Skip to content Skip to sidebar Skip to footer

चेहऱ्यावर काळे पडल्याने सौंदर्य कमी झाले आहे ?? निराश होऊ नका, हे घरगुती उपाय करा आणि काळ्या डागांपासून लवकरच मुक्त व्हा

how to get rid of hyperpigmentation: सुंदर आणि निरोगी चेहरा हे प्रत्येकाचे स्वप्न असते. चेहरा सुंदर असेल तर स्त्रियांच्या सौंदर्यात भरच पडते. त्यामुळे सुंदर चेहरा ही स्त्रीची ओळख असते. यासाठीच विविध सौंदर्यप्रसाधनांचा वापर करून आपले सौंदर्य अबाधित ठेवण्याचा प्रयत्न स्त्रिया नेहमीच करत असतात.

पण कधी कधी काही कारणाने चेहऱ्यावर काळे डाग पडतात आणि चेहरा निस्तेज दिसायला लागतो. त्यामुळे सौंदर्याला डाग लागतो. या कळ्या डागांनाच वांग असे म्हणतात. हे वांग चेहऱ्यावरील सौंदर्य तर हिरावून घेतातच शिवाय स्त्रियांचा आत्मविश्वास हरवून जातो ते वेगळेच. या डागाळलेल्या चेहऱ्याची लाज वाटते आणि मग हे डाग खूप मोठी समस्या बनून जातात.

पण इतकं वाईट वाटून घेण्याची किंवा लाज वाटून घेण्याची गरज नाही. वांग ही खरतर अत्यंत साधी गोष्ट आहे. यावर डॉक्टरांच्या सल्ल्याने सहज उपचार तर करता येतातच शिवाय अनेक घरगुती उपाय ही करून ही समस्या सोडवली जाऊ शकते.

त्यासाठी बघुया वांग म्हणजे नक्की काय आणि त्यावरील उपाय.

चेहऱ्यावरील त्वचेच्या काही भागावरील रंग इतर चेहऱ्याच्या तुलनेत गडद म्हणजेच काळसर दिसू लागतो. चेहऱ्यावर काळे डाग किंवा चट्टे दिसून येतात. हे डाग चेहऱ्यावर आणि मानेवर दिसून येतात. चेहऱ्यावर दोन्ही बाजूला तपकीर किंवा काळपट रंगाचे स्पॉट दिसून येतात त्यालाच वांग असे म्हटले जाते.

चेहऱ्यावर वांग येण्याची अनेक कारणे आहेत. त्यातील सगळ्यात महत्वाचे कारण म्हणजे सूर्याची प्रखर किरणे. या सोबतच विविध औषधांचा सतत होणारा वापर, ॲलर्जी, चेहऱ्यावरील केसांपासून सुटका मिळवण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या क्रीम, सौंदर्य प्रसाधनांचा अती वापर, मेलनिन जास्त प्रमाणात तयार होणे आणि हार्मोन्समध्ये झालेलं असंतुलन. तसेच आपले व्यस्त जीवन, त्यामुळे त्वचेची योग्य ती काळजी न घेणे, प्रदूषण यामुळे ही त्वचेवर वांग येतात.

आपल्या त्वचेचा रंग मेलेनोसाइट्स नावाच्या पेशींमुळे तयार होतो. मेलेनिन मेलेनोसाइट्समुळे तयार होते, जे त्वचेला वेगळा रंग देते. जेव्हा मेलेनोसाइट्स खराब होतात, अस्वस्थ होतात, तेव्हा जास्त प्रमाणात मेलेनिन बाहेर पडू लागते आणि त्वचा काळी पडू लागते.

हा पॅक तयार करण्यासाठी साधारण ५० ग्रॅम मासुर डाळ रात्रभर भिजत ठेवा. दुसऱ्या दिवशी मिक्सरमधून बारीक पेस्ट तयार करून घ्या. पूर्ण चेहऱ्यावर पॅक लावून वीस मिनिटे ठेवा नंतर थंड पाण्याने धुवून टाका. यामुळे वांगाचे काळे डाग निघून जातील आणि चेहरा चमकू लागेल.

केळी हे स्वस्तात मस्त असे सर्व वर्गातील लोकांना परवडेल असे फळ आहे. केळी खाण्याचे अनेक फायदे आपल्याला बघायला मिळतात. वजन वाढवण्यासाठी तर याचा खूप उपयोग होतो. त्यामुळेच वांग घालवण्यासाठी ही याचा वापर केला जातो. यासाठी केळ कुस्करून घ्या. त्यात दूध आणि मध घाला. ते चांगले मिक्स करा. हे मिश्रण वांग असलेल्या भागावर लावा. किमान 30 मिनिटं तसंच राहू द्या. त्यानंतर चेहरा कोमट पाण्याने धुवून टाका.

चंदनापासून बनवलेली पेस्ट तुमची त्वचा थंड करते तसच चेहऱ्यावर चमक आणते आणि वांग दूर करते. यासाठी 2 टेबलस्पून चंदन पावडरमध्ये पुरेसं गुलाबपाणी मिसळा आणि ते संपूर्ण चेहऱ्यावर लावा. सुकल्यावर धुवा. काही दिवसांसाठी दररोज वापरा. हळू हळू डाग निघून जातील आणि चेहरा पूर्ववत होईल.

यामध्ये एसिटिक असिड असते. ज्यामुळे चेहऱ्यावरील रंगद्रव्य कमी होऊ शकते. यासाठी व्हिनेगर आणि पाणी सारख्याच प्रमाणात घ्या. मिश्रण तयार करा आणि वांग आहेत तिथेच लावा. दोन ते तीन मिनिट तसेच ठेवून पुन्हा कोमट पाण्याने चेहरा धुवून टाका.

डेड स्किन घालवण्यासाठी हे घरगुती उपाय नक्की करून पहा

चेहरा उजळण्यासाठी हे घरगुती उपाय नक्की करून पहा

2-3 बदाम घ्या आणि ते रात्रभर दुधात भिजवा. सकाळी त्याची साल काढा आणि बारीक करा. या पेस्टमध्ये थोडी साय मिसळा आणि संपूर्ण चेहऱ्यावर लावा. सुकल्यावर धुवा. काही आठवड्यांसाठी दररोज वापरा. ह्यामुळे वांग कमी होऊ शकतात आणि चेहऱ्यावर चमकही येईल.

असं म्हणतात की बटाटा फ्रिकल्स आणि डार्क स्पॉट्स सारख्या त्रासावर खूप प्रभावीपणे कार्य करतो. कारण त्यात कॅटेकोलेज एंजाइम असतात, जे मेलानोसाइट्सचे नियमन करतात. काही आठवड्यांसाठी दिवसातून दोनदा बटाट्याचे तुकडे घ्या आणि ते डागांवर घासून लावा. 10 मिनिटे असेच राहू द्या आणि नंतर चेहरा धुवा.

कोरफड म्हणजेच ॲलोवेरा जेल वांग येण्यावर हा उत्तम उपाय आहे. चेहरा स्वच्छ धुवून रात्रभर त्यावर ॲलोवेरा जेल लावून झोपा. बराच वेळ जाईल पण कोरफडीचा हा उपाय नियमित कराल फायदा देऊन जाईल.

मध सकाळी रोज एक चमचा औषध म्हणून घ्यायला हवे. मध खाणे आरोग्यासाठी अतिशय उत्तम असते. कोरफड ही अलोवेरा प्रमाणे उत्तम काम करते. याचा उपयोग वांग घालवण्यासाठी करताना एका वाटीत मध आणि कोरफड घेऊन मिक्स करा. हे मिश्रण 10 मिनिटं तसंच ठेवा. त्यानंतर ते चेहऱ्यावर लावा आणि 20 मिनिटे तसेच राहू द्या. त्यानतंर कोमट पाण्याने चेहरा धुवून घ्या. हा उपाय आठवड्यातून दोन वेळा करा. हा उपाय वांगासाठी प्रभावी उपचार आहे.

दही आरोग्यासाठी अतिशय उत्तम मानले जाते. तसेच ते त्वचेसाठीही उत्तम ठरते. आहारात ही दह्याचा वापर केल्याने त्वचा विकार दूर होतील आणि चेहऱ्यावर चमक येईल. वांग जाण्यासाठी एका वाटीमध्ये दही घ्या आणि ते त्वचेवरील वांग असलेल्या जागी लावा. 20 मिनिटे चेहऱ्यावर तसेच राहू द्या. सुकल्यानंतर चेहरा कोमट पाण्याने धुवा.

लिंबाच्या रसामध्ये नैसर्गिक ब्लीचिंग गुणधर्म असतात आणि मध मॉइश्चरायझर म्हणून काम करते. हे गुणधर्म वांगावर उपचार करू शकतात. लिंबामध्ये व्हिटॅमिन-सी असल्याने त्यात अँटीऑक्सिडंट गुणधर्म असतात, जे त्वचेला सूर्याच्या हानिकारक किरणांच्या प्रभावापासून वाचवतात. यासाठी अर्ध्या लिंबाचा रस घ्या आणि अर्धा चमचा हळद आणि अर्धा चमचा मध मिसळा. वांग असलेल्या भागावर लावा. सुकल्यावर धुवा. तुम्ही मधाऐवजी बेसन पीठ ही वापरू शकता.

तर असे हे घरगुती आणि नैसर्गिक उपाय करून तुम्ही वांग ही समस्या दूर करू शकता. तरीही तुम्हाला काही त्वचेशी संबंधित आजार असतील तर हे उपाय करण्याआधी जरूर डॉक्टरांचा सल्ला घ्या.

=========================

प्रिय वाचकहो, उत्तम बोधकथा/moral stories in marathi, प्रेम कथा, रहस्य कथा, कथामालिका, भारतातील संस्कृतीचे विविध पैलू, पर्यटन, खाद्यसंस्कृती, फॅशन, पॅरेंटिंग, लाईफस्टाईल ब्लॉग्स वाचायचे असतील तर रीतभातमराठीला नक्की भेट द्या.

1 Comment

 • Leslee
  Posted Sep 23, 2022 at 8:55 am

  Sports betting. Bonus to the first deposit up to 500
  euros.
  online casino

  Reply

Leave a Comment

error:

Warning

सध्या युट्युब वर कथा चोरी करून वाचून दाखवण्याचे धंदे चालू आहेत लोकांचे. आमच्या वेबसाईट वरची कथा कुठल्याही युट्युब चॅनेलवर बेकायदेशीररित्या आढळल्यास त्या चॅनेलला लगेच रिपोर्ट करण्यात येईल ह्याची कृपया दक्षता घ्यावी. तसेच आपल्या वाचकांपैकी कुणालाही असे बेकायदेशीर चॅनेल्स आढळल्यास आम्हाला ritbhatmarathi@gmail.com ह्या ई-मेल वर त्वरित कळवावे.