Skip to content Skip to sidebar Skip to footer

डेड स्किन घालवण्यासाठी हे घरगुती उपाय नक्की करून पहा

homemade scrub for glowing skin: आज तू खूपच सुंदर दिसतेस / दिसतोस. असे कोणी आपल्याला म्हटले तर …. छानच वाटते ना. मग ही पावती कोणालाही, कुठल्याही वयाला, कधीही कुठेही मिळाली तरी आपण लाजून लाल झाल्यावाचून राहणार नाही. हो ना ?? कारण सौंदर्य ही सर्वानाच हवीहवीशी वाटणारी गोष्ट. सुरुवातीला याचा संबंध फक्त महीलांपुरता मर्यादित होता. पण आता तसे राहिले नसून पुरुषवर्ग, बच्चे कंपनी तसेच वयस्कर वर्ग सुद्धा यात दाखल झाला आहे. कारण सौंदर्य ही गोष्टच तशी आहे. कधीही, कोणालाही, कोणत्याही वयात सुंदरच असावे असे वाटते आणि त्यात चुकीचे असे काहीच नाही.

त्यासाठी सौंदर्य म्हणजे नक्की काय हे समजून घ्यायला हवे. बऱ्याच जणांचा असा गैरसमज असतो की सुंदर दिसायचे म्हणजे महागड्या ब्युटी पार्लरमध्ये जाऊन खूप पैसा खर्च करायचा. म्हणून बरेच लोक इच्छा असूनही या भानगडीत पडत नाहीत. पण तसे अजिबात नाही. सुंदर दिसणे म्हणजे रंग गोरा असणे किंवा खूप महागडी सौंदर्यप्रसाधने वापरून मेकअप करणे असा नाही. तर चेहरा किंवा त्वचा स्वच्छ आणि निरोगी ठेवणे म्हणजे सुंदर असणे.

आपल्या त्वचेवर म्हणजेच चेहऱ्यावर छोटी छोटी छिद्रे असतात ज्यातून प्रदूषणामुळे होणारी धूळ, माती त्वचेवर एक जाडसर थर निर्माण करतात. त्यालाच इंग्रजीत एक्सफोलिएट होणे असे म्हणतात. त्यामुळेच तोंडावर पिंपल्स, पुरुळ येणे, काळे डाग पडणे, त्वचा काळवंडने असे प्रॉब्लेम्स उद्भवतात. हा थर घालवल्यानतर त्वचा निरोगी रहाते आणि त्यासाठी स्क्रब खूप महत्त्वाची भूमिका बजावतो. कारण स्क्रबमध्ये त्वचेवर हलक्या हाताने मसाज केला जातो, ज्यामुळे चेहऱ्यावरील छिद्र मोकळी होतात, त्वचेवरील डेड स्किन म्हणजे मृत त्वचा निघून जाते, धूळ, माती निघून जाते, छिद्र मोकळी होऊन त्वचा मोकळा श्वास घेऊ शकते चेहऱ्यावर कोणतेही डाग, पुरळ, मुरूम येत नाहीत, त्वचा विकार होत नाहीत आणि त्वचा निरोगी रहाते.

चेहरा उजळण्यासाठी हे घरगुती उपाय नक्की करून पहा.

खूप प्रयत्न करूनही सकाळी लवकर उठणं होत नाही? मग हे उपाय नक्की करून पहा

मी जर तुम्हाला सांगितले की तुम्ही तुमच्या घरात राहून तुमच्या स्वयंपाक घरातील वस्तूंचा वापर करून अगदीच माफक दरात तुमचा चेहरा अगदी नितळ, चमकदार आणि स्वच्छ करू शकता तर त्यावर तुमचा विश्वास बसेल ?? नाही ना ?? पण मित्रानो हे अगदीच खरे आहे. आता तुम्ही म्हणाल यात घरगुती गोष्टी कशा प्रकारे मदत करतील ?? तर आपल्या स्वयंपाक घरातील गोष्टी त्वचा सुंदर करण्यास आणि नैसर्गिक पद्धतीने त्वचा निरोगी ठेवण्यास मदत करतात असे खुद्द सौंदर्यतज्ञ म्हणतात. त्यामुळेच ते स्वयंपाक घराला ब्युटी पार्लर तर घरातील घटकांना ब्युटी प्रॉडक्ट्स म्हणतात. आपण हे स्क्रब आठवड्यातून एकदा या प्रमाणे महिन्यातून चार वेळा करू शकतो. स्क्रब करून त्वचा स्वच्छ ठेवणे गरजेचे आहे असे सौंदर्यतज्ञ म्हणतात. ब्युटी पार्लरच्या मानाने घरगुती घटक दीर्घकाळ परिणाम करतात आणि नैसर्गिक तेज देतात.

चला तर पाहूया घरातील सामान वापरून करता येतील असे परिणाम कारक स्क्रब (homemade scrub for glowing skin ) :

हा स्क्रब वापरण्यासाठी दोन चमचे दह्यात एक चमचा मध घालून चांगले मिसळून घ्या. त्यात एक चमचा ऑलिव्ह ऑईल आणि एक चमचा साखर घालून पुन्हा सगळे एकत्र करा. हे मिश्रण चेहऱ्यावर हळुवार हातांनी गोल फिरवून मसाज करा. साधारण ५-७ मिनिटे मसाज करा आणि दहा पंधरा मिनिटांनी चेहरा कोमट पाण्याने स्वच्छ धुवा. यातील दह्यात त्वचा स्वच्छ करणारे कलींजींग गुणधर्म असतात त्यामुळे चेहऱ्यावर नैसर्गिक चमक येते. हा उपाय आठवड्यातून एकदा अवश्य करा.

एका वाटीत साखर आणि मधाचे चांगले मिश्रण तयार करा. साखर मधात योग्य पद्धतीने विरघळली पाहिजे. त्यासाठी तुम्ही पीठीसाखर पण वापरू शकता. हे मिश्रण तयार झाले की चेहऱ्यावर लावून पाच मिनिटे मसाज करा. मसाज पूर्ण झाला की लेप लावल्याप्रमाणे काही वेळ कोरडा होण्यासाठी तसाच चेहऱ्यावर ठेवा. मसाज कोरडा झाल्यावर चेहरा थंड पाण्याने धुवा. हे स्क्रब आठवड्यातून दोनदा लावल्यास लवकर परिणाम दिसून येईल. यातील साखर चेहऱ्यावरील डाग, मुरूम घालवून त्वचा स्वच्छ करते आणि चमक सुरक्षित ठेवण्यास मदत करते.

डाळ रात्रभर पाण्यात भिजत ठेवा. दुसऱ्या दिवशी बारीक करून त्यात कच्चे दूध मिसळा आणि ही पेस्ट मान आणि चेहऱ्यावर लावा. नंतर दहा मिनिटांनी साध्या पाण्याने धुवा.

यासाठी तांदूळ धुवून चांगले वाळू द्या. नंतर मिक्सरमधुन बारीक करून घ्या. तयार झालेले तांदूळ पीठ एक चमचा घ्या आणि त्यात चमचाभर मध घाला. चांगले मिश्रण तयार करा त्यात थोडा बेकिंग सोडा घाला आणि पुन्हा चांगले मिसळून घ्या. पाच मिनिटे मसाज करा आणि पाण्याने धुवा. यामुळे चेहरा चमकतो, मुरूम आणि पुटकुळ्याचे डाग निघून जातात. आठवड्यातून एकदा याचा वापर करा.

गव्हाच्या कणकेत दूध आणि मध घालून नीट मिसळून घ्या. तयार झालेले मिश्रण चेहऱ्यावर गोलाकार बोटं फिरवत मसाज करा. दहा पंधरा मिनिट झाल्यावर चेहऱ्यावर पूर्ण सुकू द्या. नंतर थंड पाण्याने स्वच्छ धुवा. यामुळे चेहरा चमकतो. आठवड्यातून एकदा याचा वापर करा.

लिंबाच्या रसात साखर तसेच मध घालून नीट मिसळून घ्या आणि चेहऱ्यावर लावा. यातील लिंबू ब्लिचिंग करते म्हणजे डाग दूर करते, चमक देते आणि साखर नैसर्गिक पद्धतीने चेहऱ्यावरील मृत त्वचा काढून टाकते. हे नैसर्गिक असल्याने आठवड्यातून एकदा याचा वापर करा.

दोन चमचे ओट्सची बारीक पावडर तयार करून त्यात गुलाबपाणी टाका. याची पेस्ट तयार करून चेहरा आणि मानेला लावा. पाच ते आठ मिनिटे रहुद्या नंतर साध्या पाण्याने धुवा. हे आठवड्यातून दोन तीन वेळा करा. याने चेहरा तजेलदार होईल.

Leave a Comment

error: