जेजुरीचे खंडेराया माहिती आणि इतिहास नक्की वाचा jejuri khandoba

jejuri khandoba : खंडोबा, खंडेराया, मल्हारीमार्तंड अशा नावांनी ओळखले जाणारे पुणे जिल्ह्यात पुरंदर तालुक्यातील जेजुरी गावात हे जागृत देवस्थान असून महाराष्ट्रातील अनेकांचे कुलदैवत आहे. आपल्या महाराष्ट्रा बरोबरच कर्नाटक आणि आंध्र प्रदेश राज्यातील लोकांचे लिंगायत दैवत आहे. गडारीया, वंजारी, धनगर, आगरी, कराडी, कुणबी, खारवी, गवळी, गोसावी, भंडारी, भोई, मराठा, मल्हारकोली, मातंग, माळी, रामोशी, वडवळ, लिंगायत, सोनार, गानाली, गान गोलू, सोनकोळी समाज तसेच ब्राह्मण आणि कायस्थ प्रभू यांचे हे कुलदैवत आहे. यांच्या परिवारात म्हाळसा, बाणाई या दोन पत्नी, हेगडे प्रधान ( बानाई चा भाऊ ) कुत्रा आणि खंडोबाचे वाहन घोडा यांचा समावेश होतो. श्री खंडोबाना भगवान शंकराचा अवतार किंवा भैरव रूप मानले जाते.
खंडोबाचे हे जागृत देवस्थान धनगर, आगरी, कोळी व इतर अनेक लोकांचे आराध्य दैवत असून १६०८ मध्ये त्याचे बांधकाम झाले. खरतर श्री खंडोबा हे भुलेश्वरचे भक्त होते. बळीराजाच्या काळात ते एका खंडाचे मुख्य होते. त्यामुळे लोकदेव खंडोबा आणि लोकदेव विठोबा ही त्यांची नावे घराघरात रुजलेली दैवते आहेत. हे भुलेश्वरचे मंदिर जेजुरी पासून १७ किमी अंतरावर आहे. खंडोबा हे शिव, भैरव आणि सूर्य तीन देवतांचे एकत्रित स्वरूप आहे म्हणून खंडोबाचा उपवास रविवारी सूर्याच्या वारी करण्याचा प्रघात असावा असे मानले जाते.
श्री खंडोबाचे प्रथम स्थान उंच डोंगरावरील कडेपठारावर होते. नंतर जेजुरीला नव्याने मंदिर बांधण्यात आले ते ई. स. १७१२ मध्ये. या देवळा समोर दगडी दीपमाळा आहेत या कडेपठारावर ३०० मी उंच डोंगरावर व ५ किमी अंतरावर मुख्य देऊळ आहे. किल्ला कोटा हे मंदिर खाली आहे. गेल्या अनेक शतकात धनगर व इतर जमातींच्या भक्तांनी दगडी पायऱ्या, दीपमाळा आणि कमानी उभारल्या आहेत. त्यामुळे यात मराठी वास्तुकला आणि निसर्गाशी असलेले सानिध्य दिसून येते. मंदिरात असलेले दीपमाळाचे प्रकार, कमनिवरील भित्तीचित्रे आणि नाजूक नक्षी जेजुरीच्या गतवैभवाची साक्ष देते.
१. मंदिराची रचना

या मंदिरात जाण्यासाठी दोनशे पायऱ्या चढून जावे लागते. नवलाख म्हणजेच नऊ लाख पायरींचा डोंगर असेही या देवस्थानाच्या डोंगरस म्हणतात. या मंदिरास सभामंडप आणि गाभारा आहे. इथे म्हाळसा, मनिमाला आणि खंडोबा यांच्या तीन सुबक मूर्ती आहेत. सभामंडप, आणि इतर काम १६३७ मध्ये राघो मंबाजी या मराठा सरदारांनी केले तर सभोवतालच्या ओवऱ्या आणि इतर वास्तू होळकरांनी बांधल्या आहेत. या वास्तूत होळकरांनी १७४२ मध्ये दगडी खांब बांधले आहेत. तर तटबंदी आणि तलवारीचे काम १७७० मध्ये पूर्ण झाले आहे.
२. खंडोबाची मूर्तीचे वैशिष्ठय
जेजुरीत खंडोबाची मूर्ती उभी आणि अश्वारूढ रुपात पाहायला मिळते. त्यांच्या हातात डमरू, त्रिशूळ, खंडा म्हणजेच अतिशय मोठी आणि खूप जड अशी तलवार आणि पानपात्र असून तो चारही बाजूंनी कपाळाला भंडारा लावलेल्या रुपात असतो. आजही खंडोबाच्या मंदिरात तलवार, डमरू आणि परळ अशा प्राचीन वस्तू जतन केलेल्या आहेत.
३. खंडेरायांना पडलेली नावे व त्यांचा इतिहास
खंडोबा हे नाव खंडा या शस्त्र वरून आले आहे असे काही लोकांचे म्हणणे आहे. तर काही लोकांच्या मतानुसार हे नाव संस्कृत भाषेतील स्कंद या शब्दाचा अपभ्रंश आहे. या खंडेरायाना अनेक वेगवेगळी आणि अर्थपूर्ण अशी नावे आहेत. मल्ह+ अरी अशी मल्हारी या शब्दाची फोड असून मल्ल राक्षसाचा शत्रू असा त्याचा अर्थ आहे. श्री खंडोबाने मल्ल दैत्याला मारून टाकले होते त्यामुळे हे नाव त्यांना पडले. तसेच मल्ल दैत्याची हार खंडोबाची केली म्हणून त्यांना मल्हार असे नाव पडले असावे.
म्हाळसा देवीचे पती असल्या कारणाने त्यांना म्हाळसाकांत असे म्हटले जाते. रवळनाथ येळकोटी ( येळ = सात.) सात कोटी सैन्य असलेला म्हणून येळकोटी हे नाव त्यांना पडले. मुसलमान समाजात पण खंडोबाचे अनेक भक्तगण आहेत. ते लोक खंडोबाना मल्लुखान आणि अजमत म्हणजेच चमत्कार या लोकप्रिय नावांनी ओळखतात. तर खंडोबाच्या खंडा या शास्त्राला मल्लूखान की गदा अशा नावाने ओळखतात. तसेच या शिवाय खंडेराय, मार्तंड भैरव अशीही नावे त्यांना दिली आहेत.
मणी आणि मल्ल ही दोन राक्षसे देवतांना खूप त्रास देत होती. ब्रह्म देवाची अपार सेवा करून त्यांना मल्ल आणि मणीने प्रसन्न करून घेतले आणि त्या दोघांनाही ब्राह्म देवाकडून वरदान प्राप्त केले होते की युद्धात जितके थेंब रक्त जमिनीवर पडेल तितकेच त्यांची रूपे पुन्हा प्रकट होतील. त्यांना असे वरदान मिळाल्याने त्यांनी स्वर्गदेव इंद्र आणि सगळ्याच देवतांना त्रास द्यायला सुरुवात केली. काही केल्याने या वरदानमुळे त्यांचा पराभव करता येईना.
मग हे सगळे देव शंकराचा अवतार असलेल्या श्री खंडोबाकडे आले. नंतर खंडोबानी देवी म्हाळसा देवीच्या मदतीने यांच्या सोबत पूर्ण सहा दिवस युद्ध केले. यात देवीने या दोन्ही असुरांचे रक्त जमिनीवर पडू न देता स्वतः प्राशन केले. आणि सहाव्या दिवशी चंपाशाष्टिस या दोघांचा वध केला. याच सहा दिवसांच्या काळात खंडोबाचा उत्सव साजरा केला जातो यालाच खंडोबाचे नवरात्र असे म्हटले जाते.
४. खंडेरायांचं माहात्म्य
नक्की वाचा
सप्तशृंगी देवीबद्दल माहिती आणि इतिहास
५. खंडोबाची जेजुरीतील उत्सव आणि जत्रा :
चैत्र, पौष आणि माघ महिन्यात शुध्द द्वादशी ते वद्य प्रतिपदा हे पाच दिवस, मार्गशीर्ष शुद्ध प्रतिपदा ते षष्ठी सहा दिवस, तसेच वर्षातील सर्व सोमवती अमावस्या आणि आश्विन शुद्ध प्रतिपदा ते दशमी असे दहा दिवस जेजुरीत उत्सव आणि यात्रा असते. अनेक लोक येथे नवस पूर्ती करण्यासाठी येतात. येथे मंदिरात खंडोबाचा खंडा म्हणजेच खूप जड आणि खूप उंच तलवार आहे. जो कोणी ही तलवार जास्तीत जास्त उंच उचलून ठेवेल त्या व्यक्तीला बक्षीस देण्याची प्रथा आहे. हा उत्सव बघण्यासाठी खूप भाविक गर्दी करतात. तसेच दसऱ्याला मोठी यात्रा भरते.
६. खंडेरायाची दंतकथा
१. सावकारी भुंगा :
औरंगजेब दक्षिणेकडील मोहिमेवर असताना त्याने यवत जवळील दौलत मंगल किल्ला ताब्यात घेतला. तिथूनच जवळ असलेले जेजुरीचे मंदिर त्याने पहिले आणि मंदिर भ्रष्ट करण्याच्या हेतूने मंदिराकडे त्याचे मुघल सैन्य पाठवले. सैन्य मदिराजवल पोहचले तर मंदिर बंद होते. मग त्यांनी सुरुंग लावून कोट उडविण्याचे ठरवले. पण जिथे सुरुंग लावण्यासाठी छिद्र पाडले तिथून हजारो भुंगे बाहेर पडले आणि मुघल सैन्यावर त्यांनी हल्ला केला. इतकेच नव्हे तर सैन्य जिथे जाईल तिथे त्यांचा पाठलाग केला.
मग त्यातील एका सरदाराने या घटनेचा अर्थ एका हिंदूला विचारला तेंव्हा त्यांनी सांगितले की खंडोबा हे कडक दैवत आहे आणि तुम्ही त्याला डिवचले आहे. आता ही अस्मानी बंद करण्यासाठी तुम्हाला काहीतरी करावे लागेल. हा सगळा प्रकार जेंव्हा औरंगजेबाला समजला तेंव्हा त्याने सव्वा लाख रुपये खंडोबाना भेट दिले. अशा प्रकारे खंडोबानी सावकारी वसुली केल्यामुळे त्यांना सावकारी भुंगे असे म्हणतात. मंदिराच्या उजव्या दरवाजा कडील भुंगे हे सावकारी भुंगे दाखवले जातात.
२. भाया भक्त :
एकदा कडेपठारावर धनगराची मुले विश्रांतीसाठी बसलेली असताना श्री खंडोबा तिकडून जात होते. त्याच वेळी त्यांचा भक्त भाय तिकडून येत असलेला पाहून श्री खंडोबा अदृश्य झाले. पण तिथे बसलेल्या बाकी मुलांनी हे भायाल सांगितले. आपले दर्शन चुकले या विचाराने तो खूप अस्वस्थ झाला. खंडोबा ज्या ठिकाणी बसून गायब झाले होते त्या घोंगड्याखाली भायाला हळदीचे लिंग सापडले. तिथेच भायाने त्याची प्रार्थना सुरू केली. पण बाकी वरिष्ठ मंडळींनी त्या पोरांच्या बोलण्यावर विश्वास न ठेवता लिंग फेकून दिले आणि त्याचे रूपांतर एका मौल्यवान मण्यात झाले.
मग सगळेच विचारत पडले आणि कोणाच्या भक्तीने खंडोबा प्रकट झाले हा वाद सुरू झाला. ज्याची कुऱ्हाड लिंगात रुतेल त्यालाच खंडोबा आणण्याचे श्रेय मिळेल असे ठरले आणि आपेक्षे प्रमाणे भायाची कुऱ्हाड रुतली आणि त्यातून रक्त दुधाचा प्रवाह सुरू झाला. मग मरल घराण्यातील व्यक्तीने स्वतःचे रक्त शिंपडल्यास हा प्रवाह थांबेल असे स्वतः श्री खंडोबा यांनी प्रकट होऊन सांगितले. त्यांनी सांगितल्या प्रमाणे लोकांनी केले आणि प्रवाह थांबला. पुढे तिथेच मंदिर उभारण्यात आले.
७. खंडोबाची आरती
जेजुरगडपर्वत शिवलिंगाकार
मृत्युलोकी दुसरे कैलास शिखर ||धृ||
नाना परीची रचना रचिली अपार
तये स्थळी नांदे स्वामी शंकर
जयदेव जयदेव शिवमार्तंडा
अरीमर्दना मल्लारी तूची प्रचंडा ||१||
मनिमल्ल दैत्य प्रबळ तो झाला
त्रिभुवनी त्याने प्रलय मांडीला
नाटोपे कोणास बरे मातला
देवगण गंधर्व कापांती त्याला ||२||
चंपाषष्ठी दिवशी अवतार धरिसी
मनीमल्ल दैत्यांचा संहार करिसी
चरणी षष्ठी खडगे वर्मी स्थापिसी
अंती वर देऊनी त्या मुक्तीते देशी ||३||
मानिमल्ल दैत्य मर्दूनी मल्लारी
देवा संकट पडता राहे जेजुरी
अर्धांगी म्हाळसा शोभे सुंदरी
देवा ठाय मागे दास नरहरी ||४||
===============