Skip to content Skip to sidebar Skip to footer

जल शक्ती अभियान (JSA)

jal shakti abhiyan in marathi : पाणी ही राष्ट्रीय संपत्ती आहे आणि त्याची जपणूक करावीच लागणार आहे, नाहीतर भविष्यात खूप मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागण्याची शक्यता लक्षात घेऊन हे अभियान सुरू केले आहे…. तर आपणही याचा महत्त्वाचा भाग होऊया आणि पाणी जपून वापरुया….

पाणी अडवा पाणी जिरवा, जल ही जीवन है, असे जागोजागी म्हणजेच खेडोपाडी, शहारोशहरी लिहलेले आपण बघतो. हे सगळं लिहण्याची, लोकांना सांगण्याची गरज का पडली याचा विचार कधीही आपण करत नाही. पण खरे सांगायचे तर या सगळ्याची गरज आपल्याच वागण्यामुळे पडली. माणूस हा व्यक्ती पाण्याचा वापर कसा करावा,किती प्रमाणात करावा त्याची गरज लक्षात न घेता कसाही वापर करतो आणि त्यामुळेच पाण्याचा तुटवडा जाणवायाला लागला आहे. आजही कित्येक ठिकाणी पाण्याचा दुष्काळ पडलेला आहे. लोक कोस कोस अंतर चालून पाणी घेऊन येत आहेत.

सगळ्याच गोष्टींसाठी पाणी लागते. कोणतेही काम पाण्याशिवाय होत नाही. एकवेळ माणूस अन्नाशिवाय राहू शकतो पण पाण्याशिवाय जगू शकत नाही. हे सगळ्यांनाच माहीत असते तरीही वापर करताना मात्र या गोष्टीचा विसर पडतो. त्यामुळेच अशी अवस्था निर्माण झाली आहे.

म्हणूनच २०१९ च्या लोकसभा निवडणुकीआधी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशभरातील जनतेला शुद्ध पिण्याचे पाणी पुरवण्याचे आश्वासन दिले होते. या पार्श्वभूमावर त्यांनी २०१९ च्या लोकसभा निवडणुकीनंतर देशात पहिल्यांदाच जलशक्ती मंत्रालयाची स्थापना केली.

१. केंद्र सरकारने घेतलेल्या अहवालानुसार पाण्याची परिस्थिती काय आहे ??
२. जल शक्ती अभियान सुरू करण्याची गरज का पडली ??
३. जल शक्ती अभियानाचे उद्दिष्ट काय आहे ??
४. जलसाठा वाढवण्यासाठी काय करावे लागेल ??
५. जल शक्ती अभियाना अंतर्गत काय केले जाईल ??
६. जलशक्ती प्रकल्पाचा फायदा कोणत्या भागांना होणार?

आजकाल वाढते शहरीकरण, जंगल तोडीचे वाढते प्रमाण यामुळे निसर्गचक्र बदलले आहे आणि त्यामुळेच नको तेंव्हा पाऊस, नको तेंव्हा ऊन आणि नको त्या वेळी थंडी जाणवत आहे. हवामान, ऋतू चक्र बदलले असल्याने सगळ्याच गोष्टी बदलल्या आहेत. लोक जमिनीचा वापर पाणी जिरवण्यासाठी, साचवून ठेवण्यासाठी नव्हे तर बिल्डिंग, मॉल उभे करण्यासाठी करत आहेत. म्हणूनच भूगर्भातील पाण्याचा सतत आणि वाढीव प्रमाणात उपसा केल्याने या मूल्यवान स्रोताचा मोठ्या प्रमाणात र्‍हास झाला आहे. पाण्याअभावी उपजीविकेच्या साधनांचा र्‍हास, उद्भवणार्‍या आरोग्यविषयक गंभीर समस्या, पाणीटंचाईमुळे मोठ्या प्रमाणावर होणारी जीवितहानी, सुरक्षित पेयजलाअभावी होणारे स्थलांतर, असे पाणीटंचाईचे परिणाम अतिशय तीव्र स्वरुपाचे आहेत.

हवामान बदलामुळे पावसाचे प्रमाणही अनियमित होते आणि भूजल पुनर्भरणावरही त्याचा विपरित परिणाम होतो. या समस्येचे समाधान करण्यासाठी केंद्र सरकारने पंतप्रधानांच्या प्रेरणेने २०१९ साली ‘जलशक्ती अभियान’ हाती घेतले. ‘जलशक्ती अभियान’ हा भारत सरकारच्या विविध मंत्रालयांचा आणि राज्य सरकारांचा एक एकत्रित प्रयत्न आहे. जलशक्ती मंत्रालयाच्या पेयजल आणि स्वच्छता विभागाच्या समन्वयाने ही मोहीम राबविण्यात आली.

पाण्याचा जास्तीत जास्त साठा कसा करता येईल याचा विचार करून त्यावर काम करणे आणि पाण्याची बचत तसेच साठवणूक करणे. म्हणजेच भविष्यात पुढे पाणीटंचाई ही समस्या निर्माण होणार नाही याची काळजी घेणे. त्यामुळे या मोहिमेअंतर्गत केंद्र सरकारचे अधिकारी, भूजल तज्ज्ञ आणि शास्त्रज्ञांनी पाच निर्धारित उद्दिष्टांच्या त्वरित अंमलबजावणीवर लक्ष केंद्रित केले आणि जलसंधारण तसेच जलसंपत्ती व्यवस्थापनासाठी देशातील सर्वाधिक पाणीटंचाई असलेल्या जिल्ह्यांमध्ये राज्ये आणि जिल्हाधिकार्‍यांच्या बरोबरीने काम केले. व्यापक, संवाद आणि समुदायांच्या सहभागाच्या माध्यमातून जलसंवर्धनाची लोक चळवळ उभारणे, हे ‘जलशक्ती अभियाना’चे उद्दिष्ट आहे.

सगळ्यात आधी पाण्याचा अपव्यय टाळला पाहिजे आणि ही प्रत्येकाची नैतिक जबाबदारी आहे हे लक्षात घ्यायला हवे. स्वतः पासून सुरुवात करायला हवी भविष्यात हीच तुमच्या भावी पिढीसाठी खूप मोठी कमाई असेल. त्याचप्रमाणे आपल्या नद्यांचे पुनरुज्जीवन करणे, जलपुनर्भरण सुधारणे, लोकांना त्यांच्या स्वत:च्या जलसुरक्षेमध्ये सहभागी करून घेणे या शाश्वत बदलासाठी आवश्यक असणार्‍या बेसिक गोष्टी आहेत. हे ‘जलशक्ती अभियानाच्या उद्दिष्टांशी अगदी सुसंगत असे आहे. त्यामुळे ही मोहीम यशस्वी करण्यासाठी आपण सर्वांनी एकत्र येणे अत्यावश्यक आहे. आपल्यासाठी आणि आपल्या भावी पिढ्यांसाठी जलसुरक्षित भारताची निर्मिती करणे, हे आपले आद्य कर्तव्य आहे.

पाणी ही राष्ट्रीय संपत्ती आहे आणि त्याची जपणूक करावीच लागणार आहे, नाहीतर भविष्यात खूप मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागण्याची शक्यता लक्षात घेऊन हे अभियान सुरू केले आहे…. तर आपणही याचा महत्त्वाचा भाग होऊया आणि पाणी जपून वापरुया….

पाणी अडवा पाणी जिरवा, जल ही जीवन है, असे जागोजागी म्हणजेच खेडोपाडी, शहारोशहरी लिहलेले आपण बघतो. हे सगळं लिहण्याची, लोकांना सांगण्याची गरज का पडली याचा विचार कधीही आपण करत नाही. पण खरे सांगायचे तर या सगळ्याची गरज आपल्याच वागण्यामुळे पडली. माणूस हा व्यक्ती पाण्याचा वापर कसा करावा,किती प्रमाणात करावा त्याची गरज लक्षात न घेता कसाही वापर करतो आणि त्यामुळेच पाण्याचा तुटवडा जाणवायाला लागला आहे. आजही कित्येक ठिकाणी पाण्याचा दुष्काळ पडलेला आहे. लोक कोस कोस अंतर चालून पाणी घेऊन येत आहेत.

केन बेटवा नदी जोड प्रकल्पाचा फायदा बुंदेलखंड, पन्ना , टिकमगढ, छत्तरपूर, सागर, दामोह, दातिया, विदीषा, शिवपूर या मध्यप्रदेशातील तर उत्तर प्रदेशातील बंड, महोबा, झांसी आणि ललितपूर या भागांना होणार आहे.

==============

प्रिय वाचकहो, उत्तम बोधकथा/moral stories in marathi, प्रेम कथा, रहस्य कथा, कथामालिका, भारतातील संस्कृतीचे विविध पैलू, पर्यटन, खाद्यसंस्कृती, फॅशन, पॅरेंटिंग, लाईफस्टाईल ब्लॉग्स वाचायचे असतील तर रीतभातमराठीला नक्की भेट द्या.

Leave a Comment

error:

Warning

सध्या युट्युब वर कथा चोरी करून वाचून दाखवण्याचे धंदे चालू आहेत लोकांचे. आमच्या वेबसाईट वरची कथा कुठल्याही युट्युब चॅनेलवर बेकायदेशीररित्या आढळल्यास त्या चॅनेलला लगेच रिपोर्ट करण्यात येईल ह्याची कृपया दक्षता घ्यावी. तसेच आपल्या वाचकांपैकी कुणालाही असे बेकायदेशीर चॅनेल्स आढळल्यास आम्हाला ritbhatmarathi@gmail.com ह्या ई-मेल वर त्वरित कळवावे.