Ritbhatmarathi

Search
Close this search box.

मासिक पाळीमध्ये वेदना कमी करण्याचे नैसर्गिक उपाय.

how to reduce period pain: मैत्रिणींनो निसर्गाने स्त्रीवर्गाला आई होण्याचे सुंदर वरदान दिले आहे. आपल्या पोटी नऊ महिने वागवून आपला अंश जन्माला घालण्याइतकी सुंदर गोष्ट नाही या जगात. पण त्यासाठी स्त्रियांना दर महिन्याला येणाऱ्या मासिक पाळीला आणि त्याच्याशी निगडीत त्रासाला सामोरे जावे लागते. खरतर मासिक पाळी हे स्त्री आभूषण म्हणायला हवे पण त्यामुळे होणाऱ्या त्रासामुळे हा स्त्रियांना कटकटच जास्त वाटतो.

प्रत्येक स्त्रीची प्रकृती वेगळी आणि त्यानुसार मासिक पाळीत होणारे त्रास पण वेगवेगळे. या चार पाच दिवसांच्या काळात स्त्रियांना आणि मुलींना गरज असते ती आरामाची, कोणीतरी हक्काचे माणूस जवळ असण्याची, समजून घेण्याची. कारण या काळात स्त्रियांच्या शरीरात काही हार्मोनल बदल होत असतात आणि स्त्रिया हळव्या, चिडक्या, रागीट होत असतात. अनेक स्त्रियांना या दिवसात पोट दुखी, कंबर दुखी,अंगदुखी, हात पाय गळून जाणे, अशक्तपणा, अती चिडचिड असे शारीरिक त्रास सुरू होतात. त्यात आजकालच्या धकाधकीच्या जीवनात कोणालाच घरात बसून व्यवस्थित आराम घेणे शक्य होत नाही. मग आपण औषधे घेतो आणि त्याचे चुकीचे परिणाम शरीरावर होताना दिसून येतात.

मग अशा वेळी काही घरगुती आणि नैसर्गिक उपाय करणेच जास्त श्रेयस्कर ठरते. त्यासाठी आपल्यासाठी जरा वेळ काढणे महत्त्वाचे आहे. पण स्वतःच्या आरोग्यासाठी तो काढायला हवा. मग नक्की नैसर्गिक उपाय कोणते ज्यामुळे पाळीचा त्रास कमी होईल ?? चला बघुया.

मासिक पाळीच्या दिवसांत हलका व्यायाम म्हणजेच काही योगासनं करणं हे फायदेशीर आहे. यामुळे शरीरात बीटा एन्डोरफिनचा प्रवाह सुधारतो आणि वेदना कमी होण्यास मदत होते. जमेल तितके चालल्यामुळे पाय मोकळे होतात तसेच व्यायाम केला तर हृदयाला जास्ती रक्तपुरवठा होतो. त्यामुळे एन्डोर्फीन नावाचे रसायन तयार होते जे पाळीच्या कळांना आणि ओटीपोटात उठणाऱ्या शूळांना कमी करते.

तसेही व्यायामाचा उपयोग सगळ्याच दृष्टीने शरीरास उत्तम असतो.

व्हिटॅमिन डी ची कमतरता स्त्रियांच्या शरीरात असल्यास पाळीच्या ३-४ दिवस आधीही अंग दुखणे, पोटऱ्यामध्ये गोळा येणे, कंबर दुखणे असे त्रास होऊ शकतात. त्यामुळे आहारातून व्हिटॅमिन डी ची कमतरता दूर केल्यास फरक नक्कीच जाणवेल. कोवळी उन्हे देखील व्हिटॅमिन डी चा चांगला स्रोत आहेत.

गरम पाणी पिण्याची स्नायूंना आराम मिळतो. त्वचेला भरपूर रक्तपुरवठा होतो. शरीरातील पोटफुगी किंवा अतिरिक्त पाणीसाठा कमी करायचा असल्यास सतत गरम पाणी पीत राहणे उपयुक्त आहे

गरम पाणी जंतुनाशक असते. अशा पाण्यात अरोमॅंटिक एस्सेन्स म्हणजे सुगंधित द्रव्य घालून अंघोळ केल्यास प्रसन्न वाटते. शरीर गरम पाण्याने शेकले गेले की स्नायू शिथिल होतात. पाठ, कंबर दुखी कमी होते.

पाळीमध्ये शरीरास वेदना होत असल्याने शरीरास विश्रांती देण्याचा सगळ्यात छान उपाय म्हणजे झोप घेणे. तीही अगदी लहान बाळासारखी. म्हणजे सगळ्या चिंता कटकटी बाजूला ठेऊन.

दिवसा एक दोन तास विश्रांती घेतली तर होणारा त्रास जाणवणार नाही.रात्री सुद्धा पूर्ण ८ तास झोप होईल ह्याकडे लक्ष द्यावे.

बाजारात ‘नाईट लॉंग’ प्रकारचे मोठे सॅनिटरी नॅपकिन/पॅड उपलब्ध असतात. ते वापरून झोपल्यास रात्री झोपमोड करून ते बदलण्यासाठी उठावे लागत नाही आणि छान विश्रांती मिळाली की शरीराला काम करायला शक्ती मिळते.

मेथीचे लाडू बाळंतिणीला आवर्जून देतात. कारण कंबरदुखी, अंगदुखीवर जालीम उपाय म्हणजे मेथ्यांचे दाणे. मासिक पाळीच्या दरम्यान ह्यांचे सेवन केल्यास सगळ्या वेदनांपासून आराम मिळतो.मेथीचे दाणे १२ तास पाण्यात भिजवून ठेवावे आणि ते पाणी सकाळी पिऊन टाकावे. असे रोज ४-५ दिवस करावे. शरीरास आराम नक्की मिळेल.

उत्तम आरोग्य हवं असल्यास आजच तुमच्या स्वयंपाकघरातील हि भांडी वापरायची बंद करा

चेहरा उजळण्यासाठी हे घरगुती उपाय नक्की करून पहा

मासिक पाळीच्या दिवसांत घट्ट कपडे वापरणे टाळा. या कपड्यांमुळे पोटाजवळील स्नायूंवरील ताण वाढतो. परिणामी वेदना अजूनच तीव्र होतात.

संशोधकांनी तेल मालिशने पाळीचा त्रास कमी होतो हे सिद्ध केले आहे.

हे खास तेल म्हणजे झाडांच्या काही भागांचा अर्क असतो. हे अर्क असलेले तेल आपल्या घरात नेहमीच्या वापरातल्या तेलात मिसळून मग लावणे योग्य.

पाळीच्या वेळी ओटीपोट, कंबर आणि पाय चोळल्याने काही पॉइंट दाबले जातात आणि हे अक्युप्रेशर प्रमाणे काम करते आणि आराम मिळतो.

एखाद्या पेन किलर औषधाप्रमाणे गरम पाण्याचा पिशवीचा शेक काम करतो. तितक्याच वेळात दुखणे कमीही करतो.

ओटीपोटाचे, कंबरेचे स्नायू आकुंचन पावल्याने वेदना होतात. तो भाग शेकला गेला, त्याला हवी तितकी गर्मी मिळाली की ते आकुंचन पावलेले स्नायू परत पूर्ववत होतात.

याशिवाय आहारात काही बदल केले तरीही त्रास कमी होण्यास मदत होते.

फॅटी अन्नपदार्थ, चहा कॉफी, खारट पदार्थ, कार्बन असलेली शीत पेये, दारू ह्या पदार्थांपासून दूरच असलेले उत्तम. या पदार्थांमुळे ‘ब्लोटिंग आणि वॉटर रिटेन्शन’ म्हणजेच पोटफुगी आणि जास्तीच पाणीसाठा असा त्रास पाळीच्या दरम्यान होतो.

अँटीटॉक्सिन, गॅस/पोटफुगी दूर करणारे, शरीराला ताजेतवाने करणारे पदार्थ आहारात सामील केल्यास पाळीचा त्रास आपण सुसह्य करू शकतो.

कॅमोमाईल टी किंवा हर्बल टी, बडीशोप, दालचिनी आलं, शेपू, इतर हिरव्या पालेभाज्या मांसाहारी असल्यास चिकन, मासे, अक्रोड, बदाम, पपई, केळी आणि पाणीदार फळे, ब्राउन राईसह्यांचा जेवणात समावेश नक्की करावा.

स्नायू आकुंचणे, मळमळणे, अशक्तपणा, अंगदुखी ह्यातून मुक्तता मिळते हे पदार्थ खाल्ल्याने.

गाजर हे डोळ्यांच्या आरोग्यासोबतच मासिकपाळीच्या समस्या दूर करण्यासाठीदेखील फार उपयुक्त आहे. ग्लासभर गाजराचा रस प्यायलास तुम्हांला प्रसन्न वाटेल.

कोरफडीचा रस मधासोबत घेणे आरामदायी आहे. यामुळे रक्तस्त्राव नियंत्रणात राहतो व वेदना कमी होतात.

मासिकपाळीच्या दिवसांत कॅफिनयुक्त पदार्थ (चहा, कॉफी, चॉकलेट्स.. इत्यादी ) व लाल मांस खाणे टाळावे. यामुळे वेदना अधिक तीव्र होतात.

चिडचिड करणे टाळा.

आवडीनुसार संगीत ऐका,एखादा छंद जोपासा,पुस्तकं वाचा किंवा मित्र-मैत्रीणींशी गप्पा मारा. यामुळे तुमचे लक्ष वेदनांकडे राहणार नाही. तसेच तुम्हांला प्रसन्न रहाण्यास मदत होईल.

रताळं हे वेदनाशामक असल्याने मासिकपाळीच्या दिवसांत, त्याचा आहारात आवर्जून समावेश करावा.

रासबेरीची पानं किंवा जास्मिन फ्लेवरची ग्रीन टी यांमुळे मन व शरीर शांत राहण्यास मदत होते.
ब्रेकफास्टच्या वेळी ग्लासभर दूध नक्की प्या. दुधातील कॅल्शियम वेदना व क्रॅम्स कमी करण्यास मदत करतात.

मासिकपाळीचा त्रास दूर करण्यासाठी पपई हे फारच उपयुक्त फळ आहे. यामुळे मासिकपाळीच्या दिवसांतील रक्तस्त्राव नियंत्रणात राहण्यास मदत होते.

तर असे काही घरगुती आणि नैसर्गिक उपाय केल्याने मासिक पाळीचा त्रास कमी होण्यास नक्कीच मदत होईल.

=================

प्रिय वाचकहो, उत्तम बोधकथा/moral stories in marathi, प्रेम कथा, रहस्य कथा, कथामालिका, भारतातील संस्कृतीचे विविध पैलू, पर्यटन, खाद्यसंस्कृती, फॅशन, पॅरेंटिंग, लाईफस्टाईल ब्लॉग्स वाचायचे असतील तर रीतभातमराठीला नक्की भेट द्या.

Share your love
Facebook
Twitter

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *