Ritbhatmarathi

Search
Close this search box.

उत्तम आरोग्य हवं असल्यास आजच तुमच्या स्वयंपाकघरातील हि भांडी वापरायची बंद करा

Healthy Lifestyle: स्वयंपाकघर हा घरातील प्रत्येक स्त्रीचा श्वास असतो. आपले किचन नीटनेटके स्वच्छ असावे असा तिचा प्रमाणिक प्रयत्न असतो. असे म्हणतात की घरातील अंगण आणि स्वयंपाकघर पाहून त्या घरातील वातावरण लक्षात येते. बऱ्याच गृहिणींना तर त्यांच्या किचनमध्ये कोणाचीच लुडबुड चालत नाही. एकहाती किचन सांभाळायला त्यांना आवडते. स्वयंपाक घरात रोज अन्न शिजवणे आणि घरातील मंडळींना खाऊ घालण्याची कामे घरातील स्त्री करत असते. घरात जर लहान मूल असेल तर त्याच्यासाठी वेगळं जेवण जे फक्त पोट भरणार नाही तर उत्तम पोषण देईल हाच तिचा प्रयत्न असतो.

पण मैत्रिणींनो तुम्ही जे जेवण बनवता किंवा मुलांना, घरातील ऑफिस मध्ये जाणाऱ्या मंडळींना टिफीन देता तो कशात देता ( कोणत्या भांड्यात ) किंवा कोणत्या भांड्यात अन्न शिजवता आणि ते खरंच उपयुक्त आहे की नाही याचा कधी विचार केला आहे का ?? नाही. अजिबात नाही. आपण काय करतो, कशात करतो याकडे आपले लक्षच नसते. आपण फक्त बदलत्या काळानुसार नव्या ट्रेण्ड नुसार आपल्याला बदलत रहातो.

जरा मागे म्हणजे एक – दोन पिढ्या मागे जाऊन पाहिले तर आपल्या सगळ्यांच्याच लक्षात येईल की पूर्वीच्याकाळी आपल्या सगळ्यांच्या घरात तांबे आणि पितलेचीच भांडी होती

आपल्याकडे या भांड्यांना कलई करण्यासाठी लोक येत असत आणि त्यांची कलई करून घेतली जात असे. आजही अनेक घरात पिढीजात चालत आलेली थोडीतरी पितळी भांडी नक्कीच असतील. त्यांच्या सासूची, आईची किंवा आजीची आठवण म्हणून.पण ही भांडी धूळ खात पडली असतील नक्कीच. कारण आजचा जमाना हा नॉनस्टिक, काच, प्लास्टिकच्या भांड्यांचा. त्यात घासायला, धुवायला जड अशी भांडी कोण वापरणार ?? आपल्या स्टाईलल मॅच करत नाहीत ही भांडी. कोण वापरते हे आजकाल ?? त्यामुळे नव्या पिढीला फक्त पितांबरीच माहिती ते ही टीव्हीवर पहिल्यामुळे.

आपली भारतीय जीवनशैली ही आयुर्वेदावर आधारलेली आहे. परंपरेनुसार ज्या गोष्टी चालत आल्या त्याचेच निसर्गनियमाने पालन केले जात असे. उगाच एखादी गोष्ट वाटली म्हणून केली असे होत नसे. प्रत्येक चालीरीतीमागे काहीतरी विज्ञान होते, शास्त्रशुद्ध कारण होते. म्हणूनच त्या गोष्टी कारणमीमांसा न करता पुढेही चालू ठेवल्या होत्या. आपल्या आयुर्वेदात अनेक काढे, चूर्ण, भस्म हे पितळी किंवा तांबे वापरून बनवले जात असत. सोने, चांदी,तांबे, पितळ या धातूंचा आजही आयुर्वेदात वापर केला जातो. ते उगाच का ?? तर नाही. कारण पितळ, तांबे हे फक्त धातू नसून त्यांचा मानवी शरीरासाठी खूप जास्त फायदा होतो. केवळ शरीरासाठी नव्हे तर आर्थिक सौख्य, भाग्योदय, सुख प्राप्त करण्यासाठी सुद्धा हे धातू उपयोगी ठरतात. कदाचित हे तुम्हाला खरे वाटणार नाही पण अभ्यासाने या गोष्टी सिद्ध झाल्या आहेत.

या उलट फॅशनच्या नावाखाली आपण ज्या प्लास्टिक आणि नॉनस्टिक भांड्यांचा वापर करतो त्याचे फायदे तर सोडाच उलट अत्यंत घातक परिणाम आपल्या शरीरावर होत आहेत. अनेक रोगांना आमंत्रण देत आहोत यांचा वापर करून. कसे ?? जरा सविस्तर बघुया ..

Healthy Lifestyle
Image Source

पितळ हा धातू तांबे आणि जस्त यांच्यापासून बनवलेला मिश्र धातू आहे. संस्कृत भाषेत पीत म्हणजे पिवळा तसेच त्याच्या रंगामुळे त्याला पितळ हे नाव पडले. धार्मिक दृष्टिकोनातून पिवळा रंग हा भगवान विष्णूचा आवडता रंग आहे. त्यामुळेच पूजेच्या एकंदरीत सामग्रीमध्ये सगळीच भांडी ही पितळ किंवा तांब्याची असतात. ताम्हण, निरंजन, घंटा, पळी, फुलपात्र ही सगळीच भांडी पितलेचीच असतात. धार्मिक दृष्टिकोनात तर पितळ महत्वाचे आहेच पण आयुर्वेद आणि ज्योतिषशास्त्रात सुद्धा त्याला अनन्यसाधारण महत्व प्राप्त झाले आहे ते त्याच्या गुणांमुळेच. आयुर्वेदात पितळ धातू हा धनवंतरीचा अतिशय प्रिय धातू मानला जातो. तर जोतिषशास्त्रप्रमाणे पितळ धातूमुळे अनेक कायम स्वरुपी फळ देणारे परिणाम प्राप्त होतात.

  • पितळ धातू लवकर गरम होतो, त्यामुळे इंधन बचत होते.
  • पितळेच्या भांड्यात ठेवलेले अन्न आणि पाणी आपल्या शरीराला ऊर्जा देते. त्यामुळेच तर पुराणात द्रौपदीची अक्षयथाळी ही पितळेची होती. ज्यातून मिळणारे अन्न हे कधीही न संपणारे होते आणि कितीतरी लोकांची भूक भागवण्यासाठी उपयुक्त ठरले असा उल्लेख आढळतो .
  • विवाह विधीत कन्यादान करताना पितळी भांड्यात ( कलश ) तून पाणी सोडले जाते.
  • अनेक विधीत दानधर्म करताना पितळी भांडी दान करतात.
  • भगवान शंकराच्या शिवलिंगावर दूध अभिषेक पितळी भांड्यातूनच केला जातो.
  • बगलामुखी देवीच्या अनुष्ठानमध्ये पितळी भांड्यानाच महत्त्व आहे.
  • मुल जन्माला येते त्यावेळी पण पितळी थाळी वाजवून आनंद व्यक्त करण्यात येतो. आपल्याच घराण्यातील कोणी पूर्वज जन्माला आला आहे अशी त्यामागची धारणा आहे.
  • आयुर्वेद मधील अभ्यासानुसार पितळी किंवा तांब्याच्या भांड्यात ठेवलेले पाणी शरीरावर उत्तम परिणाम करते. याशिवाय त्वचा विकार कमी होतात, पचनक्रिया सुधारते, रक्तातील हिमोग्लोबिन वाढण्यास मदत करते तसेच वात प्रकृतीवर चांगले परिणाम करतात.
  • शरीरातील पित्तला आळा घालतात तसच वजन वाढीवर पण या भांड्यातील अन्न उपयोगी आहे.
  • याशिवाय नजरदोष किंवा दृष्टीदोषावर देखील पितळी भांड्यातील अन्न आणि पाणी फार उपयोगी ठरते.
  • पितळी भांड्यातील तूप अतिशय गुणकारी मानले जाते.

माहित आहे का? रिफाईंड तेल आरोग्यासाठी खूप घातक आहे. उत्तम आरोग्यासाठी आजच आहारात हे कूकिंग ऑइल समाविष्ठ करा

उन्हाळ्यात उष्णतेपासून थंडावा मिळण्यासाठी आहार कसा असावा

१. भाग्योदयासाठी : पितळेच्या वाटीमध्ये हरभरा डाळ रात्री भिजत घालून, रात्रभर उशाशी ठेवा. त्यात सकाळी गुळ घालून ती डाळ गाईल खायला घाला. असे केल्याने आपले भाग्य उदयाला येईल.

२. धनप्राप्तीसाठी : अखंड धनप्राप्तीसाठी पौर्णिमेला तुपाने भरलेला पितळी कलश श्रीकृष्णाला नैवेद्य दाखवून निर्धन ( ज्याच्याजवळ पैसे नाहीत ) ब्राह्मणाला द्या. यामुळे आपल्याला सतत पैसे मिळतील.

३. सुखप्रप्ती साठी : नेहमी सुख लाभावे यासाठी वैभव लक्ष्मीला पितळी दिव्यात शुद्ध तुपाचा दिवा लावा. सतत सुख मिळेल.

४. सौभाग्यप्राप्तसाठी : पितळी भांड्यात हरभरा डाळ भरून ते विष्णु मंदिरात दान करा.

Image Source

पूर्वीच्या काळी अगदी भगवान श्रीकृष्ण त्यांच्या लहानपणी दही, लोणी चोरून खात ते सगळे पदार्थ मातीच्या भांड्यात ठेवलेले असत. ही मातीची भांडी एकदम नैसर्गिक पद्धतीने बनवलेले असत. आजही अनेक ठिकाणी ( मोठी शहरे सोडल्यास ) पाणी ठेवन्यासाठी माठ वापरताना दिसून येतात. कारण यातील पाणी हे फ्रिज मधील पाण्यापेक्षा कितीतरी लाभदायक आणि तहान भागवणारे असते. पूर्वीची लोकं दही, दूध, ताक, लोणी अशा गोष्टी माठात ठेवत असत. शरीराला थंडावा देत असे माठ. त्यामुळे आजही आपण ही माठाची भांडी सहज वापरू शकतो.

प्लास्टिक आणि नॉनस्टिक भांडी कशी घातक आणि आरोग्यावर विपरीत परीणाम करणारी ठरू शकतात ते पाहूया.

हल्ली सगळेच या प्रकारची भांडी वापरतात कारण यांचा वापर केल्याने तेल कमी लागते आणि अन्न बुडाला चिटकत नाही. पण तुम्हाला माहीत आहे का या भांड्यांवर टेफलॉन नावाचे कोटिंग असते. या कोटींगला पॉलीटेट्राफ्लूरोएथलिन (polytetrafluoroethylene) असे म्हणतात. हे टेफलोन एका एसिड पासून बनवलेले असते. हे एसिड अत्यंत विषारी पदार्थ आहे. हे एसिड आरोग्यावर घातक परिणाम करू शकतो. टेफ्लोन म्हणजे नॉनस्टिक भांड्यांवरचे सेफ कव्हर असले तरीही ३०० डिग्री सेल्सिअस तापमानावर धुरावाट ते शरीरात मिसळते. त्यामुळे थंडी भरून ताप, डोकेदुखी, अंगदुखी सारखे लक्षणे दिसून येतात. आतडे खराब होऊ शकतात तसेच कॅन्सर सारख्या गंभीर आजाराचा धोका उद्भवतो असे तज्ञांचे म्हणणे आहे.

आपण आजकाल घरात घासायला, धुवायला सोपे म्हणून प्लास्टिक वापरतो. इतकेच काय तर लहान मुलांना टिफीन म्हणून पण प्लास्टिकचे डबे आपण आणतो. यातही घातक तत्वे मिसळले जाते कारण प्लास्टिक जास्त काळ टिकून राहावे म्हणून. जेंव्हा आपण हे डबे वापरतो तेंव्हा हे डब्यातील तत्व पोटात जाते आणि हार्मोनल असंतुलन वजन वाढणे आणि कर्करोगाचा धोका संभवतो. प्लास्टिक जास्त घासले तर त्यावरील कोटींग उतरते.

त्यामुळेच जुनं ते सोनं अशी आपल्या मराठीत खूप पूर्वीपासून चालत आलेली म्हण आहे. ती अगदी खरी आहे. ती पटायाला उशीर करून घेऊ नका. आजकाल अनेक मॉल्समध्ये तांब्याच्या बॉटल्स, नव्या ट्रेण्डची पितळी भांडी पाहायला मिळतात. म्हणजे लोक पुन्हा जुन्या चालीरीतीकडे वळताना दिसत आहेत. त्यामुळे पुन्हा पितळी, तांबे, मातीची भांडी वापरण्यास सुरुवात करा आणि हेल्दी रहा. कराल ना ??

================

हेही वाचा

marathi goshta

marathi story

marathi moral stories

marathi love story

marathi motivational stories

Share your love
Facebook
Twitter

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *