Skip to content Skip to sidebar Skip to footer

काम हे कामच असतं

©® गीता गरुड.

आज बऱ्याच दिवसांनी प्रेरणाकडे तिची नणंदबाई आली. प्रेरणाने नणंदेशी गप्प मारता मारता तिच्या आवडीचा साजूक तुपातला शिरा केला.

प्रेरणाचा मुलगा सुजयही दहावीची सुट्टी असल्याने घरात होता. प्रेरणाने तिघांसाठी शिऱ्याच्या डीश भरल्या.

शिऱ्यासोबत गप्पा मस्त रंगल्या. अगदी पेपर कसे गेले पासनं ते कुठची शाखा निवडणारैस, बाहेर फिरायला जाऊन या. हेच मजेचे दिवस मग दोन वर्ष सुटका नाही. क्लास कोणता लावलाहेस..किती फीस….आत्याबाईंची प्रश्नमालिका काही केल्या संपेना.

तिथून कलटी कशी मारायची या विचारात सुजय असताना त्याच्या सुपीक डोक्यात एक कल्पना आली. सुजयने आत्याला म्हंटलं,”आत्या तुला नाक्यावरच्या माऊली ग्रुहउद्योगकडचे बटाटेवडे आवडतात ना.”

“हो रे. किती वर्ष झाली माऊलीकडचे वडे खाऊन. आणतोस का?”

“ये बात. हा आलोच वडे घेऊन.”

“सोबत त्याच्याकडचे नरम बुंदीचे लाडूही आण.”

“आणतो आणतो.”

“अरे थांब पैसे घेऊन जा.”

“नको वन्स, पैसे आहेत त्याच्या खिशात. सकाळीच पेपर टाकायला जातो तो.”

“अरे देवा. याचा बाबा मोठा हाफिसर आणि हा पेपर टाकतो..”

प्रेरणाला यावर काय बोलायचं ते कळेना मग सुजयच म्हणाला,”आत्या, काम हे कामच असतं. पेपर टाकणं,दूध टाकणं ही कामं केल्याने कोणी लहान होत नाही. बाबांची पदवी, हुद्दा त्यांच्याजवळ. त्याच्या हुद्द्याचा गर्व मी करायचं कारणच नाही.

उलट या कामाने मला शिस्त शिकवली. पैशाचं महत्त्व कळलं, पैसे कमवण्यासाठी किती कष्ट करावे लागतात ते कळू लागलय. आता तर मी आईकडून पोळ्या लाटायला शिकतोय. कुकर तर मला लावता येतोच. काही भाज्या करायलाही शिकतोय.”

नणंदबाई भाच्याचं म्हणणं कौतुकाने ऐकत होती. पिण्याच्या पाण्याचा ग्लासही मुलाच्या हातात न्हेऊन देणाऱ्या आपल्यापेक्षा आपली प्रेरणावहिनीच मुलाला उत्तम घडवत आहे हे तिला मनातल्या मनात का होईना मान्य करावच लागलं.

समाप्त

–गीता गरुड.

===================

नमस्कार वाचकहो🙏🙏,

आजकालच्या धकाधकीच्या जीवनात आवड असूनही आपले छंद आपल्याला जोपासता येत नाही. आवड असूनही पुस्तकं वाचता येत नाही. त्यामुळे वेळेअभावी आपल्यासारखे खूप सारे वाचक वाचनापासून वंचित राहतात. आणि म्हणूनच वाचकांना कुठेही सहज वाचता येतील असा कथासंग्रह आम्ही रीतभातमराठी ह्या डिजिटल व्यासपीठावर घेऊन आलो आहोत.

उत्कृष्ट लेखकांनी लिहिलेल्या marathi katha, marathi moral story, marathi stories, marathi short stories, bodh katha marathi मध्ये आपल्याला रीतभातमराठीवर वाचायला मिळतील.

Leave a Comment

error: