गणपती स्तोत्र मराठी भावार्थसह

१. गणपती स्तोत्र कुणी रचले?
ganpati stotra marathi: मित्रांनो आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात अडचणी असतातच असतात. त्यांचे निराकरण करण्यासाठी आपण देवाला त्या परमात्म्याला शरण जातो. आपल्या हिंदू धर्मात तब्बल तेहातिस कोटी देव आहेत. आपले जे कोणी श्रद्धा स्थान असेल त्या त्या देवाची आपण प्रार्थना करतो, पूजा करतो, व्रत वैकल्ये करतो, जप मंत्र म्हणतो आणि संकटातून बाहेर पडतो.
आज आपण अशाच एका छोट्या पण तितक्याच महत्वाच्या अशा स्तोत्राची माहिती करून घेणार आहोत ज्याच्या पठणाने सर्व अडचणी दूर होतात, मनःशांती मिळते आणि वैभव प्राप्त होते. कोणत्याही देवाची पूजा करण्याआधी आपण ज्याची पूजा करतो,सगळ्यात आधी पूजेचा मान ज्याला मिळाला आहे, ज्याच्या पुजे शिवाय कोणतेच कार्य पूर्णत्वास जाऊ शकत नाही अशा सगळ्यांच्या लाडक्या गणपती बाप्पा चे गणपती स्तोत्र पठण काय आहे आणि त्याचे फायदे जाणून घेऊया.
गणपती स्तोत्र ही श्री गणेशाला केलेली सगळ्यात गोड विनवणी आहे. हे स्तोत्र नारद मुनींनी रचलेले असून नारद पुरमातून घेण्यात आले आहे. याचा मराठी अनुवाद श्रीधर स्वामी यांनी केला आहे. या स्तोत्रात गणपतीची बारा नावे असून स्तोत्रच्या शेवटी पठण करणाऱ्याला मिळणारे फायदे नमूद केले आहेत.
२. गणपती स्तोत्र पठण कसे करावे?
- सगळ्यात आधी गणपतीची पूजा करून घ्या.
- आपली इच्छा सांगून संकल्प सोडा. म्हणजे ज्या कारणासाठी तुम्ही स्तोत्र पठण करत आहात ते कारण सांगून किंवा इच्छा बोलून ती पूर्ण व्हावी अशी विनंती गणपती बाप्पा जवळ करा आणि ताम्हणात पाणी सोडा.
- पूर्वेकडे तोंड करून बसा.
- आरामदायक स्थितीत बसा.
- एक ग्लास पाणी घेऊन त्यात अगरबत्तीची विभूती म्हणजेच राख घाला पडेल असे ठेवा.
- श्री गणपती स्तोत्राचा जप करा.
स्तोत्र संख्या वाचून झाल्यावर श्री गणेशाची आरती करा. - यानंतर राख म्हणजेच विभूती पडलेले पाणी प्या.
३. गणपती स्तोत्र पठण फायदे
- सुख, समृध्दी आणि वैभव प्राप्त होते.
- स्तोत्र पठण केल्याने मनःशांती मिळते.
- आयुष्यातून तसेच मनातून वाईट गोष्टी निघून जातात
- हे स्तोत्र वाचल्याने जीवन निरोगी आणि समृदध बनवते.
- जो कोणी सहा महिने दररोज या स्तोत्रांचे पठण करतो त्याचे सर्व त्रास, अडचणी नष्ट होतात.
- जर कोणी वर्षभर या स्तोत्रांचे रोज पाठ करत असेल तर तो सर्व पक्षांचा स्वामी होतो. हे स्तोत्र वाचल्याने वेगवेगळ्या प्रकारच्या अडचणींचे मार्ग निघतात. म्हणूनच याला संकट नाशनम स्तोत्र असेही म्हणतात.
४. गणपती स्तोत्र मराठीमध्ये
जय जयाजी गणपती। मज द्यावी विपुल मती।
करावया तुमची स्तुती। स्पुर्ती द्यावी मज अपार।।०१।।तुझे नाम मंगलमूर्ती। तुज इंद्र-चंद्र ध्याती।
विष्णू शंकर तुज पूजिती। अव्यया ध्याती नित्य काळी।।०२।।तुझे नाव विनायक। गजवदना तू मंगल दायक।
सकल नाम कलिमलदाहक। नाम-स्मरणे भस्म होती।।०३।।मी तव चरणांचा अंकित। तव चरणा माझे प्रणिपात।
देवधीदेवा तू एकदंत। परिसे विज्ञापना माझी।।०४।।माझा लडिवाळ तुज करणे। सर्वापरी तू मज सांभाळणे।
संकटामाझारी रक्षिणे। सर्व करणे तुज स्वामी।।०५।।गौरी पुत्र तू गणपती। परिसावी सेवकाची विनंती।
मी तुमचा अनन्यार्थी। रक्षिणे सर्वार्थेची स्वामिया।।०६।।तूच माझा बाप माय। तूच माझा देवराय।
तूच माझी करिशी सोय। अनाथ नाथा गणपती।।०७।।गजवदना श्री लम्बोदरा। सिद्धीविनायका भालचंद्रा।
हेरंभा शिव पुत्रा। विघ्नेश्वरा अनाथ बंधू।।०८।।भक्त पालका करि करुणा। वरद मूर्ती गजानना।
परशुहस्ता सिंदुरवर्णा। विघ्ननाशना मंगलमूर्ती।।०९।।विश्ववदना विघ्नेश्वरा। मंगलाधीषा परशुधरा।
पाप मोचन सर्वेश्वरा। दिन बंधो नाम तुझे।।१०।।नमन माझे श्री गणनाथा। नमन माझे विघ्नहर्ता।
नमन माझे एकदंता। दीनबंधू नमन माझे।।११।।नमन माझे शंभूतनया। नमन माझे करुणांलया।
नमन माझे गणराया। तुज स्वामिया नमन माझे।।१२।।नमन माझे देवराया। नमन माझे गौरीतनया।
भालचंद्रा मोरया। तुझे चरणी नमन माझे।।१३।।नाही आशा स्तुतीची। नाही आशा तव भक्तीची।
सर्व प्रकारे तुझिया दर्शनाची। आशा मनी उपजली।।१४।।मी मूढ केवल अज्ञान। ध्यानी सदा तुझे चरण।
लंबोदरा मज देई दर्शन। कृपा करि जगदीशा।।१५।।मती मंद मी बालक। तूच सर्वांचा चालक।
भक्तजनांचा पालक। गजमुखा तू होशी।। १६।।मी दरिद्री अभागी स्वामी। चित्त जडावे तुझिया नामी।
अनन्य शरण तुजला मी। दर्शन देई कृपाळुवा।।१७।।हे गणपती स्तोत्र जो करी पठण। त्यासी स्वामी देईल अपार धन।
विद्या सिद्धी चे अगाध ज्ञान। सिंदूरवदन देईल पै।।१८।।त्यासी पिशाच भूत प्रेत। न बाधिती कळी काळात।
स्वामीची पूजा करोनी यथास्थित। स्तुती स्तोत्र हे जपावे।।१९।।होईल सिद्धी षड्मास हे जपता। नव्हे कदा असत्य वार्ता।
गणपती चरणी माथा। दिवाकरे ठेविला।।२०।।।। इति श्री गणपती स्तोत्र संपूर्ण।।
हेही वाचा
रामरक्षा स्तोत्र पठण फायदे आणि प्रचिती
जाणून घ्या तुळशीचे आध्यात्मिक आणि आयुर्वेदिक महत्त्व आणि फायदे
५. नारद मुनींनी रचलेले संस्कृतमधील गणपती स्तोत्र मराठी भावार्थसह | ganapati stotra meaning in marathi
साष्टांग नमन हे माझे गौरीपुत्र विनायका |
भक्तिने स्मरतां नित्य आयु:कामार्थ साधती ||१||
पार्वती पुत्र श्री गणेश जी यांना नमन करा. आणि मग आपले वय, इच्छा आणि अर्थ पूर्ण करण्यासाठी भक्तिने त्यांना नियमित स्मरण करा.
प्रथम नाव वक्रतुंड दुसरे एकदंत तें |
तीसरेकृष्णपिंगाक्ष चवथे गजवक्त्र तें ||२||
पहिले वक्रतुंड (वाकलेला चेहरा असलेला), दुसरे एकदंत (एक दात असलेला), तिसरे कृष्ण पिंगाक्ष (काळा आणि तपकिरी डोळे असलेला), चौथे गजवक्र (हत्तीचा चेहरा).
पाचवेश्रीलंबोदर सहावे विकट नाव तें |
सातवेविघ्नाराजेंद्र आठवे धुम्रवर्ण तें ||३||
पाचवे लंबोदर (मोठा पोट), सहावे विकास ( प्रगती ), सातवे विघ्नराजेंद्र (अडथळ्यांचा राजा) आणि आठवे धुम्रवर्ण (राखाडी रंगाचा).
नववेश्रीभालाचंद्र दहावे श्रीविनायक |
अकरावेगणपति बारावे श्रीगजानन ||४||
नववे भालचंद्र (ज्याच्या कपाळावर चंद्र सुशोभित झाला आहे), दहावे विनायक, अकरावे गणपती आणि बारावे गजानन.
देवनावे अशीबारा तीनसंध्या म्हणे नर |
विघ्नाभिती नसेत्याला प्रभो ! तू सर्वसिद्धिद ||५||
ही बारा नावे तिन्ही प्रहर (सकाळ, मध्यरात्री आणि संध्याकाळ) जो म्हणतो त्याला कोणत्याही प्रकारच्या अडचणीची भीती नाही, या प्रकारचे स्मरण सर्व कर्तृत्ववान आहे.
विद्यार्थ्यालामिळे विद्या धनार्थ्याला मिळे धन |
पुत्रर्थ्यालामिळे पुत्र मोक्षर्थ्याला मिळे गति ||६||
विद्या पाहिजे असणाऱ्याला विद्या, धन हवे त्याला धन, पुत्र हवा त्याला पुत्र आणि मोक्ष हवा असणाऱ्याला मुक्ती मिळते.
जपतागणपति गणपतिस्तोत्र सहामासात हे फळ|
एकवर्ष पूर्ण होता मिळे सिद्धि न संशय ||७||
जर तुम्ही या गणपती स्तोत्राचा जप केला तर तुम्हाला सहा महिन्यांत इच्छित परिणाम मिळेल. आणि एका वर्षात पूर्ण सिद्धी मिळते याबद्दल शंका नाही .
नारदांनी रचिलेले झाले संपूर्ण स्तोत्र हे |
श्रीधाराने मराठीत पठान्या अनुवादिले ||८||
जो माणूस हे लिहितो आणि आठ ब्राह्मणांना शरण जातो श्री गणेशाच्या कृपेने त्यांना सर्व प्रकारचे ज्ञान प्राप्त होते.
=================
प्रिय वाचकहो, उत्तम बोधकथा/moral stories in marathi, प्रेम कथा, रहस्य कथा, कथामालिका, भारतातील संस्कृतीचे विविध पैलू, पर्यटन, खाद्यसंस्कृती, फॅशन, पॅरेंटिंग, लाईफस्टाईल ब्लॉग्स वाचायचे असतील तर रीतभातमराठीला नक्की भेट द्या.