पासपोर्ट काढण्यासाठी दिवसभर रांगेत उभे राहण्याचे दिवस आता गेले. पासपोर्ट काढणे आता झाले सोपे.

पासपोर्टसाठी कसं अप्लाय करावं ?
१. पासपोर्ट म्हणजे काय आणि पासपोर्टचे प्रकार
how to online passport apply: पासपोर्ट म्हणजे सरकारद्वारे जारी केलेला एक मुख्य असा दस्तावैज आहे ज्याचा वापर आपण परदेशात फिरण्यासाठी करतो.ज्याला भारतीय पारपत्र म्हणजेच पासपोर्ट असेही म्हणतात. पासपोर्ट हा आयटी मध्ये कार्यरत असणारे कामगार, व्यापारासाठी किंवा व्यापारवृद्धीसाठी परदेशात जावे लागणाऱ्यांसाठी मिळालेला सरकारी परवाना आहे तर पासपोर्टचे तीन मुख्य असे प्रकार पडतात.
- पर्सनल पासपोर्ट (ऑर्डीनरी पासपोर्ट)
- डिप्लोमॅटिक पासपोर्ट
- ऑफिसिअल पासपोर्ट
१.१ पर्सनल पासपोर्ट
या पासपोर्टलाच ऑर्डीनरी पासपोर्ट असेही म्हणतात. सामान्य नागरिकांना सामान्य प्रवास करण्यासाठी हा पासपोर्ट दिला जातो. हा पासपोर्ट गडद निळ्या कव्हर चा असतो. सहलीसाठी कुणी जात असेल म्हणजेच काही लहान कारणास्तव जर कुणी जात असेल तर त्यासाठी पर्सनल पासपोर्ट वापरला जातो. यालाच ‘पी’ पासपोर्ट असेही म्हणतात याचाच अर्थ ‘पी’ म्हणजे पर्सनल असा आहे.
१.२ डिप्लोमॅटिक पासपोर्ट
हा पासपोर्ट दिसायला माय ऑन कव्हरचा असतो. भारतीय राजनैतिक सदस्य,केंद्रीय कॉन्सिल मंत्री,जारीक सदस्य त्याचप्रमाणे उच्च दर्जाचे सरकारी अधिकारी याना डिप्लोमॅटिक पासपोर्ट देण्यात येतो. या पासपोर्टलाच ‘डी’ पासपोर्ट असेही म्हणतात. यातला ‘डी’ म्हणजेच डिप्लोमॅटिक होय.
१.३ ऑफिसिअल पासपोर्ट
हा पांढऱ्या रंगाचा पासपोर्ट असतो अधिकृत व्यवसायावर भारत सरकारचे प्रतिनिधित्त्व करणाऱ्यास ऑफिसिअल पासपोर्ट दिला जातो. यालाच ‘एस’ पासपोर्ट असे म्हणतात म्हणजेच यातील S म्हणजेच सर्विस होय.
पासपोर्ट साठी दोन पद्धतीने आपण अर्ज करू शकतो
पासपोर्टचे प्रकार तर आपण पहिले आता पासपोर्ट साठी आपण कसे अप्लाय करू शकतो याची माहिती आपण घेणार आहोत
पासपोर्ट साठी दोन पद्धतीने आपण अर्ज करू शकतो –
- ऑफलाईन पद्धत
- ऑनलाईन पद्धत
२. पासपोर्ट काढण्याची ऑफलाईन पद्धत
२.१ ऑफलाईन पासपोर्ट सेवेसाठी लागणारी कागदपत्रे
ऑफलाईन पद्धतीने जर आपण पासपोर्ट काढणार असू तर आपल्याकडे मुख्य दस्तावैज असणे गरजेचे आहे. त्यामध्ये
रेसिडेन्शिअल प्रूफ, जन्मदाखला असणे गरजेचे आहे याचीच सविस्तर माहिती आपण पाहणार आहोत.
> ऍड्रेस प्रूफ
- पाणी बिल
- वीज बिल
- टेलिफोन बिल
- इन्कम टॅक्स ऑर्डर
- वोटर आयडी
- गॅस कनेक्शन असल्यास गॅस नोंदणी असलेले पुस्तक ज्याचे पहिले आणि शेवटचे पान
- आधार कार्ड
- घर भाडे करार पत्रक जर आपण भाडे तत्वावर राहत असू
- बँक अकॉउंट पासबुक
> डेट ऑफ बर्थ प्रूफ
यामध्ये आपण कुठलेही एक जन्माचा दाखला म्हणून दाखवू शकतो
- नगरपालिका किंवा हॉस्पिटलमधून मिळालेला जन्मनोंदणीचे प्रमाणपत्रक
- शाळा सोडल्याचा किंवा शाळा बदली केल्याचा दाखला
- आधार कार्ड / ई – आधार कार्ड
- पॅन कार्ड
- इलेक्शन फोटो आयडेंटिटी कार्ड
- ड्रायविंग लायसन
- अनाथ असल्यास अनाथालयाकडून मिळालेले जन्म दिनांक नमूद केलेले प्रमाणपत्र
वरील सामानाच्या यादीमधून फक्त पासपोर्टसाठी आवश्यक असणाऱ्या दस्तावैजांची कल्पना येते.
आता प्रत्यक्ष पासपोर्टसाठी ऑफलाईन पद्धत आपण पाहुयात –
२.२ पासपोर्ट ऑफलाईन काढण्याची थोडक्यात प्रक्रिया
सध्याचे युग हे डिजिटल युग म्हणून ओळखले जाते. म्हणजेच सर्व सुविधा आपण ऑनलाईन पद्धतीने मागवू शकतो. पासपोर्ट सुविधाही याला अपवाद नाही कारण बऱ्याचदा इंटरनेटच्या अभावामुळे पासपोर्टसाठी ऑनलाईन अर्ज करणं शक्य होत नाही. यासाठी आपण ऑफलाईन पद्धतीनेही अर्ज करू शकतो
१. पासपोर्ट सेवेच्या अधिकृत वेबसाईट वर जाऊन म्हणजेच http://www.passportindia.gov.in या वेबसाईट वर जावे मुखपृष्ठावर अर्ज करण्यापूर्वी ‘होम’ या टॅबवरून ‘न्यू रजिस्ट्रेशन’ या पर्यायावर जावे.

२. त्यानंतर ‘फॉर्म अँड ऍफिडेव्हिटस’ या पर्यायावर क्लिक करावे.


३. त्यानंतर ई-फॉर्म डाउनलोड करावा?


४. अर्ज (e-Form) प्रिंट करून परत काळजीपूर्वक मॅनुअली भरा
निवडलेली सर्व कागदपत्रे पडताळणीसाठी नजदिकच्या पासपोर्ट सेवा केंद्रामध्ये मॅनुअली सबमीट करावे.
२.३. पासपोर्टसाठी कुठे अर्ज करावा ?
आपण पासपोर्टसाठी जरी ऑनलाईन पद्धतीने अथवा ऑफलाईन पद्धतीने अर्ज करत असल्यास खालीलपैकी कोणत्याही केंद्रावर फॉर्म सबमिट करून पासपोर्टसाठी अर्ज करू शकता
- जिल्हा पासपोर्ट सेल (DPC)
- स्पीड पोस्ट सेंटर (SPC)
- नागरिक सेवा केंद्र (CSC)
वरील केंद्रांमध्ये पासपोर्ट फॉर्म हे स्वीकारले जाऊ शकतात. याठिकाणी फक्त आणि फक्त नवीनच पासपोर्ट स्वीकारले जातात. पासपोर्टचे नूतनीकरण,राजनयक अधिकृत पासपोर्ट या संबंधित सेवांचे पासपोर्ट स्वीकारले जात नाहीत. याठिकाणी फक्त पासपोर्टचा फॉर्म, कागदपत्रे त्याची पडताळणी आणि त्यासाठी लागणारे पासपोर्ट शुल्क एवढ्याच गोष्टी याठिकाणी ग्राह्य धरल्या जातात. या ठिकाणी बोटांचे ठसे किंवा कुठलाही बायोमेट्रिक गोळा केलं जात नाही. पुढील प्रक्रियेसाठी योग्य प्रादेशिक पासपोर्ट कार्यालयाकडे (RPO) कडे पाठवला जातो. त्याठिकाणीच पोलीस पडताळणी होते.
हेही वाचा
बँकेत खाते खोलण्याची सोपी प्रक्रिया
Bitcoin : जाणून घ्या बिटकॉईन म्हणजे काय? क्रिप्टोकरन्सी म्हणजे काय ? (bitcoin in marathi)
म्युच्युअल फंड म्हणजे काय? | म्युच्युअल फंड गुंतवणूक कशी करावी? | types of mutual funds
३. पासपोर्ट अर्ज करण्याच्या ऑनलाइन पद्धतीसाठी मार्गदर्शक (how to online passport apply)
याठिकाणी आपण घरबसल्या पासपोर्टसेवेसाठी अर्ज करू शकतो. त्यासाठी खालीलप्रमाणे पायऱ्या लक्षात घेऊन अर्ज करावा लागेल.
१. अधिकृत पासपोर्ट सेवा साईटला भेट द्या http://www.passportindia.gov.in
२. ‘न्यू युजर रजिस्ट्रेशन’ या पर्यायावर क्लिक करा.



३. तुम्हाला नवीन पेजवर नेले जाईल त्यानंतर सर्व आवश्यक माहिती त्याठिकाणी भरा
४. सर्व माहिती भरल्यानांतर ‘ रजिस्टर ‘ या पर्यायावर क्लिक करा
५. आपल्या कॉम्पुटर स्क्रीनवर नोंदणी यशस्वीरीत्या झाली असा संदेश येईल


३.१ पासपोर्ट सेवा साईटवर लॉगिन कसे कराल ?
१. पासपोर्ट सेवा साईट वर जाऊन मुखपृष्ठावरील म्हणजेच होम पेज वरील लॉगिन या पर्यायावर क्लिक करा.
२. लॉगिन पृष्ठावर तुमचा लॉगिन आय डी टाकावा
३. त्यांनतर पुढील पेजवर पर्यायांची यादी येईल त्यामध्ये ‘दस्तावैज सलाहकार’ ( Document Advisor) असे पर्याय येतील त्यापैकी हव्या असलेल्या पर्यायावर म्हणजेच आपण फ्रेश पासपोर्टसाठी करत असाल तर त्याठिकाणी क्लिक करा.




३.२ प्रत्यक्ष ऑनलाईन अर्ज कसा कराल? | how to online passport apply
१. पासपोर्ट सेवा साईटवर लॉगिन करा फ्रेश पासपोर्ट वर क्लिक करा.
२. RPO च्या निवड पृष्ठावर नेले जाईल ज्याठिकाणी आपल्याला राज्य किंवा जिल्हा निवडण्याची गरज आहे


३. पुढील पेजवर पासपोर्ट साठी अर्ज करणे, अर्जाचा प्रकार आणि पासपोर्ट पुस्तिकेचा प्रकार निवडावा नंतर पुढे या पर्यायावर क्लिक करावे
४. अर्जदाराने सर्व आवश्यक तपशील योग्यरीत्या भरावा


५. सर्व तपशील भरून झाल्यानंतर चेक बॉक्स वर क्लिक करावे आणि त्यानंतर पुढील या पर्यायावर म्हणजेच ‘नेक्स्ट’ या पर्यायावर क्लिक करावे.
६. पुढील पेजवर वडिलांचे नाव,आईचे नाव असे कुटुंब तपशील प्रविष्ट करा


७. त्यांनतर निवासी पत्ता टाकून पुढील पर्यायावर म्हणजेच ‘नेक्स्ट’ या पर्यायावर क्लिक करा.


८. त्यांनतर आपत्कालीन संपर्क क्रमांक अर्थात एमर्जन्सी नंबर टाकावा
९. पुढील पेजवर ओळख प्रमाणपत्र निवडावे


१०. त्यापुढे होय किंवा नाही स्वरूपातील प्रश्नांची उत्तरे द्यावीत त्यांनतर पुढील पर्यावर क्लिक करावे


११. त्यांनतर पासपोर्ट तपशील पडताळणी पृष्ठ येईल आपली योग्य ती माहिती पडताळून पुढील बटनावर म्हणजेच ‘नेक्स्ट’ या पर्यायावर क्लिक करावे


१२. सेल्फ डिक्लेरेशन मध्ये आपल्याला जन्माचा पुरावा आणि सध्याचा निवासी पत्ता टाकणे आवश्यक आहे


१३. पासपोर्ट सेवेकडून एसएमएस अपडेट्स मिळवण्यासाठी ‘होय’ या पर्यायावर क्लिक करा. नावनोंदणी शुल्क ५० रुपये याठिकाणी आकारला जातो. जर एसएमएस अलर्ट नको असल्यास ‘नाही’ या पर्यायावर क्लिक करू शकता आपले ठिकाण त्याठिकाणी टाका आणि नंतर फॉर्म सबमीट करा
१४. आपला अर्ज यशस्वीरीत्या सबमिट झाला आहे अथवा नाही जर सबमीट झाला असेल तर आपल्याला अर्जाचा संदर्भ क्रमांक मिळतो.
३.३. आपला पासपोर्ट अर्ज कधी नाकारला जाऊ शकतो ?
१. अर्जामध्ये दिलेल्या माहितीत काही चुका आढळल्यास.
२.आवश्यक कागदपत्र चुकीच्या पद्धतीने सादर केल्यास.
३. सबमीट केलेले दस्तावैज अस्पष्ट असल्यास.
४. पासपोर्ट अर्जाची फी भरली नसल्यास
५. पोलीस पडताळणी प्रक्रिया अपूर्ण असल्यास
६. आपल्या नावावरती एखादे गुन्हेगारी रेकॉर्ड असल्यास
७. कर्जात बुडाले असल्यास भरण्यास असमर्थ असल्यास
८. कॉल व्हेरिफिकेशन दरम्यान चुकीची माहिती समजल्यास
सर्वांना पासपोर्ट संदर्भातील ऑफलाईन आणि ऑनलाईन पद्धतीने अर्ज कसा करावा याबद्दल आपण माहिती पहिली. यानंतर आपण आधार कार्डसाठी कसा अर्ज करायचा हे आपण पाहणार आहोत.
===============