इंडियन प्रीमयर लीगचा (IPL 2021) १४ वे पर्व अखेर परत सुरू झाले. २००७ मध्ये भारताने पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकला आणि भारतामध्ये या जलदगती क्रीडा प्रकाराने प्रचंड लोकप्रियता मिळवली. त्यानंतर द्वीपक्षीय टी-२०सामन्यांची वाढत जाणारी लोकप्रियता पाहून अखेर बोर्ड ऑफ कंट्रोल फॉर क्रिकेट इन इंडिया ( बीसीसीआय) ने एक प्रोफेशनल क्रिकेट सामने आयोजीत करण्याचं नियोजन केलं आणि आयपीएलचा जन्म झाला. आणि त्यात सगळ्या देशांचे खेळाडू मिळून एकत्र एकच संघाचा भाग बनून खेळू लागले.आणि एक प्रचंड यशस्वी स्पर्धा म्हणून आयपीएल ओळखली जाऊ लागली.२०२० मध्ये आलेल्या कोरोनाने मात्र आयोजकांवर प्रचंड दबाव आणला.
पण प्रेक्षक शिवाय स्पर्धा आयोजित करण्याचं ठरवलं गेलं.आणि ती स्पर्धा संयुक्त अरब अमिराती मध्ये पार पडली. यावर्षी मात्र भारतामध्ये ही स्पर्धा आयोजित करायची अस ठरवून बीसीसीआय ने एप्रिल मध्ये आयोजन केलं.खेळाडूंना बायोबबल मध्ये राहून नियमांच पालन करण्यासाठी संघाना प्रतीबद्द करण्यात आल. पण २९ सामने खेळवले गेल्यानंतर कोरोना ने चेन्नई विरुद्ध मुंबई सामन्यादरम्यान शिरकाव केला आणि हा सामना रद्द झाला.पुढे सगळे सामने स्थगित करण्यात आले.आणि अखेर १९ सप्टेंबर पासून ही उर्वरित स्पर्धा संयुक्त अरब अमिराती मध्ये आयोजित करण्यात आली आहे.