Ritbhatmarathi

Search
Close this search box.

घरच्या घरी अगदी सोप्या पद्धतीने फेशिअल कसे करावे?

facial steps in marathi: सुंदरता ही प्रत्येकालाच प्रिय अशी गोष्ट आहे. त्यामुळेच स्त्रिया आणि आजकाल पुरुष सुधा सुंदरता विषयी खूपच जागरूक दिसून येत आहेत. सुंदरतेची व्याख्या त्वचेच्या निरोगीपणावरून ठरते रंगावरून नाही. त्वचा जितकी निरोगी आणि डाग विरहित असेल तितकेच सौंदर्य खुलून येते. कोणत्याही सण समारंभात किंवा कार्यक्रमात सुंदर चेहरा सगळ्यांचे लक्ष वेधून घेतो. त्यात जर चेहऱ्यावर काळे डाग, सुरकुत्या, सतत येणारे पिंपल्स आणि कोरडेपणा असेल तर यामुळे अनेक स्त्रिया त्रासून गेलेल्या असतात. बाहेरून त्वाचेची काळजी घेणे जितके महत्वाचे असते तितकाच आहार सुधा खूप चांगला असावा लागतो, भरपूर पाणी पिणे आवश्यक असते. तसेच सगळया प्रकारची फळे आणि भाज्या खाणे लाभदायक असते.

त्वचेचे आरोग्य सुंदर राहण्यासाठी सध्या अनेक उपचार पद्धती नव्याने सुरू झालेल्या आहेत. त्यामुळेच स्त्रिया ब्युटी पार्लरमध्ये जाऊन उपचार घेत असतात. त्यातलाच एक उपचार पद्धतीचा भाग म्हणजे फेशिअल.

फेशिअल करा आणि त्वचा निरोगी ठेवा असा पायंडा पडला आहे. पण त्वचेवर काही डाग आणि पिंपल्स आले की पार्लरमध्ये जाऊन फेशिअल करून घेणे म्हणजे त्वचा निरोगी ठेवणे असे अजिबात नाही. पार्लरमध्ये जाण्याआधी जिथे आपण जात आहोत त्यांना त्वचेविषयी संपूर्ण माहिती आहे की नाही हे जाणून घेणे तितकेच महत्त्वाचे आहे. कारण प्रत्येकाची त्वचा वेगळी असते आणि त्या त्या प्रकारानुसार होणारे फेशिअल पण वेगळेच असते. आपल्याकडे फेशिअलचे किमान दहा तरी प्रकार आहेत, त्यात गोल्ड फेशिअल, डायमंड, सिल्व्हर, हर्बल फेशिअल यांचा समावेश होतो. पार्लरमध्ये जाऊन फेशिअल करणे सगळ्यांनाच परवडेल आणि वेळेत बसेल असे नसते. त्यामुळे घरच्याघरी घरात उपलब्ध असलेल्या वस्तू वापरून आपण पार्लर सारखाच ग्लो चेहऱ्यावर आणु शकतो.

तर फेशिअल म्हणजे एक उपचार पद्धती ज्यात त्वचेवर काही विशिष्ठ प्रक्रिया करून त्याला तजेलदार ठेवायचा प्रयत्न केला जातो. या प्रक्रिया कोणत्या? तर क्लिनिंग, स्टीमिंग म्हणजेच वाफ घेणे, मसाज म्हणजे मालिश करणे आणि पॅक लावणे.

१. क्लिनिंग मध्ये त्वचेला अनुरूप अशा क्लीनजरने त्वचा साफ केली जाते. याने त्वचेवरील निर्जीव झालेल्या पेशींचा जो थर असतो तो साफ होतो व त्वचेवरील साठलेली घाण साफ होते आणि नंतर वापरल्या जाणारे क्रीम्सचा फायद जास्तं होतो.

२. मग वाफ दिली जाते. जेणेकरून त्वचेवरील रंध्र उघडे होतात. शिवाय त्वचेला होणारा रक्त पुरवठा वाढतो. ज्या लोकांना मुरूमअसतात ते या टप्प्यात काढले जातात. या प्रक्रियेमुळे सुद्धा फेशिअलमध्ये वापरले जाणारे क्रीम्सचा परीणाम जास्त होतो.

सौभाग्याचं लेणं…’ टिकली ‘…लावा पण जरा जपून…

३. तिसऱ्या टप्प्यात मसाज दिला जातो. त्वचेवरून हात नीट फिरावा म्हणून त्वचेला उपयुक्त व त्वचेला अनुरूप अशा क्रीम्सचा वापर केला जातो. जर त्वचा रुक्ष असेल तर तेल युक्त क्रीम्स लावल्या जातात आणि जर त्वचा तेलकट असेल तर त्वचेवरील तेल कमी करणारे क्रीम्स वापरले जातात. चेहऱ्यावरील जो मसाज केला जातो तो विशिष्ठ पद्धतीने केला जातो. मानेवर जर मसाज करायचा असेल तर त्याची पद्धत निराळी असते. डोळ्यांभोवती अजून निराळी असते. हा टप्पा सर्वात महत्वाचा मानला जातो कारण यात आपण त्याभागावर क्रीम लावून ते क्रीम जिरवायचा प्रयत्न करतो. त्या मसाजच्या त्या कृतीमुळे तिकडचा रक्तपुरवठा आपण वाढवायचा प्रयत्न करतो व लसीकाचं अभिसरण वाढवण्याचा प्रयत्न करतो. त्याशिवाय त्या भागातील स्नायुंना शिथिल करण्याचा प्रयत्न करतो ज्यामुळे स्नायुंमुळे निर्माण होणाऱ्या सुरकुत्या कमी करायचा प्रयत्न करतो. या सर्व गोष्टींचा परीणाम काय तर त्वचा तात्पुरती का होईना ताजीतवानी व गुलाबी दिसते. रक्त पुरवठा वाढल्यामुळे त्वचेत एका प्रकारचा गुबगुबीतपणा येतो. स्नायू शिथिल झाले असल्यमुळे सुरकुत्या कमी झालेल्या वाटतात. मसाज कसा व किती वेळ दिला जाईल हे त्वचे प्रमाणे बदलतं. शिवाय मसाज देण्याची पद्धत सुद्धा निराळी असू शकते. हाताने किंवा बोटांनी फेशिअल मसाज दिला जाऊ शकतो किंवा विविध यंत्रांनी सुद्धा.

४. फेशिअलच्या शेवटचा टप्पा म्हणजे पॅक लावणे. यात परत एकदा त्वचेच्या प्रकारानुसार व त्वचेची गरज बघून कोणते पॅक लावायचा हे ठरवलं जातं. पॅक लावल्यानी त्वचा मऊ केली जाते.

आधी हा उपचार फक्त ब्युटीपार्लरमध्ये वापरला जायचा. हल्ली त्याला एक वैज्ञानिक रूप देऊन त्वचारोगतज्ञ त्याचा वापर करू लागले आहेत. साधे क्रीम्स न वापरता औषधी क्रीम्स वापरल्या जातात. तसेच मसाजच्या पद्धतीला सुद्धा एक वैज्ञानिक दृष्टीकोन दिला गेला आहे.

मासिक पाळीमध्ये वेदना कमी करण्याचे नैसर्गिक उपाय

डेड स्किन घालवण्यासाठी हे घरगुती उपाय नक्की करून पहा

– त्वचेवरील घाणीचा व मेलेल्या पेशींचा परत काढण्यात मदत होते व त्वचा नितळ दिसते.

– रक्तपुरवठा वाढल्यामुळे त्वचेत एका प्रकारे गुबगुबीतपणा येतो.

– लसीकाचं अभिसरण वाढल्यामुळे चेहर्यावरची सुज व घण कमी करण्यात मदत होते

– स्नायू शिथिल झाल्यामुळे ढोबळमानाने चेहऱ्यावरील ताण कमी होतो व आरामदायक वाटतं.

– मानसिक दृष्ट्यासुद्धा शिथिल करण्याचं काम फेशिअल ट्रीटमेंट करतं

खरतर मी म्हटल्याप्रमाणे त्वचेच्या प्रकारानुसार फेशिअल प्रकार ठरतो. पण घरात उपलब्ध असलेल्या वस्तू पासून म्हणजेच, कच्चे दूध, दही, मध, गुलाबजल, हळद, चंदन पावडर अशा गोष्टींचा वापर करून आपण फेशिअल करतो. त्यातील गोल्डन फेशिअल घरच्या घरी कसे करावे ते पाहूया.

फेशिअल मध्ये पहिली पायरी असते ती म्हणजे चेहरा स्वच्छ करण्याची म्हणजेच क्लीन्जिंगची. क्लीन्जरनं आधी चेहरा स्वच्छ करुन एक बेस तयार होतो. घरच्याघरी फेशियल करताना क्लीन्जिंगसाठी 2 चमचे कच्चं दूध आणि चिमूटभर हळद घ्यावी. ते चांगल एकत्र करुन कापसाच्या बोळ्यानं मिश्रण चेहेऱ्यास लावावं. थोड्या वेळानं चेहरा थंडं पाण्यानं धुवावा.

क्लीन्जिंग केल्यानं त्वचा प्राथमिक स्वरुपात स्वच्छ होते. फेशियलसाठी आपण ज्या घटकांचा वापर करणार असतो त्यांचे गुणधर्म त्वचेत खोलवर रुजण्यासाठी त्वचा खोलवर स्वच्छ होणं गरजेचं असतं. यासाठी स्क्रबचा वापर करुन चेहरा स्वच्छ करणं म्हणजेच एक्सफोलिएट करणं गरजेचं असतं. या स्क्रबसाठी एक चमचा गव्हाच्या पिठाचा कोंडा, थोडी हळद, मध आणि कच्चं दूध घ्यावं. कच्च्या दुधाऐवजी गुलाब पाण्याचा उपयोग केला तरी चालतं. सर्व घटक एका वाटीत मिसळून घ्यावेत. हा लेप चेहऱ्याला हलका मसाज करत लावावा. किमान दहा मिनिटं या मिश्रणानं चेहऱ्याला स्क्रब करणं आवश्यक असतं. मसाज केल्यानंतर थोडा वेळ चेहरा तसाच ठेवावा आणि मग चेहरा थंडं पाण्यानं स्वच्छ धुवावा. वरील घटकांचा वापर करुन स्क्रब केल्यानं चेहऱ्याची रंध्रं खोलवर स्वच्छ होतात. त्वचेवरील मृत पेशी, मृत त्वचा निघून जाते. चेहरा स्वच्छ होतो.

क्लीन्जिंग आणि स्क्रब केल्यानंतर वाफ घेणे महत्त्वाचं असतं. वाफ घेतल्यानं चेहऱ्यावाची रंध्र मऊ पडतात. रंध्रातील म्हणजेच खड्यातील घट्ट झालेली घाण मऊ होवून निघून जाण्यास वाफेमुळे मदत होते. ब्लॅकहेडस, व्हाइट हेडस निघून जातात. कडुलिंबाची पानं घालून उकळलेल्या पाण्याची वाफ घेतल्यानं त्वचा निर्जंतुक होते. वाफ घेण्याच्या प्रक्रियेमुळे त्वचा ओलसर होते.

वाफ घेतल्यानंतर मऊ झालेल्या त्वचेवर मसाज करावा. मसाज करण्यासाठी दही, थोडी हळद आणि बदामाचं तेल घ्यावं. हे सर्व नीट एकत्र मिसळून घ्यावं. बदाम तेलाऐवजी ऑलिव्ह तेल घातलं तरी चालतं. मिश्रण चेहऱ्यास मसाज करत लावावं. 4-5 मिनिटं मसाज केल्यानंतर चेहरा थंडं पाण्यानं स्वच्छ धुवावा.

बेसनपीठ- हळद- मधाचा सोनेरी लेप :

या सर्व प्रक्रियानंतर सगळ्यात शेवटची आणि चेहऱ्याला विशेष परिणाम देणारी बाब म्हणजे चेहेऱ्यास लेप लावावा. फेशियलच्या गोल्डन इफेक्टसाठी एका वाटीत अर्धा चमचा बेसनपीठ, हळद, मध , थोडं दूध घ्यावं. हे एकत्र करुन त्यात अर्धा चमचा दुधाची साय घालावी. पुन्हा सर्व नीट एकत्र करुन लेप चेहऱ्यास लावावा. हा लेप 15 मिनिटं ठेवावा. चेहरा थंडं पाण्यानं धुतल्यानंतर रुमालानं टिपून चेहऱ्यास माॅश्चरायझर लावावं. सौंदर्य तज्ज्ञ सांगतात कोरडी त्वचा असल्यास क्रीम स्वरुपातलं माॅश्चरायझर लावावं आणि त्वचा तेलकट असल्यास लाइटवेट लोशन स्वरुपातलं माॅश्चरायझरनं चेहऱ्याचा हलका मसाज करावा.

अशा प्रकारे घरच्या घरी फेशिअल करून पार्लर सारखा ग्लो मिळवा आणि सौंदर्य वाढवा.

=====================

प्रिय वाचकहो, उत्तम बोधकथा/moral stories in marathi, प्रेम कथा, रहस्य कथा, कथामालिका, भारतातील संस्कृतीचे विविध पैलू, पर्यटन, खाद्यसंस्कृती, फॅशन, पॅरेंटिंग, लाईफस्टाईल ब्लॉग्स वाचायचे असतील तर रीतभातमराठीला नक्की भेट द्या.

Share your love
Facebook
Twitter

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *