Skip to content Skip to sidebar Skip to footer

ईश्वर योजना..

चित्रा आपल्या आईची एकुलती एक मुलगी…आपल्या नवऱ्याची तक्रार घेऊन आली…आणि आईला बिलगून रडू लागली…

चित्रा  – आई…मला गिरीश कडे जायचं नाहीय..हल्ली मला सारखं धारेवर धरतोय तो…

आई  – काय झालं..नक्कीच तुझंच काहीतरी चुकलं असेल…

चित्रा  – बोल…तुही मलाच बोल..गिरीश बोलतो ते बोलतो…त्याच्या आई, बहीण सगळेच बोलतात..

आई  – अशीच रडत बसणार आहेस कि सांगणारेस काहीतरी…

चित्रा  – अगं एक विडिओ रेकॉर्डिंग होत आमच्या साखरपुड्याचं आणि लग्नाचं तर माझ्याकडून तो पेनड्राईव्ह करप्ट झाला…मग त्यातलं ते रेकॉर्डिंग सगळं गायब झालं…मला कुठेही सापडलं नाही ते…बरं त्याचा बॅकअप तरी असायला हवा ना मग माझ्याकडे नाहीय तो…मला आता ज्यांनी विडिओ शूटिंग केलंय त्यांना मागावं लागेल ते…असेल त्यांच्याकडं तर बरं होईल… खूप खर्च केलायं ग गिरीशने त्यासाठी…५०,०००/- …..मला कळत नाही काय करावं ते…

आई  – चित्रा…इथे चूक तुझीच आहे…मग बोलणारच तुला…लग्नाची आठवण नाहीशी झालीय…कळतंय का तुला..

चित्रा  – मी काही जाणून-बुजून केलेलं नाहीय…

आई  – मग कसं…काय झालं..?

चित्रा  – मी तो १६ GB चा पेनड्राईव्ह माझ्या मोबाइलला अटॅच केला होता…

आई  – अगं…पेनड्राईव्ह होतो कि कनेक्ट मोबाइलला…माशी कुठे शिंकली..?

चित्रा  – बघ…तुलाही असंच वाटतं ना…मग मलाही असंच वाटलं…मी गिरीशला म्हटलं…कनेक्ट करू शकतो आपण मोबाईलला…तर गिरीश म्हणाला…’चित्रा मला न विचारता कुठलंही काम करत जाऊ नकोस’!

आई  – मग बरोबर आहे…माहिती नाहीय ना..मग कशाला घोळ घालत असतेस तू…जावईबापू ओरडले का तुला..

चित्रा  – हो…खूप ओरडले…[रडत-रडत आपल्या आईला सांगते]

आई  – मग चुकलीस ना तू माफी माग आणि मोकळी हो…मनावरचं ओझं हलकं होईल..तुलाच बरं वाटेल…! आणि..काय ग….हे घरी कुणाला सांगितलंय का जावईबापुनी..?

चित्रा  – नाही अजून…आणि मलाही बजावलं होत गिरीशने…कुणाला सांगू नकोस म्हणून..

आई  – किती ग..वेंधळी आहे तू…मलाही सांगितलंस ? आता हे तरी ऐकायचं ना जावईबापूंच…फोन कर त्यांना…पहिली माफी माग त्यांची…!

चित्रा  – ते नीट नाही बोलणार माझ्याशी…

आई  – हा…हे हि तू न बोलताच ठरवतेस कि काय परस्पर…सगळं कसं तुलाच माहिती हो ना…!

चित्रा  – आई…[मुसमुसत म्हणते]

आई  – आई….काय…आई…वय वाढलं पण अक्कल कधी वाढणार…इकडं आलीस हे तरी सांगून आलीस कि नाही तू जावईबापूना…?

चित्रा  – नाही..सांगितलं..मी रागातच आले…

आई  – काय…?? आत्ताच्या आत्ता…उठ फोन घे आणि कॉल करून कळवं तू कुठे आहेस ते…माझ्यासमोर कॉल कर…कसला एवढा राग आहे तुला…सात जन्म साथ द्यायची ठरवलीय…एवढ्यात नकोसे झाले का तुला ते…उठ फोन कर..आणि माफी माग…!

आपल्या आईचा आवाज चढताच चित्रा फोन घेते आणि गिरीशला कॉल करते…

चित्रा   – हॅलो…गिरीश..!

गिरीश – हा…कुठे गेलीस अचानक…तेही न सांगता…

चित्रा   – सकाळच्या प्रकाराबद्दल सॉरी म्हणते…खरच खूप चुकलं माझं…[रडत] मला नाही माहिती रे ते सगळं कसं करप्ट झालं ते…मला असं नव्हतं करायचं…पण माझा नाईलाज होता…मी तुला घाबरले आणि निघून आले..

गिरीश – मी काय तुला मारलं का ?

चित्रा   – मारलं नसतं…पण तुझ्या आईला…पपांना फोन करून सांगितलं असतं तू !

गिरीश – चित्रा…मी असं काहीही केलेलं नाहीय..

चित्रा   – मग…विडिओ बद्दल कुणी विचारलं तर काय सांगायचं…माझंच नाव सांगणार ना तू ?

गिरीश – तू कसं काय…ठरवतीस ग..? तुझं नाव नाही सांगणार मी…मी सांगेन माझ्याकडूनच खराब झालंय ते..पाण्यात पडलं आणि खराब झालं..असं सांगेन..

चित्रा   – थँक गॉड….आता माझ्या जीवात जीव आला…एनी वे तू कुठे आहेस…

गिरीश – मी ऑफिस मध्ये आहे..

चित्रा   – ओह्ह…पप्पा आणि आई कुठे आहेत…?

गिरीश – पप्पा आणि आई मार्केट मध्ये गेले आहे…मी तुला काही पैसे पाठवतो…

चित्रा   – कशाला…पाठवतोस..पैसे..?

गिरीश – अगं…आई विचारात होती…चित्रा कुठे गेलीय म्हणून…मी सांगितलं की शॉपिंगला गेलीय म्हणून…ड्रेस आणायला…पैसे पाठवतो मस्त ड्रेस घेऊन ये…चांगला किरमिजी कलर चा…आज बाहेर जाऊयात आपण दोघेच..

चित्रा   – ओह्ह्ह….माझं एवढं चुकलेलं असताना सुद्धा तू किती कॅज्युअल वागतोयस…मला वाटलं मी आज डेफिनेटली बोलणी खाते की काय तुझा…आणि मी उगाच घाबरत होते…

गिरीश – अजून किती दिवस घाबरणारेस तू मला…संसार व्हायचाय…दोघांपैकी कुणीतरी शहाणं असावं ना….चल बाय ठेवतो फोन…नाहीतर बॉस फायर करेल मला…[फोन ठवतो आणि आपल्या कामाला लागतो…चित्राला वाटत..गिरीश ऐकत असेल म्हणून ती म्हणते ]

चित्रा   – व्हॉट डू यू मिन…मी काय वेडी आहे का…थांब संध्याकाळी येतेच…[आणि जोरात हसते]

आई   – हसतेस काय वेड्यासारखी…केव्हाच फोन ठेऊन दिलाय जावईबापुनी…

चित्रा   – [आपल्या कपाळावर चापट मारते] चल निघते मी…

आई   – थांब… जाताना सगळे सकारात्मक विचार घेऊन जा…बस चहा ठेवते..जावईबापूनाही इथूनच बोलाव..

आपल्या आईच्या सांगण्यावरून चित्रा लगेचच गिरीशला कॉल करते आणि बोलावून घेते…आईही लेकीसाठी चहा घेऊन दिवाणखान्यात येते…

आई   – हे…घे चहा…आणि मी एक गोष्ट सांगते ऐकशील का…म्हणजे जाताना वाईट-साईट विचार येणार नाहीत..

चित्रा   – हा…आई सांग…ऐकते मी…

आई   – एक ना दलदलयुक्त परिसर असतो…त्यात एक सुंदर कमळ असते..कमळही खूप सुंदर असते शिवाय येणारे-जाणारे सगळे कमळाची स्तुती करत असतात…एक दिवस त्या कमळाच्या मनात विचार येतो..आपण एवढे सुंदर आहोत मग आपल्या आजूबाजूला ही सगळी घाण कशासाठी या घाणीमुळे आपलं सौन्दर्य कुठेतरी भंग पावतंय…मला दुसरीकडं गेलं पाहिजे…असं सारखं त्या कमळाला वाटत असत म्हणून…ते कमळ आपलं गाऱ्हाणं देवापुढे मांडतं….देवही कमळाला समजावतो पण कमळाला ती गोष्ट पटत नाही …देवही कमळाच्या मनासारखं त्याला एका राजवाड्याच्या समोर असणाऱ्या सुंदर तलावामध्ये विराजमान करतो…पण तिथेही कमळाची प्रशंसा होतेच…येणारे-जाणारे सगळे कमळाला सारखा-सारखा हात लावून डिवचत असतात…कारण तिथले तळे स्वछ असल्याने जो तो कमळाला हात लावून ओरबाडून पाहत होते …हे सगळं सोसून कमळाला आधीपेक्षा जास्तच त्रास होतो म्हणून ते कमळ देवाकडे जाऊन क्षमायाचना मागते…देवही मग कमळाला सांगतो..तुझ्या आजूबाजूला चिखल, दलदल आहे..पण ती सगळी तुझ्या संरक्षणार्थ आहे..तू त्या घाणेरड्या जागी होतास म्हणून तुला कुणी त्रास देत नव्हतं…काही गोष्टी आपल्या आजू-बाजूला असतात त्या चांगल्यासाठीच असतात..ही गोष्ट त्या कमळाला पटते आणि ते परत आपल्या आधीच्या जागी राहू लागते….

चित्रा  – अगं पण…यातून नेमका बोध काय घ्यायचा…

आई  – हम्म…म्हणूनच जावईबापू म्हणाले दोघातून एक तरी शहाणं पाहिजे…अगं तुझंही त्या कमळासारखंच आहे…तुझ्या आजूबाजूला खूप आव्हान आहेत…पण त्यातून तू काहीतरी शिकायला पाहिजे…जरासं कुणी काही बोललं की वाईट वाटून घ्यायचं नाही…समोरचा सांगतो ते आपल्या चांगल्यासाठीच असतं…हीच तर ईश्वर योजना आहे…

चित्रा  – ईश्वरयोजना…ती कशी काय..?

आई  – अगं…तुझ्या आजूबाजूला खूप खाचखळगे आहेत…पण त्यातून आपलं बळ वाढतं ग…त्याचा क्लेश, द्वेष करू नये…देवानं खूप विचार करून योजना आखलेली असते…अगदी ब्रह्मदेव कसा गाठी आधीच बांधून ठेवतो असे म्हणतात…तसेच खूप विचार करून तुमची जोडी देवाने बनवली आहे…एकमेकांना समजून घेणारे…तू आत्ताच बघ ना…तू रागाने कुणालाही न सांगता आलीस…पण तेच जावईबापुनी कुणाला कळून तरी दिल का ?तुझीच बाजू घेतली ना त्यांनीही…म्हणजे समजूनच घेतलं ना..तू फक्त डोक्यात गैरसमज करून घेतला…

इतक्यात बाहेर गाडीचा हॉर्न वाजतो… घेतलं गिरीश घरात येताच चित्रा गिरीशला मिठी मारते, “सॉरी गिरीश आणि थँक यु सो मच मला समजून घेतल्याबद्दल”

चहा-पानाचा कार्यक्रम उरकून गिरीश आणि चित्रा ठरवल्याप्रमाणे बाहेर फिरायला जातात.

==============

प्रिय वाचकहो आमच्या कथा तुम्हाला वाचायला आवडत असतील तर आमच्या फेसबुक पेजला फॉलो करून लेखकांना प्रतिसाद नक्की द्या. जेणेकरून नवोदित लेखकांना प्रेरणा मिळेल.

https://www.facebook.com/ritbhatmarati/

तसेच तुम्हालाही लिहायची आवड असेल तर आमच्याशी संपर्क साधा.

ritbhatmarathi@gmail.com

फोटो साभार – गूगल

आमची स्टोरी आमच्या/लेखकाच्या नावासकट शेयर केल्यास आम्हास काही हरकत नाही

=============

हेही वाचा

marathi goshta

marathi story

marathi moral stories

marathi love story

marathi motivational stories

Leave a Comment

error:

Warning

सध्या युट्युब वर कथा चोरी करून वाचून दाखवण्याचे धंदे चालू आहेत लोकांचे. आमच्या वेबसाईट वरची कथा कुठल्याही युट्युब चॅनेलवर बेकायदेशीररित्या आढळल्यास त्या चॅनेलला लगेच रिपोर्ट करण्यात येईल ह्याची कृपया दक्षता घ्यावी. तसेच आपल्या वाचकांपैकी कुणालाही असे बेकायदेशीर चॅनेल्स आढळल्यास आम्हाला ritbhatmarathi@gmail.com ह्या ई-मेल वर त्वरित कळवावे.