Skip to content Skip to sidebar Skip to footer

द्रौपदी मुर्मू यांची माहिती । Draupadi Murmu information in Marathi

Draupadi Murmu information in Marathi:

भारताच्या  राष्ट्रपतीपदासाठी, भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडीद्वारा द्रौपदी मुर्मू या आदिवासी समाजातील महिलेचे नाव पुढे आले. . . आणि साहजिकच साऱ्यांच्या नजरा या व्यक्तिमत्त्वाकडे वळल्या.

राष्ट्रपतिपदासाठीच्या निवडणुकीची मतमोजणी पार पडली. त्यामध्ये द्रौपदी मुर्मू या मोठ्या मताधिक्क्याने विजयी झाल्या आहेत. त्यांनी यूपीएचे उमेदवार यशवंत सिन्हा यांचा पराभव केला आहे.

दि. २५ जुलै २०२२रोजी द्रौपदी मुर्मू यांनी राष्ट्रपतीपदाची शपथ घेतली. दौपदी मुर्मू या भारताच्या पंधराव्या राष्ट्रपती झाल्या आहेत.

भारताच्या एका लहानशा खेड्यातील एका झोपडीत जन्म झालेल्या मुलीचा इथपर्यंतचा प्रवास हा संघर्षमय व प्रेरणादायी आहे.

Draupadi Murmu information in Marathi:

• ओडिशा राज्यातील संथाल या आदिवासी जमातीत द्रौपदी यांचा जन्म झाला.

• ओडिशा राज्यातील मयुरभंज जिल्ह्यामध्ये बेडापुसी नावाचं छोटसं गाव आहे. तिथे बिरांची नारायण तुडू रहातात.

• बिरांची यांची द्रौपदी ही कन्या. द्रौपदीचे शालेय शिक्षण गावातील माध्यमिक शाळेत झाले. पुढे महाविद्यालयीन शिक्षणासाठी तिने भुवनेश्वरमधील रमादेवी महिला विद्यापीठात प्रवेश मिळविला.

• द्रौपदीला आपल्या समाजातील लोकांबद्दल कळकळ होती. आसपासच्या मुलांना, महिलांना सुधारणेचे धडे देणे तिचे चालूच होते.

• इ.स.१९७९मध्ये त्या कला शाखेच्या पदवीधर झाल्या. त्यानंतर आपल्या समाजाच्या प्रगतीसाठी त्या राजकीय क्षेत्रात उतरल्या. मधील कालावधीत द्रौपदी यांनी नोकऱ्याही बऱ्याच केल्या.

• द्रौपदी यांचे वडील व आजोबा दोघेही पंचायत राज्य प्रणाली अंतर्गत गावप्रमुख होते.

आयुष्यात थोडे हादरे बसले, म्हणून काही संपूर्ण आयुष्य वाया जात नाही – अजय पुरकर

वाचा मराठी महिला उद्योजकांचा प्रवास, संघर्ष आणि अनुभव त्यांच्याच शब्दात

• बिरांची तूडू यांच्या दौपदीची श्याम चरण मुर्मू यांच्याशी लग्नगाठ बांधली गेली. श्याम चरण व द्रौपदीची ओळख महाविद्यालयीन जीवनात झाली. ओळखीचे रुपांतरण भेटीगाठींत व भेटीगाठींचे प्रेमात झाले.परंतु द्रौपदीच्या वडिलांना हे स्थळ मान्य नव्हते. श्याम चरण मात्र माघार घ्यायला तयार नव्हते ते द्रौपदीच्या गावात ठिय्या देऊन बसले. अखेर द्रौपदीचे वडील या दोघांच्या लग्नाला तयार झाले.

• संथाल जमातीत नवऱ्याकडची मंडळी वधुपक्षाला देज देतात. श्याम चरण यांच्या घरुन एक गाय व ४० कपड्यांचे जोड देज म्हणून देण्यात आले होते. श्याम चरण हे बँकेत नोकरी करत होते.

• काही वर्षे द्रौपदी व श्याम चरण यांचा सुखाचा संसार झाला. त्या उभयतांना दोन मुलगे व एक मुलगी झाली. परंतु, त्यांचा मुलगा लक्ष्मण मुर्मु याचे २००९मधे तर मुलगा सिप्पन मुर्मू याचे २०१३मधे निधन झाले.

• त्यातूनही द्रौपदी सावरत होत्या तोच पुढे काही वर्षांनी  २०१४ मधे श्याम चरण मुर्मू यांचे ह्रदयविकाराने आकस्मिक निधन झाले. द्रौपदी यांनी राजस्थामधील माऊंट अबू स्थित ब्रह्यकुमारी सेंटरचा आधार घेतला. तिथे त्या ध्यानधारणा करू लागल्या. राजयोग शिकल्या. दु:खातून बाहेर पडण्यासाठी आध्यात्माचा त्यांनी आधार घेतला.

• आता त्या त्यांची मुलगी इतिश्री मुर्मू हिच्यासोबत रहातात. आयुष्यात एवढी वादळं आली तरी द्रौपदी खचून गेल्या नाहीत. वैयक्तिक दु:ख बाजूला ठेवत आपल्या भगिनीबांधवांच्या उन्नतीसाठी राजकीय वाटचाल करत राहिल्या. आदिवासींच्या हक्कासाठी आवाज उठवत राहिल्या आहेत. म्हणूनच की काय भाजपाने या तेजाची दखल घेत राष्ट्रपती पदासाठी उमेदवार म्हणून त्यांचे नाव पुढे केले.

• द्रौपदी यांना 22 जुलैच्या राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीत 64.03% मते मिळाली. 25 जुलै ला त्यांचा शपथविधी झाल्यानंतर त्या अधिक्रुतपणे भारताच्या राष्ट्रपती होतील.

• सन १९७९ मध्ये ओडिशा सरकारमधील पाटबंधारे व उर्जा विभागात कनिष्ठ सहाय्यक म्हणून द्रौपदी यांना नोकरी मिळाली. 

• द्रौपदी या भाजपमधे अनुसूचित जमातीच्या उपाध्यक्षा म्हणून कार्यरत होत्या.

• सन १९७९ ते १९८३ पर्यंत द्रौपदी यांनी ही नोकरी केली.  त्यांनी सन १९९४ ते ९७ मधे रायरंगपूरमधील अरबिंदो इंटरनेशनल एज्युकेशन सेंटरमध्ये शिक्षिका म्हणूनही नोकरी केली.

• १९९७ मधे द्रौपदी मुर्मू या भारतीय जनता पार्टीच्या तिकीटावर लढून रायरंगपूरमधील नगरपरिषदेत नगरसेविका म्हणून निवडून आल्या.

• इ.स. २०००मधे द्रौपदी मुर्मू या रायरंगपूरमधून राज्यविधानसभेच्या सदस्या म्हणून निवडून आल्या. ओडिशातील भाजप आणि बिजू जनता दल युती सकारच्या काळात द्रौपदी मुर्मू या ६मार्च २००० ते ६ ऑगस्ट २००२ पर्यंत वाणिज्य व वाहतूक विभागाच्या स्वतंत्र प्रभार मंत्री होत्या.

• दि.६ ऑगस्ट २००२ ते १६ मे २००४ पर्यंत त्या मत्स्यव्यवसाय व पशुसंसाधन विकास राज्यमंत्री होत्या.

• २००७ मधे ओडिशा विधानसभेने द्रौपदी मुर्मू यांना सर्वोत्कृष्ट आमदाराचा ‘नीलकंठ पुरस्कार’देऊन गौरविले.

• २०१३ मधे द्रौपदी मुर्मू यांची मयूरभंज जिल्ह्याच्या जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती झाली.

• २०१५ मधे द्रौपदींची झारखंडच्या राज्यपालपदी निवड झाली. ओडिशा राज्यातील त्या पहिल्या महिला व आदिवासी नेता होत. त्यांनी यापूर्वी 2015 ते 2021 पर्यंत झारखंडच्या नवव्या राज्यपाल म्हणून काम केले. पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करणार्‍या झारखंडच्या त्या पहिल्या राज्यपाल ठरल्या आहेत.

• द्रौपदी मुर्मू यांनी २५जुलै २०२२ रोजी भारताच्या राष्ट्रपतीपदाची शपथ घेतली. द्रौपदी मुर्मू या स्वातंत्र्योत्तर काळात जन्मलेल्या पहिल्या राष्ट्रपती आहेत.

६४ वर्षाच्या द्रौपदी मुर्मू या भारताच्या दुसऱ्या महिला राष्ट्रपती व पहिल्या आदिवासी राष्ट्रपती झाल्या आहेत ही भारतीयांसाठी निश्चितच गौरवाची बाब आहे.

=============

marathi goshta

marathi story

marathi moral stories

marathi love story

marathi motivational stories

Leave a Comment

error: