Skip to content Skip to sidebar Skip to footer

दुसरे लग्न ??

आज शालिनी आणि रवीच्या लग्नाचा वाढदिवस होता. आज लग्नाला ३ वर्षे झाली होती. शालिनी साधारण ४० शीतली होती आणि रवी वय वर्षे ५०. 
आता तुम्ही म्हणाल की एवढ्या उशिरा लग्न !!!!!!!

होय !! खरंतर हे दोघांचंही दुसरं लग्न होतं. शालिनीचा पहिला नवरा खूप दारू प्यायचा आणि तिला त्रास द्यायचा, त्यामुळे शालिनीने लग्नाच्या १ वर्षातच वेगळे होयचा निर्णय घेतला होता. शालिनी उच्चशिक्षित होती आणि स्वावलंबी असल्याकारणाने तिला डिवोर्स नंतर पैशाची कमी कधी भासली नाही. पण जोडीदार नाही म्हणून तिला नेहमीच खंत असायची. पहिल्या लग्नात तिला जो काही अनुभव आला होता, त्या कारणाने तिने दुसऱ्या लग्नालाच पूर्णविराम दिला होता. शालिनीपुढे तिचे नातेवाईक देखील नतमस्तक झाले होते.

दुसरीकडे रवी होता…. ज्याचं सगळं काही छान चाललं होतं. रवी एका नामांकित कंपनी मध्ये मॅनेजर होता. त्याची बायको गृहिणी आणि त्यांना २ मुलं. सगळं काही सुरळीत होतं. अगदी एखाद्या मूवी सारखं “हम २ हमारे २”. पण नियतीला काहीतरी वेगळंच मजूर होतं. साधारण १० वर्ष पुर्वीची घटना. रवी आणि त्याचं कुटुंब महाबळेश्वर ला फिरायला गेले होते. परतताना त्याच्या गाडीला अपघात झाला आणि त्यात त्याची बायको वाचू नाही शकली. रवी आणि त्याची मुलं त्या अपघातातून वाचली खरी, पण आई गेल्या कारणाने मुलं पोरकी झाली होती. आणि रवी ची तर अवस्था बघण्यासारखीच होती. मुलंही फार काही मोठी नव्हती. रवीचा मोठा मुलगा १० वर्षांचा असेल आणि मुलगी ५ वर्षांची. त्या घटनेनंतर रवीचे आई वडील आणि जवळच्या मित्र मंडीळीनी त्याला दुसऱ्या लग्नाचा खूप आग्रह केला होता. पण रवीने कुणाचंच ऐकलं नाही. त्याला भीती होती की दुसरं लग्न केल्यानंतर ज्या मुलांना आपल्या बायकोने एवढं सांभाळलं ती दूर होतील त्याच्यापासून.

असेच घटनेला २-३ वर्षे गेले. रवीने दुसरं लग्न न करण्याचा निर्णय घेतल्यामुळे मुलांची सगळी जबाबदारी त्याने उत्तम निभावली. ते म्हणतात ना की “वेळ आली माणसावर तेव्हा तो त्यातून निभावून निघतो. ” रवीच्या बाबतीत देखील हे खरं ठरलं होतं. बायको होती तेव्हा रवी सारखा माणूस ज्याने कधीच मुलांना टाइम दिला नव्हता. मुलांचे शाळेचे डब्बे ,त्यांना तयार करणे , त्यांचा अभ्यास , ट्युशन्स , त्यांना काय हवं नको ते सगळं रवीची बायकोच बघायची. पण आता रवी हळू हळू सगळं शिकला होता आणि तो हे सगळं एन्जॉय करू लागला होता.

खरंतर शालिनी आणि रवी एकाच ऑफिस मध्ये होती. पण वेगळ्या प्रोजेक्ट्स मध्ये असल्या कारणाने त्यांची कधीच भेट झाली नव्हती. एक दिवस कामानिमित्त त्या दोघांची भेट झाली होती. त्यानंतर बऱ्याचदा कामानिमित्त का होईना पण त्यांची भेट होईला लागली होती. प्रोफेशनल लाइफ मधले सहकारी पर्सनल लाइफ मध्ये फ्रेंड्स कसे झाले कळलंच नाही. ते दोघेही ऑफिस नंतर आता कॉफी शॉप मध्ये देखील भेटायचे. हळू हळू ते एकमेकांवर प्रेम करू लागले होते. पण दोघेही अजून पण लग्नाच्या विरोधातच होते. कारण त्यांना भीती वाटायची की लग्नामुळे आपली फ्रेंडशिप तुटायला नको.  त्यात रवीचा देखील अजून आक्षेपार्ह होता की शालिनी लग्नानंतर आपल्या मुलांना अड्जस्ट करून घेईल का? आणि मुलं तिला समजून घेतील का? लग्न केलं की रवीचं शालिनी आणि मुलासोबत नातं तर खराब होणार नाही ना….. समाजामध्ये तसेही बिना लग्नाच्या २ व्यक्ती अगदी एखाद्या कॉफी टेबल वर जरी बसले असतील तर समाज त्यांना शंकास्पद नजरेने बघतो. शालिनी आणि रवी सोबत देखील तेच झालं. त्या दोंघाबद्दल ऑफिस मधले सहकारी नाही नाही ते बोलायला लागले होते. पण शालिनी रवीचं नातं पवित्र होतं त्यामुळे त्यांनी दुर्लक्ष केलं.

एक दिवस कॉफी टेबल वर त्या दोघांना रवीच्या मुलीने नित्याने त्यांना पाहिलं. नित्या त्याच शॉप मध्ये आपल्या फ्रेंड्स सोबत आली होती. नित्याला पहिले थोडं विचित्र वाटलं. ती दुरूनच त्या दोघांना न्याहळत होती. शालिनीचे हावभाव ओब्सर्व करत होती. त्या दोघांना बघताच तिच्या मनात दाट शंका आली की नक्की काहीतरी नातं आहे ह्या दोघांमध्ये. तिने घरी जाऊन आपल्या मोठ्या भावाला दक्षला आणि आजी आजोबांना सांगितलं. रवी रात्री घरी आला, पण सगळे त्यासोबत नॉर्मलच वागत होते. कुणी त्याला जाणून नाही दिलं की आज त्याला नित्याने एका अनोळखी स्त्रीसोबत पाहिलं होतं.

त्या घटनेनंतर १० दिवसात रवीच्या घराचा गृहप्रवेश होता. रवीने एक दुमजली घर घेतलं होतं. मुलं मोठी झाली होती, त्यामुळे राहायला जागा कमी पडत होती. म्हणून त्याने नवीन घर घेतलं होतं. आज सकाळपासून रवीची धांदल उडाली होती. सगळं काही तो आणि मुलंच बघत होती. संध्याकाळी सगळे पाहुणे येणार होते. पूजेची वेळ झाली होती. ब्राम्हणाने रवीला हाक मारली आणि पूजेसाठी बसायला सांगितलं. रवी जाऊन बसला तेवढ्यात त्याच्या शेजारी शालिनी हि जाऊन बसली. शालिनीला बघून रवी चकितच झाला. शालिनीने छान जरीची साडी घातली होती. तिच्या गोऱ्या चेहऱ्यावर चंद्रकोर आणि नथ उठून दिसत होती.

रवी – “शालिनी तू !!!!! तू इथे काय करतेस? “

शालिनी – “अरे रवी , हे सगळं तुझ्या नित्या आणि दक्षलाच विचार!! “

शालिनी काय बोलतेय रवीला काही कळेनाच. शेवटी नित्या आणि दक्ष ने रवीला सांगितलं कि कसं नित्याने त्या दोघांना कॉफी शॉप मध्ये बघितलं होतं आणि मग रवीच्या मोबाईलमधून शालिनीचा कॉन्टॅक्ट नंबर घेतला…… तिला फोन केला आणि तिला जाऊन भेटले. तिथे गेल्यावर शालिनीने त्यांना सगळं सांगितलं.

नित्या – “बाबा आज गृहप्रवेश आहे आणि गृहप्रवेशाच्या पूजेसाठी जोडीने बसायचं असतं. म्हणून मग आम्ही “आईला ” इथे घेऊन आलो “

दक्ष – “बाबा तुम्ही आई गेल्यावर आमची इतकी काळजी घेतली. आम्हाला आई ची कमी कधी जाणून नाही दिली. सोबतच आजी आजोबांना देखील कधीच वाटू नाही दिलं की घरात त्यांची सून नाहीये. तुम्ही इतके वर्ष आई बाबांची भूमिका निभावली. पण मला तुमचा एकटेपणा जाणवतो. भलेही तुम्ही आजपर्यंत कुणाला बोलून नाही दाखवलं, पण तुम्हाला सतत जोडीदाराची खंत वाटत असते. बाबा आम्ही मोठे झालो आहोत. आता वेळ आमची आहे कि आम्ही तुमच्यासाठी काहीतरी करू आणि आजी आजोबांची तुम्ही काही काळजी करू नका त्यांना देखील सगळं माहित आहे. “

हे सगळं ऐकून रवीच्या डोळ्यात आनंदाश्रू आले आणि तो ज्यांच्यामुळे इतके दिवस संभ्रमात होता आणि लग्न न करण्याचा निर्णय त्याने घेतला होता…. आज त्यांनीच त्याच लग्न जमवून आणलं होतं. शालिनीला देखील इतकी वर्ष कुणाचा सहवास लाभला नव्हता. ती एकटीच राहायची. त्यामुळे रवीचं आनंदी कुटुंब पाहून शालिनीला देखील हवंहवंसं वाटत होतं. शेवटी गृहप्रवेशाच्या दिवशी रवी आणि शालिनीच्या संमतीने… देवा ब्राह्मणाच्या साक्षीने… त्यांचा छोटासा लग्न समारंभ पार पडला.

लग्नानंतर शालिनीने स्वेच्छेने आपल्या प्रोफेशनल कामातून निवृत्ती घेतली आणि नवीन कुटुंबात चांगलीच रमली होती. शालिनी ने मुलांना कधीच दुजाभाव केला नाही.. तर रवीच्या आई वडिलांची देखील छान काळजी घेतली आणि रवीने देखील शालिनीला दुसरी बायको म्हणून कधीच जाणवू दिलं नाही .आज लग्नाचा ३ रा वाढदिवस होता. मुलांनी दोघांना युरोप ची तिकिटे देऊन छान सरप्राईझ दिलं होतं.

अशाप्रकारे २ कोमेजलेली मने उमजली आणि त्याचा सुखाचा संसार सुरु झाला

==================

प्रिय वाचकहो आमच्या कथा तुम्हाला वाचायला आवडत असतील तर आमच्या फेसबुक पेजला फॉलो करून लेखकांना प्रतिसाद नक्की द्या. जेणेकरून नवोदित लेखकांना प्रेरणा मिळेल.

https://www.facebook.com/ritbhatmarati/

तसेच तुम्हालाही लिहायची आवड असेल तर आमच्याशी संपर्क साधा.

ritbhatmarathi@gmail.com

फोटो साभार – गूगल

आमची स्टोरी आमच्या/लेखकाच्या नावासकट शेयर केल्यास आम्हास काही हरकत नाही

=============

हेही वाचा

marathi goshta

marathi story

marathi moral stories

marathi love story

marathi motivational stories

1 Comment

  • Nandini Sankhe
    Posted May 11, 2021 at 6:43 pm

    khuoch sunde…mazich story ahe…amcgya lagnala 8 varsh zali

    Reply

Leave a Comment

error:

Warning

सध्या युट्युब वर कथा चोरी करून वाचून दाखवण्याचे धंदे चालू आहेत लोकांचे. आमच्या वेबसाईट वरची कथा कुठल्याही युट्युब चॅनेलवर बेकायदेशीररित्या आढळल्यास त्या चॅनेलला लगेच रिपोर्ट करण्यात येईल ह्याची कृपया दक्षता घ्यावी. तसेच आपल्या वाचकांपैकी कुणालाही असे बेकायदेशीर चॅनेल्स आढळल्यास आम्हाला ritbhatmarathi@gmail.com ह्या ई-मेल वर त्वरित कळवावे.