लहानांपासून मोठ्यापर्यंत बर्गर आवडतो ना मग जाणून घ्या मॅकडोनल्ड विषयी | Facts about Mcdonalds

१. मॅकडोनल्ड (McDonald’s Corporation)
Facts about Mcdonalds: आपली भारतीय खाद्यसंस्कृती खूप प्रसिद्ध आहे. कारण तितकेच खवय्ये आपल्याकडे आहेत. बहुतेक लोकांना वेगवेगळे पदार्थ खायला आवडतात. खाण्याची खूप आवड असते त्यामुळे जगभरातील पदार्थ चाखून चवीचा आनंद घेणे त्यांना जमते. आपली भारतीय खाद्य परंपरा जगप्रसिद्ध तर आहेच पण त्याचबरोबर जगभरातील अनेक प्रसिद्ध आणि चविष्ट पदार्थ सुद्धा भारतात चांगलेच लोकप्रिय झाले आहेत.
चायनीज, इटालियन, मॅक्सिकन अशा अनेक पदार्थांचा समावेश त्यात होतो. त्यातूनही खूप लोकप्रिय ठरलेला प्रकार म्हणजे फास्ट फूड. आजकाल लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच प्रिय असणारा प्रकार म्हणजे फास्ट फूड. त्यातल्या त्यात पिझ्झा, बर्गर, हॅम्बर्गर आणि फ्रेंच फ्राईज म्हटलं की मग तर विचारायलाच नको.
२. मॅकडोनल्डची माहिती
मॅकडोनल्ड ही जगातील सगळ्यात मोठी फास्टफूड चेन आहे. ही अमेरिकेतील फास्टफूड कंपनी आज जगभर पसरलेली आहे. भारतात याला खूपच लवकर लोकप्रियता मिळाली आहे. हम्बर्गर, चीजबर्गर आणि फ्रेंच फ्ाईज साठी हे रेस्टॉरंट प्रसिद्ध असले तरीही चिकन उत्पादने, नाष्टा, शीतपेय, मिल्कशेक आणि बरेच गोड पदार्थ सुद्धा इथे चाखायला मिळतात. हे मॅकडोनल्ड २०१८ पर्यंत ३७,८५५ आउटलेटमध्ये रोज १०० पेक्षा जास्त देशात रोज एकूण ६९ दशलक्ष ग्राहकांची सेवा देत आहे.
ही अमेरिकेची संयुक्त संस्थानेस्थित कंपनी असून जाहिराती आणि विपणनव्यवस्थाद्वारे याने आपले जाळे जगभर पसरले आहे. सर्वोत्कृष्ट नामांकित फास्टफूड कंपनी म्हणून आज याने आपली ओळख निर्माण केली आहे. हॉलिवूडच्या जवळपास सर्व नवीन चित्रपट जाहिरातीद्वारे मॅकडोनल्ड आपले प्रॉडक्ट वितरित करते.
हेही वाचा
कमी खर्चात महिलांना घरच्या घरी व्यवसाय सुरु करता येईल अशा ११ आयडिया
आयुष्यात थोडे हादरे बसले, म्हणून काही संपूर्ण आयुष्य वाया जात नाही – अजय पुरकर
३. मॅकडोनल्डची स्थापना कधी झाली?
मॉरिस मॅकडोनल्ड आणि त्यांची बहीण रिचर्ड यांनी मिळून या रेस्टॉरंटची स्थापना १५ मे ई. स. १९४० मध्ये केली. अमेरिकेतील कोलिफॉर्निया मधील वेस्ट १४ व्या स्ट्रीट सेन बरणार्डिनो येथे १३९८ नॉर्थ ई स्ट्रीट नावाचे पहिले रेस्टॉरंट उघडले होते.
४. मॅकडोनल्डचा इतिहास
मॅकडोनल्ड ही कंपनी फास्टफूड मधील जगप्रसिद्ध कंपनी आहे. या कंपनीची सुरुवात मॅकडोनल्ड बांधवांनी मिळून केली होती. १९५३ मध्ये उघडले गेलेले मॅकडोनल्ड रेस्टॉरंट हे सर्वात जुने तिसरे हॉटेल आहे. हे रेस्टॉरंट अमेरिकेतील लेकवूड ब्लावडी येथे आहे. १९४० मध्ये जेंव्हा मॅकडोनल्डची सुरुवात झाली तेंव्हा ते फारसे ओळखले गेले नव्हते, याचा विस्तार व्हावा किंवा याला प्रसिध्दी मिळावी यासाठी रे क्रोक या मॅकडोनल्डच्या भावाने व्यवसायात आधुनिकता आणण्यासाठी काही बदल केले. त्यासाठी १९४८ मध्ये या बांधवांनी मिळून स्पीडी सर्व्हिस सिस्टीम म्हणजे जलद सेवा उपलब्ध करून दिली. शिवाय फार पूर्वी व्हाईट कॅडलने व्यवहारात आणलेल्या आधुनिक फास्टफूड रेस्टॉरंट तत्वाचा उपयोग करून मॅकडोनल्डला अद्भुत स्वरूप प्राप्त करून दिले. त्यानंतर मॅकडोनल्डने यशाची जी उंच भरारी घेतली ती आजवर तशीच चालू आहे. मॅकडोनल्ड मध्ये स्पिडी नावाचा एक शेफ हॅम्बर्गरच्या आकाराची टोपी घालून आला होता. त्याच्या कल्पनेवरून कंपनीने पसरलेल्या पायाचा पोशाख पहिला अमेरिकन ट्रेडमार्क म्हणून जाहीर केला.
५. मॅकडोनल्डची यशोगाथा
मॅकडोनल्ड जेंव्हा सुरू झाले होते त्यावेळी ते एकच फास्टफूड असलेले रेस्टॉरंट होते. नंतर अमेरिकेतच त्यांनी फास्टफूडची चेन सुरू केली. आज फक्त अमेरिकेत फास्टफूड रेस्टॉरंटची संख्या तब्बल १४,१४६ असून सगळ्या हॉटेल्समध्ये एक बिलियन पाउंड वजनाच्या बिफचा वापर हॅम्बर्गर बनवण्यासाठी केला जातो.
जगभरातील नामांकित फास्टफूड चेनची माहिती गोळा करणाऱ्या वेबसाईटनुसार मॅकडोनल्ड दर सेकंदाला तब्बल ७५ हांबर्गरची विक्री करतो. या माहिती नुसारच अमेरिकेतील सगळ्याच मॅकडोनल्डमध्ये रोज सत्तर मिलियन ग्राहक रोज येत असल्याचे हा डेटा सांगतो. आज संपूर्ण जगात मॅकडोनल्डची एकूण ३८,८९९ रेस्टॉरंट आहेत. मकडोनाल रेस्टॉरंट हे बर्गरकिंग, टँकोबेल या फास्टफूड हॉटेल्सपेक्षा कितीतरी पटीने जास्त आहेत. मॅकडोनल्डमध्ये अनेक पदार्थ मिळतात पण सगळ्यात जास्त लोकप्रिय पदार्थ म्हणजे फ्रेंच फ्राईज. हा बटाट्याचा तळलेला पदार्थ दिसत असला तरीही त्यात एकूण वीस पदार्थांचा समावेश करण्यात येतो. यात वेगवेगळे तेल, मीठ आणि रसायने वापरली जातात.
मॅकडोनल्डची लोकप्रियता इतकी आहे की १९६८ साली फ्रान्सच्या ऑलिंपिक स्पर्धेत भाग घेण्यासाठी गेलेल्या खेळाडूंना घराची आठवण येऊ लागली तेंव्हा त्यांच्यासाठी खास विमानाने मॅकडोनल्ड मधील हॅम्बर्गर पाठवण्यात आले. आज अमेरिकेत दर आठ व्यक्तींमध्ये एक व्यक्ती मॅकडोनल्डमध्ये काम करते यावरूनच त्याची व्याप्ती दिसून येते. मॅकडोनल्डची ही फास्टफूडची चेन इतकी श्रीमंत आहे की एखाद्या विकसनशील देशापेक्षा अधिक आर्थिक उत्पन्न यांच्याकडे आहे.
या कंपनीचे इतके घवघवीत यश पाहता कोणालाही हेवा वाटल्याशिवाय राहणार नाही. खाण्याच्या जगात एक नवी उत्क्रांती घडवणाऱ्या या कल्पनेला पुढच्या वाटचालीसाठी खूप शुभेच्छा.
===============