Skip to content Skip to sidebar Skip to footer

प्रधानमंत्री धन जन योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना आता या खात्यांमधून थेट लाभ मिळेल. जाणून घ्या नियम व सविस्तर माहिती

jan dhan yojana : मित्रांनो आजकाल काळाच्या सोबत राहून काम करणे किती महत्त्वाचे झाले आहे ते वेगळं सांगण्याची गरज नाही. काळानुरूप बऱ्याच गोष्टी बदलत आहेत, बदलल्या आहेत आणि बदलत राहतीलच. आपण जुन्या पिढीतील लोकांना बदलांबद्दल बोलताना नेहमीच ऐकत आलो आहोत. आमच्या वेळी नव्हते असे मोबाईल, इतक्या सुविधा किंवा अशा प्रकारची शिक्षण पद्धती, नात्यांची बदलती समीकरण किंवा मग जगण्याची बदलती जीवनशैली. अशा एक ना अनेक विषयांवर जुनी लोकं आपली मते मांडत असतात आणि बहुतांशी वेळा निराशा व्यक्त करत असतात. कारण आताच्या बदलत्या काळापेक्षा त्यांना त्यांचा काळ अधिक चांगला आणि समाधानकारक वाटत असावा.

असो तर मुद्दा हा आहे की, बदल होत आहेत कारण काळ बदलत आहे. त्यामुळे आपणही बदलत्या काळानुसार स्वतःच्या वागण्या बोलण्यात बदल केले पाहिजेत आणि स्वतःला अपडेट ठेवले पाहिजे. आता उदाहरणच द्यायचं झालं तर हेच बघा ना, आता बँकेचे व्यवहार आधी बँकेत जाऊनच तासन् तास रांगेत उभं राहून पूर्ण करावे लागत होते. पण आता स्मार्ट फोनमुळे गुगल पे, फोन पे, भीम अशा कितीतरी एप्लिकेशनद्वारे घरबसल्या एका मिनिटात पैशांचे व्यवहार आपण करू शकतो कधीही आणि कुठेही. पण या सगळ्या गोष्टींचा लाभ घेण्यासाठी बँकेत खाते असणे आवश्यक आहे. तेच जर नसेल तर मग किती अवघड होईल पैशांचे कोणतेही व्यवहार करणं.

आता तुम्ही म्हणाल, बँकेत खाते काढण्यासाठी काही ठराविक रक्कम बँकेत जमा असावी लागते खाते उघडताना. त्यासाठी लागणारे पैसे आमच्याकडे नसतील तर आम्ही काय करायचं ??? अगदी सो्पं आहे. ज्यांना बँकेत खाते काढण्यासाठी पैसे भरायचे नाहीत पण खाते काढयचे आहे अशा लोकांसाठी म्हणजेच सगळ्याच लोकांना बँकेचे व्यवहार करता यावेत त्याचा लाभ घेता यावा यासाठी पंतप्रधानांनी खास योजना सुरू केली आणि ती म्हणजे प्रधानमंत्री जन धन योजना.

देशातील प्रत्येक नागरिकांकडे किमान एक बँक खाते असावे, बँकिंग सुविधा उपलब्ध व्हावी व सरकारी योजनेचा आर्थिक लाभ लोकांना थेट बँक खात्यात जमा व्हावा तसेच, विमा संरक्षण व इतर आर्थिक व्यवहार सुलभ होण्याच्या उद्देशाने दिनांक २८ ऑगस्ट, २०१४ ला प्रधानमंत्री जन धन योजना संपूर्ण देशात राबविण्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली. या योजनेमुळे प्रत्येकाला पैशांची गुंतवणूक न करता खाते उघडता येणार आहे.

प्रधानमंत्री जन धन ही योजना विशेषतः समाजातील गरीब आणि दुर्बल घटकांसाठी अतिशय लाभदायक योजना आहे. शून्य बॅलन्सवर बँक खाती उघडण्यासाठी आणि कर्ज आधारित, हस्तांतरण सुविधा, विमा आणि निवृत्तीवेतनाची सुविधा तसेच, बँकिंग / बचत, ठेवी खाते, रेमिटन्स, कर्ज, विमा, निवृत्तीवेतन इत्यादी आर्थिक सेवा या योजनेअंतर्गत सर्वांना प्रभावीपणे उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत.

तुमचे चालू असलेले कोणतंही बचत खातं जनधन खात्यात करण्यासाठी, बँकेत जाऊन एक फॉर्म भरावा लागेल. सोबतच आपल्या खात्यासाठी RuPay कार्डसाठी अर्ज करावा लागेल. दोन्ही फॉर्म बँकेत सबमिट केल्यानंतर बचत खातं जनधन खात्यात बदललं जातं.

१) भारतात राहणारा 10 वर्षांवरील कोणताही नागरिक जनधन खातं सुरु करु शकतो.

२) लाभार्थीचे बँकेत बचत खाते असणे आवश्यक आहे.

३) अपघात विमा संरक्षण फायदा उपलब्ध होण्यासाठी, रुपे कार्डचा वापर 45 दिवसातून एकदा तरी झाला पाहिजे.

४) जन धन योजना खात्यात कोणताही मिनिमम बॅलेन्स ठेवण्याची आवश्यकता नाही. परंतु, चेकबुकची सुविधा घेतल्यास मिनिमम बॅलेन्स ठेवणं गरजेचं आहे.

5) ओव्हरड्राफ्टची सुविधा प्राप्त करण्यासाठी सहा महिन्यापर्यंत समाधानकारक व्यवहार होणे आवश्यक असते.

शासनाच्या बाल संगोपन योजनेअंतर्गत प्रति बालक मिळणार आता ठराविक रक्कम. जाणून घ्या सविस्तर माहिती

अटल पेन्शन योजना (APY) : 60 वर्षावरील पेन्शन योजना सविस्तर माहिती

जर आधार कार्ड / आधार नंबर उपलब्ध असेल तर इतर कागदपत्रांची आवश्यकता नाही. जर पत्ता बदलला असेल तर, सध्याच्या पत्त्याचे स्वयं-प्रमाणपत्र पुरेसे आहे. जर आधार कार्ड उपलब्ध नसेल तर खालीलपैकी कोणत्याही वैध कागदपत्रांची आवश्यकता असेलः

 • मतदार ओळखपत्र
 • ड्रायव्हिंग लायसन्स
 • पॅनकार्ड, पासपोर्ट आणि नरेगा कार्ड

१) वित्तीय साक्षरता वाढून संघटीत वित्तसंस्थाकडून होणारा पतपुरवठा वाढणार आहे

२) ग्रामीण भागातील वित्तीय समावेशनाला गती लाभणार आहे

३) वित्तीय अस्पृश्यता कमी होणार आहे .

४) सूक्ष्म विमा सेवांचा पाया विस्तृत होणार आहे ,

५) आगामी काळातील नियोजित थेट लाभ हस्तांतरण योजनासाठीचा पाया जलद गतीने उभारला जात आहे .

१) कोणत्याही बँकेमधून झिरो बॅलन्स बचत खाते उघडता येते म्हणजेच, किमान शिल्लक ठेवणे आवश्यक नाही.

२) खातेधारकाला निशुल्क मोबाईल बँकिंगची सुविधा मिळते.

२) बँकेतील ठेवींवरील व्याज मिळते.

३) लाभार्थीना रु. 2,00000/- ( दोन लाख रु. ) रुपयांचा अपघात विमा संरक्षण प्राप्त होते.

४) प्रधानमंत्री जन धन योजनेंतर्गत लाभार्थीच्या मृत्यूच्या सामान्य शर्तीची भरपाई केल्यास रु. 30,000/- ( तीस हजार रु. ) रुपयांचा जीवन विमा देण्यात येतो.

५) भारतभर निधी सहज हस्तांतरण.

६) सरकारी योजनेतील लाभार्थ्यांना या खात्यांमधून थेट लाभ मिळेल.

७) सहा महिन्यांपर्यंत या खात्यांच्या समाधानकारक व्यवहार झाल्यास ओव्हरड्राफ्टची सुविधा दिली जाईल.

८) लाभार्थीच्या प्रति परिवाराला रु. 10,000/ – इतकी ओव्हरड्राफ्ट सुविधा प्रत्येक कुटुंबासाठी फक्त एका खात्यात उपलब्ध आहे, ही सुविधा मुख्यत: कुटुंबातील महिलांसाठी मिळते.

प्रधानमंत्री जन धन योजनेअंतर्गत ओवरड्राफ्ट सुविधा म्हणजे जनधन खातेधारक आपल्या खात्यातून 10 हजार रुपयांपर्यंत ओवरड्राफ्ट म्हणजेच क्रेडिट कार्ड सुविधा याचा वापर करु शकतो. म्हणजेच, खात्यात पैसे नसतानाही किंवा खात्यात शिल्लक असलेल्या रकमेपेक्षा जास्त रक्कम काढता येते. त्या रक्कमेवर बँककडून व्याजदर आकारणी होते. परंतु ही सुविधा खातं सुरु केल्यानंतर काही महिन्यांनंतरच मिळते. (या योजनेअंतर्गत पूर्वी ५०००/- एवढी ओवरड्राफ्टची सुविधा होती).

तर असे हे प्रत्येक नागरिकासाठी उपयुक्त असलेली जन धन योजना नक्कीच वापरा आणि पुरेपूर लाभ घ्या.

==================

प्रिय वाचकहो, उत्तम बोधकथा/moral stories in marathi, प्रेम कथा, रहस्य कथा, कथामालिका, भारतातील संस्कृतीचे विविध पैलू, पर्यटन, खाद्यसंस्कृती, फॅशन, पॅरेंटिंग, लाईफस्टाईल ब्लॉग्स वाचायचे असतील तर रीतभातमराठीला नक्की भेट द्या.

1 Comment

 • Anthony
  Posted Nov 28, 2022 at 3:45 am

  I’m gone to convey my little brother, that he should also pay a quick visit
  this web site on regular basis to get updated from hottest news.

  Reply

Leave a Comment

error:

Warning

सध्या युट्युब वर कथा चोरी करून वाचून दाखवण्याचे धंदे चालू आहेत लोकांचे. आमच्या वेबसाईट वरची कथा कुठल्याही युट्युब चॅनेलवर बेकायदेशीररित्या आढळल्यास त्या चॅनेलला लगेच रिपोर्ट करण्यात येईल ह्याची कृपया दक्षता घ्यावी. तसेच आपल्या वाचकांपैकी कुणालाही असे बेकायदेशीर चॅनेल्स आढळल्यास आम्हाला ritbhatmarathi@gmail.com ह्या ई-मेल वर त्वरित कळवावे.