Ritbhatmarathi

Search
Close this search box.

गुरुचरित्र अठरावा अध्याय : कुठलीही इच्छा असो, गुरुचरित्राचा हा अध्याय रोज वाचल्यास ती नक्की पूर्ण होईल

gurucharitra adhyay 18 pdf : आजकाल प्रत्येकजण कोणत्या ना कोणत्या विवंचनेत अडकला आहे. वास्तूदोष, घरातील कटकटी, अशांतता, घरातील तसेच घराबाहेरील समस्या यामुळे सगळेच त्रस्त आहेत. या अडचणींमुळे आपली मानसिक आणि शारीरक अशांतता भंग होत चालली आहे. या सगळ्याच प्रकारच्या अडचणीतून मार्ग काढण्यासाठी सगळे आपापल्या परीने प्रयत्न करतच असतात. यातील अनेकजण अथक परिश्रम करण्याबरोबरच अध्यात्मिक आणि धार्मिक गोष्टींचा आधार घेतात. सुदैवाने आपल्या हिंदू पुराणात असे अनेक ग्रंथ आहेत ज्यामुळे आजही सगळेच संकटे दूर होतात आणि अडचणीतून मार्ग निघतो शिवाय मनाला शांतता मिळते.

दत्त संप्रदायातील करोडो लोकांचा विश्वास आणि पवित्र वेद म्हणजे गुरूचरित्र. गुरूचरित्र १५ व्या १६ व्या शतकात श्री सरस्वती गंगाधर स्वामींनी लिहलेले होते. या पोथीचे पारायण सात दिवसात केले जाते. यात एकूण ५३ अध्यात आहेत. या अध्यायाची विभागणी ज्ञानकांड, कर्मकांड आणि भक्तीकांड अशी केली असून प्रत्येक अध्याय वाचण्याचे फळ देखील आहे. या ग्रंथाचे पारायण मार्गशीर्ष महिन्यात येणाऱ्या पौर्णिमेआधी आठ दिवस करतात आणि पौर्णिमेच्या दिवशी उद्यापन केले जाते. हा ग्रंथ लीहणारे श्री. टेंबेस्वामी म्हणतात की, दुसरी कुठली उपासना तुम्हाला शक्य झाली नाही तरी चालेल पण गुरूचरित्र च्या किमान पाच ओव्या रोज वाचन करा.

खरतर गुरुचरित्र ग्रंथाचा प्रत्येक अध्याय वेगळे आणि विशेष फळ देणारा आहे. तरीही काही रहस्यमय फायदे बघुया आणि प्रत्येक अध्याय वाचनाचे फल ही जाणून घेऊया.

१. जेंव्हा एखादे गंभीर संकट आपल्या स्वतःवर किंवा आपल्या कुटुंबावर येते, सगळेच रस्ते बंद झालेत असे वाटायला लागते त्यावेळेस या ग्रंथाच्या पारायणाने संकटातून बाहेर पडण्याचा मार्ग सापडतो अशी मान्यता आहे.

२. या ग्रंथामध्ये प्रत्येक अक्षर एखाद्या मंत्रप्रमाणे आहे त्यामुळेच तुमच्या कुठल्याही प्रकारचे आजार याच्या वाचनाने नष्ट होते.

३. गुरूंचा आशीर्वाद प्राप्त झाला आणि गुरुभक्ती मनातून जागृत झाली की मनुष्य दुःख मुक्त होतो.

४. स्वतःच्या घरामध्ये गुरूचरित्र वाचन केल्याने घरातील नको ते दबावाचे वातावरण कमी होऊन एक आगळावेगळा आनंद चैतन्य व प्रसन्नता निर्माण होते.

५. प्रखर पितृदोष व वास्तुदोष यावरती उपाय म्हणून संकल्प युक्त गुरुचरित्र पारायण केल्यास खूप लवकर प्रभावी अनुभव येतात.

आता प्रत्येक अध्यायाची फलश्रुती बघुया.

ज्यांना संपूर्ण पारायण करणे शक्य होत नाही अशा लोकांनी अध्यायाच्या फलश्रुती प्रमाणे वाचन केले तरीही फायदा होतो.

अध्याय १- नित्य गुरुचिन्तनाने संपूर्ण जीवन मंगलमय होते.
अध्याय २- कलीबाधा व सर्व रोगबाधा नाहीशी होतात.
अध्याय३- गुरुकोपाचे शमन होते. व व्रताची पूर्तता होते.
अध्याय ४- स्त्रीछलणाचा दोष जातो व स्वहिताचे रक्षण होते.
अध्याय ५- शाररिक व्यंगे नष्ट होतात. ज्ञानाची प्राप्ती होते.
अध्याय ६- दैवी कोप दूर होतो. व विद्याप्राप्ती होते.
अध्याय ७- पंचमहापापादी सर्व पातके नाहीशी होतात.
अध्याय ८- बुध्दिमांद्य नाहिशे होतात. विवाह कार्य सुलभ होते.
अध्याय ९- सर्व शुभकामना गुरुकृपेने पूर्ण होतात.
अध्याय १०- नवस फळाला येतात. चोरीचा आळ दूर होतो.
अध्याय ११- वाचंदोष तसेच,वेड नाहीसे होते.
अध्याय १२- संकटे, दैन्य दारिद्र्य यांचे निवारण होते.
अध्याय १३- सर्व प्रकारच्या पोटाच्या व्याधी नाहीशा होतात.
अध्याय १४- प्राणघातक गंडातरापासून स्वरक्षण लाभते.
अध्याय १५- तिर्थयात्रांना सफलता प्राप्त होते.
अध्याय १६- आदरणीयची निंदा, अपमान केल्याचा दोष दूर होतो.
अध्याय १७- ज्ञान व गुरुकृपा यांचा लाभ होतो.
अध्याय १८- संपत्तीचा लाभ होऊन दारिद्र्य नाहिशे होते.
अध्याय १९- भाग्य वृद्धी होते. सद्गुगुरूंचा लाभ होतो. त्रीस्थळी यातरपुण्य लाभते.
अध्याय २०- गुरूस्मरण करुनी मनी, पूजा करी वो गुरुचरणी, तुझे पाप होईल धुनी, ब्रह्मासमंध परिहरेल!!
अध्याय २१- मृत्यूभयापासून मुक्तता .
अध्याय २२- वांझपण दूर होते. बाळणतिनिला चांगले दूध येते.
अध्याय २३- पिशाच्चबाधा नष्ट होते. राजमान्यता प्राप्त होते.
अध्याय २४- भ्रम व वैचारिक गोंधळ दूर होऊन मनशांती लाभते.
अध्याय २५- अपात्र लोकांचा संपर्कात त्यांचे दुष्परिणाम टळतात.
अध्याय २६- शत्रू निष्प्रभ होऊन शरण होतात.
अध्याय २७ – गर्व नष्ट होऊन चित्त शुद्ध होते.
अध्याय २८- वाईट कर्माचे दोष दूत होतात , सप्तथ सापडतो.
अध्याय २९- स्त्रीछलदोष , वासनादोष दूर होऊन पावित्र्य लाभते.
अध्याय ३०- कुमारिकांना इच्छित पतीचा प्राप्ती होते. सौभाग्य वृद्धी होते.
अध्याय ३१- पतीवर येणारे विघ्ने टळतात.
अध्याय ३२- वैधव्याचे दुःख टळते अथवा सुसह्य होते.
अध्याय ३३- वचनभंग व व्यभिचार दोष दूर होऊन सदगती लाभते.
अध्याय ३४ – प्राणसंकटाचे निवारण होऊन आयुष्य वृद्धी होते.
अध्याय ३५ – हरवलेले , नष्ट झालेले पुन्हा प्राप्त होते तूटलेले संबंध जुळतात.
अध्याय ३६- चूकीच्या समजुती जाऊन अंतःकरण शुद्ध होते.
अध्याय ३७- मूढ बुद्धी नष्ट होऊन योग्य ज्ञान व ब्रह्मा प्राप्ती होते.
अध्याय ३८- निंदा करणारे शरण येतात, अन्नपूर्णा नित्य प्रसन्न राहते.
अध्याय ३९- सद्गुगुरुची प्राप्ती होऊन योग्य मार्ग सापडतो .
अध्याय ४०-कुष्ठरोग नाहीसा होऊन शरीर निकोप होते.
अध्याय ४१- सद्गुगुरूंची प्राप्ती होऊन योग्य मार्ग सापडतो.
अध्याय ४२- विद्या व फलाची प्राप्ती होऊन कर्तबगारिला यश येते.
अध्याय ४३- गर्व व क्रोध नाहीसा होऊन एशवर्या ची प्राप्ती होते.
अध्याय ४४- मनातील भ्रम दूर होऊन योग्य मार्ग लाभतो.
अध्याय ४५- कुष्ठरोग नाहीसा होतो, गुरुनिष्ठ सफल होते. बुद्धी वाढते.
अध्याय ४६- चिंताची स्थिरता लाभते. ज्ञानाची प्राप्ती होते.
अध्याय ४७- पक्षपाताचा दोष नाहीसा होऊन समत्वबुद्धी प्राप्त होते.
अध्याय ४८- गुरुनिष्ठास विपुल समृद्धी प्राप्ती होते.विघ्ने टळते.
अध्याय ४९- तीर्थक्षेत्राबद्दल आदर वाढतो. सर्व पापांचे समान होते.
अध्याय ५०- ग्रँथी रोग , त्वचारोग नष्ट होऊन शरीरसुख लाभते.
अध्याय ५१- सुखसमृद्धी व अंती मोक्ष प्राप्ती होते.
अध्याय ५२ – श्रद्धेला चांगली फळे येतात व संपूर्ण ग्रंथ वाचनाचे फळ मिळते.

वैभवलक्ष्मी व्रताविषयी संपूर्ण माहिती. कुणी व कसे करावे?

कृष्णाला नैवेद्य म्हणून छपन्न भोगच का दाखवतात?

बांके बिहारी लाल मंदिराचं रहस्य.. ह्या मूर्तीला कुणीच २ मिनिटापेक्षा जास्त न्याहाळू शकत नाही.

॥ श्रीगणेशाय नमः ॥ श्रीसरस्वत्यै नमः ॥ श्रीगुरुभ्यो नमः ॥

जय जया सिद्धमुनि । तू तारक भवार्णी ।
सुधारस आमुचे श्रवणी । पूर्ण केला दातारा ॥१॥

गुरुचरित्र कामधेनु । ऐकता न-धाये माझे मन ।
कांक्षीत होते अंतःकरण । कथामृत ऐकावया ॥२॥

ध्यान लागले श्रीगुरुचरणी । तृप्ति नव्हे अंतःकरणी ।
कथामृत संजीवनी । आणिक निरोपावे दातारा ॥३॥

येणेपरी सिद्धासी । विनवी शिष्य भक्तीसी ।

माथा लावूनि चरणांसी । कृपा भाकी तये वेळी ॥४॥

शिष्यवचन ऐकोनि । संतोषला सिद्धमुनि ।
सांगतसे विस्तारोनि । ऐका श्रोते एकचित्ते ॥५॥

ऐक शिष्या शिकामणी । धन्य धन्य तुझी वाणी ।
तुझी भक्ति श्रीगुरुचरणी । तल्लीन झाली परियेसा ॥६॥

तुजकरिता आम्हांसी । चेतन जाहले परियेसीं ।
गुरुचरित्र आद्यंतेसी । स्मरण जाहले अवधारी ॥७॥

भिल्लवडी स्थानमहिमा । निरोपिला अनुपमा ।
पुढील चरित्र उत्तमा । सांगेन ऐका एकचित्तें ॥८॥

क्वचित्काळ तये स्थानी । श्रीगुरु होते गौप्येनि ।
प्रकट जहाले म्हणोनि । पुढे निघाले परियेसा ॥९॥

वरुणासंगम असे ख्यात । दक्षिणवाराणसी म्हणत ।
श्रीगुरु आले अवलोकित । भक्तानुग्रह करावया ॥१०॥

पुढें कृष्णातटाकांत । श्रीगुरू तीर्थे पावन करीत ।
पंचगंगगासंगम ख्यात । तेथें राहिले द्वादशाब्दे ॥११॥

अनुपम्य तीर्थ मनोहर । जैसें अविमुक्त काशीपुर ।
प्रयागसमान तीर्थ थोर । म्हणोनि राहिले परियेसा ॥१२॥

कुरवपुर ग्राम गहन । कुरूक्षेत्र तोंचि जाण ।
पंचगंगासंगम कृष्णा । अत्योत्त्म परियेसा ॥१३॥

कुरुक्षेत्रीं जितके पुण्य । तयाहूनि अधिक असे जाण ।
तीर्थे अस्ती अगण्य़ । म्हणोनि राहिले श्रीगुरू ॥१४॥

पंचगंगानदीतीर । प्रख्यात असे पुराणांतर ।
पांच नामे आहेति थोर । सांगेन ऐका एकचित्तें ॥१५॥

शिवा भद्रा भोगावती । कुंभीनदी सरस्वती ।
‘ पंचगंगा’ ऐसी ख्याति । महापातक संहारी ॥१६॥

ऐसी प्रख्यात पंचगंगा । आली कृष्णेचिया संगा ।
प्रयागाहूनि असे चांगा । संगमस्थान मनोहर ॥१७॥

अमरापुर म्हणिजे ग्राम । स्थान असे अनुपम्य ।
जैसा प्रयागसंगम । तैसे स्थान मनोहर ॥१८॥

वृक्ष असे औदुंबर । प्रत्यक्ष जाणा कल्पतरु ।
देव असे अमरेश्वर । तया संगमा षटकूळी ॥१९॥

जैसी वाराणसी पुरी । गंगाभागीरथी-तीरी ।
पंचनदींसंगम थोरी । तत्समान परियेसा ॥२०॥

अमरेश्वरसंनिधानी । आहेति चौसष्ट योगिनी ।
शक्तितीर्थ निर्गुणी । प्रख्यात असे परियेसा ॥२१॥

अमरेश्वरलिंग बरवे । त्यासी वंदुनि स्वभावे ।
पुजितां नर अमर होय । विश्वनाथ तोचि जाणा ॥२२॥

प्रयागी करितां माघस्नान । जें पुण्य होय साधन ।
शतगुण होय तयाहून । एक स्नाने परियेसा ॥२३॥

सहज नदीसंगमांत । प्रयागसमान असे ख्यात ।
अमरेश्वर परब्रह्म वस्तु । तया स्थानी वास असे ॥२४॥

याकारणें तिये स्थानी । कोटितीर्थे असती निर्गुणी ।
वाहे गंगो दक्षिणी । वेणीसहित निरंतर ॥२५॥

अमित तीर्थे तया स्थानी । सांगता विस्तार पुराणीं ।
अष्टतीर्थ ख्याति जीण । तया कृष्णातटाकांत ॥२६॥

उत्तर दिशी असे देखा वहे कृष्णा पश्चिममुखा ।
‘शुक्लतीर्थ’ नाम ऐका । ब्रहम्हत्यापाप दूर ॥२७॥

औदुंबर सन्मुखेसी । तीनी तीर्थे परियेसी ।
एकानंतर एक धनुषी । तीर्थे असती मनोहर ॥२८॥

‘पापविनाशी’ ‘काम्यतीर्थ’ । तिसरें सिध्द ‘ वरदतीर्थ ।
अमरेश्वरसंनिधार्थ । अनुपम्य असे भूमंडळी ॥२९॥

पुढें संगम-षट्‍कुळांत । प्रयागतीर्थ असे ख्यात ।
‘ शाक्तितीर्थ’ अमरतीर्थ’ । कोटितीर्थ’ परियेसा ॥३०॥

तीर्थे असती अपरांपर । सांगता असे विस्तार ।
याकारणें श्रीपादगुरु । राहिले तेथें द्वादशाब्दें ॥३१॥

कृष्णा वेणी नदी दोनी । पंचगंगा मिळोनी ।
सप्तनदीसंगम सगुणी । काय सांगू महिमा त्याची ॥३२॥

ब्रह्महत्यादि महापातकें । जळोनि जातीं स्नानें एकें ।
ऐसें सिध्द्स्थान निकें । सकळाभीष्ट होय तेथें ॥३३॥

काय सांगूं त्यांची महिमा । आणिक द्यावया नाहीं उपमा ।
दर्शनमातें होती काम्या । स्नानफळ काय वर्णू ॥३४॥

साक्षात् कल्पतरु । असे वृक्ष औदुबरु ।
गौप्य होऊन अगोचरु । राहिले श्रीगुरु तया स्थानी ॥३५॥

भक्तजनतारणार्थ । होणार असे ख्यात ।
राहिले तेथें श्रीगुरुनाथ । म्हणोनि प्रकट जाहले जाणा ॥३६॥

असता पुढें वर्तमानीं । भिक्षा करावया प्रतिदिनीं ।
अमरापुर ग्रामी । जाती श्रीगुरु परियेसा ॥३७॥

तया ग्रामी द्विज एक । असे वेदभ्यासक ।
त्याची भार्या पतिसेवक । पतिव्रतशिरोमणी ॥३८॥

सुक्षीण असे तो ब्राह्मण । शुक्लभिक्षा करी आपण ।
कर्ममार्गी आचरण । असे सात्विक वृत्तीनें ॥३९॥

तया विप्रमंदिरांत । असे वेल उन्नत ।
शेंगा निघती नित्य बहुत । त्याणे उदरपूर्ति करी ॥४०॥

एखादे दिवशी त्या ब्राह्मणासी । वरो न मिळे परियेसीं ।
तया शेंगांते रांधोनि हर्षी । दिवस क्रमी येणेंपरी ॥४१॥

ऐसा तो ब्राह्मण दरिद्री । याचकारणें उदर भरी ।
पंचमहायज्ञ कुसरी । अतिथि पूजी भक्तीनें ॥४२॥

वर्तता श्रीगुरु एके दिवसीं । तया विप्रमंदिरासी ।
गेले आपण भिक्षेसी । नेलें विप्रे भक्तिनें ॥४३॥

भक्तिपूर्वक श्रीगुरूसी । पूजा करी तो षोडशी ।
घेवडे-शेंगा बहुवसी । केली होती पत्र-शाका ॥४४॥

भिक्षा करून ब्राह्मणासी । आश्वासिती गुरु संतोषी ।
गेलें तुझे दरिद्र दोषी । म्हणोनी निघती तये वेळी ॥४५॥

तया विप्राचे गृहांत । जो का होता वेल उन्नत ।
घेवडा नाम विख्यात । आंगण सर्व वेष्टिलें असे ॥४६॥

तया वेलाचें झाडमूळ श्रीगुरुमूर्ति छेदिती तात्काळ ।
टाकोनि देती परिबळें । गेले आपण संगमासी ॥४७॥

विप्रवनिता तये वेळी । दु:ख करिती पुत्र सकळी ।
म्हणती पहा हो दैव बळी । कैसें अदृष्ट आपुलें ॥४८॥

आम्हीं तया यतीश्वरासी । काय उपद्रव केला त्यासी ।
आमुचा ग्रास छेदुनी कैसी । टाकोनि दिल्हा भूमीवरी ॥४९॥

ऐसेपरी ते नारी । दु:ख करी नानापरी ।
पुरुष तिचा कोप करी । म्हणे प्रारब्ध प्रमाण ॥५०॥

म्हणे स्त्रियेसी तये वेळी । जें जें होणार जया काळी ।
निर्माण करी चंद्रमोळी । तया आधीन । विश्व जाण ॥५१॥

विश्वव्यापक नारायण । उत्पत्तिस्थितिलया कारण ।
पिपीलिकादि स्थूळ-जीवन । समस्तां आहार पुरवीतसे ॥५२॥

‘आयुरन्नं प्रयच्छति’ । ऐसें बोले वेदश्रुति ।
पंचानन आहार हस्ती । केवी करी प्रत्यही ॥५३॥

चौर्‍यायशी लक्ष जीवराशी । स्थूल सूक्ष्म समस्तांसी ।
निर्माण केलें आहारासी । मग उत्पत्ति तदनंतरें ॥५४॥

रंकरायासी एक दृष्टी । करुनि निक्षेपण ।सकृत अथवा दुष्कृत्य जाण ।
आपुलें आपणचि भोगणें । पुढील्यावरी काय बोल ॥५६॥

आपुलें दैव असतां उणें । पुढिल्या बोलती मूर्खपणे ।
जे पेरिलें तोंचि भक्षणें । कवणावरी बोल सांगे ॥५७॥

बोल ठेविसी यतीश्वरासी । आपलें आर्जव न विचारिसी ।
ग्रास हरितला म्हणसी । अविद्यासागरी बुडोनि ॥५८॥

तो तारक आम्हांसी ।म्हणोनि आला भिक्षेसी ।
नेलें आमुचे दरिद्रदोषी । तोचि तारील आमुतें ॥५९॥

येणेंपरी स्त्रियेसी । संभाषी विप्र परियेसी ।
काढोनि वेलशाखेसी । टाकीता झाला गंगेत ॥६०॥

तया वेलाचें मूळ थोरी । जे कां होतें आपुले द्वारी ।
काढूं म्हणुनि द्विजवरी । खणिता झाला तया वेळीं ॥६१॥

काढितां वेलमूळासी । लाधला कुंभे निधानेसी ।
आनंद जाहला बहुवसी । घेऊनि गेला घरांत ॥६२॥

म्हणती नवल काय वर्तले । यतीश्वर आम्हां प्रसन्न्न झाले ।
म्हणोनि ह्या वेला छेदिलें । निधान लाधलें आम्हांसी ॥६३॥

नर नव्हे तो योगीश्वर होईल ईश्वरीअवतार ।
आम्हां भेटला दैन्यहर । म्हणती चला दर्शनासी ॥६४॥

जाऊनि संगमा श्रीगुरुसी । पूजा करिती बहुवसी ।
वृत्तांत सांगती तयासी । तये वेळी परियेसा ॥६५॥

श्रीगुरु म्हणती तयासी । तुम्ही न सांगणें कवणासी ।
प्रकट करितां आम्हांसी । नसेल लक्ष्मी तुमचे घरी ॥६६॥

ऐसेपरी तया द्विजासी । सांगे श्रीगुरु परियेसी ।
अखंड लक्ष्मी तुमचे वंशी । पुत्रपौत्री नांदाल ॥६७॥

ऐसा वर लधोन । गेली वनिता तो ब्राह्मण ।
श्रीगुरुकृपा ऐसी जाण । दर्शनमात्रे दैन्य हरे ॥६८॥

ज्यासी होय श्रीगुरुकृपा । त्यासी कैचें दैन्य पाप ।
कल्पवृक्ष-आश्रय करितां बापा । दैन्य कैंचे तया घरी ॥६९॥

दैव उणा असेल जो नरु । त्याणें आश्रयावा श्रीगुरु ।
तोचि उतरेल पैलपारु । पूज्य होय सकळिकांई ॥७०॥

जो कोण भजेल श्रीगुरु । त्यासी लाधेल इह-परु ।
अखंड लक्ष्मी त्याचे घरी । अष्टैश्वर्ये नांदती ॥७१॥

सिध्द म्हणे नामधारकासी । श्रीगुरुमहिमा असे ऐसी ।
भजावे तुम्हीं मनोमानसीं । कामधेनु तुझ्या घरीं ॥७२॥

गंगाधराचा कुमर । सांगे श्रीगुरुचरित्रविस्तार ।
पुढील कथामृतसार । ऐका श्रोते एकचित्तें ॥७३॥

इति श्रीगुरुचरित्रामृते परमकथाकल्पतरौ श्रीनृसिंहसरस्वत्युपाख्याने सिध्द-नामधारकसंवादे अमरापुरमहिमानं-द्विजदैन्यहरणं नाम अष्टादशोऽध्याय: ॥ १८ ॥

॥ श्रीपादश्रीवल्लभ-नृसिंहसरस्वती-दत्तात्रेयार्पणमस्तु ॥ श्रीगुरुदेव दत्त ॥ शुभं भवतु ॥

=============

प्रिय वाचकहो, उत्तम बोधकथा/moral stories in marathi, प्रेम कथा, रहस्य कथा, कथामालिका, भारतातील संस्कृतीचे विविध पैलू, पर्यटन, खाद्यसंस्कृती, फॅशन, पॅरेंटिंग, लाईफस्टाईल ब्लॉग्स वाचायचे असतील तर रीतभातमराठीला नक्की भेट द्या.

Share your love
Facebook
Twitter

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *