Skip to content Skip to sidebar Skip to footer

भारतीय स्वातंत्र्य दिनवर थोडक्यात माहिती

essay on independence day in marathi :

दोनशे वर्षांच्या गुलामगिरीतून सुटल्यानंतर, पहिल्यांदा सर्व देशवासीयांना भारतीय म्हणून संबोधित करण्यात आलेला हा दिवस संपूर्ण देशासाठी कायमच अविस्मरणीय असणार यात शंकाच नाही.

मित्रांनो आपला देश ” भारत ” हा एक नव्हे दोन नव्हे तर तब्बल दोनशे वर्षे ब्रिटिश सरकारच्या म्हणजेच इंग्रजांच्या ताब्यात होता. आपण शाळेत जेंव्हा इतिहासात शिकलो, की इंग्रजांनी आपल्या देशवासीयांवर किती अत्याचार केले, किती भयानक शिक्षा दिली ते आठवले की आजही अंगावर काटा उभा राहतो. जीवंत पणी मरण यातना भोगायला लावल्या इंग्रजांनी आपल्या भारतीय देशवासीयांना. आपण त्या काळी तिथे असतो तर माहीत नाही काय केले असते, कसे सामोरे गेलो असतो या परिस्थितीला.

कदाचित घाबरून अन्याय सहन करीत राहिलो असतो. पण त्या काळातही अन्यायाविरुद्ध आवाज उठवणारे लोक होते आणि त्यांनी तो उठवला. केवळ उठवलाच नाही त्या आवाजाला एका लढाईचे स्वरूप प्राप्त करून दिले, सगळ्यांना त्यात सामील करून घेतले आणि ती लढाई यशस्वी करून दाखवली. आजही त्या लढवय्या नेत्यांचा इतिहास आपण आपल्या पिढीला शिकवत आहोत आणि शिकवत राहू. महात्मा गांधी यांनी केलेला असहकार आंदोलन, मिठाचा सत्याग्रह, जालियनवाला बाग हत्याकांड, भगतसिंग यांचे उपोषण तसेच अन्न पाण्याचा त्याग, सुभाषचंद्र बोस यांच्या घोषणा…… बापरे आजही या सगळ्या गोष्टी जशास तशा आठवतात हो ना ??

त्यामुळेच ऑगस्ट महिना म्हटलं की डोळ्यासमोर येतो तो १५ ऑगस्ट हा स्वतंत्रता मिळालेला दिवस. हा दिवस आपल्या भारतीय बांधवांसाठी अतिशय महत्त्वाचा आणि कायमस्वरुपी लक्षात राहील असाच तर आहे. कारण या दिवशी ब्रिटिश सरकारच्या तावडीतून आपला देश स्वतंत्र झाला. आपण खऱ्या अर्थाने स्वतंत्र झालो, भारतीय अशी ओळख निर्माण करू शकलो. त्यामुळे हा दिवस एखाद्या सणाप्रमाणे,उत्सवाप्रमाणे आपला पूर्ण भारत देश मिळून साजरा करतो. दिवाळी, दसरा या सणादिवशी जसा उत्साह असतो तोच उत्साह हा दिवस साजरा करताना आपल्यात असतो.

=====================

या दिवशी एक वेगळेच चैतन्य, एक वेगळीच ऊर्जा, उत्साह सळसळत असतो भारतवासीयामध्ये. आपल्या देशाबद्दलचा अभिमान प्रत्येकाच्या डोळ्यात ओसंडून वाहत असतो. फक्त देशाबद्दलच नाही तर देशासाठी जीव वेचणाऱ्या प्रत्येक देशभक्तासाठीचा अभिमान असतो तो.

या दिवशी ठिकठिकाणी देशभक्तीची गाणी लावलेली असतात, रस्त्यावर मोठमोठ्या रांगोळ्या काढल्या जातात, प्रभात फेरीनी, घोषणांनी रस्ते भरून गेलेले असतात, जागोजागी झेंडा फडकत असतो, राष्ट्रगीताचे स्वर कानावर पडत असतात,भारत माता की जय च्या घोषणे बरोबर हात नकळत सलामी द्यायला वर होतात त्यामुळे वातावरण कसे भारावून गेलेले असते. नकळत देशाचा इतिहास डोळ्यासमोरून जातो, आणि देशवीरांनी केलेले बलिदान आठवते आणि अंगावर रोमांच उभा राहतो.

येत्या १५ ऑगस्ट २०२२ रोजी ६८ वा स्वातंत्र्य दिवस आपण साजरा करणार आहोत. स्वातंत्र्य दिवस म्हणजे काय तर १५ ऑगस्ट १९४७ रोजी आपल्या भारताला ब्रिटिश सरकार पासून खऱ्या अर्थाने राजकीय स्वातंत्र्य मिळाले आणि आपली “भारतीय” ही ओळख आपण अभिमानाने सगळ्या जगाला सांगू शकलो. पण हे स्वातंत्र्य मिळण्यासाठी कित्येक लोकांनी आपले जीव गमावले आहेत, संपूर्ण आयुष्य स्वातंत्र्यासाठी वेचले आहे. अनेक तडफदार नेते आणि देशभक्त यात आहेत ज्यांच्या लढण्यामुळे आज आपण स्वतंत्र आहोत.

====================

टिळक, बोस, गांधी, पटेल, राजगुरू, सुखदेव, भगतसिंग अशा कितीतरी देशभक्तांनी आपल्याला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी ब्रिटिश सरकारचा टोकाचा छळ सहन केला ज्याची कल्पनाही न केलेलीच बरी. व्यापारासाठी म्हणून आलेल्या या ब्रिटिश सरकारने आपला देशच काबीज केला आणि देशाची लुटमार तर केलीच शिवाय आपल्या देशवासीयांना गुलामगिरीत ठेवले, एखाद्या जनावरासारखे काम करून घेतले, उपाशी ठेवले, हवे तसे वागवले. या अन्यायाविरुद्ध ज्यांनी आवाज उठवले त्यांचा आवाज बंद करण्याचा प्रयत्न केला पण आपले भारतीय देशवासी लढतच राहिले आणि शेवटी १५ ऑगस्ट १९४७ रोजी आपल्या लढाईत ते यशस्वी झाले आणि खऱ्या अर्थानं आपण स्वतंत्र झालो.

आपल्याला ज्ञान देणाऱ्या, जगण्याची नैतिक मूल्ये शिकवणाऱ्या गुरूंना मानवंदना देणाऱ्या या दिवसाचे महत्त्व जाणून घेऊया …..

आयुष्यातील अनुभवांना पुस्तकांच्या माध्यमातून आपल्यासोबत शेअर करणाऱ्या या लेखिकेची पुस्तके एकदा तरी नक्कीच वाचा

भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर आपल्या सांस्कृतिक आणि धार्मिक विविधतेमुळे भारत एकसंध रहाणार नाही असे बोलले गेले होते पण विविधतेत एकता हेच आपल्या भारताचे वैशिष्ठ्य ठरले आणि गेल्या ६८ वर्षात एकदाही त्याला तडा गेला नाही ही खरंच खूप अभिमानाची बाब आहे. उलट दिवसेंदिवस आपला भारत शेती, विज्ञान, शिक्षण, तंत्रज्ञान यात प्रगती करतोच आहे. आज भारताकडे स्वतःचा अण्विक साठा आहे आणि भारत महासत्ताकडे वाटचाल करणार असेही म्हटले जात आहे.

भारत हा खूप मोठा देश आहे आणि विविधतेने नटलेला आहे. आपल्या देशात अनेक सण उत्साहाने साजरे केले जातात. हे सण भारतीय कॅलेंडर किंवा तिथीनुसार साजरे करतात पण स्वातंत्र्य दिवस हा सण इंग्रजी कॅलेंडर नुसार साजरा होतो कारण स्वातंत्र्य मिळण्यापूर्वी आपण इंग्रजी कॅलेंडरची मान्यता स्वीकारली होती आणि हा सण आपण काही वर्षांपूर्वी साजरा करण्यास सुरुवात केली.

बाकी सगळे सण हे आपापल्या पद्धतीनुसार साजरे होत असले तरीही स्वातंत्र्य दिवस मात्र संपूर्ण देश एकत्रित येऊन साजरा करण्यात येतो. कारण हा सण भारताच्या संस्कृतीशी आणि पूर्ण भारताशी जोडला गेलेला आहे. याच दिवशी आपल्या भारताला पूर्ण स्वातंत्र्य मिळाले. फक्त भारतातच नव्हे तर भारताबाहेरही हा दिवस अतिशय उत्साहाने साजरा करण्यात येतो.

====================

हा तो दिवस आहे जेंव्हा भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी दिल्लीच्या लाल किल्ल्यावरून लाहोरी गेटवर भारताचा तिरंगा फडकवला होता आणि सगळ्या देशाला भारतीय म्हणून संबोधित केले होते.

या दिवशी पूर्ण देशात देशभक्तीचे वातावरण असते. तब्बल दोनशे वर्षांच्या गुलामगिरी नंतर भारताची मुक्तता झाली ती याच दिवशी. त्यामुळे हा दिवस एखाद्या सणाप्रमाणे साजरा करण्यात येतो. वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळे उपक्रम राबवून हा उत्सव साजरा करतात. भारतीय असण्याचा अभिमान वाटण्याचा हा दिवस.

शाळेत देशभक्ती पर गाणी लावून, नृत्य करून, भाषणे करून, नेत्यांच्या घोषणा देत प्रभातफेरी काढून हा दिवस साजरा केला जातो. तर ऑफिसमध्ये, कामाच्या ठिकाणी झेंडा फडकावून मानवंदना दिली जाते.

ज्या देशाच्या स्वातंत्र्यासाठी अनेकांनी प्राण वेचले, ज्या स्वतंत्र भारताची स्वप्ने त्यांनी पहिली होती, त्याच प्रकारे आज आपला देश स्वतंत्र आहे का ?? आपण ब्रिटिश सरकारच्या गुलामगिरीतून मुक्त झालो असलो तरीही भ्रष्टाचार, महागाई, रोगराई, वाढते राजकारण, स्वच्यता यांच्या तावडीतून सुटलो आहोत का.

आपला देश इंग्रजांच्या गुलाम गिरीतून मुक्त व्हावा यासाठी लढले आपले देश वासी पण आपण दिवसेंदिवस भ्रष्टाचार, महागाई, राजकारण यांच्या गुलामगिरीत अडकत आहोत त्याचे काय ?? अशा स्वतंत्र भारताची स्वप्ने पहिली नव्हती गांधी, सुखदेव, भगतसिंग, पटेल, बोस यांनी. जर आज हे नेते दुरून आपल्याकडे पहात असतील तर ते समाधानी असतील का ?? ज्या देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी आपण प्राण त्याग केला, ज्यांच्यासाठी केला त्या भारतीय लोकांना पाहून त्यांना आनंद होत असेल का ??

भारत हा एक लोकतान्त्रिक देश आहे, प्रत्येकाला हवे तिथे राहण्याचे स्वातंत्र्य भारतात आहे. पण आजही रोज अनेक प्रश्न देशासमोर आहेत ज्यांची उत्तरे आपण शोधत आहोत. एक वेळ आपण परकियांशी लढू पण स्वकियांशी कोण लढणार. आपल्याला देशाच्या स्वातंत्र्याची किंमत कधी कळणार आहे ??

ज्या लोकांनी स्वातंत्र्य मिळावे म्हणून स्वतःचे प्राण वेचले त्याची जाणीव सर्वांनीच ठेवायला हवी आणि ती फक्त त्या दिवसापूरती नको तर रोजच ठेवून वागायला हवे इतकेच म्हणावेसे वाटते. सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!!!

===================

marathi goshta

marathi story

marathi moral stories

marathi love story

marathi motivational stories

Leave a Comment

error: