गुरुचरित्र चौदावा अध्याय : कुठल्याही संकटातून मुक्ती मिळवण्यासाठी नित्यसेवेमधे हा अध्याय जरूर वाचा

gurucharitra adhyay 14 pdf : ज्यामुळे आजही सगळेच संकटे दूर होतात आणि अडचणीतून मार्ग निघतो शिवाय मनाला शांतता मिळते.
दत्त संप्रदायातील करोडो लोकांचा विश्वास आणि पवित्र वेद म्हणजे गुरूचरित्र. गुरूचरित्र १५ व्या १६ व्या शतकात श्री सरस्वती गंगाधर स्वामींनी लिहलेले होते. या पोथीचे पारायण सात दिवसात केले जाते. यात एकूण ५३ अध्यात आहेत आणि प्रत्येक अध्याय वाचण्याचे फळ देखील आहे. या ग्रंथाचे पारायण मार्गशीर्ष महिन्यात येणाऱ्या पौर्णिमेआधी आठ दिवस करतात आणि पौर्णिमेच्या दिवशी उद्यापन केले जाते.
गुरूचरित्र पठण फायदे
खरतर गुरुचरित्र ग्रंथाचा प्रत्येक अध्याय वेगळे आणि विशेष फळ देणारा आहे. तरीही काही रहस्यमय फायदे बघुया आणि प्रत्येक अध्याय वाचनाचे फल ही जाणून घेऊया.
१. जेंव्हा एखादे गंभीर संकट आपल्या स्वतःवर किंवा आपल्या कुटुंबावर येते, सगळेच रस्ते बंद झालेत असे वाटायला लागते त्यावेळेस या ग्रंथाच्या पारायणाने संकटातून बाहेर पडण्याचा मार्ग सापडतो अशी मान्यता आहे.
२. या ग्रंथामध्ये प्रत्येक अक्षर एखाद्या मंत्रप्रमाणे आहे त्यामुळेच तुमच्या कुठल्याही प्रकारचे आजार याच्या वाचनाने नष्ट होते.
३. गुरूंचा आशीर्वाद प्राप्त झाला आणि गुरुभक्ती मनातून जागृत झाली की मनुष्य दुःख मुक्त होतो.
४. स्वतःच्या घरामध्ये गुरूचरित्र वाचन केल्याने घरातील नको ते दबावाचे वातावरण कमी होऊन एक आगळावेगळा आनंद चैतन्य व प्रसन्नता निर्माण होते.
५. प्रखर पितृदोष व वास्तुदोष यावरती उपाय म्हणून संकल्प युक्त गुरुचरित्र पारायण केल्यास खूप लवकर प्रभावी अनुभव येतात.
आता प्रत्येक अध्यायाची फलश्रुती बघुया.
ज्यांना संपूर्ण पारायण करणे शक्य होत नाही अशा लोकांनी अध्यायाच्या फलश्रुती प्रमाणे वाचन केले तरीही फायदा होतो.
गुरुचरित्राचे अध्यानुसार फायदे | फलश्रुती
अध्याय १- नित्य गुरुचिन्तनाने संपूर्ण जीवन मंगलमय होते.
अध्याय २- कलीबाधा व सर्व रोगबाधा नाहीशी होतात.
अध्याय३- गुरुकोपाचे शमन होते. व व्रताची पूर्तता होते.
अध्याय ४- स्त्रीछलणाचा दोष जातो व स्वहिताचे रक्षण होते.
अध्याय ५- शाररिक व्यंगे नष्ट होतात. ज्ञानाची प्राप्ती होते.
अध्याय ६- दैवी कोप दूर होतो. व विद्याप्राप्ती होते.
अध्याय ७- पंचमहापापादी सर्व पातके नाहीशी होतात.
अध्याय ८- बुध्दिमांद्य नाहिशे होतात. विवाह कार्य सुलभ होते.
अध्याय ९- सर्व शुभकामना गुरुकृपेने पूर्ण होतात.
अध्याय १०- नवस फळाला येतात. चोरीचा आळ दूर होतो.
अध्याय ११- वाचंदोष तसेच,वेड नाहीसे होते.
अध्याय १२- संकटे, दैन्य दारिद्र्य यांचे निवारण होते.
अध्याय १३- सर्व प्रकारच्या पोटाच्या व्याधी नाहीशा होतात.
अध्याय १४- प्राणघातक गंडातरापासून स्वरक्षण लाभते. (गुरुचरित्र 14 वा अध्याय फायदे)
अध्याय १५- तिर्थयात्रांना सफलता प्राप्त होते.
अध्याय १६- आदरणीयची निंदा, अपमान केल्याचा दोष दूर होतो.
अध्याय १७- ज्ञान व गुरुकृपा यांचा लाभ होतो.
अध्याय १८- संपत्तीचा लाभ होऊन दारिद्र्य नाहिशे होते.
अध्याय १९- भाग्य वृद्धी होते. सद्गुगुरूंचा लाभ होतो. त्रीस्थळी यातरपुण्य लाभते.
अध्याय २०- गुरूस्मरण करुनी मनी, पूजा करी वो गुरुचरणी, तुझे पाप होईल धुनी, ब्रह्मासमंध परिहरेल!!
अध्याय २१- मृत्यूभयापासून मुक्तता .
अध्याय २२- वांझपण दूर होते. बाळणतिनिला चांगले दूध येते.
अध्याय २३- पिशाच्चबाधा नष्ट होते. राजमान्यता प्राप्त होते.
अध्याय २४- भ्रम व वैचारिक गोंधळ दूर होऊन मनशांती लाभते.
अध्याय २५- अपात्र लोकांचा संपर्कात त्यांचे दुष्परिणाम टळतात.
अध्याय २६- शत्रू निष्प्रभ होऊन शरण होतात.
अध्याय २७ – गर्व नष्ट होऊन चित्त शुद्ध होते.
अध्याय २८- वाईट कर्माचे दोष दूत होतात , सप्तथ सापडतो.
अध्याय २९- स्त्रीछलदोष , वासनादोष दूर होऊन पावित्र्य लाभते.
अध्याय ३०- कुमारिकांना इच्छित पतीचा प्राप्ती होते. सौभाग्य वृद्धी होते.
अध्याय ३१- पतीवर येणारे विघ्ने टळतात.
अध्याय ३२- वैधव्याचे दुःख टळते अथवा सुसह्य होते.
अध्याय ३३- वचनभंग व व्यभिचार दोष दूर होऊन सदगती लाभते.
अध्याय ३४ – प्राणसंकटाचे निवारण होऊन आयुष्य वृद्धी होते.
अध्याय ३५ – हरवलेले , नष्ट झालेले पुन्हा प्राप्त होते तूटलेले संबंध जुळतात.
अध्याय ३६- चूकीच्या समजुती जाऊन अंतःकरण शुद्ध होते.
अध्याय ३७- मूढ बुद्धी नष्ट होऊन योग्य ज्ञान व ब्रह्मा प्राप्ती होते.
अध्याय ३८- निंदा करणारे शरण येतात, अन्नपूर्णा नित्य प्रसन्न राहते.
अध्याय ३९- सद्गुगुरुची प्राप्ती होऊन योग्य मार्ग सापडतो .
अध्याय ४०-कुष्ठरोग नाहीसा होऊन शरीर निकोप होते.
अध्याय ४१- सद्गुगुरूंची प्राप्ती होऊन योग्य मार्ग सापडतो.
अध्याय ४२- विद्या व फलाची प्राप्ती होऊन कर्तबगारिला यश येते.
अध्याय ४३- गर्व व क्रोध नाहीसा होऊन एशवर्या ची प्राप्ती होते.
अध्याय ४४- मनातील भ्रम दूर होऊन योग्य मार्ग लाभतो.
अध्याय ४५- कुष्ठरोग नाहीसा होतो, गुरुनिष्ठ सफल होते. बुद्धी वाढते.
अध्याय ४६- चिंताची स्थिरता लाभते. ज्ञानाची प्राप्ती होते.
अध्याय ४७- पक्षपाताचा दोष नाहीसा होऊन समत्वबुद्धी प्राप्त होते.
अध्याय ४८- गुरुनिष्ठास विपुल समृद्धी प्राप्ती होते.विघ्ने टळते.
अध्याय ४९- तीर्थक्षेत्राबद्दल आदर वाढतो. सर्व पापांचे समान होते.
अध्याय ५०- ग्रँथी रोग , त्वचारोग नष्ट होऊन शरीरसुख लाभते.
अध्याय ५१- सुखसमृद्धी व अंती मोक्ष प्राप्ती होते.
अध्याय ५२ – श्रद्धेला चांगली फळे येतात व संपूर्ण ग्रंथ वाचनाचे फळ मिळते.
हेही वाचा
वैभवलक्ष्मी व्रताविषयी संपूर्ण माहिती. कुणी व कसे करावे?
कृष्णाला नैवेद्य म्हणून छपन्न भोगच का दाखवतात?
गुरूचरित्र अध्याय १४ | gurucharitra adhyay 14 pdf
श्रीगणेशाय नमः ॥ श्रीसरस्वत्यै नमः ॥ श्रीगुरुभ्यो नमः ॥
नामधारक शिष्य देखा । विनवी सिद्धासी कवतुका ।
प्रश्न करी अतिविशेखा । एकचित्तें परियेसा ॥१॥
जय जया योगीश्वरा । सिद्धमूर्ति ज्ञानसागरा ।
पुढील चरित्र विस्तारा । ज्ञान होय आम्हांसी ॥२॥
उदरव्यथेच्या ब्राह्मणासी । प्रसन्न जाहले कृपेसीं ।
पुढें कथा वर्तली कैसी । विस्तारावें आम्हांप्रति ॥३॥
ऐकोनि शिष्याचें वचन । संतोष करी सिद्ध आपण ।
गुरुचरित्र कामधेनु जाण । सांगता जाहला विस्तारें ॥४॥
ऐक शिष्या शिखामणि । भिक्षा केली ज्याचे भुवनीं ।
तयावरी संतोषोनि । प्रसन्न जाहले परियेसा ॥५॥
गुरुभक्तीचा प्रकारु । पूर्ण जाणे तो द्विजवरु ।
पूजा केली विचित्रु । म्हणोनि आनंद परियेसा ॥६॥
तया सायंदेव द्विजासी । श्रीगुरु बोलती संतोषीं ।
भक्त हो रे वंशोवंशीं । माझी प्रीति तुजवरी ॥७॥
ऐकोनि श्रीगुरुचें वचन । सायंदेव विप्र करी नमन ।
माथा ठेवून चरणीं । न्यासिता झाला पुनःपुन्हा ॥८॥
जय जया जगद्गुरु । त्रयमूर्तीचा अवतारू ।
अविद्यामाया दिससी नरु । वेदां अगोचर तुझी महिमा ॥९॥
विश्वव्यापक तूंचि होसी । ब्रह्मा-विष्णु-व्योमकेशी ।
धरिला वेष तूं मानुषी । भक्तजन तारावया ॥१०॥
तुझी महिमा वर्णावयासी । शक्ति कैंची आम्हांसी ।
मागेन एक आतां तुम्हांसी । तें कृपा करणें गुरुमूर्ति ॥११॥
माझे वंशपारंपरीं । भक्ति द्यावी निर्धारीं ।
इह सौख्य पुत्रपौत्रीं । उपरी द्यावी सद्गति ॥१२॥
ऐसी विनंति करुनी । पुनरपि विनवी करुणावचनीं ।
सेवा करितो द्वारयवनीं । महाशूरक्रूर असे ॥१३॥
प्रतिसंवत्सरीं ब्राह्मणासी । घात करितो जीवेसीं ।
याचि कारणें आम्हांसी । बोलावीतसे मज आजि ॥१४॥
जातां तया जवळी आपण । निश्चयें घेईल माझा प्राण ।
भेटी जाहली तुमचे चरण । मरण कैंचें आपणासी ॥१५॥
संतोषोनि श्रीगुरुमूर्ति । अभयंकर आपुले हातीं ।
विप्रमस्तकीं ठेविती । चिंता न करीं म्हणोनियां ॥१६॥
भय सांडूनि तुवां जावें । क्रूर यवना भेटावें ।
संतोषोनि प्रियभावें । पुनरपि पाठवील आम्हांपाशीं ॥१७॥
जंववरी तूं परतोनि येसी । असों आम्ही भरंवसीं ।
तुवां आलिया संतोषीं । जाऊं आम्ही येथोनि ॥१८॥
निजभक्त आमुचा तूं होसी । पारंपर-वंशोवंशीं ।
अखिलाभीष्ट तूं पावसी । वाढेल संतति तुझी बहुत ॥१९॥
तुझे वंशपारंपरीं । सुखें नांदती पुत्रपौत्रीं ।
अखंड लक्ष्मी तयां घरीं । निरोगी होती शतायुषी ॥२०॥
ऐसा वर लाधोन । निघे सायंदेव ब्राह्मण ।
जेथें होता तो यवन । गेला त्वरित तयाजवळी ॥२१॥
कालांतक यम जैसा । यवन दुष्ट परियेसा ।
ब्राह्मणातें पाहतां कैसा । ज्वालारुप होता जाहला ॥२२॥
विमुख होऊनि गृहांत । गेला यवन कोपत ।
विप्र जाहला भयचकित । मनीं श्रीगुरुसी ध्यातसे ॥२३॥।
कोप आलिया ओळंबयासी । केवीं स्पर्शे अग्नीसी ।
श्रीगुरुकृपा होय ज्यासी । काय करील क्रूर दुष्ट ॥२४॥
गरुडाचिया पिलियांसी । सर्प तो कवणेपरी ग्रासी ।
तैसें तया ब्राह्मणासी । असे कृपा श्रीगुरुची ॥२५॥
कां एखादे सिंहासी । ऐरावत केवीं ग्रासी ।
श्रीगुरुकृपा होय ज्यासी । कलिकाळाचें भय नाहीं ॥२६॥
ज्याचे ह्रुदयीं श्रीगुरुस्मरण । त्यासी कैंचें भय दारुण ।
काळमृत्यु न बाधे जाण । अपमृत्यु काय करी ॥२७॥
ज्यासि नाहीं मृत्यूचें भय । त्यासी यवन असे तो काय ।
श्रीगुरुकृपा ज्यासी होय । यमाचें मुख्य भय नाहीं ॥२८॥
ऐसेपरी तो यवन । अंतःपुरांत जाऊन ।
सुषुप्ति केली भ्रमित होऊन । शरीरस्मरण त्यासी नाहीं ॥२९॥
ह्रुदयज्वाळा होय त्यासी । जागृत होवोनि परियेसीं ।
प्राणांतक व्यथेसीं । कष्टतसे तये वेळीं ॥३०॥
स्मरण असें नसे कांहीं । म्हणे शस्त्रें मारितो घाई ।
छेदन करितो अवेव पाहीं । विप्र एक आपणासी ॥३१॥
स्मरण जाहलें तये वेळीं । धांवत गेला ब्राह्मणाजवळी ।
लोळतसे चरणकमळीं । म्हणे स्वामी तूंचि माझा ॥३२॥
येथें पाचारिलें कवणीं । जावें त्वरित परतोनि ।
वस्त्रें भूषणें देवोनि । निरोप देतो तये वेळीं ॥३३॥
संतोषोनि द्विजवर । आला ग्रामा वेगवक्त्र ।
गंगातीरीं असे वासर । श्रीगुरुचे चरणदर्शना ॥३४॥
देखोनियां श्रीगुरुसी । नमन करी तो भावेसीं ।
स्तोत्र करी बहुवसीं । सांगे वृत्तांत आद्यंत ॥३५॥
संतोषोनि श्रीगुरुमूर्ति । तया द्विजा आश्वासिती ।
दक्षिण देशा जाऊं म्हणती । स्थान-स्थान तीर्थयात्रे ॥३६॥
ऐकोनि श्रीगुरूचें वचन । विनवीतसे कर जोडून ।
न विसंबें आतां तुमचे चरण । आपण येईन समागमें ॥३७॥
तुमचे चरणाविणें देखा । राहों न शके क्षण एका ।
संसारसागरतारका । तूंचि देखा कृपासिंधु ॥३८॥
उद्धरावया सगरांसी । गंगा आणिली भूमीसी ।
तैसें स्वामीं आम्हांसी । दर्शन दिधलें आपुलें ॥३९॥
भक्तवत्सल तुझी ख्याति । आम्हां सोडणें काय निति ।
सवें येऊं निश्चितीं । म्हणोनि चरणीं लागला ॥४०॥
येणेंपरी श्रीगुरुसी । विनवी विप्र भावेसीं ।
संतोषोनि विनयेसीं । श्रीगुरु म्हणती तये वेळीं ॥४१॥
कारण असे आम्हां जाणें । तीर्थे असती दक्षिणे ।
पुनरपि तुम्हां दर्शन देणें । संवत्सरीं पंचदशीं ॥४२॥
आम्ही तुमचे गांवासमीपत । वास करुं हें निश्चित ।
कलत्र पुत्र इष्ट भ्रात । मिळोनि भेटा तुम्ही आम्हां ॥४३॥
न करा चिंता असाल सुखें । सकळ अरिष्टें गेलीं दुःखें ।
म्हणोनि हस्त ठेविती मस्तकें । भाक देती तये वेळीं ॥४४॥
ऐसेपरी संतोषोनि । श्रीगुरु निघाले तेथोनि ।
जेथें असे आरोग्यभवानी । वैजनाथ महाक्षेत्र ॥४५॥
समस्त शिष्यांसमवेत । श्रीगुरु आले तीर्थे पहात ।
प्रख्यात असे वैजनाथ । तेथें राहिले गुप्तरुपें ॥४६॥
नामधारक विनवी सिद्धासी । काय कारण गुप्त व्हावयासी।
होते शिष्य बहुवसी । त्यांसी कोठें ठेविलें ॥४७॥
गंगाधराचा नंदनु । सांगे गुरुचरित्र कामधेनु ।
सिद्धमुनि विस्तारुन । सांगे नामकरणीस ॥४८॥
पुढील कथेचा विस्तारु । सांगतां विचित्र अपारु ।
मन करुनि एकाग्रु । ऐका श्रोते सकळिक हो ॥४९॥
इति श्रीगुरुचरित्रामृते परमकथाकल्पतरौ श्रीनृसिंहसरस्वत्युपाख्याने सिद्ध-नामधारकसंवादे क्रूरयवनशासनं-सायंदेववरप्रदानं नाम चतुर्दशोऽध्यायः ॥१४॥
॥ श्रीगुरुदेव दत्त ॥ ॥ ओंवीसंख्या ४९ ॥
॥श्रीगुरुदत्तात्रेयार्पणमस्तु॥
===============
प्रिय वाचकहो, उत्तम बोधकथा/moral stories in marathi, प्रेम कथा, रहस्य कथा, कथामालिका, भारतातील संस्कृतीचे विविध पैलू, पर्यटन, खाद्यसंस्कृती, फॅशन, पॅरेंटिंग, लाईफस्टाईल ब्लॉग्स वाचायचे असतील तर रीतभातमराठीला नक्की भेट द्या.
1 Comment
Buzz Story
whoah this weblog is magnificent i really like reading your posts. Stay up the good work! You understand, a lot of individuals are looking round for this information, you can aid them greatly. |