केसांतील कोंडा कायमचा घालवण्यासाठी हे प्रभावी उपाय नक्की करून पहा.

how to get rid of dandruff fast at home: आपले केस दाट, लांब, काळेभोर आणि चमकदार असावेत असे प्रत्येकच स्त्रीला वाटत असते. वाटायलाच हवे कारण स्त्रीचं सौंदर्य हे तिच्या केसातच असते असे म्हणतात ना. त्यामुळे स्त्रिया आपल्या केसांकडे जास्तच लक्ष देताना दिसून येतात. पण अलीकडे वाढते प्रदूषण, धकाधकीचे जीवन,चुकीच्या शाम्पूचा वापर, अतिरिक्त ताण अशा समस्यांमुळे बहुतांशी स्त्रिया केसांशी संबंधित प्रॉब्लेमशी लढताना दिसून येतात. केस पांढरे होणे, केस गळती, पातळ केस, केसातील वाढता कोरडेपणा या समस्यांचा त्यात समावेश होतो. यातीलच सगळ्यात महत्त्वाची आणि खूप जास्त त्रासदायक समस्या म्हणजे केसातील वाढता कोंडा.
कोंडा या तक्रारीमुळे केसात खाज होते तसेच डार्क रंगाच्या कपड्यांवर येणारा पांढरा कोंडा हा अक्षरशः चार चौघात लाज आणतो. त्यामुळे स्त्रिया केसांची योग्य ती स्टाईल करू शकत नाहीत किंवा मग हवे तसे मोकळे सोडू शकत नाहीत. त्यामुळे मग चिडचिड आणि एक प्रकारचा न्यूनगंड किंवा मग आत्मविश्वास गमावणे इथपर्यंत समस्या बळावते. तर मग अशा वेळी काय करायचे असा प्रश्न पडतो.
यासाठी सगळ्यात आधी कोंडा म्हणजे नेमके काय ?? हे जाणून घ्यायला हवे. मी मगाशी म्हटल्याप्रमाणे धूळ, प्रदूषण आणि तीव्र तापमान ह्यासारख्या हवामानातील बदलांमुळे आपल्या टाळू वरील नैसर्गिक ढाल नष्ट होत चालली आहे. म्हणून आपले केस अनेक त्रासांमधून जात आहेत. परिणामी, आपली टाळू कोट्यावधी बॅक्टेरिया आणि बुरशीला उघडी पडलेली दिसून येते. नंतर हे बॅक्टेरिया आणि बुरशी आपल्या टाळूवर हल्ला करतात. बॅक्टेरियामुळे आपल्या टाळूचा वरचा रक्षण करणारा थर नष्ट होतो आणि डोक्यात कोंडा (Drandruff) तयार होतो जो नंतर दाट पांढरा थर म्हणून टाळूवर बसलेला दिसतो. कोंडा हा केसांची नीट निगा, स्वच्छता न ठेवल्यास आणि त्वचारोगाच्या समस्यांमुळे देखील होऊ शकतो.
पण मी जर सांगितले की, स्वयंपाक घरात उपलब्ध असलेल्या वस्तू अगदी सोप्या पद्धतीने आपली काँड्याची समस्या सोडावतील तर ????
कसे हा प्रश्न पडला असेल ना ?? तर बघुया कोंडा कायमस्वरुपी घालवण्याचे काही घरगुती पण खात्रीशीर उपाय.
१. तुळस :
सगळ्यांच्या अंगणात हमखास उपलब्ध असलेली ही औषधी वनस्पती आहे. तुळस ही अनेक आजारांवर रामबाण उपाय मानली जाते. रोज सकाळी उपाशी पोटी तुळशीची पाने खावीत असे म्हणतात. हीच तुळस कोंड्यासाठी फायदेशीर ठरते. त्यासाठी तुळस आणि आवळा पावडर एकत्र करून अर्धा तास डोक्याच्या त्वचेवर लावा. यानंतर हर्बल शैम्पूने धुवा.त्यामुळे केसातील कोंडा कमी होईल.
२. कडुनिंबची पाने :
कडुनिंबचा पाला किंवा पाने बऱ्याच आजारांवर उपाय करतात. कोंडा घालवण्यासाठी डोक्याच्या त्वचेला पाणी न लावता कडुलिंबाची पाने चोळा आणि थोड्या वेळाने डोके धुवा. त्याने त्वचेवरील फंगस निघून जाऊन डोके स्वच्छ राहील.
३. नियमित स्वछता :
स्वच्छता ही शरीरासाठी खूप महत्त्वाची असतेच. हे सगळ्यांनाच माहीत आहे. त्यामुळेच नियमित केस धुणे आणि त्यांची निगा राखणे गरजेचे असते. जर डोक्याच्या त्वचेची नियमित साफसफाई होत नसेल तर डोक्यात कोंडा बनतो. केस स्वच्छ न घुतल्यास घाम ग्रंथी मोकळ्या होत नाहीत. त्यामुळे कोंडा होतो. म्हणून केसातील कोंडा काढून टाकण्यासाठी केस साफ करणे फार महत्वाचे आहे. रोज नियमितपने केसांना खोबरेल तेलाने मालिश करा म्हणजे सगळे पोषण केसांना व्यवस्थित मिळेल आणि नंतर हर्बल शैम्पूने किंवा घरगुती शिकेकाई वापरून दर तिसर्या दिवशी केस धुवावेत.
४. लिंबू रस :
लिंबू हे व्हिटॅमिन सी, ए, बी, फॉस्फरस आणि अँटी-ऑक्सीडेंटचा स्रोत आहे. लिंबू आपले केस दाट आणि चमकदार बनवू शकते . केसांत कोंडा झाला असेल तर कोमट तेलात लिंबाचा रस मिसळा आणि केसांना मालिश करा. यामुळे केस गळणे आणि केस तुटणे थांबेल. याशिवाय तुम्ही लिंबाचा रस पाण्यात मिसळून केस धुवू शकता किंवा लिंबू हळूवारपणे केसांना घासू शकता.
हेही वाचा
डेड स्किन घालवण्यासाठी हे घरगुती उपाय नक्की करून पहा
उत्तम आरोग्य हवं असल्यास आजच तुमच्या स्वयंपाकघरातील हि भांडी वापरायची बंद करा
मासिक पाळीमध्ये वेदना कमी करण्याचे नैसर्गिक उपाय
५. आवळा :
आवळा खायला आंबट, तुरट असले तरीही आवळा म्हटले की तोंडाला पाणी सुटल्या शिवाय रहात नाही. छोटे आणि मोठे अशा दोन प्रकारचे आवळे उपलब्ध असतात. केसांसाठी आवळा तेल उपलब्ध आहे हे सगळ्यांना माहीत आहे.
आवळ्यात असलेलं कॅरोटीन आपले केस निरोगी ठेवते. तुळस आणि आवळ्याची पेस्ट बनवून आपण केसांना मसाज करू शकता. मसाजनंतर अर्ध्या तासानंतर केस धुवा. यामुळे डोक्यातील कोंड्याची समस्या सुटेल.
६. तेल मसाज :
केसातील कोंडा जाण्यासाठी तेल मालिश हा प्रचावी उपाय ठरतो. आजकाल बऱ्याच मुली आणि स्त्रिया पण केस चीपचीपित दिसतात म्हणून तेल लावणे टाळतात. पण तेल लावल्यानेच केसांना योग्य पोषण मिळते शिवाय डोके शांत रहाते.
कोमट तेलाने केलेली मालीश डोक्याच्या स्नायूंना उत्तेजित करते आणि रक्ता भिसरण वाढते. ज्याद्वारे केस निरोगी, दाट, लांब आणि कोंड्यापासून मुक्त होतात. म्हणून आठवड्यातून एकदा तेलाने मालिश करावी. एक चमचा लिंबाचा रस 5 चमचे नारळाच्या तेलात घालून केसांना हळूवार बोटांनी मालीश करा कोंडा काही दिवसांत निघून जाईल.
७. डाळीचे पीठ :
डाळीचे पीठ हे त्वचा विकारांवर तसेच केसांच्या आरोग्यासाठीही गुणकारी आहे. केसातील कोंडा जाण्यासाठी दही आणि हरभरा डाळीचे पीठ मिक्स करावे आणि हलक्या हातांनी डोक्याच्या त्वचेवर मालिश करावे. असे केल्याने केसातला कोंडा कमी होतो.
८. कोरफड :
कोरफड म्हणजेच अलोवरा जेल. हे सगळ्याच अडचणींवर प्रभावी औषध आहे. केसांना एलोवेरा जेल किंवा कोरफड गराने मालिश केल्याने केसांच्या समस्या दूर होतात शिवाय केस चमकदार होतात.
९. दही :
दह्यातील असिड केसांशी निगडित समस्या दूर करते. त्यामुळे आहारात नेहमीच थोडे दही नियमित घेतले पाहिजे. कोंडा घालवण्यासाठी एक चमचा दही केसांना लावा आणि एक तास ठेवा आणि मग डोके धुवा.
१०. मेथी दाणे :
मेथीमध्ये निकोटीनिक ॲसिड आणि प्रथिने भरपूर असतात, यामुळे आपल्या केसांच्या मुळांना पोषण मिळते. कोंडा घालवण्यासाठी रात्रभर 2 चमचे मेथीचे दाणे पाण्यात भिजवा. त्यांना सकाळी बारीक करून पेस्ट बनवा. ते केसांत लावा आणि 30 मिनिटे ठेवा. नंतर केस धुवा. केसांतला कोंडा घालवण्यासाठी हा घरगुती उपाय खूप प्रभावी आहे. या उपायाने आपले केस मजबूत बनतील आणि गळणार नाहीत.
११. लसूण :
लसूणातही जंतूसंसर्ग बरा करण्याची क्षमता असते. लसणामुळे तुमच्या स्कॅल्पवरचा फंगस नष्ट होतो. म्हणून केस धुण्याआधी लसूण पेस्ट आणि मध यांचं मिश्रण केसांना लावा. कोंड्यापासून नक्कीच आराम मिळेल आणि केस चमकदार होतील.
१२. खाण्याचा सोडा :
खाण्याचा सोडा त्वचाविकार तसेच पिंपल्स यावरही काम करतो. कोंडा घालवण्यासाठी
केस ओल करून त्यावर खायचा सोडा चोळा. तुमच्या डोक्याच्या त्वचेवर हा सोडा लागू द्या. त्यानंतर शँपू लावू नका. बेकिंग सोड्यामुळे फंगस कमी होते आणि कोंडाही तयार होत नाही.
१३. ऍपल व्हिनेगर :
अॅपल व्हिनेगर कोंड्यावर फारच गुणचारी आहे. या व्हिनेगारमधल्या आम्लामुळे तुमच्या स्कॅल्पचा पीएच बॅलन्स सांभाळला जातो. यामुळे कोंड्याची वाढ होत नाही. नियमित वापरामुळे कोंडा कायमचा दूर होतो.
तर हे उपाय नक्कीच कोंड्याची समस्या कायमस्वरुपी कमी करतील. त्यामुळे नक्की ट्राय करा.
===============
प्रिय वाचकहो, उत्तम बोधकथा/moral stories in marathi, प्रेम कथा, रहस्य कथा, कथामालिका, भारतातील संस्कृतीचे विविध पैलू, पर्यटन, खाद्यसंस्कृती, फॅशन, पॅरेंटिंग, लाईफस्टाईल ब्लॉग्स वाचायचे असतील तर रीतभातमराठीला नक्की भेट द्या.
2 Comments
Melody
Hey there! This post couldn’t be written any better!
Reading this post reminds me of my previous room mate!
He always kept chatting about this. I will forward this write-up to
him. Pretty sure he will have a good read. Many thanks for sharing!
Sherrill
Thank you for any other informative website. The place else could I get that kind of
information written in such a perfect means?
I have a mission that I’m just now running on, and I have been at the look out for such
info.