गिरनारची पौराणिक कथा : जाणून घ्या गिरनार परिक्रमा का पुण्यदायी आहे?

गिरनार परिक्रमा: गिरनार यांचे नाव गीर नारायण होते आणि ते हिमालय यांचे मोठे सुपुत्र असून प्राचीन काळी सर्व पर्वतांना पंख होते. त्यामुळे ते सर्वत्र उडू शकत असल्याने, ते ज्या ठिकाणी थांबत त्या ठिकाणांवर वस्ती असल्यास पर्वता खाली बसत. हि समस्या बघता सर्व देव चिंतीत झाले. आणि महादेवांकडे गेले. सर्व हकीकत सांगितल्यावर त्रिदेव यांनी निर्णय घेतला की, सर्व पर्वतांचे पंख छाटावे, हि बातमी गीर नारायण यांना समजल्यावर, आपले पंख छाटले जाऊ नयेत म्हणून, त्यावेळेस गिरनार पासून ते सोमनाथ पर्यंत संपूर्ण समुद्र होता, व तेथे एक ब्रम्ह तळ होते, त्या तळामध्ये गीर नारायण यांनी आपले शरीर लपवले, आणि फक्त चेहरा वर ठेवला.
हेही वाचा
ऋषिपंचमीची कहाणी
पितृपक्ष कहाणी: पितृपक्षात हे केलं कि पुढची ७ पिढी पित्र ऋण मुक्त होईल.
तो भाग म्हणजे आपण जे गुरु शिखरावर पादुका दर्शन घेतो ते यांचे कपाळावरील स्थान आहे. पण ज्यावेळेस, पार्वती देवी यांचा विवाह महादेवांशी होणार होता, तेव्हा आपले मोठे बंधू गीर नारायण विवाहात उपस्थित व्हावे. म्हणून पार्वती देवींनी विनंती केली कि आपण विवाहास यावे आणि गीर नारायण तेथे आले. त्यांचे पंख छाटू नये म्हणून, त्यांनी महादेव यांना वरदान मागितले कि, हिमालयावर जे ३३ कोटी देव, तपस्वी, साधू सर्व वास करतात.
तसे माझ्याकडे पण वास करावा. तसा वर महादेवांनी त्यांना दिला. म्हणून गिर नारायण आताचे गिरनार येथे, सिद्ध पुरुष, साधू, महंत वास करतात. ३३ कोटी देवांचाही येथे वास असतो. त्यामुळे, गिरनार परिक्रमा हि ३३ कोटी देव आणि गुरु दत्तात्रय यांना प्रदक्षिणा करणे होय. सदर परिक्रमा ही अत्यंत पुण्यदायी आहे.
अशा या अतीपावित्र आणि तेहातीस कोटी देवांचा वास असलेल्या ठिकाणी आयुष्यात एकदा तरी जाऊन पुण्य पदरात नक्की पाडून घ्यावे.
===================
प्रिय वाचकहो, उत्तम बोधकथा/moral stories in marathi, प्रेम कथा, रहस्य कथा, कथामालिका, भारतातील संस्कृतीचे विविध पैलू, पर्यटन, खाद्यसंस्कृती, फॅशन, पॅरेंटिंग, लाईफस्टाईल ब्लॉग्स वाचायचे असतील तर रीतभातमराठीला नक्की भेट द्या.