Ritbhatmarathi

Search
Close this search box.

नेहा आणि वरुण  गेले ५ वर्ष कॅलिफोर्निया मध्ये सेटल होते. दोघेही नोकरी करत असल्याने लग्नाला ७ वर्षे झाली होती तरी अजून काही घरात पाळणा हलला नव्हता . दोघांनाही कॅलिफोर्निया मध्ये जॉब असल्याने बक्कळ कमाई होती. स्वतःचं घर देखील घेतलं होतं.  आता दोघांनाही वाटत होतं कि आता बेबी प्लॅन करायला हवं आणि दोघांच्याही घरच्यांच्या अपेक्षा होत्या कि पैसा कितीही कमावला तरी टाईमवर  ज्या त्या गोष्टी झाल्याचं पाहिजे. म्हणून नेहा वरुणने तिथल्या डॉक्टरांच्या सल्ल्याने चान्स घेतला आणि पुढच्या २-३ महिन्यातच गुड न्यूज आली.

नेहा वरुणची बातमी येताच दोघांच्याही घरी आनंदाचे वातावरण पसरले होते. नेहाला ९वा महिना लागताच नेहा वरुण दोघांच्याही आईंना कॅलिफोर्नियात बोलवून घ्यायचं ठरलं होतं. त्यासाठी आधीच दोघीचे पासपोर्ट्स वगैरे तैयार करून ठेवले होते. दोघांच्याही आई तिकडे पोहोचल्यावर ९व्या महिन्यात नेहाचं डोहाळेजेवण ..(बेबी शॉवर) करायचाही प्लॅन ठरला होता. त्यासाठी दोघांच्या हि आईंची तयारी जोरात सूरू होती. वरुण घरात सगळ्यात मोठा असल्याने त्याच्या घरातलं हे पहिलंच बाळंतपण होतं त्यामुळे वरूणच्या आईला थोडीफारच माहिती होती त्यामुळे त्या नेहाच्या आईला किंवा वरुणच्या नानीला विचारत असत. सगळी तयारी जोरात चालू होती. पण नियतीला काही भलतंच मंजूर होतं. नेहाला ८वा चालू झाला आणि इकडे तिच्या आईचा ऍक्सीडेन्ट झाला. त्यात नेहाच्या आईचा उजवा पाय फ्रॅक्चर झाला होता. डॉक्टरांनी बजावलं कि पुढचे ३-४ महिने पाय खाली टेकवायचा नाही. झालं ! कॅलिफोर्नियाला जायची केलेली सगळी तयारी….नेहाचं डोहाळेजेवण..तिचं बाळंतपण सगळं कसं होणार ह्याची चिंता सगळ्यांना खायला लागली. 

शेवटी खूप विचार केल्यावर असं ठरलं कि वरूणच्या आईला सोबती म्हणून वरूनच्या नानीलाही कॅलिफोर्नियात पाठवायचं. नेहाला आधीच धसकी भरली होती कि बाळंतपणात मुलगी तिच्या आईसोबत जेवढी कम्फर्टबल असते तेवढी सासूसोबत नाही आणि इथे तर सासुंसोबत सासूची आई देखील येतेय म्हटल्यावर नेहाला टेन्शन आलं होतं कि कसं होईल आता आपलं.

नेहाला ९वा महिना लागताच सासूबाई आणि वरुणची नानी तिथे पोहोचल्या. तिथे पोहोचल्यावर दोघीनींही नेहाला काहीही करू नाही दिलं. याउलट तिच्या खाण्यापिण्याची चांगली खबरदारी घेतली होती. टाइम टु टाइम तिला गोळ्या औषधं देणं ….तिच्या आवडीचे पदार्थ .. डिंकाचे .. खारीचे  लाडू ..वाह्ह नेहाची छान चंगळच होती.  नेहाचं डोहाळेजेवणही  मराठी आणि इंग्लिश पद्धतीने छान थाटामाटात झालं होतं.  वरुणच्या आईने आणि नानीने नेहाला आईची कमी वाटूच नाही दिली. नेहाही छान रुळली होती.

नेहाचे दिवस भरले आणि तिने छान गोंडस मुलीला जन्म दिला. नेहा जोवर हॉस्पिटल मध्ये होती तोवर वरुण पण तिच्यासोबतच होता तेव्हाही वरुणच्या आईने आणि नानीने परक्या देशात छान सांभाळलं होतं सगळं. नेहा घरी आल्यावर देखील त्यांनी तिची आणि बाळाची छान सोय करून ठेवली होती. नेहाला कधीच परकेपणा जाणवू नाही दिला. नेहा बाळाला घेऊन घरी आली तेव्हा बाळाला नाणी दाबून दाबून मसाज करायची आणि अंघोळ झाल्यावर दुपट्यात गुंडाळायची. नेहा शिकलेली आणि तिने असं कधी पाहिलंच नव्हतं त्यामुळे तिला ह्या गोष्टी फार खटकायच्या. ह्या गोष्टीला धरून नेहा वरुणमध्ये वाद होयला सुरुवात झाली होती.

एक दिवस मध्यरात्री बाळ अचानक रडायला लागलं. नेहाने दूध पाजलं तरीही रडणं काही थांबेना. वरुणनेही बाळाला शांत करायचा प्रयत्न केला तरी काही बाळाचं रडणं थांबलं नाही. बाळ सतत रडतच होतं. बाळाचं रडणं ऐकून वरुणची आई आणि नानी नेहाच्या रूममध्ये आल्या. त्यांनीही बाळाला शांत करायचा प्रयत्न केला पण बाळ रडतच होतं. शेवटी वरुणची नानी बोलली कि,

“बाळाचं पोट दुखत आहे, त्यामुळेच रडत आहे.”

“बाळाला थोडं हिंग कोमट करून लावू या आपण आणि सुती कपड्याने पोटाला थोडं शेकवलं कि बरं वाटेनं बघ तिला.”

नेहा – “बिलकुल नाही हा आजी, मी माझ्या डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय काहीही करणार नाही”

 “आणि आजी तुम्ही बाळाला चोळून चोळून जो मसाज करता आणि दाबून दुपट्यात गुंडाळता मला अजिबात नाही आवडत हे..इथे अशी पद्धत नाहीये.”

“माझा बिलकुल ह्या घरगुती उपचारावर भरवसा नाही आणि बाळाच्या बाबतीत तर मी अजिबात रिस्क घेणार नाही.”

नेहाची सासू नेहाला शांत करत – ” हे बघ नेहा बेटा..तुझंही बरोबर आहे पण माझ्या आईला एवढ्या वर्षांचा अनुभव आहे आणि आम्हीही आमच्या पोरांच्या वेळेस असंच करायचो..बरं वरुण नेहाला नसेल पटत तर काही हरकत नाही..तू आताच तुमच्या डॉक्टरांना फोन कर आणि बघ ते फोन वरच काही सांगतायेत का.?”

वरुण आणि नेहा आपल्या डॉक्टरला सतत फोन करत होते पण त्यांनी फोन उचलला नाही. शेवटी वरुणने नेहाला समजावून सांगितलं कि नानी जे सांगतेय ते एकदा ट्राय करायला हरकत नाही. काही केल्या बाळ रडायचं थांबेना आणि डॉक्टर फोनही उचलेना शेवटी नेहा नानींचा उपचार करायला तयार झाली.

पहाटेचे ४ वाजले होते. रात्री २ वाजल्यापासून बाळ सतत रडत होतं. नानीने सांगितलेला उपचार केला आणि काय आश्चर्य थोड्याच वेळात बाळ रडायचं थांबलं.

दूध पिऊन बाळ छान झोपीही गेलं पण रात्रभर मात्र सगळ्यांची झोप मोडली होती.

नेहा – “सॉरी नानी मला माफ करा , मी तुम्हाला नको ते बोलले… मी खूप पज़ेसिव झाले होते..आणि ह्यामध्ये तुम्ही माझ्यासाठी आतापर्यंत जे काही केलं ते सगळं विसरलेच होते.”

नानी – “आई आहेस गं तू ..आणि कोणतीही आई आपल्या बाळासाठी काळजी करणं साहजिकच आहे.”

तेवढ्यात बाळाने पुर्र्कन गॅस सोडला आणि नानींच्या गोदीमधेच शी केली.

नानी – ” बघितलं हा प्रसाद द्यायचा होता तिला म्हणून एवढ्या वेळचं सगळ्यांना जागवून ठेवलं होतं तिने. आता बघ कशी छान झोपते कि नाही.”

नानीचं बोलणं ऐकून सगळे हसायला लागले आणि बाळाने देखील झोपेत स्मितहास्य केलं.

© RitBhatमराठी

प्रिय वाचकहो आमच्या कथा तुम्हाला वाचायला आवडत असतील तर आमच्या फेसबुक पेजला फॉलो करून लेखकांना प्रतिसाद नक्की द्या. जेणेकरून नवोदित लेखकांना प्रेरणा मिळेल.

https://www.facebook.com/ritbhatmarati/

तसेच तुम्हालाही लिहायची आवड असेल तर आमच्याशी संपर्क साधा.

ritbhatmarathi@gmail.com

फोटो साभार – गूगल

आमची स्टोरी आमच्या/लेखकाच्या नावासकट शेयर केल्यास आम्हास काही हरकत नाही

=============

हेही वाचा

marathi goshta

marathi story

marathi moral stories

marathi love story

marathi motivational stories