Ritbhatmarathi

Search
Close this search box.

आधार कार्ड बँक अकाउंटला कसं लिंक करावं ? | how to link bank account with aadhar

how to link bank account with aadhar: ज्याप्रमाणे पॅन कार्ड लिंक करण्याबाबत आपण माहिती घेतली त्याचप्रमाणे आधार कार्ड आपल्या बँक खात्याला लिंक करणे अनिवार्य झालेले आहे. सरकारी आदेशानुसार बऱ्याच नागरिकांनी आपले आधार कार्ड बँक अकाउंट ला लिंक केले आहे तरीही अजूनही काही नागरिकांचे आधार बँक खात्याला लिंक केले गेलेले नाही म्हणूनच या लेखामध्ये आज आधार बँक अकाउंटला लिंक कसे करावे या संदर्भात माहिती घेणार आहोत.

अनेक बँका आधार कार्ड बँक खात्याला लिंक करण्याची सुविधा देतात. सगळ्या बँकांचे वेगवेगळे आपले ठराविक क्रमांकही असतात खालील पायऱ्यांच्या आधारे आपण आधार कार्ड बँक खात्याला लिंक करू शकतो

> सर्वात आधी आपल्याला ज्या बँकेत अकाउंट लिंक करायचे आहे ती बँक फोन बँकिंगला परवानगी देते का हे तपासा.

> फोनद्वारे आधार लिंकींगची सुविधा देत असेल तर बँकेने दिलेल्या क्रमांकावर मिस कॉल द्या.

> त्यानंतर बँकेद्वारे आपल्याला कॉल बॅक मिळेल ज्यामध्ये आपण योग्य तो पर्याय निवडू शकतो

> पर्याय निवडल्यानंतर आपला बारा आकडी आधार क्रमांक टाकून त्याची पूर्तता करा

> आपले आधार कार्ड बँक खात्याला लिंक झाल्यानंतर एक एसएमएस येईल

> यानंतर आपले आधार बँक खात्याशी लिंक होऊन जाईल.

अशा पद्धतीने फोन बँकिंगच्या आधारे आपण आधार कार्ड आपल्या बँकेतील खात्याला लिंक करू शकतो.

खातेधारक एसएमएसद्वारे आधार लिंक करू शकतो परंतु ही सुविधा सर्वच बँका पुरवतात असे नाही  प्रत्येक बँकेतली पद्धत तिथले क्रमांक एसएमएस ची पद्धत असे वेगवेगळे असतात.

> एक साधा एसएमएस यूआयडी आधार क्रमांक आणि आपला खाते क्रमांक आपल्या एसएमएस वर लिहा बँकेच्या एसएमएस बँकिंग क्रमांकावर पाठवा

> आपली रिक्वेस्ट योग्य त्या ठिकाणी पोहचली आहे की नाही याचा एक एसएमएस आपल्याला मिळेल .

> प्रत्येक बँक UIDAI या ठिकाणी जाऊन माहितीची जुळवाजुळव करते

> जर त्यांची पडताळणी यशस्वी झाली तर आपल्या मोबाईलवर तसा एसएमएस येतो. जर पडताळणी अयशस्वी झाली तर त्याच बँकेच्या शाखेत जाऊन भेट देण्याची विनन्ती एसएमएस द्वारे आपल्याला देतात

खातेधारकाने आपले बँकिंग खाते बंद पडू नये यासाठी आपापले आधार त्वरित बँक खात्याला लिंक करून घ्यावे. बँक शाखेत जाऊन आपण हे सहज करू शकतो –

> बँक खाते आधार लिंक करण्यासाठी तसा एक फॉर्म भरावा लागेल

> आधार कार्ड लिंक करण्यासाठी लागणार फॉर्म हा बँकेच्या अधिकृत वेबसाईट वरही मिळू शकतो. जर वेबसाईटवर फॉर्म उपलब्ध नसेल तर बँकेच्या शाखेतही फॉर्म मिळू शकतात.

> आपल्या बँक खात्याचा तपशील आणि आपला आधार क्रमांक टाकावा

> फॉर्मसह आपल्या आधारकार्डची प्रत जमा करा

> काउंटरवर आपल्या आधारकार्डचा फॉर्म आपल्या फोटोकॉपीसह सबमीट करावा जिथे पडताळणीसाठी आपल्या आधार कार्डची मूळ प्रत दाखवावी लागेल

> त्यानंतर आपला फॉर्म स्वीकारला जाईल त्यानंतर आधार लिंक होण्यासाठी काही दिवस लागू शकतात

> एकदा आधार लिंक झाल्यानंतर आपल्या मोबाईलवर तसा एसएमएस येईल.

पॅन कार्ड आणि आधार कार्ड कसं लिंक करायचं ?

आधार कार्डला आपला मोबाईल नंबर कसा लिंक करावा? 

जन्मनोंदणीसाठी घरबसल्या ऑनलाईन अर्ज कसा करायचा?

मोबाईल अँप द्वारेही आपले आधार आपल्या बँक खात्याला अगदी सुरक्षितपणे लिंक करू शकतो. त्याची प्रक्रिया खालीलप्रमाणे –

> आपल्या बँकेच्या असणाऱ्या अँप मध्ये जाऊन एप्लिकेशन लॉगिन करा

> माय अकाउंट सेकशन च्या सर्विस टॅब वर जाऊन आधारकार्ड तपशील पहा त्यानंतर अपडेट या पर्यायावर क्लिक करा

> आपला आधार दोन वेळेस एंटर करून सबमिट या पर्यायावर क्लिक करावे

> त्यानंतर आपले बँक खाते आधार कार्डबरोबर सुरक्षितपणे लिंक झाल्याचा एक एसएमएस आपल्याला मिळेल

 > खातेदार आपल्या बँकेच्या असणाऱ्या एटीएम मध्ये जाऊन आपल्या बँक खात्याला आधारशी लिंक करू शकतो

> एटीएमद्वारे आधार लिंक करण्याची सुविधा हि फक्त डेबिट कार्डवर उपलब्ध असते

> एटीएम मशीन मध्ये आपले डेबिट कार्ड इन्सर्ट करून आपला एटीएम पिन टाकावा

> पुढे नोंदणी या पर्यावर आपल्या बोटाने स्पर्श करावा

> आपला बारा आकडी आधार क्रमांक टाकून बरोबर या चिन्हावर स्पर्श करावा

> यानंतर परत आपला बारा आकडी आधार क्रमांक एंटर करून बरोबर असल्यास दाबावा

> आपला खाते प्रकार निवडून त्याच स्क्रिनवर यशस्वी झाल्याचा संदेश  प्राप्त होईल

– सरकारकडून मिळालेले अनुदान जसे कि पेन्शन,शिष्यवृत्ती,कल्याण निधी इत्यादी थेट आपल्या बँक खात्यामध्ये जमा होण्यासाठी मदत होईल

– आधार एक वैध म्हणजेच कायदेशीररित्या KYC म्हणजेच नो युअर कस्टमर म्हणून काम करेल जे बँक खाती उघडण्यासाठी उपयुक्त आहे

– बेकायदेशीर व्यवहारांना आळा घालण्याचे काम करेल

असंख्य नागरिकांचे बँक खाते आपल्या आधार कार्डला लिंक करून झालेले असेलही पण आपल्या बँक खात्याचे स्टेटस तपासण्यासाठी खाली दिल्याप्रमाणे पडताळून पाहावे –

– UIDAI च्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन म्हणजेच अधिकृत पोर्टलला भेट द्या

– ‘ चेक आधार बँक लिंकिंग स्टेटस ‘ या पर्यावर क्लिक करा

– ऑप्शन वर क्लिक केल्यानंतर एक नवीन वेब पेज ओपन होईल ज्यामध्ये आपल्याला आपला बारा आकडी असलेला युनिक UID क्रमांक आणि त्यानंतर प्रायव्हर्सी कोड टाका असे सांगण्यात येईल

– त्यानंतर सेंड ओटीपी हा पर्याय निवडा

– आधार मध्ये आपला नोंदणीकृत असलेला मोबाईल नंबर जो आहे त्या नंबरवर एक ओटीपी पाठवला जाईल

– आपल्या ओटीपी सह लॉगिन करा त्यानांतर आपल्याला एक नवीन पेज ओपन झालेले दिसेल त्या ठिकाणी आपले आधार मॅपिंग पूर्ण झाल्याचे स्टेटस आपल्याला दिसेल.

=============

marathi goshta

marathi story

marathi moral stories

marathi love story

             

Share your love
Facebook
Twitter

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *