Skip to content Skip to sidebar Skip to footer

How to eat properly etiquette in Marathi| जेवण करतानाची पद्धत…

एखादी व्यक्ती किंवा तीच कुटुंब किती सुशिक्षित आणि सौजन्यशील आहे हे त्या व्यक्तीच्या दिसण्यावरून नाही तर एकत्र जेवण करताना समजते म्हणूनच आजही खेड्यापाड्यात मुलगी पाहण्याचा कार्यक्रम असला कि मुलाकडच्या पाहुण्यांना रीतसर जेवण करूनच पाठवतात…याउलट मुलगी किंवा मुलीच्या घरचे जरी मुलाचं घर आणि मुलगा पाहण्यास गेले तरीही जेवण करून पाठवण्याची आजही पद्धत आहे…यावरून व्यक्ती आणि त्या व्यक्तीच कुटुंब याची बारकाईने पारख होते…म्हणजेच एखाद्या प्रसंगी म्हणजे प्रसंग कुठलाही असोत लग्न प्रसंग असो किंवा कुणाचा वाढदिवस असोत…चांगले कपडे घातलेली व्यक्ती जर का अधाशाप्रमाणे जेवत असेल तर ती व्यक्ती नक्कीच असभ्य दिसते…खूप दिवसांची उपासमार झाल्याप्रमाणे ती व्यक्ती जेवणावर तुटून पडते, घाईगडबडीत त्या व्यक्तीच्या अंगावर अन्नाचे डाग पडतात…ते इतर लोकांत नक्कीच असभ्य दिसतं.

ज्याप्रमाणे आपण इतर चांगल्या गोष्टी आत्मसात करतो त्याचप्रमाणे व्यवस्थित आणि शिस्तबद्ध पद्धतीने आहार घेणं हिसुद्द्धा एक कलाच आहे म्हणूनच पद्धतशीर खाण्यातच खरा शिष्टचार आहे….जर स्वतःलाच कसं खावं हे कळत नसेल तर मुलांना वळण लावणं शक्य नाही…खूप पैसे व चांगले कपडे ह्या गोष्टी सभ्यतेचा प्रदर्शन करत नाहीत तर त्यासाठी एक विशिष्ट्य प्रकारची सौजन्याची शैली जोपासावी लागते…आता आपण या सगळ्या शिस्ती अगदी मुद्देसूदपणे मांडूयात…

हाताने जेवताना कसे जेवावे आजही आपल्या भारतात कित्येक कुटुंबात हाताने जेवायची पद्धत आहे किंबहुना तशी सवय आहे असं म्हणायला हरकत नाही कारण हाताने जेवण करणं हे काही असभ्य समजलं जात नाही याचेही एक शास्त्रशुद्ध कारण आहे…हाताने जेवताना आपल्या बोटांची ऊर्जा त्या अन्नाला किंवा त्या घासाला स्पर्शून जाते ‘ याने अन्नाची गोडी द्विगुणित होते आणि मनमोकळेपणाने जेवणाचा आस्वाद घेता येतो…पण हाताने जेवताना फक्त बोटांचा स्पर्श अन्नाला किंवा घासाला झाला पाहिजे…जर हाताच्या तळव्याचा वापर झाला तर आपण इतरांच्या चेष्टेचा विषय बनू शकतो. आता आपण हाताने जेवण करतोय तर आपली हात आणि नखे स्वछ असली पाहिजे…काटे किंवा चमचे वापरण्याची सवय नसेल तर त्या फंदात पडू नये…सवय नसताना जर आपण काटे किंवा चमच्याने खायला गेलो तर चारचौघात फजिती झाल्याशिवाय राहणार नाही.

पातळ पदार्थ सेवन करताना  पातळ पदार्थ पहिल्यांदा चमच्याने थोडासा चाखून पहा…कारण तो पदार्थ जर गरम असेल तर त्याने तोंड किंवा जीभ पोळण्याची शक्यता असते अशाने तो पदार्थ सहज गिळणे किंवा थुंकणे शक्य होत नाही म्हणून अतिशय काळजीपूर्वक पातळ पदार्थांचं सेवन करावं.

खाण्याचा वेग – जेवण करताना खाण्याचा वेग इतरांशी मिळता-जुळता ठेवावा कारण बऱ्याच जणांचा जेवणाचा वेग खूप सावकाश असतो त्यामुळे इतरांची जेवण उरकली तरी आपलं जेवण उरकत नाही म्हणून सावकाश जेवणार अर्धपोटी राहतो म्हणून सुरुवातीपासूनच जेवणाचा वेग इतरांशी मिळता-जुळता ठेवावा.

कसं व किती खावं आपल्या ताटात आवश्यकतेनुसार पदार्थ वाढून घ्या सुरुवातीलाच सगळे पदार्थ ताटात घेऊ नका जेणेकरून तुमच्यासोबत असलेल्या मित्र मंडळींना तुम्ही हावरट आहात असा संशय येईल…जेवताना तोंडात घास असताना बोलू नका कारण तोंडात घास असताना बोलले कि समोरच्या व्यक्तीच्या अंगावर ते कण पडण्याची शक्यता असते.

किती खावं – खाताना तुमच्यासमोर ठेवलेले सर्व पदार्थ फक्त तुमच्यासाठीच आहेत असं गृहीत धरू नका…पाहुण्यांनी सर्व पदार्थ तुमच्यासाठी बनवलेले असले तरी ते सर्व पदार्थ खाण्याची सक्ती मात्र तुमच्यावर नसते  तुम्हाला जे पदार्थ आवडतील  तेच खा…जेवताना चवीबरोबरच आपल्या आरोग्याचाही विचार करावा म्हणजे उदाहरण द्यायचे झाल्यास पाणीपुरी खाण्यासाठी ठेवलीय आपला जर घसा दुखत असेल तर ती पाणीपुरी न खाललेलीच चांगलं नाही का…! काही ठिकाणी पाहुण्यांसमोर भरपूर फळ ठेवली जातात अशा वेळेला ते फळ खाण्याची इच्छा असेल तरच खा…आता नको मग घरी जाऊन खावूयात असा विचार करून मुलांच्या खिशात बळेच फळं कोंबून घरी घेऊन जाऊ नका ते असभ्यतेच लक्षण आहे…ताटात उष्ट आणि खरकटं राहील नाही पाहिजे याची खबरदारी जरूर घ्यावी.

केवळ छान कपडे दागिने घातल्याने सभ्यता आणि सुशिक्षितपणा दिसून येतो हा समज चुकीचा आहे…चार चौघात शिस्तीने आणि सौजन्याने कसं वागावं हे ज्यांना समजत त्यांची प्रतिष्ठा समाजात नक्कीच वाढते…जेवणाचं ताट वाढणं ही एक कला असून त्या वाढलेल्या ताटाचा पद्धतशीरपणे आस्वाद घेणं हा एक प्रकारचा सद्गुणच आहे…आपली भूमिका कुठलीही असोत कला आणि सद्गुण आत्मसात केलेच पाहिजे.

Leave a Comment

error:

Warning

सध्या युट्युब वर कथा चोरी करून वाचून दाखवण्याचे धंदे चालू आहेत लोकांचे. आमच्या वेबसाईट वरची कथा कुठल्याही युट्युब चॅनेलवर बेकायदेशीररित्या आढळल्यास त्या चॅनेलला लगेच रिपोर्ट करण्यात येईल ह्याची कृपया दक्षता घ्यावी. तसेच आपल्या वाचकांपैकी कुणालाही असे बेकायदेशीर चॅनेल्स आढळल्यास आम्हाला ritbhatmarathi@gmail.com ह्या ई-मेल वर त्वरित कळवावे.