Ritbhatmarathi

Search
Close this search box.

मानसी उच्चशिक्षित होती. पुण्यात एका मोठ्या सॉफ्टवेअर कंपनीमध्ये नोकरी करायची. दिसायलाही सुंदर. मानसीला जॉब लागला आणि काही दिवसातच ऑफिस मध्ये तिच्या सहकारी मित्रांचा एक चांगला ग्रुप जमला. त्यात महाराष्ट्रियन, साऊथचे लोकं.. काही बंगाली तर काही नॉर्थ इंडियन होते. त्यात नितीनशी तिची जास्तच गट्टी जमली होती. नितीन नॉर्थ इंडिअन असल्याने महाराष्ट्रात पहिल्यांदाच आला होता आणि तेही नोकरीच्या निमित्ताने.

मानसी मूळची पुण्याचीच असल्याने पुण्यातलं सगळं माहित होतं. एक दिवस नितीन १ आठवड्याची सुट्टी घेऊन घरी जाणार होता. नोकरी नंतर पुण्यात आल्यावर नितीन पहिल्यांदाच आपल्या घरी जाणार होता त्यामुळे आपल्या पगारातून पहिल्यांदा घरच्यांसाठी काहीतरी घेऊन जायची त्याची ईच्छा होती. त्यासाठी त्याने मानसीला पटवलं आणि तिला तो शॉपिंग साठी घेऊन गेला.

नितीन – “मानसी आज ऑफिस के बाद मेरे साथ चलोगी क्या? कल रात को मुझे घर के लिये निकलना था तो सोचा सबके लिये पुणे का स्पेशल कुछ लेके जाऊ”

मानसी – “हा क्यू नही…तुम बस बताओ तुम्हे किस तरह कि शॉपिंग करनी है….उसी हिसाब से हम लोग शॉपिंग करणे जायेंगे”

नितीन – “तुम ही बताओ ना घर मी मम्मी, पापा और दीदी के लिये क्या ले सकते है.”

मानसीने नितीनला त्याच्या घरच्यांच्या आवडी निवडी विचारल्या आणि त्यानुसार त्याला मस्त शॉपिंग करून दिली. दुसऱ्याच दिवशी नितीन रात्रीच्या ट्रेनने घरी गेला.

हळू हळू मानसी आणि नितीनमध्ये जवळीक वाढू लागली आणि त्यांच्यातल्या घट्ट मैत्रीचं रूपांतर प्रेमात झालं. पाहता पाहता २ वर्षे निघून गेली. दोघेही आपापल्या कामात रुळली होती. काही दिवसातच मानसीच्या घरी तिच्या लग्नाची बोलणी सुरु झाली. लग्नाची बोलणी सुरु झाली म्हंटल्यावर मानसीने आपल्या घरी नितीन बद्दल सगळं सांगितलं. पण मानसीचे बाबा फार कडक स्वभावाचे होते. “इंटर स्टेट” लग्न तर दूरच राहिलं….मुलीचा प्रेमविवाह हि कल्पनाच त्यांच्या मनात कधी आली नाही. त्यात मानसीने असा तसा नाही डायरेक्ट नॉर्थ इंडियन मुलगाच निवडला म्हणजे फारच टोकाचा निर्णय घेतला होता.

घरच्यांना मनवण्यातच १-२ वर्षे निघून गेली. या दरम्यान मानसीचे घरचे काही नातेवाईकांना घेऊन नितीनला भेटले देखील होते. नितीन मध्ये नाही म्हणण्यासारखं काही नव्हतंच. नितीन बोलायला खूप मवाळ. सगळयांशी अदबीने बोलणारा मुलगा. पण समाज काय म्हणेल ह्या गोष्टीखातर मानसीचे बाबा काही लग्नाला तयार होत नव्हते. पण मानसीही आपल्या मतावर ठाम होती कि लग्न करील तर नितीनशीच नाही तर आयुष्यभर बिना लग्नाचीच राहील. शेवटी मानसीच्या वडिलांना मानसीच्या निर्णयापुढे हार मानावी लागली आणि कसे बसे ते लग्नाला तयार झाले.

मानसीचे बाबा लग्नाला तयार जरी झाले असले तरी तिच्या निर्णयावर नाराजच होते. त्यामुळे मानसी नितीनच लग्न अगदी मोजक्याच लोकांना बोलावून उरकून टाकलं. नितीनच्या घरच्यांना आधीपासूनच काही आपत्ती नसल्याने नितीनचे आई वडील आणि खूप जवळचे आप्तेष्ठ लग्नाला आले होते. लग्नानंतर मानसी पहिल्यांदा नितीनच्या घरी गेली होती. तिथे गेल्यावर नितीनच्या नातेवाईकांनी तिला खूप जपलं. लग्नासाठी घेतलेल्या सुट्ट्या संपल्या आणि दोघेही पुण्याला परतले. लग्नानंतर काही दिवसातच नितीनने मानसीच्या घरच्यांची मन जिंकली. त्यामुळे मानसीच्या बाबांचा नितीनबद्दल किंवा एकूणच दुसऱ्या राज्यातील लोकांबद्दल दृष्टिकोन होता तो दूर झाला आणि मानसीचे बाबा आणि नितीन दोघेही अगदी बाप मुलासारखे राहू लागले. वडिलांची आणि नितीनची कॉम्पॅटिबिलिटी पाहून मानसीचीही काळजी मिटली.

लग्नानंतर ४ वर्षांत मानसी नितीनच्या संसाराच्या वेलीवर आयुष नावाचं फूल उमललं होतं. सगळं काही छानच चाललं होतं कि देवाला काही वेगळंच मंजूर होत. एकदा बॅडमिंटन खेळता खेळता नितीनच्या कमरेत लचक भरली आणि त्याच्यी कंबर पाठ दुखण्याने एक झाली होती. बऱ्याच डॉक्टर केले पण काही फरक पडेना. सगळ्या डॉक्टरांनी नस दाबली असल्याचं सांगितलं आणि त्यानुसार ईलाज केले. पण नितीनला काही केल्या फरक पडेना. कुठल्याही डॉक्टरची औषधे घेतली कि २-३ दिवस आराम मिळायचा आणि परत दुखणं चालू होयच.

एक दिवस एका मोठ्या हाडांच्या डॉक्टरांना दाखवायला गेले आणि त्यांनी नितीनच्या कंबरेचा एम. आर. आई काढायला सांगितला. एम. आर. आई काढला आणि त्यात जे काही निदान झालं ते ऐकून मानसीच्या पायाखालची जमीनच हादरली होती. नितीनला ट्युमर झाला होता. पण त्या ट्युमरचे निदान होणं गरजेचं होतं म्हणून हाडांच्या डॉक्टरांनी ओंकोलॉजिस्ट कडे जाण्याचा सल्ला दिला. हाडांच्या डॉक्टरांनीच पुण्यातल्या नामांकित ओंकोलॉजिस्ट सुचविला. ओंकोलॉजिस्ट कडे गेल्यावर त्याने बायोप्सी करायला सांगितली.

बायोप्सीचं नाव ऐकताच मानसी आणि संगळ्यांचा मनात धाकधूक सुरु झाली. मानसीला गेल्या ७-८ वर्षांचा नितीन सोबत घालवलेला काळ आठवू लागला.

” सगळं किती छान सुरु होतं. किती खुश होतो आम्ही. नितीनला काही झालं तर माझं काय होईल आणि आयुष ???? आयुष तर फक्त ४ महिन्यांचा आहे. त्याने अजून आपल्या पप्पासोबत बालपण अनुभवलंही नाही. किती छोटा आहे आयुष अजून….अजून कुठल्या कुठं आयुष्य जायचं आहे? का रे देवा माझ्या सोबतच का केलं असं? एवढी का नडले मी तुला?”

मानसी रडायला लागली आणि तिला रडताना पाहून घरात सगळ्यांचीच रडारडी सुरु झाली. नितीनेच सगळ्यांना थोडा धीर दिला ,

“मला काही होणार नाही…वाईट स्वप्न समजून विसरून जाऊ….मी लवकर बरा होईन….मला फक्त तुमच्या सगळ्याचा मानसिक आधार हवा आहे…तो मिळाला कि समजा मी अर्धा तिथेच बरा होईल. “

मान्सीलाही कळून चुकलं कि नितीन समोर तिने असं खचून चालणार नव्हतं. त्याला तिच्या आधाराची गरज आहे. दुसऱ्याच क्षणी ती उठली आणि स्वतःच मन रमवू लागली जेणेकरून नितीनला आजारपण जाणवू नये. नितीनसोबत छोट्या आयुषला आई सोबत ठेऊन ती हॉस्पिटल्स, डॉक्टर्स सगळीकडे पळत होती. बायोप्सीही झाली. त्याचे रिपोर्ट्स २-३ दिवसांनी येणार होते. मानसीने फिंगर्स क्रॉस करून ठेवले होते कि रिपोर्ट पॉजिटीव्ह यावा म्हणून. तसेच देवाकडेही नितीन लवकर बारा होण्यासाठी साकडे घालत होती. बायोप्सी च्या दुसऱ्याच दिवशी एका नातेवाईकाने तिला गुरुचरित्र वाचण्याचं सुचवलं.

पण गुरुचरित्र वाचायचे नियम फार कडक असतात. आणि शक्यतो श्रावणात वाचावे. त्यामुळे ते वाचण्याआधी मानसीला थोडी धाकधूक होतीच कि तिच्या कडून शक्य होईल का? काही चूक तर नाही होणार ना? पण तिने स्वतःला तयार केले आणि दुसऱ्या दिवशी वाचायला सुरुवात केली. आई कडे देवघरात ग्रंथ ठेवला होता. तो तिने आणला आणि वाचायला सुरुवात केली. शक्य असतील तेवढे सगळे नियम काटेकोरपणे पाळून तिने दिलेल्या नियमानुसार ७ दिवसांत गुरुचरित्राचे ५२ अध्याय वाचून पूर्ण केले. गुरुचरित्र संस्कृत मध्ये होते त्यामुळे वाचताना तिला अडचण आला पण एखादाजरी शब्द चुकीचा उच्चारला गेला कि लगेच दत्तगुरूंच्या चूक झाली म्हणून पाया पडायची.

पण खरच ते वाचताना तिच्या मनात एक अलोकनीय समाधान होत. जे तिच्या हावभावावरून समजत होतं. चौथ्या दिवशी तिने गुरुचरित्र वाचायला सुरुवात केली. आज बायोप्सीचा रिपोर्ट येणार होता. मानसीच्या मनात धाकधूक चालू होती पण ती एक एक अध्याय वाचत गेली आणि तेवढ्यात फोन वाजला. ओळखीतल्या डॉक्टरांनी ज्यांच्याकडे अहवाल तपासणीसाठी जाणार होता त्यांनी स्वतः फोन केला होता. रिपोर्ट नॉर्मल होता. मानसीला माहित नव्हतं ती आपली गुरुचरित्र वाचण्यात मग्न होती. तेवढ्यात तिची आई देवघरात तिच्या जवळ आली आणि तिने मानसीला सांगितलं…

“रिपोर्ट नॉर्मल आहे मानसी”… आई दत्तगुरूंच्या हाथ जोडून पाय पडू लागली.

मानसीने बातमी ऐकली पण ती गुरुचरित्र वाचायची थांबली नाही. कारण अध्याय वाचताना कुणाशी बोलू नये किंवा खंड पडू देऊ नये असा नियम असतो. म्हणून आईला ती काही बोलली नाही पण तिच्या डोळ्यातून आनंदाश्रू खळखळा वाहत होते. गुरुचरित्र वाचता वाचता दत्त गुरूंच्या फोटोकडे बघून गोड तक्रार करत होती कि दत्तराया परत असा दिवस दाखवू नको…तू सांगशील तसं करेन मी….दत्तगुरूंची फोटोमधली स्मितहास्य छबी मात्र मानसीकडे एकटक लावून बघत होती. दत्तगुरूंच्या चेहऱ्यावरही एक प्रकारचं समाधान भासत होतं.

गुरुचरित्र ५३ अध्याय संपवून ८ व्या दिवशी मानसीने यथासांग एका जोडप्याला भोजन घालून समाप्ती केली. काही दिवसांनी नितीन चेही ऑपरेशन झाले आणि गाठ काढून टाकण्यात अली.

मानसीही शिकलेली. देवाची पूजा तसं म्हणायला गेलं कि रोज रोज नाही करायची. तिच्या नोकरीमुळे तिला रोज यथासांग पूजा करणं शक्य नाही होयच. पण ह्याचा अर्थ ती नास्तिक नव्हती. देवावरही ह्या आधी फार असा तिचा विश्वास नव्हता. पण आयुष्यात अचानक आलेल्या संकटाने आणि गुरुचरित्राने तिला विश्वास करायला भाग पाडले. तेव्हापासून मानसी दरवर्षी न सांगता श्रावणात गुरुचरित्र वाचते. गुरुचरित्राचे ते ७ दिवस वर्षभरासाठी घरात समाधान आणि शांती घेऊन येतात.

बोला , “दिगंबर दिगंबरा…श्रीपाद वल्लभ दिगंबरा….जय श्री स्वामी समर्थ!!”

===============

प्रिय वाचकहो आमच्या कथा तुम्हाला वाचायला आवडत असतील तर आमच्या फेसबुक पेजला फॉलो करून लेखकांना प्रतिसाद नक्की द्या. जेणेकरून नवोदित लेखकांना प्रेरणा मिळेल.

https://www.facebook.com/ritbhatmarati/

तसेच तुम्हालाही लिहायची आवड असेल तर आमच्याशी संपर्क साधा.

ritbhatmarathi@gmail.com

फोटो साभार – गूगल

आमची स्टोरी आमच्या/लेखकाच्या नावासकट शेयर केल्यास आम्हास काही हरकत नाही

=============

हेही वाचा

marathi goshta

marathi story

marathi moral stories

marathi love story

marathi motivational stories