मनातील कोणतीही इच्छा पूर्ण होण्याची खात्री आणि ईश्वराचा साक्षात्कार अनुभवायचा आहे …. तर इथे नक्की भेट द्या – – श्रीक्षेत्र गाणगापूर

१. श्रीक्षेत्र गाणगापूरची माहिती व महत्त्व
Gangapur dattatreya temple :
कर्नाटकच्या गुलबर्गा जिल्ह्यातील अफझलपुर तालुका असलेले गाणगापूर हे गाव श्री नृसिंहसरस्वती यांच्या जागृत दत्त मंदिरासाठी प्रसिध्द आहे. येथे श्री नृसिंहसरस्वती यांचे जागृत देवस्थान असून हजारो वर्षांपासून श्री नृसिंहसरस्वती महाराज गुप्त रूपाने राहून भाविकांना आशिर्वाद देऊन त्यांचे जीवन सुखी करत आहेत. भीमा आणि अमरजा या दोन पवित्र नद्यांच्या संगमावर वसलेले हे ठिकाण आहे. येथे प्रत्यक्ष श्री दत्त महाराजांचा वास आहे. इथे श्रध्देने आलेल्या भाविकांना संकटातून तारण्याचे आणि कोणतीही मनोकामना पूर्ण करण्याचे काम दत्त महाराज हजारो वर्षांपासून करत आहेत.
श्री नृसिंहसरस्वती महाराज यांनी गाणगापूर येथे तब्बल २२-२३ वर्षे वास्तव्य केलेले आहे. ते ज्या ज्या ठिकाणी जात असत, विश्रांती घेत असत त्या प्रत्येक ठिकाणाला आजही तेवढेच महत्त्व आहे आणि तिथेही श्री दत्त महाराज जागृत आल्याचे असंख्य अनुभव भक्तगण रोजच घेत असतात.
गाणगापूर या तीर्थक्षेत्राचे महत्त्व गुरुचरित्र या ग्रंथात खूप विस्तारपूर्वक सांगितले गेले आहे. त्यात स्वतः श्री नृसिंहसरस्वती यांनी सांगितले आहे की , या ठिकाणी कोणताही भाविक श्रद्धा पूर्वक येऊ शकतो आणि दत्त महाराजांचा आशिर्वाद घेऊ शकतो. मी इथेच राहून रोज भीमा अमरजा संगमावर स्नान करून भिक्षेसाठी निर्गुण मठात कोणत्याही रुपात उपस्थित असतो. जो भक्त माझ्यावर विश्वास ठेवेल आणि माझ्या नामस्मरणात तल्लीन होईल त्याला माझे दर्शन मिळेलच.
श्री नृसिंहसरस्वती महाराज यांच्या वास्तव्याने हे स्थान पवित्र आणि जागृत आहे. येथील अनेक ठिकाणे अतिशय प्रसिद्ध आहेत. या ठिकाणांना भेट देऊन भाविक दर्शन घेतात तेंव्हाच गाणगापूर यात्रा यशस्वी झाली असे मानले जाते. या प्रत्येक ठिकाणाला श्री नृसिंहसरस्वती यांच्यामुळे एक विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. संगम स्थान म्हणजेच भीमा अमरजा संगम, निर्गुण पादुका मठ, भस्म महिमा, अष्टतीर्थ महिमा, माधुकरी, संगमेश्वर मंदिर, औदुंबर वृक्ष, विश्रांती कट्टा या दिव्य स्थानाबरोबर कल्लेश्वर दर्शन घेतले की गाणगापूर यात्रा पूर्ण होते. कल्लेश्र्वर हे मुक्तिस्थान आहे असे मानले जाते.
२. भीमा अमरजा संगम स्थान
या दोन पवित्र नद्यांचा संगम या जागृत शक्तीपीठावर झाला आहे. हे स्थान निर्गुण मठापासून २-३ किमी अंतरावर आहे. या संगमावर श्री नृसिंहसरस्वती रोज स्नान करत असत. इथे श्रध्देने स्नान केल्याने भाविकांची अनेक पापे धुतली जाऊन दिव्य अनुभूती येते हे नक्की. निर्गुण मठातील पादुकादर्शन घेण्याआधी भाविक आधी संगमावर स्नान करतात. पौर्णिमा दिवशी केलेल्या स्नानाला विशेष महत्त्व दिले जाते. या संगमाभोवती अष्टतीर्थचा वास आहे.
३. अष्टतीर्थांची माहिती
या अष्टतिर्थाना श्री नृसिंहसरस्वती स्वामी महाराजांनी भक्तासाठी दिवाळीच्या पहिल्या दिवशी म्हणजेच नरक चतुर्दशी दिवशी प्रकट केली होती. या अष्टतीर्थमध्ये श्री दत्ताचा नित्य वास असतो असे म्हटले जाते. ही अष्टतीर्थ पुढील प्रमाणे आहेत :
१. षाटकुल व नृसिंह तीर्थ :
या ठिकाणी स्नान केल्याने काल, मृत्यू व अपमृत्यू नाहीसा होतो आणि शतायुश्य प्राप्त होते. तसेच इथे स्नान केल्याने प्रयाग येथील त्रिवेणी संगम नद्यांच्या स्नानाचे फळ मिळते.
३. भागीरथी तीर्थ :
या तीर्थात स्नान केल्याने सगळे दारिद्रय नष्ट होते तसेच काशी क्षेत्रातील गंगा स्नानाचे पुण्य मिळते. या तीर्थल काशीकुंड असे म्हणतात. असे म्हणतात की एका ब्राह्मण भक्ताने येथे श्री शंकराची आराधना करून त्यांना प्रसन्न करून घेतले आणि त्या भक्ताच्या इच्छेने भगवान शंकरानी काशीची गंगा येथे आणली.
४. पाप विनाशी तीर्थ :
येथे स्नान केल्याने पूर्व जन्मीचे सगळे पाप जळून राख होते. या तीर्थावर वासुदेवानंद सरस्वती टेंबे स्वामीना नृसिंहसरस्वती यांचे साक्षात दर्शन झाले आहे. याच तीर्थावर नृसिंह सरस्वती यांनी आपली बहीण रत्नाबाई यांना स्नान करण्यास सांगितले आणि त्यांची पापे नष्ट झाली.
५. कोटी तीर्थ :
या तीर्थावर स्नान केल्याने आत्मा शुध्द होतो आणि मुक्ती मिळते. यथा शक्ती म्हणजे ज्याला जितके जमेल तितके दान केल्याने कोटी दान केल्याचे पुण्य मिळते. अनंत पुण्य पदरात पडते.
६. रुद्र पाद :
हे तीर्थ गया समान आहे. गया क्षेत्रातील सर्व आचरण करून येथे रुद्र पाद पूजन केल्यास कोटी जन्माचे दोष नाहीसे होऊन मोक्ष मिळतो.
७. चक्र तीर्थ :
हे तीर्थ द्वारावती समान आहे. येथे स्नान करून केशव मंदिरात पूजन केल्यास द्वारावतीच्या चार पट पुण्य मिळतेच शिवाय अज्ञानीला ज्ञान मिळते.
८. मन्मथ :
येथे स्नान करून कल्लेश्र्वराची पूजा केल्यास वंश वाढतो आणि अष्टऐश्वर्य मिळते.
हेही वाचा
चारधाम यात्रेचे अनन्यसाधारण महत्व आणि चारधाम यात्रेची पूर्वतयारी
जाणून घ्या महाराष्ट्रातील देवींचे साडेतीन शक्तिपीठे आणि त्यांचा इतिहास
४. गाणगापूर जवळील काही धार्मिक स्थळे
निर्गुण पादुका :
श्री नृसिंह सरस्वती यांनी गांगापुरतून निघताना आपल्या पादुका शिष्याकडे दिल्या आणि म्हणाले, या पादुका निर्गुण आहेत पण या पादुकांमधे माझा सगुण रूपाने सदैव वास राहील. या पादुका मठात ठेवतो आणि इथे येणाऱ्यांची सर्व इच्छा पूर्ण होतील. कोणतीही शंका मनात ठेवू नका, आमचा आशिर्वाद आहे यावर विश्वास ठेवा. या निर्गुण पादुकांना कोणत्याही पाण्याचा स्पर्श होत नाही, केवळ अष्टगंध आणि केशर लावून पूजा केली जाते. पादुकांच्या आकाराच्या संपुटात त्यांना ठेवले जाते आणि फक्त पूजा करताना त्या उघड्या ठेवतात, इतर वेळी पादुका बंद करून ठेवलेल्या असतात.
विश्रांती कट्टा :
हा कट्टा म्हणजे नृसिंह सरस्वती महाराज संगमा वरून गाणगापूर येथे जात असताना जिथे बसून आराम करत असत ते ठिकाण आहे.
औदुंबर वृक्ष :
या वृक्षा खाली दत्त महाराज यांचा आजही वास आहे. संगमा पासून वर जाताना हा वृक्ष आहे. येथे गणपती मूर्ती आणि पादुका स्थापन करण्यात आलेल्या आहेत. कित्येक भाविक या वृक्षाभोवती प्रदक्षिणा घालून रोगमुक्त झाले आहेत. संगम स्नान करून आल्यावर वृक्षाला अकरा, एकवीस किंवा एकशे आठ प्रदक्षिणा घातल्यास कोणतीही मनोकामना पुर्ण होते. हजारो भक्तांनी याचा अनुभव घेतलेला आहे. हा वृक्ष म्हणजे कलियुगी दत्त महाराजांचे दिव्य वरदान प्राप्त आहे म्हणूनच अनेक भाविक येथे बसून गुरू चरित्र ग्रंथाचे पारायण करतात.
भस्म डोंगर :
हा डोंगर म्हणजे अनेक ऋषी मुनींनी तप, साधना केलेले ठिकाण आहे. आपली इच्छा पूर्ण करण्यासाठी येथील पाषाण म्हणजेच दगड वापरून रचना किंवा चित्र तयार करण्याची पद्धत प्रसिद्ध आहे. हे ठिकाण पवित्र असल्याने येथील विभूती म्हणजे भस्म भाविक घरी नेतात. येथे भगवान परशुराम यांनी लोकांच्या कल्याणासाठी अनेक यज्ञ केले होते त्याच यज्ञाची राख साचू न येथे डोंगर तयार झाले आहे. हा भस्म लावल्याने रोग दूर होतात, संकटे, बाधा दूर होते. अनेक भाविकांनी येथून भस्म नेऊन ही आजही तो डोंगर तसाच आहे.
माधुकरी :
दत्त महाराजांची पूजा केल्यावर किंवा पारायण करताना ठराविक अध्याय वाचून झाल्यावर भाविक गाणगापूर गावात जाऊन भिक्षा मागतात म्हणजे जेवण मागतात. ही भिक्षा निदान पाच घरे मागायची असते. त्यात जे काही मिळेल ते खाऊन पुन्हा दत्त सेवा केली जाते. यालाच माधुकरी असे म्हणतात.
५. गाणगापूरला कसे जाल ?
येथे जाण्यासाठी सोलापूर वरून सोलापूर गुलबर्गा ही रेल्वे आहे.
तसेच सर्व ठिकाणाहून बस उपलब्ध आहेत.
दत्ताची आरती १:
त्रिगुणात्मक त्रैमूर्ती दत्त हा जाणा।
त्रिगुणी अवतार त्रैलोक्य राणा ।
नेती नेती शब्द न ये अनुमाना॥
सुरवर मुनिजन योगी समाधी न ये ध्याना ॥ १ ॥
जय देव जय देव जय श्री गुरुद्त्ता।
आरती ओवाळिता हरली भवचिंता ॥ धृ ॥
सबाह्य अभ्यंतरी तू एक द्त्त ।
अभाग्यासी कैची कळेल हि मात॥
पराही परतली तेथे कैचा हेत ।
जन्ममरणाचाही पुरलासे अंत ॥२ ॥
दत्त येऊनिया ऊभा ठाकला ।
भावे साष्टांगेसी प्रणिपात केला ॥
प्रसन्न होऊनि आशीर्वाद दिधला ।
जन्ममरणाचा फेरा चुकवीला ३॥
दत्त दत्त ऐसें लागले ध्यान ।
हरपले मन झाले उन्मन ॥
मी तू पणाची झाली बोळवण ।
एका जनार्दनी श्रीदत्तध्यान ॥ ४॥
दत्ताची आरती २:
उद्धरी गुरुराया, अनसूया तनया दत्तात्रेया
जो अनसूयेच्या भावाला भुलूनिया सुत झाला,
दत्तात्रेय अशा नामाला मीरवी वंद्य सुरांना,
तो तू मुनीवर्या निज पाया स्मरता वारीसी माया
उद्धरी गुरुराया, अनसूया तनया दत्तात्रेया ||१||
जो माहुरपूरी स्नान करी, निवसे सह्याद्रीचे शिरी
गंगेचे स्नान करी, भिक्षा कोल्हापूरी
स्मरता दर्शन दे वारी भया, तो तू आगमगेया
उद्धरी गुरुराया, अनसूया तनया दत्तात्रेया ||२||
तो तू वांझेसी सुत देसी सौभाग्या वाढविसी
मरता प्रेतासी जीववीसी सद्वरदाना देसी
यास्तव वासुदेव तव पाया दरत्या तारी सदया
उद्धरी गुरुराया, अनसूया तनया दत्तात्रेया ||
==================