Skip to content Skip to sidebar Skip to footer

Garbh Sanskar in Marathi | गर्भसंस्कार

भारतीय शास्त्रानुसार मानवावर जन्मापासून ते मरेपर्यंत एकूण सोळा संस्कार केले जातात त्यापैकी स्त्रीला गर्भधारणा झाल्यावर जे संस्कार केले जातात त्यालाच गर्भसंस्कार (Garbh Sanskar) असे म्हणतात…जन्माला येणारे बाळ हे  सर्वगुणसंपन्न व्हावे यासाठी गर्भसंस्कार अतिशय महत्वाचे ठरतात म्हणून ज्यावेळेला आई-वडील होण्याचा विचार जेव्हा काही जोडपे करतात त्यावेळी दोघांची मानसिकता ही सकारात्मक असायला हवी…पहिल्या पेशीपासूनच गर्भसंस्कार व्हायला पाहिजे तरच त्याची चांगली फळे मिळू शकतात…गर्भधारणेपूर्वी माता-पित्याच्या मनात जर निराश किंवा नकारात्मक विचार असतील तर त्याचा परिणाम हा त्या बाळावर झालेला आपल्याला दिसतो पर्यायाने भविष्यात ते बाळ आत्मविश्वास नसलेलं होऊ शकत…म्हणूनच प्राचीन काळापासूनच गर्भसंस्काराला अनन्यसाधारण असं महत्व दिल गेलंय याची खूप सारी उदाहरणं इतिहासात सांगितलेली आहेत…

1. गर्भ संस्कार उदाहरणे | Garbh Sanskar in Ancient India
1.1. शिवाजी महाराज (Shivaji) आणि जिजाऊ (Jijau Mata):

मुघलांनी ज्यावेळी संपूर्ण भारतावर राज्य केलं अगदी तेव्हापासूनच जिजाऊसाहेबांनी आपलं असं स्वराज्य निर्माण व्हावं असा एकमेव सकारात्मक दृष्टिकोन मनात आणि ध्यानात ठेवला म्हणूनच त्यासाठी एक सत्पुरुष रयतेला मिळणं गरजेचं होत…हा एकमेव कयास जिजाऊसाहेबांनी मनाशी बांधला. असं म्हणतात शिवाजीराजे पोटात असतानाच आऊसाहेबांना दांडपट्टा चालवण्याचे,घोड्यावर बसण्याचे,तलवारबाजीचे डोहाळे लागले होते. आऊसाहेबांच्या अशा क्रांतिकारक विचारांमधूनच छत्रपती शिवाजी महाराजांसारखा सुपुत्र जन्माला आला.

1.2. सुभद्रा आणि अभिमन्यू:

गर्भसंस्काराबद्दल महाभारतातही अशीच एक गोष्ट सांगितली जाते सुभद्राला प्रसूतीवेदनांपासून लक्ष विचलित करण्यासाठी अर्जुनाने चक्रव्ह्यू कसे भेदावे हे सुभद्राला सांगितले…आणि आपल्या आईच्या पोटात असताना ते सर्व अभिमन्यूने ऐकले…म्हणूनच पुढे ज्यावेळी कौरव आणि पांडवांचे युद्ध झाले त्यावेळी अभिमन्यूने चक्रव्यूह भेदले…हे सर्व पाहून सगळे अचंबित तर झालेच पण चक्रव्यूहा मधून बाहेर कसे पडावे हे माहिती नसल्याने अभिमन्यू चक्रव्यूहात अडकून गतप्राण झाला कारण सुभद्रा ज्यावेळी अर्जुनाकडून चक्रव्ह्यू भेदावे कसे हा ऐकत होती त्यावेळी सुभद्रा जागृत अवस्थेत होती…पण ज्यावेळी अर्जुन चक्रव्युहामधून बाहेर कसे पडावे हे सांगत होता त्यावेळी सुभद्रा निद्रावस्थेत गेली आणि ते ज्ञान अभिमन्यूला मिळाले नाही…म्हणून गर्भसंस्कार ज्यावेळी आपण करतो त्यावेळी मातेने कमी झोप घ्यावी.

2. साधारणपणे गर्भधारणा झाल्यावर पहिले तीन महिने गर्भसंस्कार कसे असावे | How to do Garbh Sanskar in first trimester

गर्भधारणा झालीय पण त्यापुढचे पहिले तीन महिने फारच महत्वाचे असतात कारण स्त्री त्यावेळी बऱ्याच शारीरिक आणि मानसिक बदलामधून जात असते…त्याचप्रमाणे गर्भाच्या विविध अवयवांची वाढही याच तीन महिन्यात होत असते या महिन्यात आईने प्रथिनयुक्त पदार्थांचा समावेश आपल्या आहारात करावा त्याचप्रमाणे भरपूर कर्बोदके असलेला आहारही घ्यावा…कॅल्शिअम युक्त आहारही या दिवसात घ्यावा जस की रोज ६०० मिली दूध किंवा दुग्धजन्य पदार्थांचा समावेश असावा व्हिटॅमिन D मिळवण्यासाठी अंड्यातील पिवळा भाग फिश लिव्हर ऑइल याचा समावेश आपल्या आहारात असू द्यावा,ओमेगा ३ फॅटी ऍसिड चा समावेश आपल्या आहारात औ द्यवात कारण डोळे,मेंदू आणि मज्जातंतूंचा विकास याच महिन्यात होत असतो. फॉलिक ऍसिड आणि आयन याचा समावेश आहारात असू द्यात…नियमित व्यायाम करणे,पुरेशी विश्रांती घेणे या दिवसात फार महत्वाचे असते… नियमितपणे डॉक्टरकडे तपासणीसाठी जाणे कारण नियमित चेकअप केल्यास गर्भाच्या वाढीवर लक्ष ठेवता येते आणि भविष्यातील धोके टाळण्यास मदत होते.

2.1 पहिल्या तीन महिन्यात काय टाळता येईल…?

  • डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय औषधे घेणे टाळावे. वारंवार औषधे घेतल्याने गर्भावर दुष्परिणाम होऊ शकतो.
  • सकस आहार घ्यावा आहारात शिळे अन्नपदार्थ टाळावे,समुद्रातील मासे चिस या पदार्थांचे अतिसेवन टाळावे.
  • अति त्राण व निराशा टाळा कारण गरोदर स्त्रीवर जर मानसिक ताण असेल तर गर्भपाताची शक्यता असते.
  • अतिशय गरम पाण्याने स्नान करणे टाळा…कारण डिहायड्रेशन चा त्रास याने होतो.
  • धूम्रपान आणि मद्यपान यापासून लांबच राहावे.
  • त्याचप्रमाणे केसांना हानिकारक रंग लावू नये…चेहऱ्याला जर ब्लिच करत असाल तर ते टाळावे.
3. गर्भसंस्कार कसे करावे | How to do Garbh Sanskar:
3.1. बाळाशी संवाद साधावा:

तुम्हाला जर तुमच्या होणाऱ्या बाळाशी बोलायचं असेल तर पोटावर हात ठेऊन तुम्ही त्याच्याशी संवाद साधू शकता…कारण आपलं बोलणं बाळ ऐकत असते हे वैज्ञानिक संशोधनांमधून सिद्धही झालंय कारण तुम्ही जे बोलता ते बाळ ऐकते आणि तसा प्रतिसादही देते.

3.2. डोहाळे जेवण (dohale jevan) आणि ओटीभरण (godh bharai):

हा एक गर्भसंस्कारांचाच भाग आहे यामध्ये गरोदर स्त्रीचे सगळे लाडकोड पुरवले जातात तिला काय आवडत सगळेजण तिला आणून देतात यामध्ये पेढा की बर्फी म्हणजेच मुलगा की मुलगी असं ओळखायचाही एक खेळ खेळला जातो….डोहाळे हे अगदी चमचमीत पदार्थ खाण्याचे असू शकतात…तोंडाला रुची देणारे पदार्थ दिले जातात…शक्यतो सातव्या महिन्यात डोहाळे जेवण केले जाते….यामध्ये आपण गरोदर असताना कसे दिसतो याची उत्सुकता म्हणून झोपाळ्यावर बसून हौशी लोक फोटो काढून आपले लाडही पूर्ण करतात ..बाईसाठी हे खास क्षण असतात बाळंतपण उत्तमरीतीने पार पडावे म्हणून सासर आणि माहेर दोन्हीकडून पुरवलेले मानसिक,शारीरिक आणि आर्थिक आधार असतो या सर्वांचा उत्तम पिढी निर्माण होण्यात फार मोठा वाटा असतो.

3.3. मेडिटेशन (meditation)आणि हलका व्यायाम:

मेडिटेशनला मराठीत ध्यानधारणा असेही म्हणतात. गरोदर स्त्रीसाठी सर्वात महत्वाची ठरते या काळात बाईच्या शरीरात अनेक बदल होत असतात हॉर्मोनल इम्बॅलन्सिंग झालं की आपोआपच चिडचिड वाढते त्यासाठी शांतता महत्वाची असते म्हणूनच मेडिटेशन सर्वात उपयुक्त असं आहे. हलका व्यायामहि गर्भवतीने करावा जेणेकरून स्नायूंना आराम मिळतो पाठ आणि पायाला आराम मिळतो.

3.4. पुस्तकवाचंन: 

यामध्ये अध्यात्मिक आणि प्रेरणादायी पुस्तकवाचनही असू शकते…कुणी गुरुचरित्र,दासबोध आणि इतर अनेक पुस्तके वाचताना दिसतात. याचा खूप चांगला फायदा गर्भवतीला आणि तिच्या होणाऱ्या बाळाला झालेला आपल्याला दिसतो. 

3.5. स्वयंसूचना:

आपण आपल्या बाळाशी गप्पा मारताना त्याला सूचनाही देऊ शकतो म्हणजेच माझे बाळ खूप छान आहे…माझे बाळ हुशार आहे…माझे बाळ खूप स्ट्रॉंग आहे…असा विचार होणाऱ्या बाळाची आई नक्कीच करू शकते.

3.6. संगीत ऐकणे:

हे गर्भसंस्काराचे एक उत्तम आणि प्रभावी साधन आहे कारण मेंदूची शांतता जशी ध्यानधारणा करून मिळवली जाते तशीच संगीत ऐकणे हेही मानसिक त्रासापासून दूर राहण्यासाठी तितकंच महत्वाचं ठरू शकत…यात अध्यात्मिक गाणी,श्लोक,रामरक्षा,मंत्र जप अशा गोष्टी तुम्ही ऐकू शकता.गर्भाशयात मुल तिसऱ्या महिन्याच्या सुरुवातीपासूनच ऐकण्यास आणि प्रतिसाद करण्यास सक्षम ठरत…मेंदूच्या विकासासाठी आणि श्रवणाला उत्तेजन देण्यासाठी संगीत ऐकणं प्रभावी ठरतं.

गर्भ संस्काराचे खूप छान पुस्तके बाजारात उपलब्ध आहेत. त्यापैकी खालील पुस्तके तुम्ही वाचू शकता.

Ayurvedic Garbh Sanskar Buy Now
Ayurvedic Garbh Sanskar (Gujarati)Buy Now
Ayurvedic Garbh Sanskar Balaji Tambe (Marathi)Buy Now
Abhimanyu Garbh Sanskar (Hindi)Buy Now
Garbh Sanskar – You Reap What You Sow (English)Buy Now

Leave a Comment

error:

Warning

सध्या युट्युब वर कथा चोरी करून वाचून दाखवण्याचे धंदे चालू आहेत लोकांचे. आमच्या वेबसाईट वरची कथा कुठल्याही युट्युब चॅनेलवर बेकायदेशीररित्या आढळल्यास त्या चॅनेलला लगेच रिपोर्ट करण्यात येईल ह्याची कृपया दक्षता घ्यावी. तसेच आपल्या वाचकांपैकी कुणालाही असे बेकायदेशीर चॅनेल्स आढळल्यास आम्हाला ritbhatmarathi@gmail.com ह्या ई-मेल वर त्वरित कळवावे.