ब्लॉग म्हणजे काय? स्वतःचा ब्लॉग कसा सुरु करावा? जाणून घ्या याविषयी संपूर्ण माहिती । blogging in marathi

ब्लॉग म्हणजे काय? स्वतःचा ब्लॉग कसा सुरु करावा? जाणून घ्या याविषयी संपूर्ण माहिती । blogging in marathi
आजकाल डिजिटल मार्केटिंग खूप डिमांड मध्ये आहे. युट्युब, फेसबुक आणि इंस्टाग्राम सोबतच ब्लॉगिंग करताना अनेक लोक सर्रास दिसतात. आपल्यापैकी बऱ्याच जणांना ब्लॉगिंग बद्दल खूप प्रश्न असतील कि ब्लॉग म्हणजे नक्की काय? ब्लॉगर्स स्वतःची वेबसाईट कशी डेव्हलोप करतात. ब्लॉग वेबसाईटसाठी कोडींग (coding/programming) येणं आवश्यक आहे का? सगळ्याच ब्लॉगर्सला हे कोडींग येतं का ? मग आपल्याला हे कोडींग येत नसताना आपण स्वतःची ब्लॉग वेबसाईट चालू करू शकतो का? ह्यासारखे बरेच प्रश्न तुम्हा सगळ्यांना पडले असतीलच. चला तर मग ह्या लेखात जाणून घेऊ या ब्लॉगिंग बद्दलची संपूर्ण माहिती (blogging in marathi)
लेख आवडल्यास शेयर करायला विसरू नका.
1. ब्लॉग म्हणजे काय? | blogging in marathi | blog writing in marathi
हल्ली भरपुर वेळा आपल्याला यशस्वी लोकांच्या प्रेरणादायी व्याख्यान दरम्यान एक शब्द सर्रास ऐकायला मिळतो माझ्या ब्लॉगला भेट द्या तिथे सविस्तर माहिती दिली आहे, किंवा या या ब्लॉग वरती मला ही उपयोगी माहिती मिळाली इत्यादी… पण हे ब्लॉग नमक आहे तरी काय हे आपण पाहू. 1990 च्या दशकात हा शब्द उदयास आला.आणि या प्रकारची एक लेखन शैली प्रसिद्ध झाली.पण हे ब्लॉग आहे तरी काय ? ब्लॉग म्हणजे एखाद्याने लिहिलेला स्वानुभव,किंवा एखादा माहितीस्रोत त्या व्यक्तीच्या दृष्टिकोनातून,किंवा एखाद्या पदार्थाची रेसिपी, एखाद्या परीक्षेबाबत मार्गदर्शन, थोडक्यात काय तर सामान्यत: लेखकांचं विविध क्षेत्राबद्दल लिहिलेलं किंवा एखाद्या सेक्टर बद्दल लिहिलेली संग्रहित माहिती म्हणजेच हा ब्लॉग.
पण सध्या blog किंवा blogger ही संज्ञा एवढी साधारण पणे वापरली जाते की हा एक चर्चेत सहजपणे येणारा शब्द ठरला आहे. लोकांमध्ये ही बाब अगदी सहज झालेली दिसून येते.याच कारण म्हणजे इंटरनेट चा झालेला उदय आणि त्याचा वापर करून उदयास आलेली एक नवीन social media community. आज एवढे प्लॅटफॉर्म तयार झालेले आहेत की दुसऱ्या इन्कम चा सोर्स म्हणून सुद्धा ब्लॉगिंग कडे पाहिलं जात आहे. कित्येक प्लॅटफॉर्म वर आज करोडो ब्लॉगर आपले ब्लॉग नियमितपणे अपलोड करत असतात.त्यातून विविध प्रकारचे कंटेंट इंटरनेट वर नियमित उपलब्ध होतात ज्यामुळे एकप्रकारे सामान्य वापरकर्त्याला फायदाच होतो आहे.
आपण जेव्हा वर्तमानपत्र वाचायला घेतो,त्यात एक ‘ संपादकीय ‘ नावाचं पान आपल्याला दिसून येत ,ज्यामध्ये विविध क्षेत्रातल्या तज्ञांचा लेख उपलब्ध असतो. ब्लॉगिंग च जे मुळ आहे ते म्हणजे हे लेख. सुशिक्षित जनतेची संख्या वाढू लागल्यानंतर एखाद्या घटनेबद्दल असलेली विविध मंडळींची मते मतांतरे ,प्रत्येकाला एका मंचाची गरज भासू लागली आणि त्यातून ब्लॉगर सारखी संकल्पना उदयास आली.
2. स्वतःचा ब्लॉग सुरु करण्यासाठी असलेले व्यासपीठ कोणते?
जवळपास २० करोड ब्लॉग्ज tumblr या प्लॅटफॉर्म वरती तर ९ करोड ब्लॉग्ज wordpress या प्लॅटफॉर्म वर आढळून आले.आणि ही संख्या नियमितपणे वाढत आहेच.सध्या घेतलेल्या एका सर्वेनुसार blogger या प्लॅटफॉर्म वर सगळयात जास्त ब्लॉग्ज आढळून येतात. ब्लॉग्ज विविध प्रकारच्या विषयांवर लिहिता येतात. मी काही खाली उदाहरणे दिलेली आहेत.
हेही वाचा 🠗
पॉडकास्ट म्हणजे काय?
म्युच्युअल फंड म्हणजे काय? | म्युच्युअल फंड गुंतवणूक कशी करावी?
3. मराठी मध्ये ब्लॉगिंग साठी असलेले ट्रेंडिंग विषय कोणते | blogging in marathi
3.1. ट्रॅव्हल ब्लॉग्ज:
हे ब्लॉग्ज सध्या प्रचंड ट्रेण्ड मध्ये आहेत.आपण एखाद्या पर्यटन क्षेत्राला भेट दिल्यानंतर तिथे आवश्यक असणारी सगळी माहिती या प्रकारच्या ब्लॉग्ज मध्ये लिहिलेली असते. उदा.’प्रणव काही कामानिमित्त बसवकल्यान तालुक्यात गेलेला .हा आपला पुणेरी प्रणव ज्याला इतिहासाची प्रचंड आवड.आपला मराठ्यांचा इतिहास अगदी तोंडपाठ.पण बस्वकल्यान येत कर्नाटकात.तिथे फिरता फिरता त्याला एक किल्ला नजरेस पडला.आता याची आवड याला शांत बसू देत नाही.मग माहिती मिळवायची कशी?मग याने गुगल वरती सर्च केलं आणि याला एक ब्लॉग मिळाला.त्यात अगदी व्यवस्थित माहिती दिलेली किल्ला कोणाचा होता,तिथला शासक कोण होता.त्याचा मराठा इतिहासाशी काही संबंध आहे का, अगदी किल्ल्याला भेट देण्याचा सगळयात योग्य वेळ, काळ हे सुद्धा नमूद केलेलं होत. काही वेळातच त्याला ते सगळं परिचित वाटू लागलं आणि उत्सुकतेपोटी आलेलं दडपण सुद्धा कुतूहलाने भरून गेलं.
ट्रॅव्हल ब्लॉग मध्ये नेहमी एखाद्या पर्यटन क्षेत्राला भेट देण्यासाठी पूर्वतयारी काय काय करायला लागेल,तिथे कोणत्या कोणत्या वस्तू उपयोगी पडतील,तिथे कोणते कोणते समस्या उद्भवू शकतात हे अगदी सविस्तर पाने सुरवातीला सांगितलेलं असतं.त्यानंतर तिथे पोहोचण्यासाठी उपलब्ध असलेली दळणवळण यंत्रणा किंवा नसेल तर जवळ कुठे कोणते बस थांबा आहे.इत्यादी माहिती दुसऱ्या टप्प्यात येते.त्यानंतर भेट दिलेल्या स्थानी काय काय पाहायला मिळेल त्याची माहिती तिसऱ्या टप्प्यात दिलेली असते.त्यामुळे उद्भवणारी समस्या काही अंशी आधीच तयारी केल्यामुळे संपुष्टात आलेली असते.शिवाय आपण त्या स्थानाचा मनसोक्त आनंद लुटण्याची सूरवात करतो.नियोजन करण्यास मोठी मदत या प्रकारच्या ब्लॉग्ज मुळे होते.
3.2. फूड ब्लॉग्ज:
हे ब्लॉग्ज मध्ये सुद्धा वेगवेगळे प्रकार आहेत.काही ब्लॉग्ज माहिती साठी असतात उदा.एखाद्या विशिष्ट स्थळी एक विशेष पदार्थ मिळतो तर त्याबद्दल माहिती देणारे,त्याची इतर ठिकाणी भेटणाऱ्या पदर्थासोबत तुलना करणारे किंवा त्यांच्याबाबतीत भरपुर माहिती मग ते पदार्थ बनवणाऱ्या अचाऱ्यापासून ते हॉटेल मालकपर्यंत सगळ्यांना प्रश्न विचारून लिहिलेला ब्लॉग असतो. दुसऱ्या प्रकारचा ब्लॉग म्हणजे एखादी पदार्थ कसा बनवायचा त्याची रेसिपी, पद्धत,त्यात टाकायचे विशेष असे सामग्री.याबद्दल माहिती दिलेली असते.हे ब्लॉग्ज सुद्धा प्रचंड ट्रेण्ड मध्ये असतात खास करून गृहिणींना या प्रकारच्या ब्लॉग्ज मध्ये जास्त रुची असते.
3.3. कॉमिक्स:
इंटरनेट चा शोध लागल्यानंतर जेव्हा ते चलनात यायला सुरुवात झाली तेव्हाच बच्चे कंपनी वरती कॉमिक्स चा मोठा पगडा होता. सुपरमॅन सारखे कॉमिक्स तर आजतागायत प्रचंड फेमस आहेत.त्या वेगवेगळ्या characters वरती सुद्धा विविध ब्लॉग्ज उपलब्ध आहेत.२००८ मध्ये आलेल्या Ironman या चित्रपटाने एक वेगळाच चाहता वर्ग निर्माण केला आणि या superhuman श्रेणी मधील लोकांच्या मनात एक वेगळी आवड निर्माण केली त्याचा काय परिणाम सिनेमा सृष्टी वर झाला ते तर आपण पाहतो आहोत पण अगदी तसाच ब्लॉग्ज वरती पण झाला आणि या बद्दल ब्लॉग्ज लिहायला मोठ्या प्रमाणत सुरुवात झाली. मागच्या दशकात प्रामुख्याने ब्लॉग्ज लिहिल्या गेलेल्या क्षेत्रात कॉमिक्स सुद्धा अग्रेसर आहे.
3.4. मांगा डिस्कशन ब्लॉग्ज:
मांगा म्हणजे एकदम थोडक्यात सांगायचं तर जॅपनीज कॉमिक्स.पण मग हे वरच्या ब्लॉग्ज मध्ये येणार नाही का नुसत्या कॉमिक्स मध्ये? तर याच उत्तर आहे हो पण आणि नाही पण.कारण मांगा चाहत्यांची संख्या कॉमिक चाहत्यांपेक्षा काही कमी वगैरे नाहीये. उलट या प्रकारच्या ब्लॉग्ज ची संख्या कॉमिक एवढीच आहे आणि दिवसेंदिवस वाढते सुद्धा आहे. वन पिस, नरुटो, ड्रॅगन बॉल सारखे दशकभर चाललेले मांगा आजसुद्धा प्रचंड प्रसिद्धी मिळवून आहेत.पुढे येणाऱ्या एपिसोड बद्दल spoiler इत्यादी सारखे ब्लॉग्ज आणि discussion ग्रूप्स ची संख्या अगणित आहे त्यामुळे आपलं वेगळं स्थान हे प्रकारचे ब्लॉग्ज टिकवून आहेत. वन पिस सारखे मांगा अगदी आतासुद्धा प्रसिद्ध आहेत.त्यांच्या पात्रांवर आधारित शिर्ट्स, किचेन,त्यांचे ऍक्शन फिगर्स, प्रिंटेड गर्मेंट्स किंवा ईतर गोष्टी यांचे शॉपिंग सुद्धा या ब्लॉग्ज च्या माध्यमातून चालते. या ब्लॉग वरती हे सगळे कुठे मिळतील याबद्दल माहिती दिलेली असते.ऑर्डर सुद्धा घेतली जाते .दिवसेंदिवस वाढत जाणारी ही सृष्टी ब्लॉग्ज ना सुद्धा जास्तीत जास्त सामावून घेतेय हे विशेष.
3.5. ऐतिहासिक ब्लॉग्ज:
हे ब्लॉग्ज ऐतिहासिक घटना, त्यांच्यावर सध्या होणाऱ्या चर्चेवरून ट्रेण्ड मध्ये येत असतात. विविध ऐतिहासिक घटना बद्दल माहिती सुद्धा या ब्लॉग्ज माध्यमातून पुरवली जाते. एक उत्तम माहितीस्रोत म्हणून या ब्लॉग्ज कडे पाहिलं जात. एखादी जुनी घडामोड जेव्हा चर्चेत येते तेव्हा अर्ध्याधिक लोकांना काय चाललंय याची कल्पनाच नसते.अशावेळी या प्रकारचे ब्लॉग्ज प्रचंड उपयोगी पडतात.उदा. नुकतेच राजनाथ सिंग यांनी सावरकरांनी लिहिलेल्या माफिनाम्यावर भाष्य केलेले आणि त्यावर मोठ्या प्रमाणात प्रतिक्रिया यायला सुर्वात झाली.या काळामध्ये गांधीजी आणि सावरकर यांच्याबद्दल माहिती मिळवण्यासाठी मोठ्या प्रमाणात ब्लॉग्ज लिहिले गेले.
3.6. आर्थिक/गुंतवणूक मार्गदर्शन ब्लॉग्ज (Financial Guide):
काळानुरूप गुंतवणुकीचे पर्याय नविण्याने भरभरून समोर येतात.त्यावेळी त्या क्षेत्रातली माहिती नसलेली मंडळी बऱ्याच वेळा लुबाडले जाण्याची शक्यता असते.अशावेळी या प्रकारचे ब्लॉग्ज मोठ्या प्रमाणत मदतीस धावून येतात. कित्येक तज्ञ मंडळी याबाबत ब्लॉग्ज लिहून आपली मदत करतं असतात.
विविध प्रकारचे ब्लॉग्ज आणखीही आहेत.अगदी कोणीही हे ब्लॉग्ज लिहू शकतो.आणि हे एक सोर्स ऑफ इन्कम म्हणुन सुद्धा उपयोगी पडू शकतं.
4. स्वतःचा ब्लॉग कसा सुरु करावा? | blog writing in marathi
आपण मार्केट मध्ये एवढ्या भन्नाट वेबसाईट बघतो. पण की प्रश्न नेहमी पडतो कि इतक्या आकर्षक वेबसाईट बनवण्यासाठी नक्कीच पैसे मोजावे लागत असतील. पण तसं काहीच नाही. तुम्ही देखील तुमची स्वतःची वेबसाईट तयार करू शकता आणि तीही अगदी मोफत आणि तेवढीच आकर्षक.
आज विविध प्रकारचे प्लॅटफॉर्म ब्लॉग्ज उपलब्ध आहेत.यांच्या माध्यमातून आपण आपले ब्लॉग्ज लिहायला अगदी आजच सुरू करू शकतो.खाली मी यादी देत आहे.
The ९ best blogging sites and platforms
Best free blogging platform
Best platform for serious bloggers
Publishing platform by Google
Best microblogging site
Best blog website builder for beginners
Best WordPress alternative
Blogging powered by Evernote
Plain drag and drop builder functions
Best for businesses and journalists