Ritbhatmarathi

Search
Close this search box.

गिरनार पर्वत माहिती मराठी मध्ये : ब्रह्मा विष्णू आणि महेश या त्रिदेवंचे मिळून एक सुंदर रूप म्हणजेच दत्त रूप. दत्त महाराज यांची अनेक रूपे आणि अनेक मंदिरे आपल्या भारतात आहेत. गाणगापूर, नरसोबाची वाडी, नारायणपूर अशी एक ना अनेक ठिकाणे दत्त मंदिरासाठी आजही तितकीच प्रसिध्द आणि पवित्र आहेत. दत्त महाराज हे सगळ्यांवर कृपा दाखवतात. अतिशय प्रेमळ आणि लगेच प्रसन्न होणारे असे हे दैवत आहे. सगळ्यात महत्वाचे म्हणजे दत्त महाराज हे जागृत आहेत आणि त्याचे दाखले आजही अनेक मंदिरात आपल्याला पाहायला मिळतात.

आज दत्त महाराजांच्या अशाच एका पावन ठिकाणाबद्दल जाणून घेणार आहोत जिथे स्वतः दत्त महाराजांनी वास्तव्य करून ते ठिकाण पावन केलेले आहे, जिथे पर्वत शिखरांच्या समूहात आणि निसर्गाचे वरदान लाभलेल्या सुंदर वातावरणात अहं विसरून भक्तजन केवळ महाराजांच्या पादुका आणि सुंदर चेहऱ्याकडे भाविक बघत राहतो आणि जिथे अनेक सिद्ध पुरुष तसेच साक्षात तेहतिस कोटी देवांचा वास आहे ते ठिकाण म्हणजे गुजरात मधील गिरनार पर्वत.

गिरनार म्हणजेच गिरी नारायण. तर शिवपुरणात या गिरनार चा उल्लेख रेवता चल असा आहे. गिरनार दिसायला जितके भव्य दिव्य आहे तितकीच भव्य आहे दर्शनाची अनुभूती. आजवर दत्त सप्रदयातील प्रत्येक व्यक्तीचा असा अनुभव आहे की प्रत्येक वेळी गिरनार त्यांना नवा आणि वेगळा वाटतो. दहा हजार पायऱ्या असलेला हा गिरनार प्रत्येकाची मानसिक आणि शारीरिक परीक्षा बघतो. सुरुवातीला इतक्या पायऱ्या चढून दर्शन घ्यायचे या भावनेनेच घाबरायला होते पण दत्त महाराजांच्या दर्शनाच्या ओढीने भाविक तो टप्पाही हसत पार करतात.

पण यासाठी पहिल्याच पायरीवर दत्त महाराजांना पूर्ण शरणागती पत्करने आवश्यक आहे. कारण मी पण, अहंकार आणि अभिमान धरला तर भल्या भल्या भल्या गिर्या रोहकांस महाराज पहिलाच टप्पा पार करू देत नाहीत. कारण आपल्या इच्छा , कर्म बंध, अतृप्त वासना च आपल्याला खेचत असतात. त्यामुळे या सगळ्यांचा त्याग करून केवळ शरणागती पत्करली की महाराज सहज दर्शन देतात.

गुजरात राज्यातील जुनागड जिल्ह्यात. गिरणारचा उल्लेख हिमालयाचे पेक्षाही जुना पर्वत म्हणून उल्लेख

सत्पुरूष: श्री दत्तमहाराजांचे अक्षय निवास स्थान

विशेष: श्री दत्तपादुका, नाथ संप्रदायाचे उपासना केंद्र, नेमिनाथ भगवान मंदिर, गीर जंगल, कमंडलू कुंड, आंबा मातेचे स्थान.

गिरनार या ठिकाणी खुद्द दत्त महाराजांनी बारा हजार वर्षे घोर तपश्चर्या करून हे ठिकाण सिद्ध केले आहे त्यामुळे या ठिकाणचे वेगळे महत्त्व सांगण्याची काहीच गरज नाही. या ठिकाणी कित्येक संतांना दत्तप्रभूंनी साक्षात् दर्शन दिले आहे. अनादीकालापासून कित्येक सिद्धयोगी गिरनारच्या गुंफामध्ये साधना करत आहेत. बाबा किनाराम अघोरी, श्रीवासुदेवानंद सरस्वती टेंबेस्वामी महाराज, रघुनाथ निरंजन, नारायण महाराज, यांसारख्या संताना इथे दत्त महाराजांच्या प्रत्यक्ष दर्शनाचा लाभ झाला आहे.

गिरनार पर्वताच्या पायथ्याला म्हणजेच तलेठीला भवनाथ मंदिर, भगवान महादेव मंदिर, मृगी कुंड, लंबे हनुमान मंदिर अशी प्राचीन प्रेक्षणीय स्थळे आहेत. महाशिवरात्रीला येथे पाच दिवसांची जत्रा भरते. तेथे मृगी कुंड आहे. शिवरात्रीच्या मेळ्याला या कुंडाजवळ भगवान महादेव मंदिराच्या दर्शनाला १० ते १२ लाख लोक जमा होतात.

मृगी कुंडातील सिध्दांचे स्नान हे यातील प्रमुख आकर्षण असते. अशी एक आख्यायिका आहे कि, स्वयं शिव या कुंडात स्नानासाठी येतात. स्वयं शिव म्हणजे कोण तर मृगी कुंडामध्ये अनेक साधू स्नानाला जेंव्हा उतरतात, त्या साधूंमध्ये असा एक साधू असतो, की जो मृगी कुंडात डुबकी मारल्यावर बाहेर येत नाही म्हणजेच अंतर्धान पावतो. तोच स्वयं शिव असतो.

याशिवाय सभोवतालचा परिसर पण खूप आकर्षक आहे. अन्नछत्र आहे तसेच गुरू शिष्य परंपरा ही पाहायला मिळते गिरनार येथे. आश्रम बघण्यासारखे आहेत.

भारतातील काही रहस्यमय मंदिरे जिथे रोज काही ना काही घटना होत राहतात

जाणून घ्या सप्तशृंगी मातेच्या मुखात पानाचा विडा का ठेवला जातो

जाणून घ्या महाराष्ट्रातील देवींचे साडेतीन शक्तिपीठे आणि त्यांचा इतिहास

इथे ५,००० वर्षांपासून असलेली अखंड धुनी आहे. ही धुनी एक दैवदुर्लभ देणगी आहे. आजही ती धुनी दर सोमवारी सकाळी सुमारे ६.००-६.३० वाजता तासाभरासाठी प्रकट होते.

त्या अग्नीरुपात साक्षात् श्रीदत्तप्रभूच तिथे प्रकटतात. कमंडलुकुंड स्थानी असलेले साधू सुमारे ५-६ मण काष्ठं पिंपळाची लाकडे समर्पित करतात (आपण होळीला जशी लाकडं उभी रचतो तशी अग्नीकुंडात रचून ठेवतात.) आणि एका विशिष्ट क्षणी आपल्या डोळ्यांचं पातं लवण्याच्या आतंच् श्रीदत्तात्रेय निर्मित स्वयंभू अग्नीनारायणाची २ पुरुष उंचीची ज्वाला प्रकटते. श्रध्दावान भक्तांस त्यामध्ये साक्षात् दत्तप्रभूंचे दर्शन होते.

गिरनार यांचे नाव गीर नारायण होते आणि ते हिमालय यांचे मोठे सुपुत्र असून प्राचीन काळी सर्व पर्वतांना पंख होते. त्यामुळे ते सर्वत्र उडू शकत असल्याने, ते ज्या ठिकाणी थांबत त्या ठिकाणांवर वस्ती असल्यास पर्वता खाली बसत. हि समस्या बघता सर्व देव चिंतीत झाले. आणि महादेवांकडे गेले. सर्व हकीकत सांगितल्यावर त्रिदेव यांनी निर्णय घेतला की, सर्व पर्वतांचे पंख छाटावे, हि बातमी गीर नारायण यांना समजल्यावर, आपले पंख छाटले जाऊ नयेत म्हणून, त्यावेळेस गिरनार पासून ते सोमनाथ पर्यंत संपूर्ण समुद्र होता, व तेथे एक ब्रम्ह तळ होते, त्या तळामध्ये गीर नारायण यांनी आपले शरीर लपवले, आणि फक्त चेहरा वर ठेवला.

तो भाग म्हणजे आपण जे गुरु शिखरावर पादुका दर्शन घेतो ते यांचे कपाळावरील स्थान आहे. पण ज्यावेळेस, पार्वती देवी यांचा विवाह महादेवांशी होणार होता, तेव्हा आपले मोठे बंधू गीर नारायण विवाहात उपस्थित व्हावे. म्हणून पार्वती देवींनी विनंती केली कि आपण विवाहास यावे आणि गीर नारायण तेथे आले. त्यांचे पंख छाटू नये म्हणून, त्यांनी महादेव यांना वरदान मागितले कि, हिमालयावर जे ३३ कोटी देव, तपस्वी, साधू सर्व वास करतात.

तसे माझ्याकडे पण वास करावा. तसा वर महादेवांनी त्यांना दिला. म्हणून गिर नारायण आताचे गिरनार येथे, सिद्ध पुरुष, साधू, महंत वास करतात. ३३ कोटी देवांचाही येथे वास असतो. त्यामुळे, गिरनार परिक्रमा हि ३३ कोटी देव आणि गुरु दत्तात्रय यांना प्रदक्षिणा करणे होय. सदर परिक्रमा ही अत्यंत पुण्यदायी आहे.

अशा या अतीपावित्र आणि तेहातीस कोटी देवांचा वास असलेल्या ठिकाणी आयुष्यात एकदा तरी जाऊन पुण्य पदरात नक्की पाडून घ्यावे.

===================

प्रिय वाचकहो, उत्तम बोधकथा/moral stories in marathi, प्रेम कथा, रहस्य कथा, कथामालिका, भारतातील संस्कृतीचे विविध पैलू, पर्यटन, खाद्यसंस्कृती, फॅशन, पॅरेंटिंग, लाईफस्टाईल ब्लॉग्स वाचायचे असतील तर रीतभातमराठीला नक्की भेट द्या.

Share your love
Facebook
Twitter

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *