहेर आठ दहा लहान मुलींचा ग्रुप गोल घेर करून गरबा करत होत्या.
तिने पाहिलं सगळ्या मुलींचे कपडे जुने झालेले होते पण त्यातही त्या आनंदाने तल्लीन होऊन जमेल तसे नाचत होत्या.
बुटीक वर येतात प्राची कामाला लागली.खरंतर आज सकाळपासून तब्येत डल वाटत होती. मळमळ उलटी सारख वाटत होत. एकदा डाॅ.ला दाखवून यायला हवे. आजकाल सकाळी खूप मळमळ होते.
योगी टेलर नी विचारले ही “काय होत आहे”? आणि तिला फ्रेश जूस आणून पाजले , ते पिऊन थोडे बरे वाटल्या वर प्राची नव्या ड्रेसेस ला शेवटचा टच देऊ लागली.
काम संपेल तेव्हा संध्याकाळ होत आली होती.
” मॅडम जुन्या स्टाक मध्ये एक लाल रंगांचा नवा कोरा थान उरला आहे काय करायचे त्यांचे? योगी ने तिच्यासमोर लाल कपडा ठेवत विचारले.
प्राचीला सकाळी गरबा खेळणाऱ्या त्या मुली आठवल्या.
योगी या कपड्यांमध्ये आठ ते दहा वर्षाच्या मुलींचे किती घागरा चोली बनू शकतात जरा नाप घेऊन सांगा बरं.
दोन चार दिवसांत लाल रंगाचे आठ दहा घागरा चोली तयार झाले त्यावर सुंदर टिकल्या जरी बॉर्डर लावून प्राचीने सजवले.
नवमीच्या दिवशी सकाळी लौकर उठून आंघोळ पूजा करून प्राची कामावर निघाली .झोपडपट्टी पाशी येऊन तिने कार थांबवली .
लहान मुली तिथे खेळत होत्या प्राचीनेजवळ जाऊन एका मुलीला आवाज दिला तशा त्या मुली चपापल्या व एकमेकींकडे पाहू लागल्या.
प्राची ने परत आवाज दिला तशी एक गोड अशी मुलगी जवळ आली प्राची ने तिला प्रेमाने हातातले पॅकेट दाखवल व बाकी मुलींना आवाज दिला तशी सर्व जणी धावत आल्या.
सर्व कुमारिकांना तिने कपाळावर कुंकू लावून घागरा, चोली,आलता, टिपर्या व प्रसाद म्हणून शिरापुरीचे द्रोण दिले.
मुलींनी आनंदाने घेतले.
संध्याकाळी साडेसात -आठ वाजता जेव्हा प्राची रात्री घरी परत जायला निघाली तेव्हा ती झोपडपट्टी पाशी थबकली. मध्ये देवीचा फोटो ठेवून लाइटिंग करून झोपडपट्टीच्या त्या नऊ कन्या घागरा चोली अलता लावून टिपऱ्या घेऊन पूर्ण तन्मय होऊन गरबा खेळत होत्या .
देवळातल्या देवीच्या चेहऱ्यावर असतो तसा सात्विक आनंद त्या गरबा खेळणाऱ्या सर्व कुमारिका च्या चेहऱ्यावर विलसत होता.ते पाहून प्राची ला कन्या पूजा संपन्न झाल्या चे मनाला समाधान वाटले…
लेखन.सौ.प्रतिभा परांजपे
===================
नमस्कार वाचकहो🙏🙏,
आजकालच्या धकाधकीच्या जीवनात आवड असूनही आपले छंद आपल्याला जोपासता येत नाही. आवड असूनही पुस्तकं वाचता येत नाही. त्यामुळे वेळेअभावी आपल्यासारखे खूप सारे वाचक वाचनापासून वंचित राहतात. आणि म्हणूनच वाचकांना कुठेही सहज वाचता येतील असा कथासंग्रह आम्ही रीतभातमराठी ह्या डिजिटल व्यासपीठावर घेऊन आलो आहोत.
उत्कृष्ट लेखकांनी लिहिलेल्या marathi katha, marathi moral story, marathi stories, marathi short stories, bodh katha marathi मध्ये आपल्याला रीतभातमराठीवर वाचायला मिळतील.