Ritbhatmarathi

Search
Close this search box.

श्री. एकनाथ शिंदे यांची माहिती

eknath shinde biography in marathi: आर्थिक परिस्थितीमुळे शिक्षण अर्धवट सोडावे लागणाऱ्या आणि नंतर एका संधीमुळे आयुष्याला वेगळेच वळण लागल्यानंतर यशाची उंची गाठणाऱ्या या नेत्याची गोष्ट प्रेरणादायी ठरेल यात शंकाच नाही…..

मित्रांनो राजकारण हा सगळ्यांच्या आवडीचा विषय. आता सध्या टीव्ही आणि पेपरमधे राजकारण हाच विषय बघायला मिळत आहे. राजकारणात तसे अनेक पक्ष आणि प्रत्येक पक्षात अनेक नेते मंडळी आहेत. राजकारणात येऊन अनेकांनी नाव कमावले आणि प्रसिद्धी पण. बऱ्याच नेत्यांनी राजकारणात येऊन आपल्या कामाने स्वतःचे स्थान निर्माण केले. केवळ आश्वासने दिली नाहीत तर ती पूर्ण करून लोकांची मने जिंकली. आता निवडणुका जवळ आल्याने सगळीकडे हीच चर्चा सुरू आहे. महाराष्ट्रातील राजकारणात अतिशय महत्त्वाचा मानला जाणारा पक्ष म्हणजे शिवसेना.

शिवसेनेत बाळासाहेब ठाकरे आणि उद्धव ठाकरे नंतर आदराने घेतले जाणारे नाव म्हणजे एकनाथ शिंदे. घरातील आर्थिक अडचणीमुळे शिक्षण अर्धवट सोडून नंतर जिद्दीने पूर्ण करणाऱ्या या नेत्याबद्दल जाणून घेऊया काही खास गोष्टी.

[tablesome table_id=’17309’/]

एकनाथ शिंदे यांचा जन्म ९ फेब्रुवारी १९६४ रोजी झाला. त्यांचे प्राथमिक शिक्षण ठाणे येथील किसननगर क्र. ३ येथील ठाणे महानगरपालिकेच्या शाळा क्र. २३ येथे झाले. तर माध्यमिक शिक्षण ठाणे येथीलच मंगला हायस्कूल येथे झाले. गरिबी परिस्थितीशी सामोरे जात त्यांनी मंगला हायस्कूल मध्ये ११ वी पर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. पण नंतरचे शिक्षण पूर्ण करता आले नाही. कुटुंबाचा गाडा चालवण्यासाठी शिक्षण सोडून एका मासळी विकणाऱ्या कंपनीत काम करू लागले. पण पाहिजे तसा पैसा मिळेना त्यामुळे ती नोकरी सोडली आणि प्रवासी रिक्षा चालवण्याचे काम करू लागले. पण शिकण्याची इच्छा मात्र कायम होती त्यामुळे पुढे आयुष्यात स्थैर्य आल्यावर त्यांनी शिक्षणाला सुरुवात केली आणि बी.ए ७७.२५ टक्के गुणासह पूर्ण केले.

सत्तरच्या दशकात बाळासाहेब ठाकरेंच्या वक्तृत्वाने अनेक युवक शिवसेनेशी जोडले गेले. त्यावेळी आनंद दिघेंच्या नेतृत्वात ठाण्यात शिवसेनेचे काम चालू होते. ८० च्या दशकात एकनाथ शिंदे आनंद शिंदेच्या संपर्कात आले आणि तेंव्हापासून त्यांच्या आयुष्याला राजकीय वळण मिळाले. ठाण्यात दिघेंच्या नेतृत्वात शिंदेंनी अनेक आंदोलनात सहभाग घेतला. महाराष्ट्र कर्नाटक सीमेच्या आंदोलनात तर पोलिसांचा लाठीमार सहन करत करावास भोगला. ठाण्यातील शिवसेनेच्या प्रत्येक आंदोलनात समोर असणाऱ्या शिंदे यांच्या कामामुळे दिघे प्रभावित झाले आणि त्यांना किसन नगरचे शाखा प्रमुख केले. त्यावेळी समाजात जागोजागी होणाऱ्या अन्यायाच्या विरोधात आणि मराठी माणसाच्या हितासाठी आक्रमक भूमिका घेणारी संघटना म्हणून शिवसेनेचा दबदबा निर्माण झाला होता.

अशा वातावरणात एकनाथ शिंदे यांनीही शिवसेनेचा झेंडा हाती घेतला. तेव्हापासून श्री. दिघे यांच्या नेतृत्वाखाली अनेक आंदोलनांमध्ये एकनाथ शिंदे यांनी भाग घेतला. गोरगरीब जनतेला स्वस्त दरात धान्य उपलब्ध करून देणे, टंचाईच्या काळात पामतेल उपलब्ध करून देणे, नागरी समस्यांविरोधात सरकार व प्रशासनाविरोधात केली जाणारी आंदोलने यातही एकनाथ शिंदे आघाडीवर असायचे. सन १९८६ साली सीमाप्रश्नी झालेल्या आंदोलनात एकनाथ शिंदे यांनी ठाण्यातील शिवसेनेच्या १०० कार्यकर्त्यांसह भाग घेतला होता. त्यावेळी बेल्लारी येथील तुरुंगात त्यांना ४० दिवस कारावास झाला होता. अवघ्या विसाव्या वर्षी त्यांनी शिवसेनेच्या माध्यमातून समाजकारण व राजकारणात प्रवेश केला. फक्त प्रवेश केला नाही तर खूप कमी कालावधीत एक वेगळे स्थान निर्माण करण्यात यश मिळवले. समाजाच्या हितासाठी कुठल्याही संकटाला सामोरे जाण्याची तयारी ठेवली एकनाथ शिंदे यांनी.

—————–

1997 मध्ये दिघेंनी त्यांना ठाणे महानगरपालिका निवडणुकीचे तिकीट दिले. या निवडणुकीत ते बहुमतांनी शिवसेनेचे नगरसेवक म्हणून विजयी झाले. पुढे ते ठाणे महानगरपालिकेच्या सभागृहाचे नेतेही झाले. त्यानंतर मात्र शिंदे यांनी कधीच मागे वळून पहिले नाही. ते राजकारणात वरची पायरी चढतच गेले. सन २००१ मध्ये त्यांची ठाणे महानगरपालिकेच्या सभागृहपदी निवड झाली. सन २००१ ते २००४ अशी सलग तीन वर्षे ते या पदावर कार्यरत होते. मात्र, केवळ स्वतःच्या वॉर्डापुरते अथवा महानगरपालिका हद्दीपुरते स्वतःला मर्यादित न ठेवता संपूर्ण जिल्हा त्यांनी पालथा घातला. त्यामुळे जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातले कार्यकर्ते त्यांच्याशी जोडले गेले. सन २००४ साली बाळासाहेब ठाकरे यांनी त्यांना विधानसभा निवडणुकीसाठी ठाणे विधानसभा मतदारसंघातून प्रथम उमेदवारी दिली.

या निवडणुकीत ते मोठ्या मताधिक्याने निवडून आले. त्यानंतर पुढल्याच वर्षी शिवसेनेचे ठाणे जिल्हाप्रमुख म्हणून त्यांची नियुक्ती झाली. जिल्हाप्रमुख आणि आमदार या दोन्ही पदांवर नियुक्ती झालेले ते शिवसेनेतील पहिलेच नेते होते. जनतेच्या प्रश्नाला सातत्याने वाचा फोडत राहिल्यामुळे सन २००९, २०१४ आणि २०१९ अशा सर्व निवडणुकांमध्ये मतदारांनी त्यांना सातत्याने चढत्या मताधिक्याने विधानसभेवर पाठवले.

——————

एकनाथ शिंदे यांच्या कामाचा धडाका बघून उद्धव ठाकरे यांनी जानेवारी २०१९ मध्ये त्यांच्याकडे आरोग्यमंत्रीपदाची जबाबदारी सोपवली. आरोग्यमंत्री म्हणून त्यांना जेमतेम सात ते आठ महिन्यांचा कालावधी मिळाला. परंतु, एवढ्या अल्प कालावधीतही त्यांनी धडाकेबाज निर्णय घेत अनेक प्रलंबित विषय मार्गी लावले आणि सार्वजनिक आरोग्य व्यवस्था बळकट करण्याचा प्रयत्न केला.

या पदावर काम करत असताना शिंदे यांनी एमबीबीएस डॉक्टर्स आणि विशेषज्ञांची ८९० पदे भरली.
ग्रामीण भाग, दुर्गम भाग आणि आदिवासी भागामध्ये आरोग्य पथकांच्या माध्यमातून कंत्राटी तत्त्वावर सेवा देणाऱ्या बीएएमएस डॉक्टरांना नियमित करण्याची मागणी १० वर्षे प्रलंबित होती. या ७३८ बीएएमएस डॉक्टरांना नियमित करण्याचा निर्णय एकनाथ शिंदे यांनी घेतला.
राष्ट्रीय आरोग्य योजनेअंतर्गत राज्यात सुमारे ३४ हजार कंत्राटी कर्मचारी अत्यंत तुटपुंज्या मानधनावर सेवा देत होते. त्यांना किमान वेतन कायद्यानुसार वेतन देण्याचा निर्णय एकनाथ शिंदे यांनी घेतला. त्यामुळे प्रत्येकाला किमान १५ हजार ६०० रुपये वेतन लागू झाले.

मायबोली मराठी मधून रेसिपीसचे व्हिडिओज युट्युब वर टाकून आज कमावते करोडो रुपये

आयुष्याला कलाटणी देणारी सुद्धा मूर्तींची हि पुस्तके नक्कीच वाचून बघा

राज्याच्या कानाकोपऱ्यात सेवा देणाऱ्या आशा सेविकांची वेतनवाढ केली.
ग्रामीण भागात डायलिसिस सुविधा मिळावी, यासाठी १०२ डायलिसिस मशिन्स खरेदी करून उपजिल्हा रुग्णालयांमध्येही डायलिसिस केंद्रे सुरू करण्याच्या प्रक्रियेला गती दिली.

प्राथमिक आरोग्य केंद्रांचे आरोग्यवर्धिनी केंद्रांमध्ये रूपांतर करण्याच्या प्रक्रियेला वेग दिला. त्यात ११०० आरोग्यवर्धिनी केंद्रे कार्यान्वित झाली आहेत. आणखी ५२०० उपकेंद्रांचे आरोग्यवर्धिनी केंद्रांत रूपांतर करायला केंद्राने मंजुरी दिली होती. तेथील डॉक्टरांच्या माध्यमातून माता व बालकांचे आरोग्याचे प्रश्न, दात, डोळे, मधुमेह, रक्तदाब आदी आजारांवर तातडीचे प्राथमिक उपचार मिळाले.

कुपोषणाचे प्रमाण कमी करण्यासाठी मेळघाट पॅटर्न तयार केला. आरोग्यमंत्री या नात्याने एकनाथ शिंदे यांनी स्वतः संपूर्ण आरोग्य यंत्रणा सोबत घेऊन मेळघाटाचा दोन दिवसांचा दौरा त्यावेळी केला. राज्याच्या इतिहासात पहिल्यांदाच अशा प्रकारे सर्व यंत्रणांनी एकत्र येऊन कुपोषणमुक्तीचा आराखडा तयार केला असून अमलबजावणीला सुरुवातही केली गेली.

गोरगरीब रुग्णांना विनामूल्य उपचार मिळावे, यासाठी बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना ही योजना एकनाथ शिंदे यांच्या संकल्पनेतून सुरू झाली असून केंद्र सरकारने ६० दवाखान्यांना मंजुरी दिली आहे.
ठाणे जिल्हा सर्वसाधारण रुग्णालयाच्या पुनर्विकासाला आरोग्यमंत्री या नात्याने एकनाथ शिंदे यांनी गती देऊन या प्रकल्पाला सुरुवात देखील झाली आहे.

———————

तसेच, ठाण्यातील हाजुरी येथे गरिबांसाठी ठाणे महापालिका आणि जितो ही सेवाभावी संस्था यांच्या संयुक्त वतीने सुसज्ज महावीर जैन रुग्णालय सुरू केले. येथे कॅथलॅब आणि डायलिसिसची सुविधा देखील सुरू केली.
शिंदे यांनी इतके छान काम केले की निती आयोगाने अलिकडेच जाहीर केलेल्या क्रमवारीत हेल्थ इंडेक्समध्ये एकनाथ शिंदे यांच्या योगदानामुळे राज्याचा तिसरा क्रमांक आला आहे. त्यांचे तडफदार काम पाहून सगळेच प्रभावित झाले आणि दिनांक ३० जून २०२२ रोजी त्यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली.

प्रचंड मेहनत, चिकाटी, पक्षसंघटन, कार्यकर्त्यांशी संवाद, बैठका आणि जनतेच्या प्रश्नांवर विचारमंथन करून त्यांचा निपटारा करणे ह्या एकनाथ शिंदे यांच्या जमेच्या बाजू राहिल्या आहेत. याबरोबरच कितीही अडचणीचा, संकटांचा सामना करून पुढे जात राहणं हि एक त्यांची वेगळी ओळख आहे.

यशाची एवढी उंची गाठून सुधा आपल्या गुरूंना म्हणजेच दिघेंना ते विसरले नाहीत. त्यामुळेच आजही त्यांच्या राजकीय यशाचे श्रेय ते आनंद दिघेंना देतात. अशा या तडफदार नेत्याची गरज आपल्या देशाला कायमच राहील आणि यांनी केलेल्या कामाची नोंद जनता कायम मनात ठेवेल.

===================

प्रिय वाचकहो, उत्तम बोधकथा/moral stories in marathi, प्रेम कथा, रहस्य कथा, कथामालिका, भारतातील संस्कृतीचे विविध पैलू, पर्यटन, खाद्यसंस्कृती, फॅशन, पॅरेंटिंग, लाईफस्टाईल ब्लॉग्स वाचायचे असतील तर रीतभातमराठीला नक्की भेट द्या.

Share your love
Facebook
Twitter

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *